Skip to main content

आपण का जगतो ?

लेखक टारझन यांनी मंगळवार, 26/04/2011 22:27 या दिवशी प्रकाशित केले.
जरा नेहमीची गंमत जंमत बाजुला ठेऊन रोज रात्री आकाशाकडे पहात एकंच प्रश्न पडतो , " आपण का जगतो ? " प्रश्न तसा पाहिला तर साधा वाटतो आणि थोडा तसा पाहिला तर अगदी गुंतडा होतो आणि समाधानकारक उत्तर काही सापडत नाही. कोणी म्हणतं मी भाग्यवान ,माणुस म्हणुन जन्मलो. आहो पण झुरळंही जगतात नी आपणही जगतो. जिवनशैली वेगळी आहे . आपण थोडं ऐश आरामात जगतो ( डीपेंड्स ). मला कुंथुन कुंथुन विचार करुन ह्या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर सापडलेलं नाही. मला चांगले आईबाबा आहेत , मित्र मैत्रिणी आहेत , चांगली नोकरी मिळकत काय असेल तर सगळे आहे, स्वस्थ आहे थोडक्यात मी आहे त्या आयुष्यात सुखी आहे पण तरीही प्रश्न उरतोच की "मी का जगतोय ? " लहानपणापासुन आईबापानं वाढवलं म्हणुन जगलो . नंतर लग्न झालं की बायको , पोरं झाली की त्यांच्या मागण्या पुर्ण करायच्या. पण जर मग ह्या गोष्टी नसतील तर जगण्यात काही राम नाही असे म्हणता येईल काय? बर्‍याच कोनांतुन विचार करुन पाहिल्यावरही, वेगळा विचार करुनही "मी का जगतोय ? " ह्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मला सापडले नाही म्हणुन काथ्याकुट . तुम्हाला माहित्ये का तुम्ही का जगताय ? -( समाधानकारक उत्तरांच्या अपेक्षेत ) टारझन

वाचने 29553
प्रतिक्रिया 107

प्रतिक्रिया

म्हणुन मिपावर नव्हते... :) मलाही हा प्रश्न सतत पडतो. काही उत्तर नाही मिळत.. कदाचित या काथ्याकुटातुन काहि हाताला लागेल.. टारुभाव.... धन्यु...मणातला धागा व्यक्त झाला! का जगतो आपण... सलमानच्या कोणत्यातरी तद्दन फालतु पिक्चरात्ला कायतरी डायलॉग आठ्वला... हर क्यु और कायकु का जवाब नही होता!.... हे का आठवलं काय माहिती आत्ता... असो... धागा मस्त आहे.. मिपाकरानी शिन्शेरली प्रतिक्रिया द्याव्यात... ही मनापासुन विनंती.

उत्तराचा शोध सुरू आहे. कळले की सांगेन. ( हा धागा कुठल्या धाग्याचे विडंबन तर नाही ना, असा प्रश्न अजून ही मनात येतोय :) )

डोळे चोळत चोळत "हे मी काय वाचतो आहे ?" "हे मी कुणाचे वाचतो आहे ? " "हे मीच वाचतोय ना ?" अशा स्वरूपाच्या शंकांची खात्री करून घेण्याचा प्रयत्न करत प्रतिसाद देतो आहे. एक उत्तर : चित्रपट "मदर इंडिया" . गाणे : "दुनिया मे हम आये हैं तो जीना ही पडेगा/ जीवन है अगर जहर तो पीनाही पडेगा" :)

In reply to by टारझन

मला जगायचे आहे म्हणून जगतो आहे. मला मरावेसे वाटेल तेव्हा आत्महत्या करीन व चिठ्ठी लिहून ठेवेन " आयुष्यात मिळवण्यासारखे सगळे मिळवून झाले मग आता जगून उगाच वेळ का वाया घालवा " अवांतरः मला याच जन्मात मोक्ष किंवा मुक्ती जे काय म्हणतात त्या अवस्थेला पोचायचे आहे म्हणून जगतो आहे.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

मला मरावेसे वाटेल तेव्हा आत्महत्या करीन व चिठ्ठी लिहून ठेवेन " पुपे नाय नाय तुमी असा नाय करू शकत.

In reply to by पंगा

>>>>>>>>>>>> ...विचाराधीन आहे. .................... फक्त "वर्गणी", .................... बाकी कागद व पेन केव्हाच पाठवून दिल्या गेले आहे. ..:wink: ...... (भट्टेरी) दंगा

In reply to by टारझन

प्रत्येकच जीवात एक प्रकारची जिवंत राहाण्यासाठीची अंतःप्रेरणा आढळून येतेच, त्यामुळेच माणूसपण जगत असणार. फरक एव्हढाच की अतिविकसित मेंदूमधून त्याबद्दल उगाचच उदात्त वगैरे विचार प्रसवतात .... :) डॉ. मणि भौमिक ह्यांचे 'कोड नेम गॉड' हे पुस्तक वाचले तर ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी काही दुवे मि़ळू शकतील असं वाटतंय. थेट उत्तर मिळेलच ह्याची काहीच शाश्वती नाही कारण हा प्रश्न आद्य शंकराचार्यांना पडलेल्या 'को Sहं कथमिदं जातं' इतकाच सनातन व अनुत्तरीत आहे. मला पण एक प्रश्न नेहेमी पडतो तो असा की जवळपास प्रत्येक जोडप्याला 'आपल्याला एक तरी मूल हवंच ' असं का वाटतं? वास्तविक सगळ्या कटकटी तिथूनच तर सुरू होतात .... :)

In reply to by sagarparadkar

संपूर्ण सहमत. विशेषतः मानव प्राणी हा उत्क्रांतीतली चूक असल्याने असा प्रश्न पडण्याची क्षमता चुकून मिळाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मला पण एक प्रश्न नेहेमी पडतो तो असा की जवळपास प्रत्येक जोडप्याला 'आपल्याला एक तरी मूल हवंच ' असं का वाटतं? वास्तविक सगळ्या कटकटी तिथूनच तर सुरू होतात .... टाळ्या. समाजमान्य सुखाच्या कल्पनांमध्ये मुलं असणे ही ही एक कल्पना असल्याने बहुतेकांना मुलं व्हावी असं वाटतं. कदाचित समाजमान्य सुखाच्या कल्पनांमागे धावण्यासाठीच आपण जगतो.

मी मात्र डोळे वगैरे काऽऽही चोळले नाहीत. टार्‍याच्या आत एक टार्‍या आहे आणि त्या टार्‍याला असले प्रश्न पडत असतील असे नेहमीच वाटत होते. असो. प्रश्नाचे उत्तर (गंभीरपणे) : मरत नाही म्हणून.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

टारगट माणसे दिसतात/दुरून वाटतात तशी ती असतातच असे नाही! पुढील विचारांस शुभेच्छा, टारझनराव!

In reply to by प्रदीप

टारगट आय डी मागच्या विचारशील माणसाने हा धागा काढलाय असे वाटते. कधी कधी मुखवटे घालून घाम येतो, मग स्वच्छ हवा घ्याविशी वाटते. बाकी प्रश्नाचे उत्तर मला वाटते ते असे- प्रत्येक जण मरणाची वेळ अजून झाली नाही म्हणून जगतो. खरा प्रश्न तो नव्हे. तर ती वेळ होईपर्यंत तुम्ही काय तीर मारता हा असायला पाहीजे.

In reply to by अरुण मनोहर

खरे आहे. पण आजवर काय तीर मारला आहे असा विचार केला की आपण का जगलो असा पुढचा प्रश्न सतावायला लागतो. किंवा पूर्वी मारलेले तीर काही खरोखरचे लई भारी तीर नव्हते असे वाटू तेव्हा तर हा प्रश्न अजून प्रकर्षाने सतावू लागतो.

निदान मी स्वतः तरी का जगते हे मला नक्की माहितीये! ( तसे बाकी काही काही माणसांच्या बाबतीत मला कधी तरी प्रश्न पडतो, ' हे का जिवंत आहेत' असा) पण मी का सांगू? ;)

भारताला निदान आपल्या राजकारण्यांना एक बाबा हवेच होते. मिळाले वाट्टं! ;)

In reply to by प्रियाली

दुसर्‍यांचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी एक जन्म घेता येऊ शकेल :) पण आत्ता तर मला स्वतःच्या च प्रश्नाच्या उत्तराची पडलीये :)

In reply to by टारझन

टार्‍या अरे ते रात्री तार्‍यांकडे बघणे सोडून दे. प्रश्नही पडायचे बंद होतील. ऑन ए सिरिअस नोटः रात्री तार्‍यांकडे बघणे हा फार आनंददायी अनुभव नसावा. एकतर काळोख आणि त्यात विशाल पसरलेलं आकाश आणि लाखो प्रकाशवर्षे दूरवरचे मिणमिणते तारे आपण किती क्षुद्र आहोत त्याची जाणीव करून देतात.

जीवन म्हणजे काय तर इच्छा, आकांक्षा आणि सुख ह्यांच्या शोधासाठी व नंतर प्राप्तीसाठी अखंड चालत असलेला प्रवाह. मग ह्याचे संदर्भ, कारणे, मुल्य व त्यांचे मुल्यमापनही त्या त्या काळानुसार बदलु शकते. थोडक्यात ही 'कंटिन्युअस डेव्हलपमेंटची' प्रोसेस आहे, जीवन जगण्याचे कारण रोज अपडेट होत असते. आजचेच बघा ना, आज रात्री मॅन-यु आणि शाल्के०४ ची सेमीफायनल मॅच आहे, त्यात मॅन्युचा पार बाजार उठुन त्यांचा सुफडा साफ व्हावा ही आमची 'इच्छा' आहे व त्याच 'अपेक्षे'ने आम्ही ही मॅच पाहु, समज तसे झालेच तर आम्ही 'सुखा'ने झोपी जाऊ. उद्याचे ? अहो उद्या बार्सिलोना वि. रियाल माद्रिद आहे, जगण्याचे सोलिड सबळ कारण आहे सध्या आमच्याकडे. अर्थात प्रत्येकाचे हे वेगळे असते, आम्ही उगाच एक क्षुल्लक उदाहरण दिले. - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

:) आपण स्वतःच प्रॉब्लेम तयार करतो , स्वतःच प्रश्न तयार करतो ,, आणि त्यांचं समाधान पण स्वतःच करुन घेतो , कधीकधी समाधान होत नाही , "एवढाच" काय तो फरक :(

In reply to by टारझन

आपण स्वतःच प्रॉब्लेम तयार करतो , स्वतःच प्रश्न तयार करतो ,, आणि त्यांचं समाधान पण स्वतःच करुन घेतो , कधीकधी समाधान होत नाही , "एवढाच" काय तो फरक
करेक्ट ! ह्यालाच 'जीवन' म्हणतात मालक ... - छोटा डॉन

मला कुंथुन कुंथुन विचार करुन ह्या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर सापडलेलं नाही.
विचार करण्याची पद्धत आणि जागा यांबद्दल बराच अंदाज आला. प्रश्नाचे साधे उत्तर: इतरांचे डोके खाण्यासाठी.

In reply to by पंगा

कुंथुन कुंथुन जोर मारले , कुंथुन कुंथुन सायकल चालवली , कुंथुन कुंथुन धावलो किंवा कुंथुन कुंथुन उड्या मारल्या , ह्या सगळ्यांची पद्धत आणि जागा ह्या एकंच आहेत काय ? बाकी साधे उत्तर तितक्याच साधेपणे दिलंय तर सांगा , तुम्हाला निर्जन जागी सोडलं किंवा येड्यांच्या समुहात सोडलं जिथे तुम्ही इतरांचं डोकं खाऊ शकला नाहीत , तर ? तुमचे जगणे व्यर्थ होईल काय अवांतर : आमच्या पुर्वीच्या वाटचालीमुळे धाग्याच्या हेतुबद्दल शंका येऊ शकते , पण प्रांजळपणे तसे नसल्याचे कबुल करतो. वैराग्य आलंय असंही नाही , पुलंच्या गटण्यासारखी स्थिती आहे असं ही नाही. पण एका प्रश्नाचे समाधानकारक उत्तर नसल्याने गोष्ट चव्हाट्यावर आणली आहे , इतकंच . धन्यवाद पंगा , आणि सर्व प्रतिसादक .

In reply to by टारझन

कुंथुन कुंथुन जोर मारले , कुंथुन कुंथुन सायकल चालवली , कुंथुन कुंथुन धावलो किंवा कुंथुन कुंथुन उड्या मारल्या , ह्या सगळ्यांची पद्धत आणि जागा ह्या एकंच आहेत काय ?
जोर काढणे (हे तसेही कधी केल्याचे आठवत नाही), सायकल चालवणे, धावणे किंवा उड्या मारणे हे कुंथून कुंथून करण्याचा पूर्वानुभव नाही, त्यामुळे सांगू शकत नाही.
बाकी साधे उत्तर तितक्याच साधेपणे दिलंय तर सांगा , तुम्हाला निर्जन जागी सोडलं किंवा येड्यांच्या समुहात सोडलं जिथे तुम्ही इतरांचं डोकं खाऊ शकला नाहीत , तर ? तुमचे जगणे व्यर्थ होईल काय
नाही बॉ. तिथेही काही मार्ग काढूच. तसेही 'प्र्याक्टिस मेक्स अ म्यान पर्फेक्ट' हे आपले ब्रीद आहे. सरावासाठी हे दोन्ही प्रसंग वाईट नाहीत. (अवांतर:
येड्यांच्या समुहात सोडलं, तर?
यात 'जर-तर'चा प्रश्न येतोच कुठे?) बाकी, प्रश्नाच्या प्रामाणिक आणि पटण्यासारख्या उत्तराच्या शोधासाठी शुभेच्छा. (हे ज्यानेत्यानेच शोधलेले बरे, असे वाटते. 'वन-साइझ-फिट्स-ऑल' उत्तर असू शकेल असे वाटत नाही.) (हे उत्तर शोधले पाहिजेच का?)

अधिकचे सुख, अधिकचे समाधान आणि अधिकची शांती यासाठी आपण जगतो असे म्हणतात. आपण जर धार्मिक असाल तर जीवनाचे अंतिम ध्येय मोक्षप्राप्ती. जीवनाच्या जन्म मृत्युच्या या चक्रातून कायमची सुटका म्हणजे मोक्ष. आता हा मोक्ष मिळवायचा असेल तर काय करावे लागते त्यावर वेगवेगळ्या संप्रदायाचे वेगवेगळे मार्ग-आणि वेगवेगळे विचार आहेत. त्याबद्दलचे काही हिंदु विचार हिंदीविकीवरुन मराठी विकिवर अनुवाद करुन डकवतांना काही समजलं तर इथे डकवतो. :) अवांतर : नेतृत्त्व या विषयावर मराठी विकिपीडियात भर घालतो आहे. कोणी मदत करत असेल तर स्वागत आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

च्यायला खरंच की .. :) आणि माझी प्रतिक्रीयाही आहे तिथे ( पहिलीच ) :) पण मी धागा काढला तेंव्हा पुर्ण ब्लँक होतो :( लिंक बद्दल धन्यवाद .. नानाची आठवण आली :(

In reply to by टारझन

असं म्हणतात की प्रश्न काय आहे हे समजून घ्यावे / शोधावे. (कारण ऊत्तरे असतील तर ती तीथच मीळतात). आपण आपल्या प्रश्ना संदर्भात सांगीतलेली पार्श्वभूमी बघता व त्यासोबतच या आधीच आपल्याला पडलेला प्रश्न "आपण खरच जगतो का" याचा वीचार केला तर आपला संकल्पनेत काही गोंधळ ऊडाला आहे अथवा सूखाचे अजीर्ण झाले आहे हेच या प्रश्नामागील प्राथमीक कारण वाटते. बाकी जाणकार ऊजेड टाकतीलच. पण ऊत्तरे तूमची तूम्हाला शोधावी लागतील कारण ती फक्त तूम्हालाच मीळू शकतात. जसे अंबा गोड आहे म्हणणे म्हणजे प्रत्यक्ष त्याची गोड चव चाखणे न्हवे, म्हणजेच मी जर तूम्हाला अंबा गोड असतो सांगून जशी त्याच्या प्रत्यक्ष चवीची कल्पना अथवा त्याबाबत शंकासमाधान केवळ शब्दाने करू शकणार नाही तसेच तूमच्या प्रश्नाच्या ऊत्तराचे आहे. कोणी ही ज्याने या प्रश्नाचे ऊत्तर मीळवले आहे तो आपल्या प्रश्नाचे शंका समाधान केवळ शब्दात करू शकणार नाही. जी गोश्ट शब्द नाही ती शब्दाने अनूभवाला येणार नाही. म्हणूनच असे समजा की तूमच्या प्रश्नाचे १००% योग्य ऊत्तर जरी मी तूम्हाला नक्की देऊ शकलो(जस्स फोsssर अर्ग्युवम्येंट शेक वन्ली) तरी ते मी दीलय म्हणून आपण ते घेऊ शकता काय (प्रत्यक्ष अनूभूतीने)? उत्तराबाबत तर्काच्या मनोर्‍यांना शब्दांच्या माळानी सजवून एकदम योग्य ऊत्तर मीळालेय/दीलेय असा भ्रम कोणाही व्यक्तीबाबत (आस्तीक नास्तीक फरक पडत नाय) नीर्माण करण फारच सोपं आहे. म्हणून जो तूमच्या प्रश्नाचे १००% सत्य ऊत्तर केवळ शब्द व तर्काने करून देइल तो एक तर सर्वात मोठा थापाड्या समजावा, म्हणजे तो जे काही बोलला ते त्याने नक्कीच अनूभवले नाही. अथवा तूम्ही त्याला संमोहीत झालेले आहात ज्याचा त्या व्यक्तीने खरं ऊत्तर मीळवला असल्याशी काहीही संबध नाही म्हणजे तो खरं बोलत असेलही अथवा नसेलही तूमचे शंका समाधान हा एक भ्रमच राहील व त्याचे परीणाम अनावश्यक वेळ व इतर गोश्टी खर्च होण्यात होतील, ऊत्तर मीळण्यात न्हवे .

"का" या प्रश्नार्थक शब्दाने सुरू होणार्‍या प्रश्नाच्या समाधानकारक उत्तराची धाटणी कशी असते? याबद्दल एखादे उदाहरण देऊ शकाल काय? म्हणजे : आपण का क्ष-क्रिया-करतो? अशा प्रकारच्या कुठल्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळाले असल्यास त्याचे उदाहरण द्यावे. मग त्या धाटणीने वरील प्रश्नाबद्दल विचार करता येईल. "का" हा प्रश्नशब्द असलेले प्रश्न खोलात गेल्यास गुंतडा करतात, असा माझा अनुभव आहे. कित्येकदा गुंतडा होण्यामागचा दोष विषयातील मुद्द्यांमध्ये नसतो. किंबहुना "का" शब्दाच्या मोघम आणि संदिग्ध वापरामुळे असतो.
आहो पण झुरळंही जगतात नी आपणही जगतो. जिवनशैली वेगळी आहे .
वरील वाक्य काहीतरी महत्त्वाचा निर्देश देते. पणपुढल्या परस्परविरोधी निर्देशांपैकी कुठला निर्देश मिळतो, ते समजत नाही : (अ) तुम्हाला समाधानकारक वाटेल ते उत्तर झुरळांना आणि मनुष्यांना दोघांना लागू असले पाहिजे अशी अट आहे का? (आ) की अगदी उलट अशी अट आहे, की झुरळांना उत्तर लागू असता कामा नये, पण मनुष्यांना लागू असले पाहिजे, तरच उत्तर समाधानकारक असेल?

रोज रात्री आकाशाकडे पहात (आणि )कुंथुन कुंथुन विचार करुन ... ही दोन वाक्ये जोडली आणि चित्र डोळ्यासमोर उभे राहून आणि बाबांना प्रेरणा कशी मिळाली याचा उलगडा झाला. मी जगतोय असे विधान मी करत नाही.कुणीतरी मला जगवतंय हे खरे आहे. वडीलांच्या सेवेसी पाळावे पुत्रासी तैसे त्वा प्रतिपाळावे आम्हासी अशी काहीतरी ओळ गुरुचरीत्रात वाचलेली आठवते. काही असो जगण्याची हौस काही संपत नाही. आयुष्य हवंहवंसच वाटत राहतं. विंदांच्या एका कवितेचा दाखला देतो आहे . पुन्हा वाटते तसेच इवले बाळ होऊनी कुशीत यावे अन पदराच्या अभयाखाली डोळ्यांनी हे पंख मिटावे आणि आजच दासू वैद्यांच्या कविताही पुन्हा एकदा वाचल्या त्यांची आयुष्य ही कविता देतो आहे . कमी तापवलं तर नासण्याची भिती. जास्त तापवलं तर आलेल्या दाट सायीमुळे गुदमर होतो आयुष्याचा. विस्तवावर ठेवलंच तर राखेशिवाय काय सापडेल? या त्रैराशीकाच्या गोंधळात गणित चुकलेल्या विद्यार्थ्याने छडी खाण्यासाठी डोळे मिटून हात पुढे करावा , तसा मी उभा आहे . पाच फूट सहा इंचाच्या बाकड्यावर . हे संदर्भ जर चुकीचे असतील त्याला मी जबाबदार नाहीच . कारण या कवितांचा हॅगओव्हरच तसा असतो.

In reply to by चतुरंग

___/\___ "कुंथुन कुंथुन" ह्या शब्दप्रयोगामुळे जो नाट्याविष्कार झालाय तो मला आत्ता उमगलाय :) आणि मी पोट धरुन हसतोय .. :)

In reply to by रामदास

पुन्हा वाटते तसेच इवले बाळ होऊनी कुशीत यावे अन पदराच्या अभयाखाली डोळ्यांनी हे पंख मिटावे अप्रतिम कडवे !! "अन पदराच्या अभयाखाली ... डोळ्यांनी हे पंख मिटावे" वाह वा !!! वाचुनच इतके निर्धास्त वाटले की बास्स .. यु मेड माय डे सर. थँक यु :)

इतर प्राण्याचा मेंदू विकसित नसल्याने त्यांना असे प्रश्न पडत नाहीत .त्यांना जगायचे असेल तर ते दुसर्याला मारून जगतात , ( संधर्भ - जीव शास्त्रातील अन्न साखळी ) आपला मेंदू नक्की कधी ते माहीत नाही पण अचानक विकसित झाला .व पाहता पाहता आपण मानवाने ही पृथ्वी पादाक्रांत केली . आज आपण नवीन शोध स्वतःचे जीवनमान सुधारायला लावतो ( हायच शोधांमुळे आधुनिक जीवनशैलीने आपले जीवन ताणताणाव व समस्येने पोखरले आहे ) आपण प्रगती करतो त्यामागची प्रेरणा नक्की आपल्याला कोण देतो .? आपल्याकडून होणार्या गोष्टी कोणी आपल्याकडून करून घेतो का ? उदा आपला प्रयोगशाळेत आपण उंदरांच्या अनेक पिढ्या ( गीनिपिक ) जन्माला घालतो .त्यांच्या द्र्ष्टीने ते त्यांचे आयुष्य जगात असतात . पण आपण त्यांच्यावर अनेक प्रयोग करतो कारण त्यांच्यावर होणारे बदल व परिणाम पाहून आपण औषध व अनेक गोष्टी बनवतो .त्या उंदरांना ह्यांची काहीही कल्पना नसते की आज अचानक आपल्यात काय खायला मिळाले .अचानक आपल्यात रोगाची साथ का आली . मला नेहमी असे वाटते .माणूस कोणाचे तरी गीनिपिक नसेन कश्यावरून ? काही प्रगत परग्रहावरील जीवांनी आपला मेंदू पृथ्वीवरील इतर जीवांपेक्षा काहीच्या काही जास्त प्रमाणात विकसित केला नसेन कश्यावरून ? थोडक्यात आपण जगतो का आपल्याला जगवले जाते .? ( जगण्याची व त्यासाठी काहीही करण्याची दुर्दम्य आशा आपल्यात कोण निर्माण करतो ) '' कुणा न कळले त्रिखंडात ल्या ,हात विणकराचे ''

शेवटी एकदाचा हा प्रश्न पडला तर! दोनाचे चार हात झाले की आपोआप उत्तर मिळेल! ;) शीरियस उत्तर - माणूस म्हणून जगण्याचं सार्थक व्हावं ह्याच हेतूने जगतोय. प्रत्येक क्षणात प्रचंड आनंद आहे, क्षणस्थ होता येईल तर तो आनंद उपभोगता येईल असे वाटते. कालची काळजी आणि उद्याची चिंता नसावी अशा दिशेने प्रवास करण्याचा प्रयत्न सुरु आहे! हा प्रवासच एक आनंद आहे. कुठे पोचण्याची, मुक्कामाला जाण्याची गरज वाटत नाही असा दिवस येईल अशी खात्री आहे! "का?" या प्रश्नाला समाधानकारक उत्तर मिळेल असे वाटत नाही. हे बरेचसे लहान मुलांच्या प्रश्नसाखळीसारखे असते. एकाचे उत्तर दिले की "पण तसे का?" त्याचे उत्तर दिले की मग पुन्हा तसे का? ..... तेव्हा अशा प्रश्नमालिकेपेक्षा. जे जीवन आपल्याला मिळाले आहे, कोणत्या का कारणाने असेना, त्याचा पुरेपूर उपयोग करावा, आनंदात जगावे, क्षणस्थ व्हायचा प्रयत्न करावा. -रंगानंद

In reply to by चतुरंग

"का?" या प्रश्नाला समाधानकारक उत्तर मिळेल असे वाटत नाही. हे बरेचसे लहान मुलांच्या प्रश्नसाखळीसारखे असते. एकाचे उत्तर दिले की "पण तसे का?" त्याचे उत्तर दिले की मग पुन्हा तसे का? .....
:( हो ना ..
तेव्हा अशा प्रश्नमालिकेपेक्षा. जे जीवन आपल्याला मिळाले आहे, कोणत्या का कारणाने असेना, त्याचा पुरेपूर उपयोग करावा, आनंदात जगावे, क्षणस्थ व्हायचा प्रयत्न करावा.
हे आपण करतोच हो .. इतर वेळी कधी काही हा प्रश्न सतावत नाही . तो एक रिकामी वेळ साधुन येतो आणि डोकं खातो :)

कारण मला माझ्या जगण्यातून अतीव आनंद मिळतो! खाली माझी स्वाक्षरी आहे त्यातून अंदाज येईलच!!!;) -पिडांकाका

शंकर-पार्वतीच्या सारीपाटावरच्या सोंगट्यांना कुठून कळणार खेळ का अन किती वेळ चालू रहाणार?

भारतात अनेक लोक फुकट प्राण वायु मिळतात म्हणुन जगत आहे..त्यांच्या जिवनाचे उद्धिष्ट अस्तित्व एव्हढेच आहे.. आम्हि पण त्या पैकि एक आहोत...सरकारने प्राण वायु वर कर आकारु नये..नाहि तर आमच्या सारखे अनेक प्राण वायु अभावि धारा तिर्थि पडतिल

भारतात अनेक लोक फुकट प्राण वायु मिळतात म्हणुन जगत आहे..त्यांच्या जिवनाचे उद्धिष्ट अस्तित्व एव्हढेच आहे.. आम्हि पण त्या पैकि एक आहोत...सरकारने प्राण वायु वर कर आकारु नये..नाहि तर आमच्या सारखे अनेक प्राण वायु अभावि धारा तिर्थि पडतिल

In reply to by अविनाशकुलकर्णी

जगायला नायट्रोजन पन लागतो. आनि H2O पन लागते. आनि ऑक्सिजन विसरुन कसे चालेल. ते सुध्धा पाहीजेच ना !

लहानपणी सगळ्याच नवीन गोष्टींचे कुतुहल असते म्हणून जगतो. तरुणवयात आणखी बर्‍याच गोष्टी आकर्षक वाटू लागतात, त्या मिळवण्यासाठी धडपडत पण एंजॉय करत जगतो. मध्यम वयात जो संसाराचा पसारा मांडून ठेवलेला असतो त्याची जबाबदारी असते म्हणून जगतो. आणि उतारवयात त्याआधीचा काळ खूप सुखांत गेला असेल तर त्याच्या आठवणींवर जगतो. दु;खात गेला असेल तर आता तरी चांगले दिवस येतील या आशेवर जगतो. शिवाय मेल्यानंतर नक्की काय आहे हे माहित नसल्यामुळे एक अनामिक भीति असते म्हणूनही जगतो. वैयक्तिकः मला मात्र मेल्यानंतर काय आहे ते जाणून घेण्याची अतीव उत्कंठा आहे पण आत्महत्या हा भ्याडपणा आहे शिवाय तसे केल्यास घरच्यांना निष्कारण त्रास होईल म्हणून जगतोय.

जिनेवालो को जिने का बहाना चाहिये! असे जगण्याचे सांगण्यासारखे बहाणे हजारो आहेत पण त्यातलं कारण एकही नाही.. बहुदा मला जगायला आवडतं म्हणून जगतो.. जगण्याची आसक्ती संपली की असं जिवंत दिसणारं माणूस आणि प्रेत यात काय फरक? तेव्हा मरताना, मरणं ही आतापर्यंत न अनुभवलेला प्रवास असावा म्हणून आता जगतोय.. मनापासून जगून घेतोय!

टारझन राव, एकदा योगिनी एकादशीला आळंदीत या आणि तिथून सुरुवात करून पायीच वारी करा पंढरपूर पर्यंत..... वारीतल्या कोणत्याही वारकरयाला हा प्रश्न विचारा तुम्हाला समाधानकारक उत्तर मिळेल.:) बोला पुंडलिक वरदा....हरी विठ्ठल...

माझे मत.. आयुष्यात सगळ्या प्रश्नांची उत्तरे देता येतात पण "का?" या प्रश्नाचे उत्तर बर्‍याचदा मिळतच नाही. हे जग आहे, असं आहे, तसं आहे मी काय कसा कुठे कोण या सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत, पण मी का आहे या प्रश्नाचे उत्तर नाही. हे जगसुद्धा का आहे याचे उत्तर नाही. का हा सगळा प्रपंच निर्माण झाला याला देखील उत्तर नाही. या "का?" वाल्या प्रश्नांची उत्तरे शोधायचा प्रयत्न करु नये, वेड लागू शकते. ;) थोडं अध्यात्मिक वाटेल पण सर्वजण एका कधीही न संपणार्‍या आनंदाच्या शोधात जगत असतात, जो मरेपर्यंत मिळत नाही. :) तसं पाहिलं तर मनुष्य आणि ईतर प्राणी काही वेगळं करत नाहीत. खाणे, झोपणे, प्रजनन आणि स्वतःचे व कुटुंबाचे संरक्षण या गोष्टींच्या अवती भवतीच माणसाचे सुख-दु:ख आणि आयुष्य फिरत असते. फरक हाच की माणसं जास्त विचार करतात, निसर्गाला आव्हान देत फिरतात, ईतर प्राणी हे करत नाहीत, ते निसर्गाच्या नियमांप्रमाणे जगतात, वागतात. ज्या दिवशी "मी का जगतो?" किंवा "मी का आहे?" या प्रश्नांची उत्तरे मिळतील त्या दिवशी जगण्याची ईच्छा संपेल कदाचित. :)

In reply to by विसोबा खेचर

:) गटणे किती लक्की होता , त्याला भाईकाकांचं डोकं खायचं भाग्य मिळालं होतं :) बाकी थोडासा कशाला दोन च्या द्या :)

रात्रीच्या तारका (आकाशातल्या) पहाताना थोडे सिंहावलोकन केलेस तर तुझ्या आयुष्याच्या जमाखर्चाचा ताळेबंद स्थिरस्थावर होईल. तुझ्या मनो़ज्ञ मानसिकतेला "आपण का जगतो" याची महदोत्कट प्रचिती मिळून तुझ्या आत्म्याला अनुभूती मिळेल. (कुंथून कुंथून शिंहावलोकन केलेस तर तुला " आपण का *गतो" हे पण कळेल..)

आपण जगतो ते दुसर्‍यांसाठी. कुणाला अपत्य हवे असतो म्हणून आपण जन्मतो. कुणालातरी भाऊ मिळावा, मित्र मिळावा, प्रियकर, शेजारी, बॉस, कर्मचारी इ. इ. मिळावेत म्हणून आपण जगतो. थोडक्यात इतरांच्या आयुष्याला अर्थ देण्यासाठी आपण जगतो. आणि आपल्यासाठी ते ! (बाकी हा एक असा प्रश्न आहे ज्याचे उत्तर गद्यापेक्षा पद्यात देणे सोपे पडेल.)

माझी स्वाक्षरी पुरेशी आहे निदान माझ्यापुरत्या उत्तराला. अवांतर - काल राजधानी मध्ये जेवंण मस्त होतं, भजी, पन्हं, गाजर हलवा, दाळ ढोकळी अगदी छान छान.

सर्व उत्तरांसाठी उन्नती मासिकाच्या एका जुन्या विजयादशमी अंकात आलेला श्री. चौखुरेगुरुजी यांचा "जीवनोन्नतीचे सहा सोपान" हा लेख तुम्ही वाचाच टारुभाऊ.. (कुठला अंक विचारू नका.) - सखाराम गविटणे.

रामदास काका अन ज्ञानेश, बरच समर्पक सांगुन गेले. एव्हढा धागा पुरेसा आहे जगण्याच बळ देण्यासाठी. हा आता जास्तच प्रश्न सतावत असेल तर जरा चार दिवस सद्वर्तन करुन बघायच. तस पण, मी माझ्या पुरत "का? आणि किती?" सोडुन" कस "जगलो? याला जास्त महत्व देते. माझ्या पुरता एक आरसा मी माझ्या मनी बाळगते, जोवर मी; त्या आरशात, माझी स्वतःची नजर न चुकवीता पाहु शकते, तोवर "खरी"मी!

In reply to by स्पंदना

जगण्याची इच्छाशक्ती मेलेली नाहीये हो :) मनात कोणतं पाप केल्याचं शल्य ही नाही . फक्त प्रश्नाचं उत्तर हवंय :) ह्यात डिप्रेशन नाहीये :)

In reply to by टारझन

मी तस म्हणत ही नाही. माझ म्हणन एव्हढच की मला जेंव्हा एकंदर 'जगण्या' बद्दल प्रश्न पडतो तो ,' का?' ऐवजी 'कस ?' असा पडतो. मी तुमचा मुद्दा चुकिचा नाही डेपिक्ट केला, नाही तो बदलाय्चा प्रयत्न! आठवण आली 'असा मी असामी ' मधल्या प्रवचनाच्या सीनची. तु कोण? मी कोण?

खुप औघड आहे. मला कळ्लेल नाहीये अजुन पर्यन्त. ह्या पोस्ट वरुन काहीतरी कळेल असे वाटत आहे. रोज काम करायच, घरी यायचे. एक पिच्चर बघायचा, बायकोल घेउन बाहेर जायच. शनिवात रैवार लांब कुठेतरि फिरायला जायच. कधिकधि मिपावर यायच, एवधच काय ते येत. पन जगायच कशाला ते अजुन समजल नाही.