क्षण
वाहणारे
हातातून निसटणारे
येतील का पुन्हा जुळून
विसरता न येणारे
क्षण
भरणारे
आठवणींतून झरणारे
येतील का पुन्हा दाटून
बु़जवता न येणारे
क्षण
चमकणारे
निराशेस विझवणारे
येतील का पुन्हा उजळून
लपवता न येणारे
कुणास ठाऊक ते येतील कधी
धरतील हातात हात मैत्रीचे कधी
मिठीस घेऊन एक्-मेकांस
विसरणे चुकांस शक्य होईल का पुन्हा
क्षण
लांबणारे
हवे हवेसे ते वाटणारे
येतील का उतरून पुन्हा
आयुष्यास ते हसवणारे
- निनाव २४ अप्रिल २०११
याद्या
1228
प्रतिक्रिया
6
लेखनविषय:
मिसळपाव
निनाव - कुणास ठाऊक ते येतील
व्वाह...
खुपच छान लिहिले आहे .. खुप
एकदम छान रचना आहे. शब्दात
पाभे, आवर्जुन वाचल्या बद्दल,
क्षण