मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रतिबिंब

सूर्य · · कलादालन
खुप दिवसानी मिपावर कलादालनात फेरफटका मारतोय. इतके दिवस वाचनमात्रच रहावे लागले होते. आता देव्हार्‍यात ठेवलेला कॅमेरा बाहेर काढायचा विचार आहे व कलादालनात वरचे वर येण्याचा विचार आहे. हे चित्र जुनेच आहे. परंतु कुठे शेअर केले नव्हते. नवीन चित्रे लवकरच टाकेन. हे आवडले तर जरुर कळवा. Seagull सांग दर्पणा , मी कसा दिसतो..? मुळ चित्र इथे आहे http://farm6.static.flickr.com/5181/5612876057_a06a5bb650_b.jpg - सूर्य
लेखनविषय:

वाचने 6522 वाचनखूण प्रतिक्रिया 33

सर्वसाक्षी 12/04/2011 - 21:16
परिणाम चांगला साधला आहे, चित्र आवडले

धनंजय 12/04/2011 - 21:27
छान. (पण मला जरा जास्तच गजबजलेले वाटले. मी वरील चित्र कातरून बघितले, आणि पक्षी-प्रतिबिंबाच्या कथानकावर क्षेत्र केंद्रित केले. ते मला अधिक आवडले.)

In reply to by धनंजय

३_१४ विक्षिप्त अदिती 13/04/2011 - 18:06
कातरलेला फोटो जास्त आवडला. पुढच्या पक्ष्याची सावलीही त्यात कापलेली आहे त्यामुळेही असावं.

In reply to by सूर्य

यशोधरा 12/04/2011 - 21:41
मूळ फोटो फ्लिकरवरला ना? हां, तो पाहूनच सांगितले. :) म्हणजे पाहणार्‍याच्या डावीकडे प्लेस केला असता. उजवीकडे केला तर फ्रेममधून सब्जेक्ट बाहेर जात आहे असे वाटते, डिस्ट्रॅक्ट होते. फ्रेममध्ये सब्जेक्ट येत आहे/ आहे असे वाटले पाहिजे. ( हे सद्ध्याच एक फोटोग्राफीविषयक वर्कशॉपमध्ये मिळालेले ज्ञान पाजळले आहे ;) )

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 12/04/2011 - 22:15
फोटो आवडला. ( कोप-यातला पक्षी पूर्ण फ्रेम मधे यायला पाहिजे होता असे वाटले) कॅमेरा बाहेर काढायचा विचार आहे व कलादालनात वरचे वर येण्याचा विचार आहे. विचार चांगलाच आहे. :) मालक तुम्ही छायाचित्रातांच्या बाबतीत जाणकार असल्यामुळे क्यामेरा, त्याचा तो फोकस, त्याची ती लेन्स, फ्लॅश, अशी जी काही तांत्रिक माहिती असते ती टाका ना राव. मला तांत्रिक गोष्टी काही कळत नाही. पण तांत्रिक गोष्टी ज्यांना कळतात त्यांना ते उपयोगाचे ठरेल असे वाट्ले. -दिलीप बिरुटे

नगरीनिरंजन 13/04/2011 - 13:22
फोटो आवडला. तसे दोन्ही (मूळ आणि धनंजयांनी बदललेला) आवडले पण बदललेला फोटो शीर्षक डोळ्यासमोर ठेवून केल्या सारखा वाटला तर मूळ फोटोत फक्त एकाच पक्ष्याच्या प्रतिबिंबावर केंद्रित न होता दोन्ही पक्षी, आकाश वगैरेंचं प्रतिबिंब तर दिसतंच शिवाय फोटोत त्या दोन पक्ष्यांच्या एका छोट्याशा जगाचं प्रतिबिंब प्रकट झाल्यासारखं वाटतं.

In reply to by नगरीनिरंजन

सूर्य 13/04/2011 - 13:35
शिवाय फोटोत त्या दोन पक्ष्यांच्या एका छोट्याशा जगाचं प्रतिबिंब प्रकट झाल्यासारखं वाटतं. मस्त दृष्टीकोन. - सूर्य.

परिकथेतील राजकुमार 13/04/2011 - 18:42
काय रे सूर्याजी आलास का ? नविन फटू घेउन लवकर हजेरी लावावी. अन्यथा.... हा फटू आवडला आपल्याला. दूसरा पक्षी पहिल्याच्या प्रतिबिंबाकडे असूयेने बघतो आहे असे वाटले.

लंबूटांग 13/04/2011 - 19:02
यशोधरा आणि इतर काहीजणांनी सांगितलेच आहे. त्यालाच फोटोग्राफी मध्ये rule of thirds म्हणतात. सोप्या शब्दात सांगायचे तर कॅमेरा चा LCD screen अथवा viewfinder 3x3 च्या grid मध्ये विभागाला आहे असे समजावे व जेथे तुम्हाला लक्ष वेधून घ्यायचे आहे तो भाग मधोमध न ठेवता त्या ९ आयतांच्या ४ intersection points पैकी एका वर ठेवावा (मराठी शब्द सुचले नाहीत ऐन वेळी). उदा. खालील चित्रामधील लाल + चिन्हांच्या जागी वर यशोधरा यांनी सांगितल्याप्रमाणे तो फोटोमध्ये डाव्या बाजूला असता तर अजून जास्ती छान दिसले असते.

In reply to by लंबूटांग

यशोधरा 13/04/2011 - 21:22
intersection points - छेदबिंदू? rule of thirds - तृतियांशाचा नियम? LCD screen - याला सुचले नाही :( viewfinder - यालाही :( grid - जाल म्हणावे का? मस्त समजावला आहे तृतियांशाचा नियम.

प्राजक्ता पवार 14/04/2011 - 16:22
प्रतिबिंब आवडले.