Skip to main content

मिसळपाव विषयी......

लेखक किसन शिंदे यांनी शनिवार, 16/04/2011 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर मंडळी..... माझा पहिलाच प्रयत्न आहे मिपालेखनाचा त्यामुळे काही त्रुटी आपल्याला आढळल्यास सांभाळून घेणे. तसा मी सुद्धा मिपाकर आहे पण फ़क़्त वाचनापुरता. गेल्या वर्षी आगस्टमध्ये गुगलवर कोल्हापुरी मिसळीची पाककृती(स्वाती राजेश यांनी लिहलेली अतिशय चटकदार अशी कोल्हापुरी मिसळीची पाककृती) शोधता शोधता मिसळपाववर आलो आणि मग इथलाच झालो. सर्व मिपाकरांप्रमाणे मिसळपाव हा माझासुद्धा वीक पोइन्ट आहे. त्यानंतर मिसळपावची सवय इतकी अंगवळणी पडली कि सकाळी ऑफिसला आल्यावर सर्वात पहिल्यांदा मिसळपाव ओपन करतो आणि त्यानंतरच मग बाकीची सगळी कामे करतो. तात्या अभ्यंकर!! साला आपण काय लिहणार यांच्याबद्दल, त्यांनी लिहलेली सगळी व्यक्तिचित्रे तर खासच. त्यांची रोशनी वाचताना तर ती सगळी पात्र माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली. आधीच माझ्या आवडीचे असणारे शास्त्रीय संगीत तात्यांच्या लेखांनी मला अतिशय सुंदररीत्या उलगडून दाखवले. केतकीच्या बनी तिथे या लेखानंतर सुमन ताईंचे ते गाणे मी खुप वेळा ऐकले. थोडासा हेवा आणि खूप सारा अभीमान वाटतो मला तात्यांचा, माझे दैवत असलेल्या वैकुंठवासी अण्णांचा सहवास त्यांना लाभला. तात्यांची भेट होईल या एकाच आशेवर ठाण्यातील गोखले उपहार गृहात आठवड्यातून दोन/तीन वेळा जातो, पण नेहमी निराशा होते. टारझन यांनी लिहलेले विडंबन लेख, बल्लवाचार्य गणपा यांच्या पाक-कृती, प्रियाली तै( भोकाडी ) यांच्या गुढकथा, बिपीनदांचे लेख, विजुभाऊ आणि गविंचे खुमासदार लेखन या सगळ्यांचा मी खूप मोठा पंखा आहे. एका वयस्कर आजोबांनी तात्यांना सांगितल्याप्रमाणे मिसळपावचा दिवसेंदिवस वाढणारा आलेख आणि प्रगती हि खरोखरच त्या कोपर्यातल्या जोडगोळीमुळेच आहे हि गोष्ट अगदी तंतोतंत खरी आहे. तूर्तास तुमचा निरोप घेतो मंडळी पुन्हा येण्यासाठी.... अवांतर : मराठी टंक लेखनाचा पहिला प्रयत्न असल्यामुळे बर्याच मिपाकारंचा उल्लेख करू शकलो नाही त्याबद्दल क्षमा असावी.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3117
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

माझे पहीले लेखन याच्या पेक्शा खराब होते. मिही पा .क्रु. शोधत मि पा वर आलो आपला रस्ता एकच होता

बाकी लेखन फारच कसदार झालयं. एक एक अक्षर कसं मोत्यासारखं(कूत्रा न्हवं तर दगड) टपोरं, सूंदर, वळणदार आणी सूशोभीत दीसतय. असेच लीहीत रहा. व वाचकांच्या जीवनात आनंद नीर्माण करा.

वयस्कर आजोबा, तात्या, रोशनी ... एकेक संदर्भ कसे अगदी चपखल आणि योग्य ठिकाणी. "शिंदे" नाव अगदी सार्थ आणि किसन बद्दल तर काय बोलायलाच नको ! वेलकम!! निमित्त मात्र लेख लिहून चालू केलेली ही इनिंग सुद्धा तुम्ही गाजवणार यात शंका नाही. :)

वेलकम!! निमित्त मात्र लेख लिहून चालू केलेली ही इनिंग सुद्धा तुम्ही गाजवणार यात शंका नाही.
यू सेड इट पै* :) फक्त 'वेलकम'च्या ऐवजी 'पुन्हा एकदा वेलकम' असा बदल केला तर चालेल काय ? *पै = प + इ

In reply to by परिकथेतील राजकुमार

फक्त 'वेलकम'च्या ऐवजी 'पुन्हा एकदा वेलकम' असा बदल केला तर चालेल काय ? चालेल काय्.....अहो पळेल

In reply to by रेवती

रेवती ताई महाराज नव्हे हो.. असं समजा मी सुद्धा भाईंच्या बटाट्याच्या चाळीतील सर्वसामान्न्यापैकी एक आहे.

व्वा व्वा अशासाठी.. की मी आत्ताच मिपाकर झाले आणि विचारच करत होते की सुरवात कुठून करावी... आणि स्वग्रुहावर टिचकी मारताच हा लेख समोर दिसला. आणि मी खुष झाले... तर किसन भाऊ म्हणाले त्याप्रमाणे सकाळी ऑफिस मध्ये आल्यावर पहिले मिपाकडेच हात डोळे वळतात ... खूप छान छान लिखाण इथे वाचायला मिळत. समस्त मिपाकरांना सई चा पहिला नमस्कार ... चू. भू. द्यावी घ्यावी.

In reply to by टारझन

'जीवात जीव आला' (आनि 'पोटात गोळा आला') या म्हनिंचा अर्थ टारुला ठावुक नाही असे समजुन लई हसुण घेतले.

५ आठवड्यात लैच्च अभ्यास केला राव तुम्ही मिपाचा. नवे-जुने लेखक आणि त्यांचे नवे-जुने लेख असं सगळंच नजरेखालून घातलं म्हणायचं आपण. तात्यांविषयीचा अभ्यास तर खास वाखाणण्याजोगा. कैक वर्षांपूर्वीची रोशनी ते तात्यांच्या खाण्याच्या जागांपर्यंत ५ आठवड्यात बरीच मजल मारली की हो तुम्ही. निराश होऊ नका, तुमचे दैवत तुम्हाला नक्कीच भेटेल. सद्ध्या अनेकजण त्यांना भेटायला उत्सुक आहेत. साला आपण काय बोलणार तुमच्या अभ्यासू वॄत्तीबद्दल. तूर्तास अभिनंदनाचा नारळ पाठवून देण्यात येईल इतकेच सांगतो.