Skip to main content

शहरांची तुलना

लेखक मराठमोळा यांनी बुधवार, 06/04/2011 22:59 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो, माझ्या चेन्नई धाग्यावर काही प्रतिसदांमधे प्रवासी भाडे किंवा ईतर खर्च यासंबंधात पुणे व ईतर शहरांची तुलना केली आहे. तो धागा चर्चेसाठी नसून विरंगुळा या सदरात असल्याने तिथे प्रतिसाद न देता हा नविन धागा सुरु करत आहे. गेल्या काही वर्षात बरंच फिराफिर झाली.. मुंबई, बेंगलोर, हैदराबाद, चेन्नई. पुणे तर घरच. प्रत्येक ठिकाणी गप्पा मारताना हा विषय निघतोच. तुम्हालाही हा अनुभव आलाच असेल. प्रत्येक जण स्वतःचे शहर किती चांगले आहे हे पटवण्याचा प्रयत्न करतो आणि मग शहरांची तुलना सुरु होते. कित्येकदा ही तुलना मनात ठेवुनच त्या शहरामधे जाण्याचा योग जरी आला तरी मग दृष्टीकोन संकुचितच राहतो किंवा तुसडेपणा केला जातो. अर्थात हे सर्व बर्‍याचदा ईतर गोष्टींचे फ्रस्टेशन काढण्याचे प्रकार जरी असले तरी खरच ही तुलना योग्य आहे का? पुणे हे सर्वांचे हल्ला करण्यासाठी आवडते शहर आहे. पुणे म्हंटल तरी जळजळ सुरु होते काहींना. पुण्याचे उदाहरण घेण्याचे कारण मी पुणेकर आहे हे नसुन वेगळे आहे. बंगलुरु, मुंबई, हैदराबाद, चेन्नई, दिल्ली, कोलकाता आणि पुणे या शहरामधे पुणे ऑड सिटी आउट आहे.. कशी? तर पुणे हे शहर कोणत्याही राज्याची राजधानी नाही. आर्थिक गणित बघितले तर सर्वात जास्त बजेट हे नेहमी राजधान्यांना दिले जाते, ईतर शहरांना त्या मानाने काहीच पैसा मिळत नाही विकासासाठी, मग अशा शहरांना लोकांकडून पैसा जमा करावा लागतो विकास साधण्यासाठी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही सर्वात श्रीमंत होती कधी काळी कारण कारखान्यांवर जबरदस्त लादलेला कर. त्यामुळे बर्‍याच कंपन्या पुण्याबाहेर गेल्या हे नुकसान..परंतु पिंपरी चिंचवडचा विकास पाहण्याजोगा आहे आज. राजधान्यांमधे पब्लीक ट्रान्स्पोर्ट साठी सरकारी सपोर्ट असतो. मग चेन्नई असो वा बंगलोर. मग चेन्नै मधे सहाजिकच तिकेट ७ रुपये असेल ते पुण्यात १५-१८ रुपये असणार. या सर्वाला जबाबदार सरकारी धोरणे आहेत असे मला वाटते. महाराष्ट्र राज्य सोडले तर किती राज्यांनी राजधानी सोडून ईतर शहरांच्या विकासाकडे लक्ष दिले आहे? कर्नाटकात बंगलुरु सोडुन ईतर कोणत्या शहराचे तुम्ही नाव घ्याल? किंवा तामिळनाडु मधे चेन्नै शिवाय एक शहर? पुणे हे अशा ईतर शहरांसाठी उदाहरण आहे कारण ते स्वत:च स्वतःच्या पायावर उभे राहिले आहे. मला बर्‍याचदा पुण्याची तुलना मुंबई किंवा बंगलुरु शी करणारे लोकं भेटले की मी हेच उत्तर देतो. महाराष्ट्र हे एकच राज्य अहे जिथे कित्येक शहरे विकास साधत आहेत उदा. नागपूर, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर.. गुजरात काही दिवसात मागे टाकेल अशी शंका आहे म्हणा.. ;) जाणकारांनी आणखीन प्रकाश टाकावा ही विनंती.. :) एवढे बोलुन मी माझे दोन शब्द संपवतो.. जय हिंद जय महाराष्ट्र!!!! आपला मराठमोळा

वाचने 16336
प्रतिक्रिया 76

प्रतिक्रिया

पुणे : मेरे पास ठंडी हवा है,चट्टाने हैं,खुली जगह है. तेरे पास क्या है? मुंबई : मेरे पास ताझा फिश है! खल्लास. बात खतम.

In reply to by राही

राही!... अगं आता आमचं पुणं पूर्वीसारखं नाही गं राहिलेलें! ठन्डी हवा, चट्टाने,... वगैरे.... खूप्च कमी झालंय!... प्रदूषणामुळे ठन्डी हवा.... मैली आणि गर्म झालीये... आणि चट्टाने पाडून त्यावरती मोठ्या बिल्डिन्ग्ज बान्धल्या जाउ लागल्यात! आणि खुली जगह' पुण्यात मिळणं.. आता... कठीणच नाही तर केवळ अशक्य आहे! :| शरद पवार, अजित पवार, अविनाश भोसले, दीपक मानकर, पतन्ग कदम... यांसारखे लॅन्ड- माफिया....... असल्यामुळे पुण्याच्या भूमिपुत्रांना आता पुण्यात स्वतःच्या जागेत राहणं मुश्कील झालंय!... जुनं पुणं किती सुन्दर आणि स्वच्छ होतं!!!... वी मिस्स इट अ लॉट्ट!!!!! आय लव यु " ओल्ड पुणे " :) _____________ बाकी मुम्बई'च्या ताझ्या फिश साठी सहमत! पुण्याचे फिश मुठेच्या पाण्यात इतके गुदमरून जातात... की मेल्यानन्तर ही त्यान्च्यापेक्षा त्यांनी खाल्लेल्या अन्नाचा पर्यायाने मुठेतल्या घाणीचाच वास जास्त येतो! :| बाकी मुम्बईवाल्यान्ना समुद्राचा फायदा जास्त होतो ! :)

In reply to by मृगनयनी

>>जुनं पुणं किती सुन्दर आणि स्वच्छ होतं!!!... पुर्वी एफ सी रोड ला किती छान आणि मोठी झाडे होती , ती सर्व तोडली गेली.

प्रतिसादासाठी जागा राखुन ठेवत आहे. ममोंच्या बहुतांश दृष्टीकोणाशी सहमत आहे. परंतु पिंपरी चिंचवडच्या किंवा अगदी पुण्याच्याही अधोगतीचे कारण उद्योगांवर जबरदस्त कर लावले हे नाही किंवा विकास करण्यास आवश्यक ती इच्छाशक्ती नव्हती हे नाही. त्याची कारणे वेगळी आहेत.

मुंबई आणी त्यात येणाऱ्या रोजच्या अनेक माणसाच्या लोंढ्याला सांभाळून घेणारी मुंबई ची वाहतूक व्यवस्था व ती हाताळणारे लोक माझ्यासाठी आदरणीय आहेत . दादरला फास्ट लोकल मध्ये चढून कुर्ल्याला उतरणे व उतरताना डोंबिवली व ठाण्याच्या लोकांचे '' स्लो ट्रेन नही हे क्या '' असे उद्गार ऐकणे. सर्वच आठवून गेले . आजही मुंबई लोकल नव्या ( सिमेन्स च्या ) मस्तच आहेत . गाडीत चढताना हे गाणे आठवते .

अस्सल पुणेकर किंवा मुंबईकर किंवा डोंबिवलीकर हा पूर्वीचे शहर आता इतिहास जमा झाले म्हणून वाईट वाटून घेतो . सुनियोजित नगर बांधणी व कायद्याची अंमल बजावणी जर झाली तर हे म्हणण्याची वेळ आली नसती .( आपल्या पूर्वजांनी मोहोन्द्जाडो काय उकृष्ट बांधले होते. .) साहेबानी मुंबई काय उत्कृष्ट बांधली .आजही त्यांनी भविष्याचा विचार करून बांधलेली मोकळी मैदाने किंवा शहरात असणाऱ्या पाणपोई किंवा ऐतिहासिक रेल्वेस्थानक ( सीएसटी ) असो . सांडपाण्याची व्यवस्था तर तत्कालीन अभियंत्याने पुढील १५० वर्षाचा विचार करू बांधली ती आजतागायत मुंबईकर वापरत आहेत . आम्ही मात्र स्वातंत्र्या नंतर मुंबईत धारावी बांधली .आज आमच्या कुर्ल्यात पूर्वी मोठा डोंगर होता तो पोखरून आता त्यावर झोपड्या आहेत हेच विमानतळाच्या बाजूला असलेल्या डोंगरावर लागू पडते .त्यामुळे स्वतःची जमीन असून देखील मुंबईचे विमानतळ विस्तार करू शकत नाही .( हवाई वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे .विमानांना उतरण्यासाठी जागा मिळत नसल्याने अर्धातास हवेत घिरट्या मारत बसावे लागते कितीतरी वेळा .) भारत अफगाण मध्ये अब्जावधी रुपयांची विकासकामे करत आहे .हे वाचल्याने माझ्या येथे काम करणाऱ्या अफगाण निर्वासितांना ह्या विषयी विचारले असता ते म्हणतात '' हिंद के इंजिनियर और आर्मी के लोगोने हमारे यहा इतनी बेहेतरीन सडके बनाई हे .वो भी इतने कम समय मे के गोरे (नाटोचे सैनिक ) भी हैराण रेहे गये ''. ''और बसे भी मुहय्या कराई हे . जिसपर भारत की तरफ अफगाण भाई, भेहेनो को तोफा ऐंसे लिखा होता हे ''. ''पडोसी मुल्क हमे बरबाद कर राहा हे और हिंदुस्थान आबाद'' ही एका वृद्ध माणसाची प्रतिक्रिया बोलकी होती . तात्पर्य ( आपली वाहतूक असो किंवा इतर सेवा पूर्वजांनी त्या उत्कृष्ट बांधल्या. व वर्तमान काळात देखील त्या आपण बांधू शकतो हे जेव्हा कळते .) तेव्हा आमच्या कुर्ल्यात गेल्या ५ वर्षाहून अधिक काळ सांताक्रूझ व कुर्ला हा उड्डाण पूल जो वेस्ट व सेन्ट्रल ला जोडणारा मोठा दुवा ठरणार आहे .ज्याजोगे पुण्यातून किंवा महाराष्ट्रातून येणारे वाहतूक थेट वेस्ट ला विमानतळ किंवा इतर मार्गी जाऊ शकते .तो अजून ही अपूर्ण अवस्थेत आहे .( कारण त्याच्या मध्ये राजनैतिक नेत्यांच्या अनधिकृत इमारती व इतर राजकीय कारणे आहेत .