लाच का देऊ नये?
लहानपणापासून आपल्याला 'लाच घेण्याप्रमाणे लाच देणे' हा गुन्हा आहे हे ठसवले जाते. आणि त्याच प्रमेयाला पुढे खेचून "तुम्ही लाच देता म्हणून घेणारे घेतात आनि त्यामुळेच भ्रष्टाचार वाढला आहे" असे नेहमी म्हटले जाते. थोडा विचार केला तर लाच खाण्यास सोकावलेल्या ह्या व्यवस्थेला प्रत्येकाला उपल्ब्ध असलेल्या वेळेत / एका निश्चित वेळेत जराही लाच /अमिश न देता कोणतेही काम करणे शक्य आहे का?
यामुळे होते कसे की एखादा जेव्हा लाच देतो तेव्हा जर त्याला हे रोखायचे असेल तर लाच देण्याआधी अॅन्टी करप्शनमधे तक्रार नोंदवावी लागते, मग ते सापळा रचणार आणि त्या लाच घेणार्याला पकडणार (अशी ढोबळ पद्धत ऐकून आहे). या पद्धतीत लाच देणार्यावर कारवाई होत नाही. मात्र एखादे काम होण्यासाठी जेव्हा सर्रास लाच दिली जाते तेव्हा देणाराही त्याच व्य्वस्थेचा भाग असल्याने तो तक्रार करण्याच्या फंदात पडत नाही. ज्याला लाचखोरी रोखायची आहे त्याच्याकडे अॅन्टी करप्शनमधे तक्रार नोंदवा, मग त्यांना वेळ देऊन समोरच्याला शिक्षा करा इतका वेळ असेलच असे नाही, व इतके करून हवे ते काम होईल याची तर काहीच शाश्वती नाही.
तेव्हा असा विचार मनात आला, की कदाचित लाचखोरीची सवय लागण्याआधी हे लाच देणेही गुन्हा आहे वगैरे (कदाचित) चालु शकते. पण आजच्या सोकावलेल्या व्य्वस्थेचे काय. इथे भ्रष्टाचार हा शिष्टाचार आहे. अश्यावेळी फक्त "लाच घेणे" हाच गुन्हा का मानु नये व लाच देण्याबद्दल शिक्षा नसावी / तो गुन्हा नसावा. यामुळे लाच घेणार्याच्या डोक्यावर सतत टांगती तलवार राहिल की "हा लाच देतो तर आहे मात्र एकदा काम झाले की कशावरून तक्रार करणार नाही?"
विचार अगदीच ताजा आहे म्हणून चर्चेला ठेवला आहे, तुम्हाला काय वाटते?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
+ १
>>कधी sizeable tax refund आला
+१ टु गवि, मी वर माझ्या
@१. अगर आप भगवानपे भरोसा करते
'' लाच देणारा प्रस्थापित
मला आश्चर्य याचं वाटतं की
तेच तर होते आहे!
+१०० प्रमोद्_पुणे ''खरे
त्या ओळी ढग ज्यातुन काळा
काही दिवसांपूर्वी
'लाच न देणे ' याने सगळ्यात
गोळ्या घाला गोळ्या!
कॉर्पोरेट पध्दतीनं अगदी
:)
भ्रष्टाचाराला आळा बसेल अशी
प्रथमतः एका सनातन विषयाला तोंड फोडल्याबद्दल अभिनंदन ऋषिकेश
अत्यंत सहमत. एक समाज म्हणून
विचार करायला लावणारा
जिथं शक्य आहे तिथं
हे करून पहा
असेच
चर्चा मस्तच.
वाढति लोकसंख्या ..अपु~या
लाच = unofficial commission
लूक हुज टॉकींग!