मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दूर दूर जातानां

निनाव · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
दूर दूर जातानां मज जवळ ठेवशील ना रे? आभाळाखाली तिथल्या मज तु जपशील ना रे? तुझे नि माझे गाणे गुणगुणती गावा च्या वाटा शपथ तुला ह्या वाटांची हिरव्या तु बघशील ना रे? दूर दूर जातानां मज जवळ ठेवशील ना रे? आभाळाखाली तिथल्या मज तु जपशील ना रे? आसवे कळीस भ्रमर तसे मी पाहिन वाट तुझी रे क्षण क्षण हे जाता जाता हर क्षण मी तुज आठवीन ना रे? दूर दूर जातानां मज जवळ ठेवशील ना रे? आभाळाखाली तिथल्या मज तु जपशील ना रे? -- अंतरातुनि वजा जाता राहिन तुझाच सखी गं डोळे मिटुनि बघशील दिसेन मीच जवळ तुला गं राहुन पाण्यात जशी ह्या मास्यास विझे न तहान प्रेमात तुझ्या तसा मी कसे होईल प्रेम कमी गं? -- दूर दूर जातानां मज जवळ ठेवशील ना रे? आभाळाखाली तिथल्या मला तु जपशील ना रे?

वाचने 1047 वाचनखूण प्रतिक्रिया 2

प्रकाश१११ 14/04/2011 - 09:50
तुझे नि माझे गाणे गुणगुणती गावा च्या वाटा शपथ तुला ह्या वाटांची हिरव्या तु बघशील ना रे? छान लिहिले आहे .!!

मिसळलेला काव्यप्रेमी 14/04/2011 - 10:44
व्वाह निनाव, बहोत खुब!!
अंतरातुनि वजा जाता राहिन तुझाच सखी गं डोळे मिटुनि बघशील दिसेन मीच जवळ तुला गं
हे तर खासच!!