✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

.... प्रेम कर!!

प — प्राजु, गुरुवार, 04/14/2011 - 08:21
आयुष्याच्या हरेक क्षणांवर .. प्रेम कर अस्तित्वाच्या घनघोर रणावर .. प्रेम कर नात्यांमध्ये गुरफ़टणार्‍या ओलाव्याने मोहरणार्‍या मनाच्या या उधाणपणावर.. प्रेम कर कळ्या उमलती तू हसतना स्पर्श छेडती कोमल ताना देहाच्या प्रत्येक सणावर.. प्रेम कर नको विचारू गतकालाला करेन वश मी त्या दैवाला माझ्यामधल्या याच गुणावर.. प्रेम कर घाव झेलले जगण्यासाठी राखेमधुनी उठण्यासाठी हृदयावरच्या त्याच व्रणावर.. प्रेम कर नुरतील तेथे काही व्यथा एक आगळी शांत अवस्था मुक्ती देणार्‍या सरणावर.. प्रेम कर अंत नसतो सृजनाला त्या विलयाच्याही बस्स रेघोट्या सृष्टीच्या या कणाकणावर .. प्रेम कर - प्राजु

प्रतिक्रिया द्या
3982 वाचन

💬 प्रतिसाद (26)

कविता आवडली. सगळीच कडवी सुंदर

नगरीनिरंजन
गुरुवार, 04/14/2011 - 08:49 नवीन
कविता आवडली. सगळीच कडवी सुंदर आहेत पण ही दोन खूप आवडली: कळ्या उमलती तू हसतना स्पर्श छेडती कोमल ताना देहाच्या प्रत्येक सणावर.. प्रेम कर नको विचारू गतकालाला करेन वश मी त्या दैवाला माझ्यामधल्या याच गुणावर.. प्रेम कर
  • Log in or register to post comments

लौकीकास साजेशी कविता .. बाकी

टारझन
गुरुवार, 04/14/2011 - 10:55 नवीन
लौकीकास साजेशी कविता .. बाकी कविता वाचुन "आय कर " नावाचे विडंबन सुचते आहे :) - (नियमीत आय आणि प्रेम 'कर'णारा) टारझन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

प्राजु तै, अबब!! काय तुफान

मिसळलेला काव्यप्रेमी
गुरुवार, 04/14/2011 - 10:48 नवीन
प्राजु तै, अबब!! काय तुफान झालिये!! क्या बात क्या बात!! असे प्रत्येक कडव्याला म्हणत होतो!! विशेषतः
कळ्या उमलती तू हसतना स्पर्श छेडती कोमल ताना देहाच्या प्रत्येक सणावर.. प्रेम कर नको विचारू गतकालाला करेन वश मी त्या दैवाला माझ्यामधल्या याच गुणावर.. प्रेम कर
आणि हा तर कळस आहे:
अंत नसतो सृजनाला त्या विलयाच्याही बस्स रेघोट्या सृष्टीच्या या कणाकणावर .. प्रेम कर
तुला खरोखर धन्यवाद कि अशी कविता वाचायला दिलीस तु आम्हाला. तुला खुप खुप शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments

मस्त... खुप दिवसांनी काव्य

मराठमोळा
गुरुवार, 04/14/2011 - 11:23 नवीन
मस्त... खुप दिवसांनी काव्य विभाग उघडला मी. :)
  • Log in or register to post comments

मस्त... खुप खुप आवडली...

हरिप्रिया_
गुरुवार, 04/14/2011 - 11:46 नवीन
मस्त... खुप खुप आवडली...
  • Log in or register to post comments

खल्लास...

मनिष
गुरुवार, 04/14/2011 - 12:08 नवीन
प्राजुतै, खूप आवडली ही कविता. ही कडवी तर खासच -
घाव झेलले जगण्यासाठी राखेमधुनी उठण्यासाठी हृदयावरच्या त्याच व्रणावर.. प्रेम कर नुरतील तेथे काही व्यथा एक आगळी शांत अवस्था मुक्ती देणार्‍या सरणावर.. प्रेम कर अंत नसतो सृजनाला त्या विलयाच्याही बस्स रेघोट्या सृष्टीच्या या कणाकणावर .. प्रेम कर
  • Log in or register to post comments

मस्त!

केशवसुमार
गुरुवार, 04/14/2011 - 12:14 नवीन
प्राजूताई.. कविता आवडली.. (वाचक)केशवसुमार
  • Log in or register to post comments

मस्त झालीये

ढब्बू पैसा
गुरुवार, 04/14/2011 - 12:14 नवीन
प्राजु तै, चान झलीये कविता. शीर्षक थोडं क्लिशे वाटलं! पण ... नुरतील तेथे काही व्यथा एक आगळी शांत अवस्था मुक्ती देणार्‍या सरणावर.. प्रेम कर हे कडवं मस्तच झालंय!!
  • Log in or register to post comments

सुरेख !

ज्ञानेश...
गुरुवार, 04/14/2011 - 12:17 नवीन
'प्यार कर' हे डीटीपीएच मधले गाणे आठवले. :) लतादीदींच्या आवाजामुळे लक्षात आहे ते. कविता आवडेश.
  • Log in or register to post comments

घाव झेलले

मृत्युन्जय
गुरुवार, 04/14/2011 - 12:21 नवीन
घाव झेलले जगण्यासाठी राखेमधुनी उठण्यासाठी हृदयावरच्या त्याच व्रणावर.. प्रेम कर मस्त एकदम
  • Log in or register to post comments

प्रेम कर....

ajay wankhede
गुरुवार, 04/14/2011 - 12:53 नवीन
तुफान्...तुफान्..तुफान... प्रत्येक कडवं भन्नाट.. नुरतील तेथे काही व्यथा एक आगळी शांत अवस्था मुक्ती देणार्‍या सरणावर.. प्रेम कर निर्वाण पथावरिल वारकरी ....फक्त प्रेम कर.
  • Log in or register to post comments

ब्येष्ट कविता.

प्यारे१
गुरुवार, 04/14/2011 - 13:05 नवीन
ब्येष्ट कविता.
  • Log in or register to post comments

संदेश आवडला. आजमावा म्हणतो

गणपा
गुरुवार, 04/14/2011 - 13:19 नवीन
संदेश आवडला. आजमावा म्हणतो :)
  • Log in or register to post comments

सुरेख

प्राजक्ता पवार
गुरुवार, 04/14/2011 - 13:28 नवीन
कविता आवडली .
  • Log in or register to post comments

मस्तच!!!

असुर
गुरुवार, 04/14/2011 - 14:11 नवीन
प्राजुतै, कविता मस्तच, अगदी जमून आलीये!!! :-) --असुर
  • Log in or register to post comments

अप्रतिम कविता ...

गणेशा
गुरुवार, 04/14/2011 - 14:20 नवीन
आवडली एकदम
देहाच्या प्रत्येक सणावर.. प्रेम कर
अतिषय उच्च आनि नाविण्यपुर्ण ओळ.. खरेच खुपच अर्थ असलेली ओळ.. जास्त आवडली ही दोन कडवी तर अप्रतिम ... नुरतील तेथे काही व्यथा एक आगळी शांत अवस्था मुक्ती देणार्‍या सरणावर.. प्रेम कर अंत नसतो सृजनाला त्या विलयाच्याही बस्स रेघोट्या सृष्टीच्या या कणाकणावर .. प्रेम कर - असेच लिहित रहा .. वाचत आहे...
  • Log in or register to post comments

आवडली.

प्रभो
गुरुवार, 04/14/2011 - 18:56 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments

अतिशय सुंदर

निशदे
गुरुवार, 04/14/2011 - 19:37 नवीन
एखादे कडवे आवडले असे म्हणणे अशक्य आहे.......खूपच छान लिहिले आहे......... ""नात्यांमध्ये गुरफ़टणार्‍या ओलाव्याने मोहरणार्‍या मनाच्या या उधाणपणावर.. प्रेम कर"" ""अंत नसतो सृजनाला त्या विलयाच्याही बस्स रेघोट्या सृष्टीच्या या कणाकणावर .. प्रेम कर"" अप्रतिम....... :)
  • Log in or register to post comments

सर्वांचे मनापासून आभार.

प्राजु
गुरुवार, 04/14/2011 - 19:46 नवीन
सर्वांचे मनापासून आभार. :)
  • Log in or register to post comments

कविता

नरेशकुमार
Fri, 04/15/2011 - 09:30 नवीन
कविता आवडली, ..................................................................................... मि फक्त बायकोवर प्रेम करतो. इतर गोश्टींवर प्रेम करायला वेळ मिळत नाही. तरी पन पुढे-मागे करुन पाहीन...........प्रयत्न हो... प्रेम करन्याचा.
  • Log in or register to post comments

कविता आवडली

चित्रा
Sat, 04/16/2011 - 07:24 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments

मस्त कविता प्राजुतै टार्‍या

प्रीत-मोहर
Sat, 04/16/2011 - 14:03 नवीन
मस्त कविता प्राजुतै :) टार्‍या विडंबन टाकलस तरी चालल बरका!!
  • Log in or register to post comments

मस्त ग तै. एकदम बढिया.

परिकथेतील राजकुमार
Sat, 04/16/2011 - 14:14 नवीन
मस्त ग तै. एकदम बढिया.
  • Log in or register to post comments

मस्त!

क्रान्ति
Mon, 04/18/2011 - 19:58 नवीन
अप्रतिम कविता प्राजु! खूप खूप आवडली.
  • Log in or register to post comments

अप्रतिम..... याशिवाय दुसरा

किसन शिंदे
Mon, 04/18/2011 - 21:19 नवीन
अप्रतिम..... याशिवाय दुसरा शब्दच सुचू शकत नाही.
  • Log in or register to post comments

पुन्हा एकदा मनापासून आभार.

प्राजु
Tue, 04/19/2011 - 20:47 नवीन
पुन्हा एकदा मनापासून आभार. :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा