Skip to main content

प्रगतीच्या दाराआड

लेखक रमताराम यांनी सोमवार, 18/04/2011 या दिवशी प्रकाशित केले.
आज NDTV वर हादरवून टाकणारा हा रिपोर्ट पाहिला. दिल्लीच्या इंडिया गेट पासून ११ किलोमीटर अंतरावर असलेल्या या वस्तीच्या - खरे तर शहराच्या - दारूण अवस्थेकडे पाहून हादरून गेलो. तब्बल १० लाख लोकसंख्या असलेल्या या शहराची अवस्था काय आहे हे स्वतःच पहा. घर झाडून लख्ख करावे नि सार कचरा दाराआड लोटून द्यावा नि त्याच्याकडे ढुंकून पाहू नये तशी दिल्ली, नॉयडा, गाजियाबाद या प्रगतिपथावरील शहरांच्या मधोमध वसलेली ही 'कचरावस्ती'. आय-ई वर विडिओ दिसत नाही (मूळ NDTV च्या साईटवर देखील मला दिसत नव्हता). फाफॉ वापरा अथवा खालील दुवा वापरा. http://www.ndtv.com/video/player/ravish-ki-report/video-story/196073
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3293
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

अवघड आहे ! हे असले काही बघितले की आपण किती सुखाच्या राशीत आणि तेही मस्तवालपणे लोळत आहोत ह्याचा अंदाज येतो. अर्थात हे देखील संध्याकाळच्या प्याल्याबरोबर विसरले जाईल येवढे निगरगट्ट आहोतच.

एकूणच उत्तर भारतात हायजीन या बद्दल प्रचंड अनावस्था आहे. रस्त्र्यावर कचरा करणे , थुंकणे , लघ्वी करणे, चहाचे कप फेकणे ,उरलेल्या खाद्यदार्थ रस्त्यावर फेकून देणे यात इथल्या लोकाना फारसे ववगे वाटत नाही. रस्त्यावर मिळणारे खाद्यपदार्थ इतके घाणेरडे असतात की किळस येते

In reply to by विजुभाऊ

विडिओ पाहिला का? तिथे कोणतीही व्यवस्था अस्तित्वात नाही. लोक स्वतः लोकवर्गणी काढून रस्ता भरतात. पण सुएज सिस्टीम बसवणे हे व्यक्तिसमूहाचे नव्हे व्यवस्थेचे काम आहे, कारण त्यासाठी लागणारी कौशल्ये सामान्य माणसाकडे नसतात. इथे ते लोक घाणेरडे आहेत हे अतिशय दुर्दैवी विधान आहे. इथे ते घाणेरडे आहेत की नाही हा प्रश्न नाही. समजून चालू की ते तसे आहेत. पण त्या शहरात कचरा उचलण्याची व्यवस्थाच नाही. मोकळ्या भूखंडांवर कचरा टाकला जातो. ते भरले की जिथे जागा मिळेल तिथे. दरवर्षी घरटी काही हजार रुपये लोक खिशातून खर्च करत आहेत. पण त्यांच्या उत्पन्नाला मर्यादा आहेत. लोकप्रतिनिधी गायबच आहेत. कोणतीही प्रशासकीय यंत्रणाच अस्तित्वात नाही. भयानक हे की ही वस्ती, हे शहर दिल्लीपासून अवघ्या ११ किलोमीटर अंतरावर आहे.

ररा हे असे बकाल स्वरुप एका दिवसात होते का? एनडीटीव्हीला आजच कसे दिसले? सब चलता है!

In reply to by सहज

मुद्दा हा नाही की NDTV ला कधी दिसले. मुद्दा हा आहे की इतरांना - खास करून आपल्या शासनयंत्रणेला - इतक्या वर्षात नाही दिसले. प्रशासकीय यंत्रणेचा पूर्ण अभाव आहे इथे. कचरा उचलण्याची व्यवस्था नाही कारण म्युनिसिपल कार्पोरेशनच अस्तित्वात नाही. १० लाख लोकवस्तीमधे एकही रुग्णालय नाही, पोलिस स्टेशन नाही. वीज मंडळाचा कारभार दयनीय आहे. वीजेचे धक्के खाऊन अनेकांना जीव गमवावा लागलेला आहे. हे सारे सारे दिल्लीच्या परसात आहे तरी ररा हे असे बकाल स्वरुप एका दिवसात होते का? नक्कीच एका दिवसात होत नाही. परंतु तिकडे लक्ष देणारी यंत्रणा कुठे आहे. स्थानिकांनी आपल्या कुवतीमधे जे काही प्रयत्न केले ते पाहता त्याहून अधिक फारसे ते करूही शकत नव्हते असे वाटते. ही सारी दुय्य्म नागरिकांची वस्ती आहे, बांधकाम मजूर, दिल्लीतले रिक्शाचालक इ. लोक इथे राहतात हे लक्षात घ्यायला हवे. मुळात इथे दोष कुणाचा हा माझा मुद्दा नाहीच. इतकी गंभीर स्थिती दिल्लीच्या परसदारी असावी नि सरकारी यंत्रणांना त्याचा गंधही लागू नये हे विदारक आहे.

In reply to by रमताराम

घ्या घ्या थोडी बियर घ्या .. हे थोडी पार्टी पिनट्स घ्या. मस्त २ घोट मारा . संध्याकाळी ती आयपीएल आहे ती अशी मस्तं येंजॉय करा. कशाला ह्या नसत्या गोष्टी बघता?

In reply to by डीलर

वस्ती ? बॉस एक छोटे शहरच आहे ते. कमीत कमी ५/१० कॉलनी आहेत, एक सरकारी शाळा देखील आहे. लाखोंच्या संख्येनी लोकं राहात आहेत तिथे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

परा मान्य तुझा मुद्दा. मुंबईत धारावी इज सीटी विदीन मुंबई पण, शासनाच्या लेखी ती आधी उभी राहीलेली आणि वाढत गेलेलीअनधीक्रुत वस्तीच. (योग्य क्रु कसा लिहवा?)

In reply to by परिकथेतील राजकुमार

एवढ्या प्रचंड लोकसंख्येला किमान एक - खरेतर दोन - महानगरपालिका असायला हव्यात, इथे नगरपालिकासुद्धा नाही. ग्रामपंचायतीचे एक बुजगावणे आहे. त्याच्या सरपंचाने ४ कोटीचा निधी परत का गेला या प्रश्नाला 'माहित नाही' असे उत्तर दिले. भर घालत रस्ते वर आल्याने किंवा तळघराचे स्वरूप आल्याने त्यात सांडपाणी साचून निरुपयोगी झालेली घरे पाहून आपण एखाद्या उत्खननाच्या ठिकाणी सापडलेले प्राचीन शहर पाहतोय का काय अशी भावना उत्पन्न झाली. हे मान्य आहे की आपल्याकडे गावेच्या गावे अशा स्थितीत आहेत, पण इतर दशलक्षी शहरांची तुलना करता इथे परिस्थिती एखाद्या गाव/पाड्याहून भीषण आहे असे म्हणावे लागेल.

हे असले आम्हाला काही सांगू नका ररा... आम्हाला सध्या मेलेल्या माणसांची धोतरे फेडणार्‍या पत्रकारांचे लेखन वाचायचे व्यसन जडले आहे. आम्ही केवळ ते वाचून खिखि करुन हसण्यात मग्न आहोत. आमच्यातले फार फार हुशार लोक त्यांना टाळ्या देत वा वा छान लिहिले आहे मजा आला अजुन येउद्या असे म्हणत उड्या मारण्यात मग्न आहेत. त्यामुळे आमच्यासारख्यांना त्यांचे अनुकरण करणे क्रमप्राप्त आहे. असली काही पत्रकारीता करुन चुकीचे पायंडे पाडू नये असे एन्डीटिव्हीला आमचे सांगणे आहे आणि त्यांनी जरी ऐकले नाही तरी असल्या लिंका देऊन तुम्ही आमचा वेळ घेऊ नका ... हां कुणा विशिष्ट विचारसरणीचा (पक्षी तुम्हाला मान्य नसलेल्या विचारांचा) मनुष्य कसा विक्षिप्त आहे/ होता किंवा तो कसा मातीच्या पायांचा होता हे लेखन अगदी आवर्जुन लिंक देऊन सांगा !....

आम्हाला सध्या मेलेल्या माणसांची धोतरे फेडणार्‍या पत्रकारांचे लेखन वाचायचे व्यसन जडले आहे. आम्ही केवळ ते वाचून खिखि करुन हसण्यात मग्न आहोत. आमच्यातले फार फार हुशार लोक त्यांना टाळ्या देत वा वा छान लिहिले आहे मजा आला अजुन येउद्या असे म्हणत उड्या मारण्यात मग्न आहेत. त्यामुळे आमच्यासारख्यांना त्यांचे अनुकरण करणे क्रमप्राप्त आहे. >>> _/\_ धन्यवाद रे पै !

साहेब नोएडा, गाजियाबाद सोडा ( ते उत्तम प्रदेशात आहे ), खुद्द दिल्लीत ह्यापेक्षा काही वेगळे नाहीये.तुम्हाला कदाचित माहित असावे कि सार्वजनिक संपत्ती खेळाच्या वेळेस ह्या लोकांनी कचरा हटवता आला नाही म्हणून त्याला मोठ-मोठ्या ब्यानरच्या मागे लपवला होता. मग दिल्ली सरकारची भरपूर नाचक्की झाली होती.