शहरांची तुलना
नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो,
माझ्या चेन्नई धाग्यावर काही प्रतिसदांमधे प्रवासी भाडे किंवा ईतर खर्च यासंबंधात पुणे व ईतर शहरांची तुलना केली आहे.
तो धागा चर्चेसाठी नसून विरंगुळा या सदरात असल्याने तिथे प्रतिसाद न देता हा नविन धागा सुरु करत आहे.
गेल्या काही वर्षात बरंच फिराफिर झाली.. मुंबई, बेंगलोर, हैदराबाद, चेन्नई. पुणे तर घरच. प्रत्येक ठिकाणी गप्पा मारताना हा विषय निघतोच. तुम्हालाही हा अनुभव आलाच असेल. प्रत्येक जण स्वतःचे शहर किती चांगले आहे हे पटवण्याचा प्रयत्न करतो आणि मग शहरांची तुलना सुरु होते. कित्येकदा ही तुलना मनात ठेवुनच त्या शहरामधे जाण्याचा योग जरी आला तरी मग दृष्टीकोन संकुचितच राहतो किंवा तुसडेपणा केला जातो. अर्थात हे सर्व बर्याचदा ईतर गोष्टींचे फ्रस्टेशन काढण्याचे प्रकार जरी असले तरी खरच ही तुलना योग्य आहे का?
पुणे हे सर्वांचे हल्ला करण्यासाठी आवडते शहर आहे. पुणे म्हंटल तरी जळजळ सुरु होते काहींना. पुण्याचे उदाहरण घेण्याचे कारण मी पुणेकर आहे हे नसुन वेगळे आहे.
बंगलुरु, मुंबई, हैदराबाद, चेन्नई, दिल्ली, कोलकाता आणि पुणे या शहरामधे पुणे ऑड सिटी आउट आहे.. कशी?
तर पुणे हे शहर कोणत्याही राज्याची राजधानी नाही. आर्थिक गणित बघितले तर सर्वात जास्त बजेट हे नेहमी राजधान्यांना दिले जाते, ईतर शहरांना त्या मानाने काहीच पैसा मिळत नाही विकासासाठी, मग अशा शहरांना लोकांकडून पैसा जमा करावा लागतो विकास साधण्यासाठी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही सर्वात श्रीमंत होती कधी काळी कारण कारखान्यांवर जबरदस्त लादलेला कर. त्यामुळे बर्याच कंपन्या पुण्याबाहेर गेल्या हे नुकसान..परंतु पिंपरी चिंचवडचा विकास पाहण्याजोगा आहे आज.
राजधान्यांमधे पब्लीक ट्रान्स्पोर्ट साठी सरकारी सपोर्ट असतो. मग चेन्नई असो वा बंगलोर. मग चेन्नै मधे सहाजिकच तिकेट ७ रुपये असेल ते पुण्यात १५-१८ रुपये असणार. या सर्वाला जबाबदार सरकारी धोरणे आहेत असे मला वाटते. महाराष्ट्र राज्य सोडले तर किती राज्यांनी राजधानी सोडून ईतर शहरांच्या विकासाकडे लक्ष दिले आहे? कर्नाटकात बंगलुरु सोडुन ईतर कोणत्या शहराचे तुम्ही नाव घ्याल? किंवा तामिळनाडु मधे चेन्नै शिवाय एक शहर?
पुणे हे अशा ईतर शहरांसाठी उदाहरण आहे कारण ते स्वत:च स्वतःच्या पायावर उभे राहिले आहे. मला बर्याचदा पुण्याची तुलना मुंबई किंवा बंगलुरु शी करणारे लोकं भेटले की मी हेच उत्तर देतो. महाराष्ट्र हे एकच राज्य अहे जिथे कित्येक शहरे विकास साधत आहेत उदा. नागपूर, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर.. गुजरात काही दिवसात मागे टाकेल अशी शंका आहे म्हणा.. ;)
जाणकारांनी आणखीन प्रकाश टाकावा ही विनंती.. :)
एवढे बोलुन मी माझे दोन शब्द संपवतो..
जय हिंद जय महाराष्ट्र!!!!
आपला मराठमोळा
वर्गीकरण
प्रतिक्रिया
>>पुणे हे त्या प्रातांची (
श्री मेहेंदळे यांनी त्या
डानराव आपले मत योग्य व
अपवादांची कारणमिमांसा ...
ममो. जी ठिक आहे. तुम्ही खुप
सपोर्ट
प्रदीप शेट, मुंबईच काय तर
एग्झॅक्टली, ममो हेच म्हणायचंय
गुगलून पाहिले...
माझ्या माहितीप्रमाणे बस सेवा
वाचतोय !
हम्म
>>राजधान्यांमधे पब्लीक
मेहेंदळे काका, माझ्याकडे ठोस
ठोस
>>तुमचे वाहतूकीसंबंधीचे विधान
दुसरे पर्याय
मेहेंदळे काका???????????????
चिंतामणी काका, हे मेहेंदळे
पुणे आणि शहर?
तेरे पास क्या है?
राही!... अगं आता आमचं पुणं
हो ना ...
सविस्तर...
मुंबई आणी त्यात येणाऱ्या
अस्सल पुणेकर किंवा मुंबईकर