Skip to main content

गारूड्याचा नागूबा मस्ती करतोय रं

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 17/04/2011 20:42 या दिवशी प्रकाशित केले.
गारूड्याचा नागूबा मस्ती करतोय रं

या गारूड्याचा नागूबा मस्ती करतोय रं उंच फना काढून पुंगीवर डोलतोय रं ||धृ|| मी बाई भित्री नाजूक माझी काया डसला तर जाईल जीव माझा वाया त्येला बघून मला भ्येव वाटतंय रं ||१|| त्याला नागपंचमीला दुध मी देते त्याला लांबून नमस्कार करते त्याला देवासमान मी मानते रं ||२|| त्याचा खेळ लई मजेदार असतो पुंगी वाजवूनी नागोबा डोलतो खेळ झाला की पैकं गोळा तू करतोय रं ||३|| बघ एक सांगते मी आता तुला मुका प्राणी हा जर का मेला मनेकाबाई तुला पकडतेय रं ||४|| मुक्या प्राण्याला असं छळनं नाही बरं त्याच्यावर प्रेम करणं हेच आहे खरं दाट झाडीत त्याला सोडतोस काय रं ||५|| - पाषाणभेद (दगडफोड्या) १७/०४/२०११
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2840
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

पाषाणभेदा - मी बाई भित्री नाजूक माझी काया डसला तर जाईल जीव माझा वाया त्येला बघून मला भ्येव वाटतंय रं ||१|| मस्त डुलायला होतेय ..!!

एकदम अणूकूचीदार काव्य होते.

ह्यो नागोबा जापानी तेलानी त नाय डोलायला लागला? मस्त रे पाभे गरिबोंका गुरु ठाकूर

In reply to by प्रकाश घाटपांडे

ह्यो नागोबा जापानी तेलानी त नाय डोलायला लागला?
च्यायला पकाकाका म्हणजे कहर आहेत मस्त हो पाभे. ख्याती जपणारे पद्य.

च्यायला पकाकाका म्हणजे कहर आहेत >>> हा ना राव !! पाषा की भाषा आवडली !

आयत्या बिळावर नागोबा छळू नका गं त्याला बा- यांनो. ओवाळा, बिळात घ्या डोलता आयता नागोबा शांत रस! या चावर्‍या नागाकरिता "चावट रस" निवडायला हवा होता.

In reply to by धनंजय

छळू नका गं त्याला बा- यांनो. ओवाळा, बिळात घ्या
ह्हा ह्हा .. ह्हा .. :) आता ऐन वेळी बायकांनी गर्दी केल्यावर खेचाखेचीत एक तर समुद्रमंथन होऊन रत्नद्रव्ये बाहेर पडतील किंवा नागोबा तुटायचे =)) नागोबा भला करे :) - ( वारुळाच्या शोधात ) नागंजय

सध्या स्व.दादा कोंडके यांच्या काव्याचा भरपूर अभ्यास सुरु आहे असे दिसते! ;) बाकी सध्या नागपंचमी वगैरे जवळ आलेली नसूनही अचानक नागोबाची कविता स्फुरावी ह्याचे अंमळ आश्चर्य वाटते आहे! -रंगोबा

टारझणचा प्रतिसाद वाचायला धागा उघडला, इकडे तर लै दिग्गज डोलतांना दिसून र्‍हायले राव. हहपुवा हेवेसांनल.