Skip to main content

बिहार युपी बिमारू राज्ये

लेखक निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी यांनी रविवार, 17/04/2011 03:24 या दिवशी प्रकाशित केले.
पाणी पुरीवाल्यांना का मारले ? इतर सर्व पाणीपुरीवाले हातात ग्वोज घालून पाणीपुरी विकतात . त्यांची नखे व हात ते जेव्हा पाण्याच्या मटक्यात बुडवतात तेव्हा स्वच्छ असतात . ती लोक १० ते १५ जण मिळून एका खोलीत राहतात त्यामुळे शारीरिक स्वच्छता उत्तम रीत्या जोपासतात .अश्या स्वच्छ निर्मळ मनाच्या पाणीपुरी वाल्यांना जे दर महिन्याला मुंबईच्या रस्त्यावर तो रस्ता त्यांच्या तीर्थ रूपांचा असल्याच्या अविर्भावात धंदा करतात ( ह्यांना गेस्ट्रो,कावीळ, ह्या रोगांनी सुपारी दिली असते .स्वतःचा प्रचार करण्यासाठी ) भारतात हैद्राबाद हे सायबराबाद झाले .बेंगळूर हे आयटी हब. दिल्ली च्या जवळ गुडगाव येथे औद्योगिक नगरी उभी राहिली .गुजरात प्रगती करत आहे .आपल्या इथे पुणे व नाशिक येथे औद्यीगिक पट्टा उभा झाला . केरळ व गोवा राजस्थान पर्यटन शेत्रात नावारूपास आले .तर पंजाब कृषी शेत्रात नाव राखून आहे . मग बिहार व उत्तर प्रदेश हा ठसठशीत अपवाद का ठरले ? आज ह्या नावामध्ये पटना का नाही आहे .? ( ''खायला काळ भुईला भार'' ही म्हण आपल्या वाढत्या लोकसंख्येने सिद्ध करत आहेत ) आपल्या गृह मंत्र्यांचे विकीलीक्स ने उघडकीस आणलेले वक्तव्य काय चुकीचे आहे .ही दोन
राज्ये प्रगतीस खीळ घालत आहेत .
एकेकाळी पाटील पुत्र भारतातील बलाढ्य नंद व मौर्य साम्राज्याची राजधानी .ह्या लोकांकडे आपल्या इतिहासाचा महान वारसा आहे .आजही ह्यांच्या राज्यातील गया हे बुद्धः धर्माचे प्रमुख स्थान त्याबद्दल जगभरातील बुद्ध व इतर धर्मियांना आकर्षण आहे . ते जागतिक पर्यटन केंद्र म्हणून जर नावारूपाला आणले तर मक्का मदिना , वेतीकन सिटी .किंवा जेरुसलेम एवढेच होली पर्यटन होऊ शकते .ह्या प्रदेशातील नैसर्गिक खनिज संपत्ती चा उपयोग येथे खाजगी उद्योग धंदे उभारायला का नाही वापरत ? आज येथे खाजगी शेत्र का नाही उभे रहात आहे .? का ह्यांच्या लोकांना दुसर्या राज्यात लोंढे वाढवून तेथील लोकांच्या समस्येत भर घालत आहेत . तेथील राज्यकर्ते म्हणत असतील '' आम्ही येथे रोजगार निर्मिती करू शकत नाही . पर बंबई हे ना ,सपानोकी नगरी( बॉलीवूड इफेक्ट ) मग ही लोक येथे येतात
. बेकायदेशीर रीत्या झोपड्या ,पाणी, वीज मिळवतात ( मुंबईत २४ तास वीज पुरवठा हवा हा सरकारी आदेश ) त्याचा लाभ ह्यांना मात्र महाराष्ट्रातील खाजगी व सरकारी वीज कंपन्या मात्र ह्यांच्या बोकांडी वीज रीती करणार मग भले उर्वरीत महारष्ट्र ( अगदी डोंबिवली सारखी शहरे ) भारनियमन सोसत आहेत .
आज डोंबिवली मधील मराठी मध्यमवर्गीय माणूस गिरणगाव व गिरगाव मधून येथे आला. कारण महाग मुंबईत म्हाडा स्वस्त घरे देऊ शकत नाही .तो नियमित पणे सरकारला कर देतो ( चाकरमानी ) .ह्याच्या बदल्यात त्याला काय मिळते ? ह्याउलट एक पैशाचा कर सरकारला न देता हे पाणीपुरी वाले मुंबईत मजेत राहत आहेत .ह्यांचे भाऊ बंद बेकायदेशीर रीत्या झोपड्या बांधण्यासाठी येतच आहेत . ही लोक हलाखीत राहतात .मग स्वतःची शारीरिक स्वच्छता राखू शकत नाही व मुंबईत रोगराई पसरवतात ( मुंबईत मलेरिया बिहारी मजुरांमुळे पसरत आहे ही बातमी वाचली ) आज आपल्या आकारमानाच्या तुलनेत इतर राज्याहून भव्य म्हणून ही राज्य स्वतःचे प्रतिनिधी जास्त प्रमाणात संसदेत पोहोचवतात व स्वतःच्या राज्यासाठी गेली ६० वर्षे जास्त निधी घेत आहेत . पण जातीयता व अनेक इतर गोष्टींमुळे ह्यांचे सामाजिक जीवन अजूनही मध्ययुगीन काळासारखे आहे . ह्या बिमारू राज्यामध्ये इतर राज्यांनी पुढाकार घेऊन सर्व पक्षीय सरकार स्थापन केले पाहिजे .व त्यांचा विकास घडवून आणला पाहिजे .किमानपक्षी तेथे उद्योग धंदे वाढवले पाहिजे . ह्यांचा विकास झाला नाही तर मूळव्याधी प्रमाणे ही लोक इतर राज्ये मग महारष्ट्र असो किंवा दिल्ली ह्यांना भार बनून राहतील . ह्या बिमारू राज्यांचे काय करायचे ? ह्यांच्यावर काहीच उपाय नाही का ? ह्यांची भाषा जन संपर्काची भाषा म्हणून आपण वापरतो म्हणून ही लोक शेफारली आहेत का ? ह्यांची पुरोगामी मानसिकता मुळापासून बदलण्यासाठी काय केले पाहिजे ? केंद्र सरकार कडे बिमारू राज्यांवर अंकुश ठेवण्यासाठी विशेष अधिकार हवेत की ह्या राज्यांसाठी एखादी कमिटी हवी ? आज भारतात ४ जी तंत्रांद्यान येईल ,शहरातील तरुण पिढी प्रगत देशाला लाजवेल इतक्या झपाट्याने नवीन युगाचा मंत्र आत्मसात करत आहेत . भारताचा पाकिस्तान व कांगारू विरुद्ध विजय व मग ग्राफिक चित्रांचा सोशल नेटवर्क च्या माध्यमातून पडलेला पाऊस ह्या नवीन पिढीचे आक्रमक व आत्म विश्वास दर्शवतात . ही पिद्धी बिमारू राज्यातील एका मोठ्या समूहाशी जर आपली नाळ जोडू शकली नाही तर देश एकसंध रहायच्या दृष्टीने कठीण समस्या निर्माण होतील . आज ह्या दोन देशातून अनेक आय पी एस व आय एस दर्जाचे अधिकारी भारतात येतात .ही लोक बुद्धिमान आहेत ह्यात शंका नाही .मात्र एवढी मोठे मनुष्यबळ वाया चालले आहे . ह्या लोकांमध्ये भविष्यातील अनेक वैज्ञानिक , कारागीर , अभियंते , दडले आहेत .ह्याच्या दारिद्र्य ,गरिबी ,व अज्ञानाच्या महासागरात दीप स्तंभ बनून मार्गदर्शन करायला जे पी ह्यांनी परत एकदा जन्म ध्यावा . असे मनापासून वाटते .

वाचने 3935
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

पाणी पुरीवाल्यांना का मारले ? इतर सर्व पाणीपुरीवाले हातात ग्वोज घालून पाणीपुरी विकतात . त्यांची नखे व हात ते जेव्हा पाण्याच्या मटक्यात बुडवतात तेव्हा स्वच्छ असतात . ती लोक १० ते १५ जण मिळून एका खोलीत राहतात त्यामुळे शारीरिक स्वच्छता उत्तम रीत्या जोपासतात .अश्या स्वच्छ निर्मळ मनाच्या पाणीपुरी वाल्यांना जे दर महिन्याला मुंबईच्या रस्त्यावर तो रस्ता त्यांच्या तीर्थ रूपांचा असल्याच्या अविर्भावात धंदा करतात ( ह्यांना गेस्ट्रो,कावीळ, ह्या रोगांनी सुपारी दिली असते .स्वतःचा प्रचार करण्यासाठी )
हा उपरोध असावा. पण पुढील वाक्यांमध्ये कुठे उपरोध दिसला नाही. नक्की काही समजले नाही.
पण जातीयता व अनेक इतर गोष्टींमुळे ह्यांचे सामाजिक जीवन अजूनही मध्ययुगीन काळासारखे आहे .
हेदेखील स्वीपिंग स्टेटमेंट वाटते. असे नसेलच असे म्हणायचे नाही; पण असे आहे हे कशावरून?
ह्याउलट एक पैशाचा कर सरकारला न देता हे पाणीपुरी वाले मुंबईत मजेत राहत आहेत .ह्यांचे भाऊ बंद बेकायदेशीर रीत्या झोपड्या बांधण्यासाठी येतच आहेत . ही लोक हलाखीत राहतात .मग स्वतःची शारीरिक स्वच्छता राखू शकत नाही व मुंबईत रोगराई पसरवतात ( मुंबईत मलेरिया बिहारी मजुरांमुळे पसरत आहे ही बातमी वाचली )
ही मंडळी 'सरकारला' कर देत नसतील; पण 'सरकारी' मंडळींना कशावरुन 'कर' देत नसतील? या परिस्थितीत सरकारी मंडळीही तेवढीच जबाबदार ठरत नाहीत का? जर इतर राज्यांनी त्या राज्यांत जाऊन त्यांना सुधारावे असा प्रस्ताव येऊ शकतो, तर या परिस्थितीत ही मंडळी इथेच आयती आलेली आहेत, त्यांना इथेच सुधारुया असा प्रस्तावही अपेक्षित ठेवावा काय? म्हणजे रोगराईचा प्रश्नही आयता सुटेल. मराठी माणसांना जे स्वच्छतेचे व्यसन आहे, आणि महाराष्ट्र जसा चकचकीत आहे, तसेच या मंडळींना आणि त्यांच्या झोपडपट्ट्यांनाही ठेवता येईल.
ह्या बिमारू राज्यामध्ये इतर राज्यांनी पुढाकार घेऊन सर्व पक्षीय सरकार स्थापन केले पाहिजे .व त्यांचा विकास घडवून आणला पाहिजे .किमानपक्षी तेथे उद्योग धंदे वाढवले पाहिजे .
(तथाकथित) बीमारु राज्यांमध्ये आपण गौरवाने उल्लेख केलेले राजस्थानदेखील आहे. शिवाय आपल्या या विधानाचा अर्थ होतो बिहार आणि यूपी सोडता इतर सर्व राज्यांमध्ये आदर्श समाज एवं आदर्श राजकारणी एवं आदर्श सरकार/ प्रशासन आहे. किमान या दोन राज्यांपेक्षा अधिक चांगली परिस्थिती आहे. वेल. असे असू शकेल. पण कशाच्या आधारावर असे म्हणता येते? केवळ यूपी-बिहार विरोधी प्रचाराच्या आधारावर?
ह्या दोन देशातून अनेक आय पी एस व आय एस दर्जाचे अधिकारी भारतात येतात .ही लोक बुद्धिमान आहेत ह्यात शंका नाही .मात्र एवढी मोठे मनुष्यबळ वाया चालले आहे .
बिहार आणि यूपी हे भारताबाहेरचे दोन वेगळे देश आहेत का? आयपीएस, आयएएस दर्जाचे अधिकारी बुद्धीमान असतात काय? म्हणजे असू शकतील, पण बुद्धीमत्ता अधोरेखीत करण्यासाठी त्यांचेच उदाहरण का? की असे म्हणायचे आहे, या राज्यांतील बुद्धीमान लोक फक्त आय ए/ पी एस होतात, अन्य क्षेत्रांत जात नाहीत? असो. मनापासून लिहिले आहे असे वाटले म्हणून लिहिले. बाकी सर्वांचीचप्रगती एका गतीने व्हावी (चांगल्या गतीने) याच्याशी सहमत आहे.

बिमारु राज्य महाराष्ट्र आहे..मुंबई वगळा...अन बघा. यु.पी बिहारचे लोक होते म्हणुन ईंडस्ट्री चालल्या होत्या..त्यांना हाकलले.. आता एम आय डी सी मधे कामगार मिळत नाहित..मिळाले तर टिकत नाहित.. शेतकरी फास लावुन घेत आहेत...प्यायला पाणी नाहि..विज नाहि..

हा उपरोध असावा. पण पुढील वाक्यांमध्ये कुठे उपरोध दिसला नाही. नक्की काही समजले नाही. लेखाची सुरवात उपरोधाने झाली कारण इतर रस्त्यावरील पदार्थ खाऊन रोगराई पसरते .हे प्रखर सत्य नाकारून इतर भय्यांना का चोपले असा मानवतावादी दृष्टीकोन खूप लोकांनी आळवला . पण पुढील लेखात मी जे मला जाणवले तेच सांगितले . हेदेखील स्वीपिंग स्टेटमेंट वाटते. असे नसेलच असे म्हणायचे नाही; पण असेच आहे हे कशावरून? ह्या लोकांचे आयुष्य व जगण्याची मानसिकता मध्ययुगीन आहे . हे मी संपूर्ण राज्याबाबत बोललो . .( इतर राज्यात रामराज्य आहे अश्यातला भाग नाही .ह्या राज्यांपेक्षा खूपच चांगली स्थिती आहे ) मागेच छोटा डॉन ह्यांनी बलात्कार व त्यांच्या तक्रारी नोंदवणे संबंधी बिहार व महाराष्ट्रा मधील फरक समजाऊन सांगितला होता . ह्या राज्यांमधील .शहरे सुद्धा प्रगत नाहीत ,( म्हणुनच शहरी शिकलेले बाबू लोक सरकारी नोकर्यांसाठी इतर राज्यात मोकाट सुटतात ) आंध्र मध्ये ग्रामीण भाग प्रगती करत आहे असे एका वाचनात आहे .गुजरात बद्दल वेगळे बोलायला नकोच . तामिळनाडू येथे वाहनांची इंडस्ट्री उभी राहत आहे .आपल्या कडे पुणे ,नाशिक ...केरळ ने पर्यटनात गोव्याला स्पर्ध्धा निर्माण केली आहे . ह्यांच्या अर्थ वरील सर्वच राज्ये सर्वच क्षेत्रांत आधाडीवर आहेत असे नाही पण ह्या दोन राज्यांसारखी सर्वच क्षेत्रांत अधोगती नाही आहे .( वरील राज्यातील लोकांचे तांडे इतर राज्यात धुमाकूळ घालत नाहेईत अर्थात महाराष्ट्र व दिल्ली येथे स्थानिक प्रशासनाचे हात ओले करून ही लोक आपले इस्पित पूर्ण करतात .येथे कुंपण शेत खाते ह्यांची सगळ्यांना कल्पना आहे .ह्या मुद्यावर राजकारण जास्त चालते ह्यांची सुद्धा कल्पना आहे . @ तसेच या मंडळींना आणि त्यांच्या झोपडपट्ट्यांनाही ठेवता येईल. मुळात झोपडपट्या ( बांगलादेशी ही लोक व इतर राज्यातील गरीब लोक ) बांधतात .तेही फुकटात व त्यांना पुढे कायमस्वरूपी घरे मिळतात .मात्र पोलिसांना व इतर सर्व सरकारी कर्मचारी ज्यांचा पगार खाजगी नोकर्यांच्या तुलनेत कमी आहे .त्यांच्या घरासाठी कोणीच काही बोलत नाही .मग त्यांच्यात लाचखाऊ वृत्ती फोवावते कारण त्यांना सुद्धा ह्या महागाईच्या युगात जगायचे असते . अनधिकृत झोपडपट्या हटवून त्या जागी म्हाडाने मध्यम वर्गीयांना परवडतील अशी घरे बांधली तर ( काही दशकांपूर्वी कुर्ला पूर्व येथे नेहरू नगर , चेंबूर येथे सुभाष व टिळक नगर ही म्हाडाची मराठी माणसांसाठी बांधलेल्या वसाहती आदर्श उदाहरणे आहेत .) आता मुंबईत मोकळ्या जागा ह्या भय्यांनी किंवा बांगला देशी लोकांनी गिळंकृत केल्या मग मराठी माणसाच्या नशिबी अबंरनाथ ते विरार लोकल मधून धक्के खात जगणे लीहीलेले आहे . @ पण कशाच्या आधारावर असे म्हणता येते? केवळ यूपी-बिहार विरोधी प्रचाराच्या आधारावर? इतर राज्यामध्ये खाजगी उद्योगधंदे आहेत .ह्या राज्यांमध्ये म्हणावे तेवढे नाहीत . राजस्थान पर्यटन विभागात अग्रेसर आहे .ही लोक टोळ झाडी सारखी इतर राज्यांमध्ये जात नाहीत . @ आयएएस दर्जाचे अधिकारी बुद्धीमान असतात काय? म्हणजे असू शकतील, पण बुद्धीमत्ता अधोरेखीत करण्यासाठी त्यांचेच उदाहरण का? हा सगळ्यात विनोदी प्रश्न आहे . फार पूर्वी सुभाष चंद्र बोस ते आता मनमोहन सिंग ते कोकण रेल्वेचे जनक श्रीधरन अशी असंख्य उदाहरणे जर तुम्हाला माहीत नसतील तर ................ ह्या परीक्षेत बुद्धीमत्तेचा व व्यक्तिमत्वाचा चौफेर कस लागतो .माझ्या मते जगभरात मंदी आली पण त्या प्रमाणात भारतात आली नाही .ह्याचे श्रेय ह्या लोकांना जाते . आज रिझर्व बेकेंचे पहिले गव्हर्नर सी डी देशमुख सारखे महाराष्ट्रीयन अधिकारी सिस्टम घडवतात . पण महाराष्ट्रीय अस्मितेसाठी सरकारी नोकरीचे जोखड भिरकाऊन देतात .

In reply to by निनाद मुक्काम …

आपला लेख आणि प्रतिसाद हा स्वीपिंग स्टेटमेंट्स आणि विरोधाभासांनी भरलेला आहे हे नमूद करतो. बरेच मंडळींचे आपल्यासारखेच मत असलेले पाहिले आहे, आणि ते प्रामाणिक मत असते असेही दिसले आहे. म्हणून लिहितो. आपल्या प्रतिसादांतील काही उदाहरणे देतो. यात आपल्या चुका काढण्याचा उद्देश नाही. परंतु आपण म्हणायला एक जातो, आणि भलतेच म्हणून बसतो हेही लक्षात येत नाही असे काहीवेळा होते.
ह्या लोकांचे आयुष्य व जगण्याची मानसिकता मध्ययुगीन आहे
खैरलांजी प्रकरणाचे उदाहरण देऊन कुणी महाराष्ट्राबद्दल हेच म्हणू शकते.
ह्या राज्यांमधील .शहरे सुद्धा प्रगत नाहीत ,( म्हणुनच शहरी शिकलेले बाबू लोक सरकारी नोकर्यांसाठी इतर राज्यात मोकाट सुटतात)
एका ठिकाणी आपण (बिहार/ यूपी मधून आलेल्या) आयएएस इ. अधिकार्‍यांबद्दल गौरवाने बोलला आहात, तर या विधानात "मोकाट सुटणे" असा निगेटिव्ह शब्दप्रयोग आहे. या राज्यांमधली शहरे प्रगत नाहीत हेदेखील स्वीपिंग स्टेटमेंटच आहे.
आंध्र मध्ये ग्रामीण भाग प्रगती करत आहे असे एका वाचनात आहे .
आंध्राच्या ग्रामीण भागात वंचना आहेत, म्हणून तो भाग नक्षलग्रस्त आहे असेही वाचनात आलेले आहे.
महाराष्ट्र व दिल्ली येथे स्थानिक प्रशासनाचे हात ओले करून ही लोक आपले इस्पित पूर्ण करतात .येथे कुंपण शेत खाते ह्यांची सगळ्यांना कल्पना आहे
हेच शेत खाणारे कुंपण प्रगतीशील आहे असेही आपण म्हणता, तसेच, हे 'कुंपण' या 'मागास' राज्यांमध्ये जाऊन आदर्श व्यवस्थेचा वस्तुपाठ देऊ शकते असेही म्हणता.
त्यांच्यात लाचखाऊ वृत्ती फोवावते कारण त्यांना सुद्धा ह्या महागाईच्या युगात जगायचे असते .
लाचखाऊ वृत्तीचे आणि भ्रष्टाचाराचे हे केवीलवाणे तसेच चीड आणणारे समर्थन आहे.
माझ्या मते जगभरात मंदी आली पण त्या प्रमाणात भारतात आली नाही .ह्याचे श्रेय ह्या लोकांना जाते .
देशाची (जी काही) वाट लागली आहे (लागली असल्यास) याच लोकांमुळे लागली आहे असेही बर्‍याच जणांचे मत आहे.
पण महाराष्ट्रीय अस्मितेसाठी सरकारी नोकरीचे जोखड भिरकाऊन देतात .
हे विधान कोणत्या अर्थाने घ्यावे हेच समजत नाही. महाराष्ट्रीय अस्मिता सरकारी नोकरीच्या आड कशी काय येते? खाजगी नोकरी मराठी अस्मितेला चालते का? असो. लिहिण्यासारखे बरेच आहे. आपला प्रामाणिक दृष्टीकोन समजला आहे. परंतु आपल्या असल्या मांडणीमुळे आपल्याला जे सांगायचे आहे, ते मत नीट मांडले जात नाही. हे सांगायचे होते. "आपण" आणि "ते" हा रिलेटिव्ह दृष्टीकोण आहे. अखिल भारतीय पातळीवर विचार करताना "ते" म्हणजेच यूपी/ बिहारी हे "आपल्यापेक्षा" वेगळे आहेत असे समजणे योग्य नाही.

निनाद ..... परिस्थिती थोडी बदलत आहे. मला दिल्लीत एक टॅक्सीवाला भेटला. तो म्हणाला की बीहार मध्ये सध्या लोक घरे बांधत आहेत , गाड्या विकत घेत आहेत. बाहेर राहिलेले लोक आपल्या पालकाना घरे घेवून देताना दिसत आहेत. बीहार मध्ये कायदा आण इसुव्यवस्थिती सुधारत आहे. नितीश कुमार तेथील्कारभारात बर्‍याच सुधारणा करीत आहेत. इकडे दिल्लीत देखील कमी प्रतिची कामे बीहारी लोकच करतात. मुम्बैची परिस्थिती सुद्धा वेगळी नाही. आत्तापर्यन्त दुर्दैवाने आणि महाराष्ट्र दिल्ली वगैरेच्या सुदैवाने बीहार मध्ये औद्योगीक सुधारणा झाल्या नाहीत. तेथील राजकारण्यानी लोकांच्यात शिक्षणाचा प्रसार केला नाही. ( भारतात सर्वात जास्ती कलेक्टर्स बीहारमधून येतात ) पण आता बीहारचा विकास होतोय. ते लोक अशिक्षीत असतील/ गरीबीमुळे त्याना इतरत्र स्थलाम्तरीत व्हावे लागते. पण त्यांचे कश्टाळूपण मानावेच लागेल. एखादा मराठी माणुस इतरत्र जावून वडापावचा गाडा लावून जगतोय असे दृष्य तुम्ही स्वप्नात देखील कल्पु शकत नाही. बीहारीलोकांचे व्यवसाय इथे चालतात. ते धंदे आपल्यामुळेच चालतात ना? कर्नाटकात एक बीहारी पानवाला भेटला होता तो अस्खलीत कानडी आणि तमिळ बोलत होता. आपण्त्यांची भाषा चालवून घेतो. त्यामुळे त्याना मराठीवाचून चालून जाते .ही आपलीच चूक आहे

In reply to by विजुभाऊ

एखादा मराठी माणुस इतरत्र जावून वडापावचा गाडा लावून जगतोय असे दृष्य तुम्ही स्वप्नात देखील कल्पु शकत नाही.
आपला दिल्लीशी बराच परिचय दिसतो. अनेक मराठी दिल्लीत (तसेच इतरत्रही) सोने गाळण्याचा व्यवसाय करतात.आर्थिक परिस्थितीची तुलना करता वडापाव गाडी चा व्यवसाय करणारांपेक्षा फार वेगळे नसतात. थोडी अधिक बरी परिस्थिती, एवढेच.
तेथील राजकारण्यानी लोकांच्यात शिक्षणाचा प्रसार केला नाही. ( भारतात सर्वात जास्ती कलेक्टर्स बीहारमधून येतात )
शिक्षणाचा प्रसार न झाल्याने जास्तीत जास्त "कलेक्टर्स" बिहारमधून येतात की काय!

राजस्थान पर्यटन विभागात अग्रेसर आहे .ही लोक टोळ झाडी सारखी इतर राज्यांमध्ये जात नाहीत>> गैरसमज आहे तुमचा. मारवाडी ही सगळ्यात धूर्त व्यापारी जात. (थॉमस ए. टिम्बर्गचे 'द मारवारीज' हे पुस्तक वाचा) संस्थाने खालसा झाल्यावर इंग्रजांची सत्ता येताच पूर्वी रजपूत राजांना कर्जे देणार्‍या मारवाडी सावकारांचे व्यवसाय संपुष्टात आले. पुढचा काळ ओळखून या मारवाड्यांनी देशाच्या विविध भागांत व स्थलांतर केले. त्यात कोलकता व मुंबई या शहरांचे महत्त्व ओळखून ते हळूहळू जम बसवू लागले. 'जहॉं जाती नही गाडी, वहाँ जाता है मारवाडी' ही म्हण त्यामुळेच रुढ झाली. राजस्थानातून एक पितळी लोटा घेऊन आलेल्या लोकांनी कष्टाने त्याचे रुपांतर सोन्याच्या लोट्यात केले. उद्योग क्षेत्रातील अनेक बडी घराणी मारवाडी आहेत. मारवाड्यांचे बघून राजस्थानातील इतर समाजही (सिरवी क्षत्रिय, जैन) व्यवसायासाठी बाहेर पडला. १९८५ च्या सुमारास महाराष्ट्रातील छोट्या मोठ्या शहरांत एकदम स्वस्त आइस्क्रिमच्या गाड्यांची संख्या वाढली. महावीर, हनुमान, केसरिया, सावलिया अशा नावाने एकदम १०-१५ गाड्या शेजारी उभ्या राहू लागल्या. आमच्या लहानपणी आम्हीपण असे १-२ रुपयांचे आइस्क्रिम खात असू. ते उंटिणीच्या दुधापासून बनवतात, अशा छातीठोक गप्पा मित्रांत चालत असत. राजस्थानी लोकांनी मिळेल त्या व्यवसायात हात घालायला सुरवात केली. पुण्याचे उदाहरण घ्या. १९९५ मध्ये पुण्याच्या बांधकाम व्यवसायाचा आवाका विस्तारु लागताच पहिला फायदा राजस्थानातून आलेल्यांनी घेतला. एक गाळा घेऊन तेथे किराणा (ऑल इन वन) दुकान टाकायचे. त्याला नाव 'मिनी मार्केट' द्यायचे. दुकान दोन गाळ्यांचे असेल तर त्याला 'सुपर मार्केट' म्हणायचे. पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात आजघडीला अशा दुकानांची संख्या २० हजारांच्या आसपास असण्याचा अंदाज आहे. इतर शहरांचे माहीत नाही. पुन्हा हे लोक कुटूंबासह स्थलांतरित झाले आहेत. बर्‍याच ठिकाणी 'नीचे दुकान उपर मकान' अशी मांडणी असते. घरचे सगळे व्यवसायात मदत करतात. ते लोक वर्षा-दोन वर्षात मराठी शिकतात. आपले लोक मात्र त्यांच्याशी मुद्दाम हिंदीतून बोलायला जातात. अर्थात हा प्रतिसाद मी मारवाड्यांवर टीकेच्या उद्देशाने टाकला नाही. उलट मला त्यांच्या उद्योजक वृत्तीचे कौतुकच वाटते. पण राजस्थानातले लोक टोळधाडीसारखे जात नाहीत, हे वाक्य वस्तुस्थितीशी विसंगत वाटले म्हणून नमूद केले इतकेच.

In reply to by योगप्रभू

टोळधाड ही जेथे जाते तेथिल सर्व शेते-पिके खाउन परिसर उ़आड करते. मारवाडी लोक जेथे जातात तेथे व्यापार-व्यवसाय करुन स्वत:चि आणी परीसराची भरभराट करतात (तुमच्या प्रतिसादाचे सार), परीसर बकाल करुन त्याची वाट लावत नाहीत, म्हणुन ते लोक टोळधाडी प्रमाणे जार नाहीत असे लिहीले असावे.

ते लोक वर्षा-दोन वर्षात मराठी शिकतात. आपले लोक मात्र त्यांच्याशी मुद्दाम हिंदीतून बोलायला जातात. माझे म्हणणे हेच आहे. इंदुर वगैरे भागात आपले जे मराठी लोक आहेत ते घरात देखील हिंदी बोलतात. दिल्लीत तर महाराष्ट्र मंडळात जमलेली मंडळी एकमेकांशी हिंदीतच बोलतात. हे आपेले दुर्दैव आहे

प्रत्येक वाक्याला राजाने फाटे फोडायचे ठरवले तर मग त्याला इलाज नाही . बिमारू राज्य ही कवी संकल्पना नाही .हे निखळ सत्य आहे . आज प्रत्येक राज्य हे भारत व इंडिया ह्या दोन भागात विभागले गेले आहे .ही दरी भरलीच पाहिजे . पण संपूर्ण राज्ये ज्यात शहर व गाव येथे खाजगी उद्योग धंदे का नाहीत . राजा जेव्हा फक्त उत्तर द्यायचे म्हणून महाराष्ट्रातील जळीत हत्याकांडांचे उदाहरण मला प्रत्युत्तर द्यायचे म्हणून देतो . तेव्हा एक गोष्ट विसरतो की ह्या प्रकरणाचा महाराष्ट्रातील लोकांनी निषेध केला होता . ह्याउलट बिमारू राज्यात सरळमार्गी जीवन जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या फुलन देवीची हत्या एका ठाकूर पुत्राने बदला घेण्यासाठी केली तेव्हा अनेक गावात बंदुकींच्या फैरी झडल्या. खैरलांजी प्रकरणाचे उदाहरण देऊन तुम्ही सुतावरून स्वर्ग गाठत आहात .( महारष्ट्रात बलात्कार केलेला अभिनेता शायनी ला ७ वर्षाची शिक्षा झाली तर एका पोलीस अधिकार्याने ह्या आरोप लागल्यावर आत्महत्या केली .कारण त्याचे निलंबन होऊन अटकेचा आदेश निघाला होता ,आज हजारे ह्यांची दिल्ली वारी व त्यांचे यश तुम्हाला दिसले नाही .) @आंध्राच्या ग्रामीण भागात वंचना आहेत, म्हणून तो भाग नक्षलग्रस्त आहे असेही वाचनात आलेले आहे. सगळा ग्रामीण भाग हा नक्षलग्रस्त आहे का ? @ "ते" म्हणजेच यूपी/ बिहारी हे "आपल्यापेक्षा" वेगळे आहेत असे समजणे योग्य नाही. त्यांना वेगळे समजण्याचा प्रश्नच येत नाही .तेथे राज्य व मतदार संघ मोठे आहेत म्हणून नेहमी मोठा निधी केंद्र सरकार कडून घेतात .मग तरीही ह्यांचा बीमारू दर्जा कायम का राहतो .खाजगी उद्योग धंदे नसल्याने तेथे सुशिक्षित लोकांना सरकारी नोकरी शिवाय पर्याय नसतो .म्हणून दोन दशकात हट्टाने ह्या राज्यांनी रेल्वे मंत्री पद ताब्यात ठेवून आपल्याकडील सुशिक्षित बेरोहागर इतर राज्यात वळवले . आज तेथील सामजिक विषमतेमुळे सरकारी पद मिळवले हाच स्वतःचा उद्धार करण्याचा राजमार्ग वाटतो .त्यामुळेच लाल दिव्याची मोहिनी तेथे जास्त जनमानसात दिसून येते . बाकी @ आयएएस दर्जाचे अधिकारी बुद्धीमान असतात काय? म्हणजे असू शकतील, तुमच्या ह्या विधानातून तुमच्या चर्चेचा रोख सिद्ध होत आहे . आयएएस दर्जाचे अधिकारी हुशार असतात ह्यात वाद नाही ,पण हुशारीचा वापर श्रीधरन कोकण व दिल्लीची मेट्रो बांधायला करतात . तर फाटक हे आदर्श मध्ये जागा पटकावतात . नुकतेच एका कलेक्टर साठी आदिवासी लोकांनी नक्षलवाद्याविरुद्ध उभे ठाकले. तेव्हा काही चांगल्या लोकांमुळे हा देश अजूनही टिकून आहे हे आपण मान्य कराल .( मुळात हा माझ्या मूळ लेखाचा विषय नव्हता ) ही लोक हुशार आहेत .चाणक्य, चंद्रगुप्त, बुद्ध अश्या सारख्या महान व्यक्तींची जन्म भूमी असलेले आपल्या सांकृतिक वारसा असणारे ही राज्ये राष्ट्रांच्या मूळ प्रवाहात सामील व्हावी असे मला वाटते . त्यांची आर्थिक उन्नती झाली की त्यांचे लोक येथे यायचे आपसूक थांबतील उदाहरण १९६० च्या दशकात दक्षिणात्य लोकांनी सरकारी मोठी पदे पटकावली होती .मात्र नंतर त्या राज्यामध्ये प्रगती झाली व आपसूकच तेथील शहरातील लोक तेथील खाजगी उद्योग धंद्यात कामाला लागली कुठलाही भूमिपुत्र सहजासहजी आपला प्रदेश सोडत नाही . आज बेकायदेशीर झोपड्यात राहणाऱ्या लोकांना कुठल्या कायद्याच्या अंतर्गत फुकटात घरे द्यायची ( ती घरे भाड्याने देऊन ही लोक नवीन झोपड्या बांधायला मोकळे ) पा ह्या सिनेमात ह्या लोकांचा कळवला येणार्या प्रसारमाध्यमांना अभिषेक उत्तम धडा शिकवतो .ह्यांच्या साठी आंदोलन करणार्या बहाना आझमी ह्यांच्या घरात काही .उत्तर भारतीय मुक्कामाला ठेवले म्हणजे त्यांना कळेल .आमच्या तीर्थ रूपांनी कायदेशीर मार्गाने डोंबिवली गाठली हीच मोठी चूक केली .त्यानी सुद्धा एक झोपडे बांधले असते तर एव्हाना धारावीच्या टॉवर मध्ये गेले असते .

In reply to by निनाद मुक्काम …

लिहायचा मोह होतो आहे. सवडीने लिहितो. फाटे फोडण्याच्या किंवा प्रत्युत्तर लिहिण्याच्या उद्देशाने माझे प्रतिसाद नव्हते हे मी अगोदरच स्पष्ट केलेले आहे. भावनांशी सहमत आहे. पण "आपण आणि ते" अशी मांडणी करताना जे मुद्दे आपल्यालाही लागू होतात, तेच आपण "त्यांना" लागू करतो. असो. लिहितो. आणि हो, बाय द वे, आजकाल, म्हणजे गेली दहा वर्षे वगैरे, आयएएस आणि तत्सम सेवांमध्ये मराठी मंडळींचे प्रमाण खूप म्हणजे खूपच आणि खूपच वाढलेले आहे. ज्ञानप्रबोधिनी, पुणे इथे आपल्याला याची आकडेवारी मिळू शकेल. (बिहारींपेक्षा जास्त. २००७ मध्ये, उदा., सहा बिहारी तर दहा मराठी आय ए एस झाले. मी बाकीच्या सेवांचे तर बोलतच नाही. सर्व सेवा मिळून साधारण ९० ते १०० मराठी - आउट ऑफ टोटल ६०० ते ८०० सीट्स.) याचा अर्थ महाराष्ट्राचा बिहार होतोय असा घ्यावा काय याचा मी विचार करतोय! ;-)

In reply to by आळश्यांचा राजा

@बाय द वे, आजकाल, म्हणजे गेली दहा वर्षे वगैरे, आयएएस आणि तत्सम सेवांमध्ये मराठी मंडळींचे प्रमाण खूप म्हणजे खूपच आणि खूपच वाढलेले आहे. ज्ञानप्रबोधिनी, पुणे इथे आपल्याला याची आकडेवारी मिळू शकेल. (बिहारींपेक्षा जास्त. २००७ मध्ये, उदा., सहा बिहारी तर दहा मराठी आय ए एस झाले. मी बाकीच्या सेवांचे तर बोलतच नाही. सर्व सेवा मिळून साधारण ९० ते १०० मराठी - आउट ऑफ टोटल ६०० ते ८०० सीट्स.) याचा अर्थ महाराष्ट्राचा बिहार होतोय असा घ्यावा काय याचा मी विचार करतोय! Wink हेच म्हणतोय मी की तुम्ही मूळ विषयाला फाटे फोडत आहात . मूळ मुद्दा बिमारू राज्यांना राष्ट्रांच्या मूळ प्रवाहात कसे आणावे ? माझ्या पहिल्या लेखात मी आय ए एस दर्जाच्या बिहारी अधिकाऱ्यांचे उदाहरण ह्याच कारणासाठी दिले की ह्या केडर च्या अधिकाऱ्यांची गुणवत्ता वादादित आहे .( गंगाजल सिनेमात मध्ये अजय सुद्धा अधिकारी असतो नी मोहन आगशे सुद्धा फक्त अधिकार वापरण्यासंबंधी दृष्टीकोन वेगळा असतो ) २००७ च्या आधी व आता सुद्धा महाराष्ट्रातील पदवीधर ( शहरातील ) तरुणापुढे अभियंते झाल्यास आयटी चे शेत्र आहे . वाणिज्य शेत्रातील तरुणांना एम बी ए करून अर्थ जगतात अनेक देशी परदेशी बँक व अर्थ पुरवठा करणाऱ्या कंपन्या आहेत . थोडक्यात परदेशी शिक्षणासाठी मुलांना बाहेर पाठविण्यासाठी मध्यमवर्गीय मानसिकता आहे .पण बिमारू राज्यातील शहरात सुद्धा ना शिक्षण संस्थांचे जाळे ना खाजगी उद्योग धंदे आज आपल्यादेशातील बहुसंख्य उद्योजक हे परदेशात कंपन्या विकत घेत आहेत .पण बिमारू राज्यात नवीन सुरु करत नाही आहेत . ह्या राज्यामध्ये नैसर्गिक साधन संपत्ती व स्वस्त कामगार असून सुद्धा ही वेळ का यावी . मुळात अविनाश धर्माधिकारी व इतर संस्था ह्यांनी अथक प्रयत्न घेतले म्हणून महाराष्ट्रीयन टक्का वाढला आहे .( आयटी मध्ये जा किंवा परदेशी शिक्षण घ्या असे सांगण्यासाठी कुठल्या संस्थेची गरज नव्हती कारण ह्या संधी डोळ्यासमोर होत्या .बिमारू राज्यात तेथे अश्या संधी निर्माण झाल्या नाहीत .म्हणून आयटी मध्ये दाक्षिणात्य व महाराष्ट्रीयन जगभरात नोकर्या करताना दिसतात . आज मुंबई युनिवर्सिटी व पटना युनिवर्सिटी मध्ये जर राजाला फरक जाणवत नसेन तर नाईलाज आहे . एकेकाळी ह्या राज्यातील विद्यापीठ नालंदा व तक्षशीला जगभर प्रसिद्ध होती . आज मात्र शिक्षणाच्या नावाने बोंब आहे

बीहारी लोक हे कष्ताळू असतात. त्यांच्यासाठी सर्व्हायवल चा प्रश्न असतो त्यामुळे ते कोठेही गेले तरी कमी मोबदल्यात काम करायला तयार असतात. बीहार मध्ये शिक्षनाचा प्रसार झाला नाही या सोबतच मी कंसात केलेले . ( भारतात सर्वात जास्ती कलेक्टर्स बीहारमधून येतात ) हे विधान वस्तुस्थिती ची एकाच वेळेस असणारी विरुद्धता दाखवते हे कलेक्टर आय ए एस असतात. पण त्याच बरोबर हे लोक बीहारमध्ये विकास घडवत नाहीत हे देखील खरे आहे. राजकारणी आणि गुंद यांच्यातील संगनमतामुळे हे घडले बिहारात शिक्षण मिळत नाही. तेथे नोकर्‍या उपलब्ध नाहीत. हे चित्र बदलत आहे. तेथे नोकर्‍यांच्या संधी उपलब्ध झाल्यास लोक कशाला इतरत्र जातील. एक काळ असा होता की महाराष्ट्रात राजस्थानी/कच्छी सुतार मिळायचे. आता मात्र बहुतेक सुतार बीहारी असतात, इलेक्त्रीशियन बीहारी असतात. या व्यवसायातील मराठी लोक गेले कुठे?

आयएएस् परिक्षेत बिहारचीच पोरं जास्त पास होतात असं कसं ? भय्ये कसे काय आपल्यापेक्षा हुशार असनार ? एकदा का आयएएस् बनून अधिकारी झाला का राजकारनी, उद्योजक, गुंड, आर्थिक गुन्हेगार यांच्या कळपात जाउन बसायला आणि सार्वजनिक पैशाची अन् जनतेची लूटमार करायला मोकळा.