Skip to main content

गणनाट्याच्या पुढिल अंकांत कसला समावेश असावा या बाबत मायबाप मिपाकरांच मत जाणुन घ्यायचय.

लेखक गणपा यांनी मंगळवार, 19/04/2011 00:34 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 1326
प्रतिक्रिया 40

प्रतिक्रिया

In reply to by प्रभो

आम्हाला १. व्हेज खादाडी २. नॉन व्हेज खादाडी ३. मॉकटेल ४. कॉकटेल, हे सर्व हवे आहे. कॉम्बिनेशन तुम्हीच ठरवा आणि द्या.

In reply to by स्मिता.

उभे आड्वे कसे ही चालेल. खाल्ले नाही, पिले नाही, नुसते बघितले तरी 'पोटभरुन' 'नशा' होते राव....

In reply to by स्मिता.

गणपाभौ एक विनंती- खाद्य व पेयाचं विशिष्ट कॉम्बिनेशन निवडण्यामागची भूमिकाही त्या त्या लेखात थोडक्यात थोडक्यात सांगावी ही विनंती. म्हणजे, दोन्ही पदार्थांच्या पोत, मसाले, रंग, गोडवा, खाण्याची वेळ इत्यादी बाबींचा विचार करूनच तुम्ही ह्या जोड्या ठरवत असणार. त्यापैकी एखाद्या बाबीची माहिती प्रत्येक लेखात दिलीत तर आवडेल. उदा. मागच्या एका लेखात नाटक्याने 'टकिला थोडीशी आंबट असते त्यामुळे त्या बरोबर अननसाचा रस असला तर फारच आंबट चव येईल' असं म्हटलं आहे. अशा बारीक-बारीक पण उपयुक्त टिप्स्मुळे पदार्थांचे स्वाद जास्त उमजून खाता/ पिता येतील असं वाटतं.

In reply to by शहराजाद

कोणते मद्य कोणत्या प्रकारच्या खाण्याबरोबर चालते याचे, अगदी शास्त्र नाही म्हणता येणार पण, काही विशिष्ट ठोकताळे आहेत. कॉकटेलची निवड करताना मी याचाच विचार करतो. जसे की मागच्या वेळेला तंदूर श्रिंप्स बरोबर उष्ण/दमट वातावरणात होणार्‍या अननसाचा रस वापरला होता. त्याने थोडा समरकूल आणि ट्रॉपीकल फिल आला. कारण प्रॉन्स/श्रिंप्स म्हटले की लगेच गोवा-कारवार कडचा समुद्र किनारा आठवतो. त्यामुळे अशा वातावरणात नारळाचे पाणी, नारळाचे दुध, अननस, आंबा असले पदार्थ वापरून केलेले कॉकटेल जास्त छान वाटते. गणपाशेट सुध्दा याचा विचार करतात असे वाटते पण खाद्याची निवड त्यांच्याच शब्दात त्यांच्याच कडून ऐकणे मजेदार आणि रोचक असेल.

नॉन-व्हेज खादाडी आणि कॉकटेल व्हेज खादाडी आणि कॉकटेल नॉन-व्हेज खादाडी आणि मॉकटेल व्हेज खादाडी आणि मॉकटेल काहीही चालेल गणपा-नाटक्या मुर्दाबाद (चॉलबे ना, चॉलबे ना..काहीही नको.) सोडुन काहीही चालेल पण प्रात्यक्षीसहीत रसास्वाद घेणे हे जास्त आवडेल. (हा पर्याय न टाकल्यामुळे निषेध). (खाजगीत आमंत्रण दिल्यास वरील कंस काढुन टाकण्यात येइल)

In reply to by नाटक्या

दोघांचे कॉबिनेशन इतके भन्नाट आहे की ते प्रत्यक्षात अनुभवायला आवडेल. दोघे कधीतरी मातृभुमीवर याल आणि ही "ड्रिम पार्टी" होइल असे स्वप्न आहे. आणि ते प्रत्यक्षात येइल असे वाटते. त्यासाठी माझ्याकडे पेशन्स आहे. :)

काहीही चालेल.. व्हेज खाणं मात्र फारसं चीझ वगैरे असलेलं नका करु :) आणि हो, सारखं सारखं पायनॅपल ज्युस असलेलं पेय पण नको...जरा वेगळं काहीतरी हवं

In reply to by रेवती

"तु "चीज" बडी है मस्त मस्त .. " हे गाणं उगाच आठवलं . बाकी णॉण्व्हेज पाकृ हव्यात .. अपेयपान करत नसल्यामुळे नाटक्या च्या रेशिप्या आम्हाला नॉट अ‍ॅप्लिकेबल आहेत :(

व्हेज खादाडी आणि मॉकटेलला मत दिलय. जरा कमी क्यालरीवाले पदार्थ द्याहो! नॉनव्हेजला जरी मत दिले नसले तरी ते प्रकारही हवेतच नाहीतर शाकाहारींकडून येऊन येऊन असे किती प्रतिसाद येणार?

In reply to by मेघवेडा

च्यायचं मेवे ओक!!! =)) =)) =)) तुला येक टायम कोंबडी /बोकड खायला घातला तर काय पायजेल त्यातला तुला? कोंबडी आधी की बोकड आधी?? :D मेल्या, व्हेजच्या पलिकडे गाडी जात नाय तुझी, आणि सगळा कसा रे पायजे तुला? :-) अवांतर: बरेचसे 'प्रसाद' नामक लोक "हे पायजे, ते पायजे, ते पण पायजे, सगळंच पायजे" असे का असतात असा एक प्रश्न पडून गेला! ;-) अजून अवांतर: लै मोठा प्रतिसाद लिहीला होता, पण मिपा झोपलं. त्यातला जितका आठवला तितका रिपिट मारला. --असुर

In reply to by असुर

अजून अवांतर: लै मोठा प्रतिसाद लिहीला होता, पण मिपा झोपलं. त्यातला जितका आठवला तितका रिपिट मारला. यामुळे त्रस्त होऊन मी नेहमी प्रतिसाद सेंड करण्याआधी सिलेक्ट करून कंट्रोल सी मारतो मगच सेंडवतो.

पुण्यातल्या आशियानामध्ये व्हेज क्रिस्पी आणि चिकन क्रिस्पी खाल्लेले आठवतात. त्याचं बॅटर सारखंच होतं. चमचमीत, तिखट, आणि भज्यापेक्षा थोडं कुरकुरीत. त्याच्या पाकृ दिल्यात दोन्ही आडियन्सचा एकाच वेळी करता येतील. (कदाचित आधी दिल्याही असतील, तसं असेल तर दुवा द्या)

वेगवेगळे कबाब आणि बिर्याणीचे प्रकार येऊ द्या! कॉकटेल्स मॉकटेल्स आलटून पालटून आली किंवा एकाच वेळी पर्यायी रेशिप्या दिल्या तरी चालतील.

गणपा व नाटक्याशेठ दोघेही ठरवून देतील ते काहीही चालेल (९९.९९% जे काही असेल ते भारीच असेल) फक्त आठवड्यातून / महीन्यातून कितीवेळा ह्या लेखमालेतला धागा येउ दे हे ठरले पाहीजे.

In reply to by सहज

>>गणपा व नाटक्याशेठ दोघेही ठरवून देतील ते काहीही चालेल (९९.९९% जे काही असेल ते भारीच असेल) +१ सहमत आहे. आम्ही बिचारे शेवटी फोटुवरुनच काय तो आनंद मिळवणार.. :( ( आयला आजकाल मिपा फारच गंडायला लागले आहे.. हा प्रतिसाद ३ वेळा लिहावा लागला. सारखं पेज कॅनॉट बी डिस्प्लएड)

In reply to by सहज

फक्त आठवड्यातून / महीन्यातून कितीवेळा ह्या लेखमालेतला धागा येउ दे हे ठरले पाहीजे.
आठवड्यातुन एकदा (शक्यतो विकांताला) देण्याचा मानस आहे आमचा. जर ओव्हर डोस होत असेल तर पाक्षिक वा मासिक धागा काढु. :)

"गणपा-नाटक्या मुर्दाबाद (चॉलबे ना, चॉलबे ना..काहीही नको.)" ऐवजी "गणपा-नाटक्याला फटके द्या" असा ऑप्शन असता तरच कौलात मत देण्यात अर्थ होता. असो.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

कार्यकर्त्यांशी सहमत ( बघा बघा ) गणपा नाटक्या ला फतके द्यायला हवेत असा ऑप्शन हवा होता. लेको तुम्ही ल्ह्या ना कौल कशाला घेताय. गणपा तू इकडे येच. नाय तुला पळवला तर बोल. व्हेज खादाडी थोडी कमीच येते मिपावर. तेच मॉकटेल्स बाबत होतेय. मायबाप तुम्ही जे काही देता ते भन्नाटच असते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

कार्यकर्त्यांशी सहमत आहे. पण तसं लिहील्यास गणपा आणि नाटक्या या दोन पाककलाशास्त्रनिपुण व्यक्तींचा अपमान झाला असं इतरांनाच वाटेल काय?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

नाकारता येत नाही.

सारे काही आभासीच. प्रत्यक्ष काही देणार असाल तर कौलावर मतदान केले जाईल. अन्यथा नाही.

In reply to by श्रावण मोडक

श्रामो जिंदाबाद!! गणपा-नाटक्या.. चॉलना बे चॉलना बे..! ;)

In reply to by श्रावण मोडक

हो देऊ ना!! मे-जुन मध्ये गणपा तिथे असणार आहे (माफ कर रे बाबा गणपा.. तुझ्या सुटीचे सगळे प्लान आधीच जाहीर करून वाट लावलीय तुझ्या सुटीची) आणि मी ऑगष्ट-सप्टेंबर मध्ये यायचे म्हणतो आहे. दोन्ही एकदम मिळणार नसले तरी हप्त्या-हप्त्याने हप्ता वसूल करता येईल. कट्टा कुठे करायचा ते ठरवा (मुंबई/ठाणे/पुणे)..... हम हाजीर हो जायेंगे (बाटल्यांसकट)!!

In reply to by नाटक्या

धागा वर आला आहेच... यावे. यावे. स्वागत समिती स्थापन झाली आहे. रेड कार्पेट ऑर्डर केले आहे. :)