चाललो होतो एकटाच एका वाटेवरुन
तु भेटलीस आणि सुरुवात झाली नव्या आयुष्याला
आनंद वाटु लागला माझ्या जीवाला
पुन्हा रोज येऊ लागलो कॉलेजला
एक दिवस धाडस करुन विचारल मी तुला
तु नाही म्हंटल नाही,
पण टाईमच नाही उरला अभ्यासाला
शेवटी केटी लागली हो हिंदी विषयाला
ती केटी ची फि भरताना काय वाटल असेल माझ्या जिवाला
नंतर पुन्हा विचारल मी तुला
तु नाव सांगीतलस तुझ्या भावाला
त्यान सुपारी दिली गुंडा शिवाला
त्यान मला खुप खुप ठोकला
आणि बनवला माझा ढोकला
जागा उरली नाही हो रक्त जायला
ते रक्त पाहुन काय वाटल असेल माझ्या जिवाला
अगं...तुझ्या नादात कधी माडी,कधी बियर,कधी इंग्लीश,
आता सुरुवात झाली हो गावटीला
जेव्हा यायला लागला चकण्याचा खर्च
तेव्हा काय वाटल असेल माझ्या जिवाला
आता ऐकत असतील तिच्या कोणी मैत्रीणी येथे
तर जाऊन सांगा आता तिला, सोडली मी तिला
आणि पकडले दुसरीला .........
पुन्हा मजा येऊ लागली माझ्या आयुष्याला,
आणि बर वाटु लागल माझ्या जिवाला
पण काय वाटल असेल तिच्या जिवाला...........
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1591
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
तिला काय वाटणार? साला कटकट
छान!
:(
काव्य कळत नाही .. पण षिर्षक
शिल्पा जी, तुम्ही छान प्रयत्न
नका लाउन घेउन जिवाला इतकं !
जीवाच्या भानगडीत सखा विषयी