सरसरणारे यौवन तुझे ते
लेखनविषय:
सर सर सर सर थेंब गालावर
ओले मोती ते ओघळणारे
पडता पडता थेट तुझ्यावर
मन माझे ते जळणारे
थांबायचे? सरकायचे? प्रश्न त्यास पडले
भिजवायचे-लाजवायचे मनी असे ठरले
केसांमधुनी ओठांवरती
थेंब ते कोसळणारे
श्वासांमधल्या गंघामधुनी
प्रेम ते दरवळणारे
बोलायचे? न बोलायचे? प्रश्न त्यास पडले
भुलवायचे, भिजवायचे मनी असे ठरले
लाजत लाजत गुलाबी मनावर
नाजुक इतुके ओठ लाजणारे
येताच जवळ मी होत बांवरे
गोड भितीनं ते थरथरणारे
स्पर्शायचे? फुलवायचे? प्रश्न त्यास पडले
पाहायचे, साठवायचे मनी असे ठरले
उन्मद लाटा हरवुन वाटा
किनार्यावर आदळणारे
सोडत बंधन हळुच सारे
तन तुझे आज पाघळणारे
नेसायचे? सावरायचे? प्रश्न त्यास पडले
जपायचे, लाडवायचे मनी असे ठरले
सरसरणारे यौवन तुझे ते
घायळ मज करणारे
भिजल्या अंगी श्वास तुझे
मनी वणवा ते करणारे
पेटवायचे? विझवायचे? प्रश्न असे पडले
जळायचे, स्मरायचे मनी असे ठरले
सर सर सर सर थेंब गालावर
ओले मोती ते ओघळणारे
पडता पडता थेट तुझ्यावर
मन माझे ते जळणारे
वाचने
1883
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
निनाव,
उत्तम रचना!! खरच अप्रतिम...
फक्त एक प्रश्नः 'सरसरणारे यौव्वन' ?? तुम्हाला 'सळसळणारे यौव्वन' म्हणायचे आहे का?
In reply to उत्तम by मिसळलेला काव्यप्रेमी
मिका: आभार.
शंका बरोबर आहे. परंतु, ही संपुर्ण कविताच पावसाच्या थेंब आणिक तिच्या तरुणाई ला जोडुन दाखविणारी अस्ल्या कारणानं 'सरसरणारे' हे शब्द 'पावसाच्या सरीं' ना तिच्या यौवानाचे प्रतिक म्हणुन वापरण्याचा प्रयत्न केला आहे - म्हणुन 'पावसाच्या सरींप्रमाणे' 'सर सरणारे यौव्वन' असे संबोधले आहे. आशा आहे कि तुम्हाला हा आशय आवडला असावा.
(नेहमीच) वेळ काढून कविता वाचल्यास आणिक इतुक्या वेळेत प्रतिसाद देण्या बद्दल - :)
- आ. निनाव.
In reply to मिका: आभार. शंका बरोबर आहे. by निनाव
चुकुन मी सरासरी येणारे यौवन तुझे असे वाचले. नुकताच उपक्रमावर जाउन आल्याचा परिणाम :)
In reply to चुकून by प्रकाश घाटपांडे
:) कुठे जाउन आलात? समुद्र किनारी?
In reply to कुठे जाउन आलात? समुद्र by निनाव
सरासरी पहा
In reply to उत्तम by मिसळलेला काव्यप्रेमी
.
कविता छानच ..
एकदम आवडली ..
कुठल्या ओळी विशेष आवडल्या तर संपुर्ण कविताच पुन्हा येथे द्यावी लागेल असे वाटले म्हणुन नाही दिली..
लिहित रहा .. वाचत आहे..
कविता छानच ..
एकदम आवडली ..
कुठल्या ओळी विशेष आवडल्या तर संपुर्ण कविताच पुन्हा येथे द्यावी लागेल असे वाटले म्हणुन नाही दिली..
लिहित रहा .. वाचत आहे..
छान !! कविता आवडली :)
निनाव -मस्त भन्नाट !!
सर सर सर सर थेंब गालावर
ओले मोती ते ओघळणारे
पडता पडता ते थेट तुझ्यावर
मन माझे ते जळणारे
एवढे मस्त लिहिलेस की ह्या मस्तपणाचे मग बंधन होऊन जाईल
उत्तम