ये दौलत भी ले लो
गत दिनांची आठवण कोणाला येत नाही ? त्या दिवसांतील आठवणी निरनिराळ्या असतात. भर्तृहरि " सा रम्या नगरी महान स: नृपती.." म्हणेल व शेवटी "कालाय तस्मै नम:" म्हणून मोकळा होईल तर कोणाला पुण्यातील "बादशाही खानावळ " आठवेल. भवभुतीच्या उत्तर राम चरित्रातील राम व सीता यांना अयोध्येत, राजवाड्यात ऐषारामात असतांना सुद्धा वनवासातील झोपडीत गप्पा मारत कंठलेली रात्र आठवून " रात्रीरेव व्यंसरित " असे म्हणावे वाटेल. एखादा नभातील चंद्र पाहून "ती न आर्तता ऊरात ,," म्हणत दु:खाला वाट करून देत असेल तर दुसरा एकामेकावर उधळलेल्या फूलांची आठवण करत " गेले, ते दिन गेले " असे उसासे टाकत असेल. एखादे "प्रौढ लेकरू " खेड्यातील " घर कौलारू " आठवतो व ... आता या संदर्भात माहेरची आठवण काढणार्या सासुरवाशिणींच्या रम्य कविता तुमच्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या असतील. काही आठवणी रम्य असतात व चालू रुक्ष जीवनांत थंडगार वार्याची झुळुक पसरवतात तर बहुतेक त्या काळीं काय गवसले ह्या पेक्षा काय गमावले याचीच जाणीव करून देऊन, भरल्या जखमेवरची खपली काढून, जणू हृदयातल्या सूप्त सलाला वाट करून देतात.
आज एक हिंदी कविता देत आहे. जगजीत-चित्रा यांनी गायलेली हे अतिशय लोकप्रीय गझल आहे. पण हे एक सुरेख भावगीतही आहे. आपला आवाज त्यांच्या इतका सुरेल नसला तरी स्वत:शी गुणगुणलात तर तुमच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या आहेत असे तुम्हाला दिसून येईल. रसग्रहणात्मक काही लिहावे असे वाटत नाही पण एक नोंद अवष्य करीन की वर उल्लेखलेल्या कवितांत दु:ख असेल तर या कवितेत विष:णता आहे. गमावलेले जाणारच होते याची जाण आहे. ते जाणार हे अटळ होते व म्हणून दौलत, मानमतराब असल्या गोष्टींच्या बदल्यात "ते" परत मिळावे ही केविलवाणी विनवणी आहे.
ये दौलत भी ले लो ये शोहरत भी ले लो
भले छीन लो मुझसे मेरी जवानी
मगर मुझसे लौटा दो वोह बचपन का सावन
वो कागज की कश्ती वोह बारिश का पानी
महल्ले की सब से निशानी पुरानी
वोह बुढिया जिसे बच्चे कहते थे नानी
वोह नानी की बातों में परियों का डेरा
वोह चेहरे की झुरियों में सदियों का फेरा
भुलाए नही भूल सकता है कोई
वोह छोटी से रातें वोह लम्बी कहानी
वोह कागज की कश्ती ...
कडी धूप में अपने घर से निकलना
वोह चिडिया वोह बुलबुल वोह तितली पकडना
वोह गुडिया की शादी पर लडना झगडना
वोह झुलों से गिरना वोह गिरकर संभलना
वोह पिपल की छइयों के प्यारे से झोके
वोह टूटी हुई चूडियों की निशानी
वोह कागज की कश्ती ...
कभी रेत के उंचे टीलों पे जाना
घरोंदे बनाना बना कर मिटाना
वोह मासूम चाहत की तस्वीर अपनी
वोह ख्वाबो खिलौनों की जागीर अपनी
न दुनिया का गम था न रिशों के बंधन
बडी खुबसुरत थी वोह जिंदगानी
ये दौलत भी ले लो ये शोहरत बी भी ले लो
भले छीन लो मुझसे मेरी जवानी
मगर मुझको लौटा दो ....
( जर कोणाला जालावरून हे गाणे द्यावयाचे असेल तर कृपया जगजीत-चित्रा यांचे जुगलगीतच द्या, एकट्या जगजीतचे यु ट्युबवरील live programa चे नको.)
शरद
याद्या
3972
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
सुंदर
गाणं अप्रतिमच आहे वादच नाही.
गाणं.. नो डाऊट अप्रतिम आहे.
हा दुवा पहा जरा... हे
क्या बात...क्या बात!
....गाण्याच्या अनुशंगानं
In reply to क्या बात...क्या बात! by धमाल मुलगा
सहमतीवर सहमती. धमुच्या
In reply to ....गाण्याच्या अनुशंगानं by मनिष
छान
हेच म्हणतो.
वा...इतकी सुंदर कविता इथे
***
धन्यवाद शरदराव