Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by अवलिया on Mon, 01/17/2011 - 13:00
राम राम मंडळी नुकतेच दोन दिवसांपूर्वी कूणीतरी मला खरड करुन विचारले "आपण का जगतो?" यावर मी खूप विचार केला. खरं तर विचार करणं ही माझ्या कुवतीबाहेरची गोष्ट! पण कुवतीबाहेर आहे म्हणून करु नये असे थोडीच आहे. तर मी माझ्या परीने खूप विचार केला. (खुलासा - इथे विजुभाऊंच्या परीचा काही संबंध नाही) पण मला सुस्पष्ट असे उत्तर मिळाले नाही. म्हटले जरा मिपाकरांचा विचार घेउ ! म्हणून ह्या काथ्याकुटाचा प्रपंच !! (प्रपंच करावा नेटका - रामदासस्वामी) तर मंडळी, आपण का जगतो? तुमचे काय मत?
  • Log in or register to post comments
  • 21026 views

प्रतिक्रिया

Submitted by टारझन on Mon, 01/17/2011 - 13:02

Permalink

मला अजुन एक प्रश्न पडला आहे ,

मला अजुन एक प्रश्न पडला आहे , "आपण खरंच जगतो का ? "
  • Log in or register to post comments

Submitted by मी_ओंकार on Mon, 01/17/2011 - 13:50

In reply to मला अजुन एक प्रश्न पडला आहे , by टारझन

Permalink

नवीन काकू काढा मग.

नान्याचा धागा हायजॅक नको व्हायला.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Mon, 01/17/2011 - 13:20

Permalink

संध्याकाळी पाणवठ्यावर जाता

संध्याकाळी पाणवठ्यावर जाता यावे म्हणुन. खरे सांगायचे तर ह्या प्रश्नावर मिपा सदस्य श्री. स्पा ह्यांच्याशिवाय अधिक अधिकारवाणीने कोणी बोलु शकेल असे वाटत नाही. त्यांच्या प्रतिसादाची वाट बघत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Mon, 01/17/2011 - 15:25

In reply to संध्याकाळी पाणवठ्यावर जाता by परिकथेतील राजकुमार

Permalink

माझ्यामते सर्व जण जन्माला

माझ्यामते सर्व जण जन्माला आलेत म्हणून जगत आहेत, बाकी काही नाही
  • Log in or register to post comments

Submitted by sagarparadkar on Mon, 01/17/2011 - 18:52

In reply to माझ्यामते सर्व जण जन्माला by स्पा

Permalink

+१

अगदी हेच खरं उत्तर आहे ... १०००% सहमत ... उगाचच लंब्या चौड्या बाता मारण्यात काहीच अर्थ नाही ...
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Mon, 01/17/2011 - 19:13

In reply to +१ by sagarparadkar

Permalink

धन्स सागर....... तूच जीवनाचं

धन्स सागर....... तूच जीवनाचं रहस्य जाणलं आहेस... बाकी चाललेल्या चर्चा वाचत आहोत
  • Log in or register to post comments

Submitted by नरेशकुमार on Mon, 01/17/2011 - 13:26

Permalink

मी पन खुप खुप विचार केला,

मी पन खुप खुप विचार केला, (हो मी खरंच विचार केला ) पण काहीही निष्पण्ण झाले नाही. आपन खरेच जगलो नाही तर आपल्याला काय फरक पडतो ?
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानराम on Mon, 01/17/2011 - 13:28

Permalink

एक दिवस मरण्यासाठी...

एक दिवस मरण्यासाठी...
  • Log in or register to post comments

Submitted by यकु on Mon, 01/17/2011 - 13:33

Permalink

प्र.का.टा.आ. !

प्र.का.टा.आ. !
  • Log in or register to post comments

Submitted by रणजित चितळे on Mon, 01/17/2011 - 13:46

Permalink

जन्म होतो ......

जन्म होतो जो आपल्या हातात नसतो. पुढे रासायनिक प्रक्रिया जो पर्यंत थांबत नाहित तो पर्यंत मरण येत नाही. मधला काळ मग समय विमोचनात घालवतो ज्या ला आपण जगणे म्हणतो.
  • Log in or register to post comments

Submitted by पिंगू on Mon, 01/17/2011 - 13:51

Permalink

मनोगतावर नुकताच मृत्युसंबंधी

मनोगतावर नुकताच मृत्युसंबंधी एक लेख वाचला होता. तिथे काही उत्तर मिळेल. http://www.manogat.com/node/21354
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Mon, 01/17/2011 - 14:01

Permalink

"जगतो म्हणजे काय ? या

"जगतो म्हणजे काय ? या प्रश्नाचं उत्तर मिळाल्याशिवाय "का जगतो?" हे सांगणं. नुसता विचारही करणं अवघड आहे. "साठी" आणि "मुळे" हे दोन गंमतीदार शब्द आहेत. पूर्ण विरुद्ध. कशासाठी जगतो की कशामुळे जगतो हे आधी ठरवलं पाहिजे. (म्हणजे, काहीतरी व्हायचे/करायचे म्हणून जगतो, की काहीतरी झाले/केले म्हणून जगतो..) गहन आहे विषय. (फिलॉसॉफिकल स्माईली)
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Mon, 01/17/2011 - 14:04

Permalink

खाज ...

>>तर मंडळी, आपण का जगतो? तुमचे काय मत? जगण्याची 'खाज' आहे म्हणुन जगतो, जगणे 'आवडते' म्हणुन जगतो. बाकी ह्याशिवाय इतर कारणे देणे महत्वाचे वाटत नाही, असो. - छोटा डॉन
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Mon, 01/17/2011 - 15:15

In reply to खाज ... by छोटा डॉन

Permalink

+१ आम्हाला जगणे परवडते आहे

+१ आम्हाला जगणे परवडते आहे म्हणून जगतो.
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Mon, 01/17/2011 - 15:18

In reply to +१ आम्हाला जगणे परवडते आहे by llपुण्याचे पेशवेll

Permalink

+२

'परवडणे' हे कारण पण पुरेसे आहे. सहमत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Mon, 01/17/2011 - 15:41

In reply to +२ by छोटा डॉन

Permalink

+३

सहमत. डान्रावांसारखे आणि द्येसमुखांसारखे मित्र जोवर बीलं भरत आहेत तोवरच जगण्यात अर्थ आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Mon, 01/17/2011 - 16:10

In reply to +३ by परिकथेतील राजकुमार

Permalink

+४

आणि त्यातही जगण्याची परवानगी आहे किंवा अनुमती आहे म्हणूनही जगतो आहे. परवडत असतं पण परवानगी नसती तर काय केले असते.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Mon, 01/17/2011 - 16:13

In reply to +४ by llपुण्याचे पेशवेll

Permalink

+५

परवडत असतं पण परवानगी नसती तर काय केले असते.
हे म्हणजे 'खाते आहे पण आयडी ब्लॉक' असे झाले असते.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Mon, 01/17/2011 - 16:14

In reply to +५ by परिकथेतील राजकुमार

Permalink

+६

हे म्हणजे 'खाते आहे पण आयडी ब्लॉक' असे झाले असते. मग डू आयडी घेऊन यावे लागले असते
  • Log in or register to post comments

Submitted by नरेशकुमार on Wed, 04/27/2011 - 11:05

In reply to +६ by स्पा

Permalink

डू आयडी म्हनजे काय ? आनि तो

डू आयडी म्हनजे काय ? आनि तो का घ्यायचा ? वरच्या सग़ळ्याम्नि लाईटली घेने रे बाबांनो !
  • Log in or register to post comments

Submitted by जोशी 'ले' on Mon, 01/17/2011 - 14:39

Permalink

आपण खरेच जगतो का? का आपण

आपण खरेच जगतो का? का आपण जन्म आणि म्रुत्यु च्या मधील वेळ जगणे समजायला लागलोय
  • Log in or register to post comments

Submitted by मेघवेडा on Mon, 01/17/2011 - 14:49

Permalink

दु:ख ना आनंदही, अंत ना

दु:ख ना आनंदही, अंत ना आरंभही नाव आहे चाललेली, कालही अन् आजही!
  • Log in or register to post comments

Submitted by मुलूखावेगळी on Mon, 01/17/2011 - 15:01

Permalink

जगने हे साध्य नाही साधन

जगने हे साध्य नाही साधन आहे. वेगवेगळ्या इच्छा, हेतु पुर्न कराय्चे. कधी आनन्द स्वतःला मिळवनयासाठी, तर कधी जवळच्याना देन्यासाठी आहे , कधी गरजा पुर्न करन्यासाठी, काही मिळवन्यासाठी, अनि कधी तरी वरुन बोलावने येत नाहित म्हनुन. मी म्हनाले ते अगदी खरे नसेल हि पन मला असे वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by नन्दादीप on Mon, 01/17/2011 - 15:14

In reply to जगने हे साध्य नाही साधन by मुलूखावेगळी

Permalink

हेच म्हणतो..

हेच म्हणतो..
  • Log in or register to post comments
Profile picture for user नावातकायआहे

Submitted by नावातकायआहे on Mon, 01/17/2011 - 15:02

Permalink

आपण का जगतो?

>>आपण का जगतो? आसले विचार करुन हाय तो दिवस खराब करायला.
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास..

Submitted by सुहास.. on Mon, 01/17/2011 - 15:06

Permalink

?

? नाना, अध्यात्मिक पातळीवरन विचारतो आहे की शास्त्रीय , वैश्विक की स्वार्थाने की परमार्थाने , सामाजिक की राजकीय ?
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Mon, 01/17/2011 - 15:12

In reply to ? by सुहास..

Permalink

सर्वच दृष्टीने विचार करायला

सर्वच दृष्टीने विचार करायला हरकत नाही. त्यानिमित्ताने सकस निकस दृष्टीकोन समजुन घेता आला तर फायदाच !
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Mon, 01/17/2011 - 15:44

Permalink

हे एक कारण होईल का पहा,

हे एक कारण होईल का पहा, अर्थात हे माझे मत नाही. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Mon, 01/17/2011 - 15:49

Permalink

आपण म्हणजे कोण?

आपण म्हणजे कोण?
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Mon, 01/17/2011 - 15:53

In reply to आपण म्हणजे कोण? by नितिन थत्ते

Permalink

सह्ही !!!

>>आपण म्हणजे कोण? :) अवलियाकाका, बोला आता. होऊन जाऊ द्या तुमचा आणि थत्तेचाचांचा सामना. बाकी नशिबाने मिळालेला असा 'हाफवॉली' थत्तेचाचा वाया घालवतील असे आम्हाला वाटत नाही ;) चर्चा वाचतो आहे. - (अवलियाकाका आणि थत्तेचाचांचा फॅन)छोटा डॉन
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Mon, 01/17/2011 - 15:56

In reply to सह्ही !!! by छोटा डॉन

Permalink

संपादकांचे असले वागणे पाहुन,

संपादकांचे असले वागणे पाहुन, आपण संपादन का करतो असा प्रश्न का पडला नाही असा प्रश्न पडला.
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Mon, 01/17/2011 - 17:14

In reply to आपण म्हणजे कोण? by नितिन थत्ते

Permalink

>>>आपण म्हणजे कोण? अतिशय

>>>आपण म्हणजे कोण? अतिशय उत्तम प्रश्न. आपण हा स्वतःला निर्देशित करण्यासाठी वापरलेला शब्द आहे. स्वतः या अर्थाने जसा मी स्वतः बोललो. तू स्वतः बोलला. तो स्वतः बोलला. ती स्वतः बोलली. या वाक्यांमधे स्वतः याअर्थाने निर्देशित होणारे चैतन्य जे देहरुपाने कार्यमग्न असते ते आपण याअर्थाने अपेक्षित असुन सध्या आपण या शब्दाचा परिघ केवळ मानववंशापुरता मर्यादीत आहे. कारण इतर प्राणीवंश जे स्वतः या अंशाने प्रतिबिंबित होऊ शकतात परंतु भाषेच्या अभावामुळे त्यांच्या अनुभव/जाणीवांची कल्पना किमान मला तरी नाही. सबब आपण या शब्दाचा अर्थ प्रत्येक मानवी जीव असा घ्यावा.
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Mon, 01/17/2011 - 17:35

In reply to >>>आपण म्हणजे कोण? अतिशय by अवलिया

Permalink

+

खुलाशाबद्दल धन्यवाद. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by sagarparadkar on Mon, 01/17/2011 - 19:00

In reply to आपण म्हणजे कोण? by नितिन थत्ते

Permalink

सह्हीच ....

लय आवडला हा प्रश्न ....
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Mon, 01/17/2011 - 16:25

Permalink

मी प्रेमा साठी जगतो आणि

मी प्रेमा साठी जगतो आणि जगण्यासाठी प्रेम करतो... ;) अवांतर :--- श्री श्री श्री अवलिया उर्फ नाना उर्फ नानुडी... आपल्याला सुस्पष्ट उत्तर मिळालेच आणि खात्री पटली तर आम्हालाही कळवा... कसे ? ;) (लव्हर बॉय) ;)
  • Log in or register to post comments

Submitted by सूर्यपुत्र on Mon, 01/17/2011 - 16:45

Permalink

आपण (!/?) का जगतो??

कारण आपण मरत नाही म्हणून......
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Tue, 01/18/2011 - 18:05

In reply to आपण (!/?) का जगतो?? by सूर्यपुत्र

Permalink

पण

पण आपण (!/?) मरत का नाही?! ;) अवांतरः 'आपण का जगतो' हा प्रश्न मुंग्याना पण पडत असेल का? त्यांची 'जगण्याची' धडपड माणसांइतकीच असते.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वानन्द on Tue, 01/18/2011 - 18:24

In reply to पण by कवितानागेश

Permalink

हे शाब्बास!! चेक-मेट

हे शाब्बास!! चेक-मेट :)
  • Log in or register to post comments

Submitted by इन्द्र्राज पवार on Mon, 01/17/2011 - 17:04

Permalink

अनुभवासाठी जगणे....!!

चिन्ता चिता समानाऽस्ति बिन्दुमात्रविशेषतः | सजीवं दहते चिन्ता निर्जीवं दहते चिता || या संस्कृत सुभाषिताचा अर्थ असा आहे : चिन्ता आणि चिता सारखी आहे फरक फक्त अनुस्वाराचा. चिन्ता जिवंत माणसाला जाळते तर चिता जीव निघून गेल्यावर जाळते. याच अनुषंगाने "मी का जगतो?" आणि "मी का जगलो?" असा केवळ एका शब्दाच्या बदलाने प्रश्न स्वतःलाच विचारला तर माझ्यापुरते मी म्हणू शकेन की "मी अनुभव घेण्यासाठी जगतो". जगण्याचे कारण शोधण्याची विचारक्षमता ईश्वराने [अर्थात या विश्वाची निर्मिती 'देव' नावाच्या कुणीतरी अज्ञाताने केली यावर विश्वास असेल तरच] माणसाला जन्मजातच दिली असल्याने ज्याचा त्याने आपल्या वाटेला आलेल्या खात्यावरील जमाखर्चाचा लेखाजोगा तपासून 'जगण्या' चे वल्हे कसे हाताळावे हे ठरवून आपले तारू अनुभवाच्या विशाल दर्यात न्यावे. या अखंड प्रवासातील संचित धन हेच त्याला जीवनाविषयी उभारी देण्यास कारणीभूत होत असल्याने ते मिळविण्यासाठी तरी त्याने "जगले" (च) पाहिजे; अन्यथा मानव आणि पशू यात फरकच राहणार नाही. निसर्गाने माझ्यासाठी H2O आणि O2 चा पुरेशा प्रमाणात साठा करून ठेवला असला तरी त्यामुळे मी जगू शकेन हे खरे पण त्या जगण्याला जर 'जगणे' म्हणत असेल तर ते एखादी वनस्पतीही सहजगत्या करू शकते. पण 'जगण्याची तृष्णा' फार विलोभनीय आहे ही गोष्ट संतमंडळीही नाकारू शकत नाहीत. कोणतीही कारणमीमांसा द्या वा उपमा लावा....थोरांचे प्रेम, पत्नी प्रेम, अपत्य वात्सल्य, मित्र प्रेम...पण शेवटी उरते ते हेच सार की दिवसभराचे आपले सारे झगडणे अखेरीस जगण्याची उर्मी आणि त्याबद्दलची रत्तीभरही कमी न होणारी तृष्णा हेच होय. "असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी" हे दाखल्यापुरते ठीक आहे, पण या संज्ञेची रचना करणाराही जगण्याच्या तृष्णेपायी खाटल्यावरून हमखास उठला असणारच आणि मग त्याबाबतच्या शोधउत्खननाचीही गरज नाही इतके ते प्रखर आहे. नैराश्येपोटी आत्महत्येचे विचार मनी बाळगणारा रावसाहेब त्याच रात्री आमटीत आमसुल ज्यादा पडले म्हणून बायकोवर वस्स्कन ओरडतो, ते ह्याच कारणासाठी की जगण्यावरचे त्याचे प्रेम रत्तीभरही कमी झालेले नाही. 'कास्ट अवे' मधील फेडेक्सचा एक्झेक्युटिव्ह चक नोलँड चार वर्षे एकांतवासात त्या अज्ञात बेटावर अटळपणे राहतो...पण "जगतो"....आपण 'मेलेलो नाही म्हणून जगलो आहोत" असे चुकूनही त्याच्या मनी येत नाही. उलटपक्षी 'अरे, हा तर एक अनुभव आहे, जगण्याचा....आणि मी जगून दाखविनच, पाहतो कोण मला अडवे तो !" चक आणि बेटावरील त्याच्या कल्पनेतील सखा "विल्सन" हे जगण्याच्या अनुभवाचे प्रतीक आहेत. मनुष्यप्राण्यातील ही कट्टरतेचीच भावना आणि निसर्गाने जन्मजात दिलेली जगण्याची लालसा, ओढ यासाठी आणि ती सार्थअर्थाने भोगण्यासाठीच 'आपण जगतो' असे मी म्हणेन. इन्द्रा
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Mon, 01/17/2011 - 17:20

In reply to अनुभवासाठी जगणे....!! by इन्द्र्राज पवार

Permalink

उत्तम प्रतिसाद. किंचित

उत्तम प्रतिसाद. किंचित शंका जगण्याचे कारण शोधण्याची विचारक्षमता ईश्वराने [अर्थात या विश्वाची निर्मिती 'देव' नावाच्या कुणीतरी अज्ञाताने केली यावर विश्वास असेल तरच] माणसाला जन्मजातच दिली असल्याने कंसातील वाक्य सध्यापुरते बाजुला ठेवु. जगण्याचे कारण शोधण्याची विचारक्षमता जन्मजात असते की भाषेच्या संवादामुळे/लेखनामुळे इतर मानवांच्या अनुभवाच्या /विचारांमुळे असे विचार मनात येतात हा प्रश्न आहे. कारण जर अशी क्षमता जन्मजात असेल तर प्रत्येकालाच असे प्रश्न पडतात का? हा विचार मनात आला.
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Mon, 01/17/2011 - 17:28

In reply to उत्तम प्रतिसाद. किंचित by अवलिया

Permalink

जन्मजात नसावी.. पण

जन्मजात नसावी.. पण बुद्धिमत्ता हाच माणूसप्राण्याचा इतका अविभाज्य भाग आहे की ही विचारक्षमता किंवा इच्छा इतरांकडून (अ‍ॅक्वायर्ड) असते की बुद्धी विकसित होताना सोबत आपोआप पडणार्‍या प्रश्नांपैकी (स्वनिर्मित) तो प्रश्न आहे हे सांगणे कठीण. सर्वांनाच हे प्रश्न पडतात असं दिसतं.. इथे असलेल्या प्रत्येकाला कधी ना कधी पडला असेल हे ते सांगू शकतील. जनरली पंधरावीस वर्षे वयादरम्यान पहिल्यांदा आणि तीव्रतेने पडतात असं वाटतं. म्हणजे त्या वयात मित्रांमधे चर्चा झडलेल्या आठवतात.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वानन्द on Mon, 01/17/2011 - 17:46

In reply to उत्तम प्रतिसाद. किंचित by अवलिया

Permalink

क्षमता असल्याशिवाय... आपण

क्षमता असल्याशिवाय... आपण विचार करू शकणारच नाही! असं म्हणता येईल की तिचा वापर करण्यासाठी उपरोल्लिखित कारणे कारणीभूत होतात. पण या लेखनाची सुरूवात पण कुणीतरी पहिल्यांदा केली; ती तशी क्षमता असल्यामुळेच.
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Tue, 01/18/2011 - 04:25

In reply to उत्तम प्रतिसाद. किंचित by अवलिया

Permalink

हो!!

>>प्रत्येकालाच असे प्रश्न पडतात का? हा विचार मनात आला. हो. हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. किंबहुना सर्व प्रश्नांचं मूळ कारण तेच असतं. ते प्रत्येकाला प्रत्येकवेळी प्रकर्षाने जाणवत नाहि हा भाग निराळा. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on Mon, 01/17/2011 - 17:34

Permalink

मस्त मस्त बीर्यानी खाता यावी म्हणून जगतो

. पण आता असे पण वाटालेय की राष्ट्रपतींकडे अर्ज पेंडींग असेल तर पण जगता येते....
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Mon, 01/17/2011 - 17:25

Permalink

माझी स्वाक्षरी पहा, कारण

माझी स्वाक्षरी पहा, कारण कळेल.. हर्षद.
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Mon, 01/17/2011 - 17:37

Permalink

मला या प्रश्नाचे उत्तर माहित

मला या प्रश्नाचे उत्तर माहित नाहीये. पण गेल्या काही दिवसापासून आमचे मित्र श्री. प.रा.-जी यांना "मी अजून जिवंत कसा?" असा प्रश्न स्वतःबद्दलच पडला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by निखिल देशपांडे on Mon, 01/17/2011 - 17:43

Permalink

चांगला प्रश्न आहे. वर काही

चांगला प्रश्न आहे. वर काही चांगले कारणे आले आहेत. आम्ही तर बुवा खाण्यासाठी जगतोय. निखिल
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Mon, 01/17/2011 - 18:01

In reply to चांगला प्रश्न आहे. वर काही by निखिल देशपांडे

Permalink

वर काही चांगले कारणे आले

वर काही चांगले कारणे आले आहेत. आम्ही तर बुवा खाण्यासाठी जगतोय.
काय ? जरा संपुर्ण वाक्यात लिहित जा. उगाच मनात नको नको ते विचार येतात.
  • Log in or register to post comments

Submitted by निखिल देशपांडे on Mon, 01/17/2011 - 18:08

In reply to वर काही चांगले कारणे आले by परिकथेतील राजकुमार

Permalink

वरील वाक्य असे वाचावे वर काही

वरील वाक्य असे वाचावे वर काही चांगले कारणे आले आहेत. आम्ही तर बुवा ,खाण्यासाठी जगतोय.
  • Log in or register to post comments
Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on Mon, 01/17/2011 - 18:18

In reply to वरील वाक्य असे वाचावे वर काही by निखिल देशपांडे

Permalink

हाहाहा आहो पराला असे म्हणायचे असावे की ;)

जर वर काही चांगली कारणे आली आहेत असे तूम्हाला वाटते आहे तर तूम्ही खाण्यासाठी जगताय असे सांगून तूमचे कारण चांगल्या कारणापासून वेगळे का करत आहात ?
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com