✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

लाच का देऊ नये?

ऋ
ऋषिकेश यांनी
Fri, 04/08/2011 - 10:54  ·  लेख
लेख
लहानपणापासून आपल्याला 'लाच घेण्याप्रमाणे लाच देणे' हा गुन्हा आहे हे ठसवले जाते. आणि त्याच प्रमेयाला पुढे खेचून "तुम्ही लाच देता म्हणून घेणारे घेतात आनि त्यामुळेच भ्रष्टाचार वाढला आहे" असे नेहमी म्हटले जाते. थोडा विचार केला तर लाच खाण्यास सोकावलेल्या ह्या व्यवस्थेला प्रत्येकाला उपल्ब्ध असलेल्या वेळेत / एका निश्चित वेळेत जराही लाच /अमिश न देता कोणतेही काम करणे शक्य आहे का? यामुळे होते कसे की एखादा जेव्हा लाच देतो तेव्हा जर त्याला हे रोखायचे असेल तर लाच देण्याआधी अ‍ॅन्टी करप्शनमधे तक्रार नोंदवावी लागते, मग ते सापळा रचणार आणि त्या लाच घेणार्‍याला पकडणार (अशी ढोबळ पद्धत ऐकून आहे). या पद्धतीत लाच देणार्‍यावर कारवाई होत नाही. मात्र एखादे काम होण्यासाठी जेव्हा सर्रास लाच दिली जाते तेव्हा देणाराही त्याच व्य्वस्थेचा भाग असल्याने तो तक्रार करण्याच्या फंदात पडत नाही. ज्याला लाचखोरी रोखायची आहे त्याच्याकडे अ‍ॅन्टी करप्शनमधे तक्रार नोंदवा, मग त्यांना वेळ देऊन समोरच्याला शिक्षा करा इतका वेळ असेलच असे नाही, व इतके करून हवे ते काम होईल याची तर काहीच शाश्वती नाही. तेव्हा असा विचार मनात आला, की कदाचित लाचखोरीची सवय लागण्याआधी हे लाच देणेही गुन्हा आहे वगैरे (कदाचित) चालु शकते. पण आजच्या सोकावलेल्या व्य्वस्थेचे काय. इथे भ्रष्टाचार हा शिष्टाचार आहे. अश्यावेळी फक्त "लाच घेणे" हाच गुन्हा का मानु नये व लाच देण्याबद्दल शिक्षा नसावी / तो गुन्हा नसावा. यामुळे लाच घेणार्‍याच्या डोक्यावर सतत टांगती तलवार राहिल की "हा लाच देतो तर आहे मात्र एकदा काम झाले की कशावरून तक्रार करणार नाही?" विचार अगदीच ताजा आहे म्हणून चर्चेला ठेवला आहे, तुम्हाला काय वाटते?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
29027 वाचन

💬 प्रतिसाद (75)

प्रतिक्रिया

+ १

मृत्युन्जय
Sat, 04/09/2011 - 18:42 नवीन
+ १
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद्_पुणे

>>कधी sizeable tax refund आला

विश्वनाथ मेहेंदळे
Sun, 04/10/2011 - 12:54 नवीन
>>कधी sizeable tax refund आला आहे का हो? येणार नाही कारण तो हवा असेल तर आधी बाबूला थोडे पैसे चारावे लागतील. पगारदार लोकांचे tax refund फार बदलत नाहीत हो साहेब. बिझिनेसच्या लोकांसारखे फार deductions नसतात. १ लाख 80C, घरभाडे, थोडीशी मेडिकल ची बिले आणि गृहकर्ज. सगळा बराचसा सरळ मामला असतो. त्यात फार फेरफार नाही करता येत. आणि त्यांनी refund चे पैसे थकवले तर सरकारच वरून व्याज देते, ८-९% बहुतेक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद्_पुणे

+१ टु गवि, मी वर माझ्या

५० फक्त
Fri, 04/08/2011 - 14:13 नवीन
+१ टु गवि, मी वर माझ्या प्रतिसादात जे कुकर मध्ये दाळ भात न शिजण्याचं उदाहरण दिलं आहे ना त्याचं हे उदाहरण आहे. दोन हिंदि पिक्चरमधले दोन डायलॉग आठवत आहेत या वेळी १. अगर आप भगवानपे भरोसा करते हो तो सैतान में विश्वास करना पडेगा | - डरना मना है, - आशुतोष राणा २, आग के लिये पानी का डर बहोत जरुरी है, दुनिया में शक्ती का संतुलन होना बहुन जरुरी है | - मकबुल - नसिरुद्दिन शहा / ओम पुरी. म्हणुनच, दोन नंबरची व्यवस्था ही एक नंबरच्या व्यवस्थेचीच माजलेली आव्रुत्ती असते. किंवा एक नंबरची व्यवस्था ही दोन नंबरच्या व्यवस्थेची कव्हर अप आव्रुत्ती असते. बाकी चर्चा चागली होते आहे.
  • Log in or register to post comments

@१. अगर आप भगवानपे भरोसा करते

निनाद मुक्काम …
Fri, 04/08/2011 - 18:50 नवीन
@१. अगर आप भगवानपे भरोसा करते हो तो सैतान में विश्वास करना पडेगा | - डरना मना है, - आशुतोष राणा माझ्या मते हा संवाद राझ ह्या सिनेमात आहे . लाच ही केव्हा दिली जाते ? जेव्हा दोन्ही पक्षाला माहीत आहे .की ह्या प्रक्रियेत कायदा विशेष बाधा आणू शकत नाही .कारण त्याची अंमल बजावणी कडक रीत्या व्हायला व्हावी ( सैन्यात कोर्ट मार्शल केले जाते .) सिविल आयुष्यात असे काही तरी भक्कम हवे . माझे निरीक्षण सांगते परदेशी लोक त्यांच्या देशात लाच देत नाही कारण अटक होण्याशी शक्यता जास्त असते ( जर एखादी कायद्यातून पळवाट दिसत असेल तर ही लोक त्याचा जरूर लाभ घेतात ) सामाजिक आर्थिक विषमता हे लाचखोरीचे प्रमुख कारण आहे . सरकारी कर्मचारी अल्प वेतनात विशेष भत्ते न मिळवता काम करतात ह्यात कनिष्ठ कर्मचारी व त्याचे कुटुंब खाजगी नोकरी व धंदा करणारे गर्भ श्रीमंत लोक पाहून मग लाच घेणे सुरु करतो . मुंबई मेरी जान मध्ये इरफान खान ने गरीब माणूस व मॉल संस्कृतीचे आकर्षण व त्याची त्यातून होणारी तडफड व्यवस्थित दाखवली आहे . वरच्या पातळीवर उदाहरण द्यायचे झाले तर नुकतेच एका वरिष्ठ पोलीस अधिकार्याला अमली पदार्थाच्या तस्करी साठी पकडण्यात आले . त्याने ह्या व्यवहारातून अमाप पैसा मिळवला .पण तो त्या पैशाचे काय करणार होता ? जो पर्यत उमेदीच्या काळात तो अधिकारी आहे त्याला तो पैसा खुलेआम पणे वापरता येत नाही .राजकीय पुढारी हजारो करोड चे घोटाळे करतात .तर सरकारी सचिव करोडोची माया जमवतात .ह्या पैशाचे ते लोणचे घालतात का ? येथे एक मुद्दा महत्वाचा असा आहे की लाच किंवा भ्रष्टाचार हा केवळ पैश्यासाठी होत नाही .तर सिस्टम मध्ये टिकून राहण्यासाठी व सत्ता व खुर्चीचा माज करण्यासाठी व त्याजोगे समाजात नुसती प्रतिष्ठा नाही तर समाजाला दावणीला बांधून खुल्या सांडासारखे जगण्यासाठी हि तडजोड करावी लागते . ''टू विन अ गेम, .यु हेव टू बी इन द गेम '' म्हणूनच रामदास काकांच्या भाषेत ह्या सरकारी खुर्च्या व पदे हे धावण्याच्या मशीनचा एक पट्टा आहे .एकदा त्यावर स्वार झाले की पळण्याच्या व वेगाच्या धुंदीत जीवघेणी धावपळ सुरु होते .मग ''कायदा पाळा गतीचा थांबला तो संपला '' ह्या सिनियर रामदासांच्या उक्ती सर्व अमलात आणतात .तेव्हा लाचखोरी साठी नुसती शिक्षा नको तर त्या व्यक्तीस जाहीररीत्या बदनाम करून त्याची सामाजिक प्रतिष्ठा धुळीस मिळवावी .समाजप्रिय माणूस समाजातून बहिष्कृत व्हायला नेहमीच घाबरतो .आज प्रसार माध्यमे व सोशल नेटवर्क ने आदर्श घोटाळा हे प्रकरण इतके चघळले की काही राजकीय नेत्यांची व माजी आजी सरकारी सचिवांची कारकीर्द धोक्यात आली .पार लष्कराने माजी लष्करप्रमुखांवर कारवाई करण्याची भाषा केली .तेव्हा ह्या युगात आभासी जगतातून लाचखोरी ची मोहीम सुरु करून तिची गुंफण वास्तविक जगतात अण्णा हजार्यानी राबविलेल्या मोहिमेशी जोडणे आवश्यक आहे अवांतर - बलात्कार पीडित महिलांनी पुरुष नाटकातील नायिकेचे अनुकरण करावे असे माझे वयक्तिक मत आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

'' लाच देणारा प्रस्थापित

५० फक्त
Fri, 04/08/2011 - 15:37 नवीन
'' लाच देणारा प्रस्थापित व्यवस्थेवर अविश्वास दाखवून त्यात पळवाटा आणि बीळे तयार करायला उद्युक्त करतो म्हणून त्याचा गुन्हा जास्त गंभीर.'' वरची वाक्यं ननिंच्या प्रतिसादातुन साभार, मला वाटतं, लाच देणारा अशा पळवाटा आणि बिळं तयार करायला उद्युक्त करत नाही तर संपुर्ण व्यवस्थाच प्रस्थापित करताना आधी अशा पळवाटा आणि बिळं तयार करण्यात येतात आणि मग त्याच्या बाजुला एक व्यवस्था तयार करण्यात येते.
  • Log in or register to post comments

मला आश्चर्य याचं वाटतं की

नगरीनिरंजन
Fri, 04/08/2011 - 15:44 नवीन
मला आश्चर्य याचं वाटतं की काही देशांमध्ये कसं सगळं चांगलं असतं? किमान सामान्य माणसाला तरी लाच वगैरे द्यावी लागत नाही. जी व्यवस्था आहे ती जशी चालायला पाहिजे ती तशीच चालते. भारतात असं कधीच होणार नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

तेच तर होते आहे!

अरुण मनोहर
Sun, 04/10/2011 - 05:45 नवीन
>>जी व्यवस्था आहे ती जशी चालायला पाहिजे ती तशीच चालते. भारतात असं कधीच होणार नाही?<< बाबु लोकांचा तळीराम शांत केल्याशिवाय काम होणार नाही हीच तर व्यवस्था आहे! आणि ती तशीच चालली आहे की!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

+१०० प्रमोद्_पुणे ''खरे

५० फक्त
Fri, 04/08/2011 - 15:58 नवीन
+१०० प्रमोद्_पुणे ''खरे सांगायचे तर मला तरी काही उपाय सुचत नाहिये. आणि हे असेच चालू राहणार. निराशावाद वाटेल एखाद्याला पण ground reality शी सुसंगत विधान आहे.'' पण हे सगळं किमान आपल्या आयुष्यभराच्या अवधीत सुधारेल हा भिकारचोट आशावाद बाळगण्यापेक्षा हा ग्राउंड रिअ‍ॅलिटिला धरुन असणारा प्रत्यक्षवाद जास्त चांगला. संदिप खरेंच्या ओळी आठवल्या '' ढग ज्यातुन काळा एकही गेला नाही, मी असे आभाळ पाहिले नाही '
  • Log in or register to post comments

त्या ओळी ढग ज्यातुन काळा

मिसळलेला काव्यप्रेमी
Fri, 04/08/2011 - 16:14 नवीन
त्या ओळी
ढग ज्यातुन काळा एकही गेला नाही, मी असे आभाळ पाहिले नाही
अश्या नसून
ढग ज्यातुन काळा एकही फिरला नाही, नभ असले मी अद्याप पहीले नाही
अश्या आहेत. अर्थात आपला मुद्दा स्पष्ट आहे. आणि त्याला +१००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

काही दिवसांपूर्वी

मिसळलेला काव्यप्रेमी
Fri, 04/08/2011 - 16:12 नवीन
काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात (बहुदा लोकसत्ता) एक बातमी वाचली होती. ठाणे महानगरपालीकेतील एका आधिकार्‍याची मंत्रालयातून (मंत्र्यांपुढे जे निवाडे चालतात त्याद्वारे) कुठल्याशा भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची चौकशी होऊन शिक्षा जाहीर झाली होती ति अशी: १. टप्प्याटप्याने वेतन ३३% पर्यंत कमी करण्यात यावे. २. पुढील ३ बढत्या रद्द करण्यात याव्या. तसा आदेश निघल्यानंतर तो आदेश दाबून ठेवून त्याच आधिकार्‍याला २ वेतनवाढी एकदम मंजूर होऊन त्याची तात्काळ अंमलबजावणी देखिल झाली. कुणा पत्रकाराने माहीती आधिकाराचा वापर करून हे उघड केले. नंतर त्याबद्दल कुठेही एकही चकार शब्दही वाचायला मिळालेला नाही. यातच सगळं आलं.
  • Log in or register to post comments

'लाच न देणे ' याने सगळ्यात

रेवती
Fri, 04/08/2011 - 17:59 नवीन
'लाच न देणे ' याने सगळ्यात जास्त नुकसान आपलेच होते हे आतापर्यंत लक्षात आले आहे. मी या भ्रष्टाचारी व्यवस्थेला प्रोत्साहन देणार नाही अश्या आदर्श विचारांमुळे माझ्या वेळेचा आणि पैशाचा कमालीचा अपव्यय झाला आहे. कामे उशिराने का होइना झाली...........काही वर्षांनी त्याला काही अर्थ आहे असे वाटत नाही. मागल्यावर्षीपर्यंत तरी आमच्या पुण्यातील बंद असलेल्या घराचे विजेचे मिटर चोरीला जायचे..........म्हणजे मंडळाचे (कुठल्या ते विचारू नका) लोक किंवा त्यांचे चेले हे काम करत असणार. कारण विजेच्या मिटरांच्या बॉक्सला व्यवस्थित कुलुप आहे. वॉचमनकडून किल्ली घेउन मंडळाचे लोक ते बॉक्स उघडतात आणि त्यांची आवश्यक ती कामे करून जातात. माझ्या वडीलांनी अनेक प्रयत्न करून शेवटी ते प्रकरण तडीला नेले. पुण्याहून दुसर्‍या राज्यात जाताना "आता आम्हाला फोनचे कनेक्षन नको" म्हटल्यावर ते काढायला पैसे द्या म्हणून मागे लागले होते. हैदराबादला फोनवाल्यांना पैसे दिले नाहीत म्हणून ७ महिने लँडलाईनच नव्हती. पुण्याच्या घराच्या कागदपत्रावर जुन्या मालकाऐवजी आमचे नाव लागावे म्हणून महापालिकेत पैसे देण्यास नकार देताच वर्षभर हैदराबाद पुणे अश्या चकरा मलाच माराव्या लागल्या. माझे काम करणारा माणूस इतक्या घाणेरड्या नजरेनी बघायचा कि त्याचे डोळे फोडून टाकावेसे वाटायचे........जाऊ दे.....ते भ्रष्टाचारात मोडत नाही. लग्नाच्या सर्टीफिकीटाचे इंग्रजीकरण तातडीने करून हवे होते तेंव्हा नाईलाजाने मी आमच्या आय ए एस जावयांना सांगितले आणि माझे काम एका दिवसात झाले. त्यावेळेस शेकडो लोक त्यांची कामे करण्यासाठी तिष्ठत असताना माझे काम झाले म्हणून अपराधीपणाच आला होता. त्यामानाने हैदराबाद तेंव्हा तरी बरे वाटले होते.
  • Log in or register to post comments

गोळ्या घाला गोळ्या!

धमाल मुलगा
Fri, 04/08/2011 - 18:37 नवीन
हिंदुस्तानी शिनेमा पाहिलाय का? तसं करा. पैशे मागितले की सरकारी बाबूची पालखी! :) जोक्स अपार्ट, मला वाटतं, सरकारी नोकर्‍या राहुद्या ना तशाच. फक्त त्याचा साचा थोडा बदलला तर? म्हणजे, कॉर्पोरेट पध्दतीनं अगदी क्लार्कपासून ते सचिवापर्यंत आणि नगरसेवकापासून ते पंतप्रधानापर्यंत सगळ्यांनाच 'व्हेरिएबल पे बेस्ड अपॉन परफॉर्मन्स' असे पैसे दिले तर? म्हणजे असं बघा, एखादा तलाठी आहे. त्याचं काम काय? तर सातबारा उतारा, पीकपाणी ह्यांच्या नोंदी. आता ह्याचं पर्फॉमन्स अप्रेझल कसं होईल? तर ठराविक काळात ह्या तलाठ्यानं किती उतारे दिले? ते किती दिवसात दिले? काय कागदपत्रांआधारे दिले? वगैरे.... जर ठरवलेल्या अ‍ॅव्हरेजपेक्षा काम कमी असेल तर पैसे कमी. ठरवलेल्या संख्येइतकं झालं तर नेहमीचा पगार, त्याहून जास्त काम केलं असेल तर इन्सेन्टिव्ह्ज. ह्यातून अडकून राहिलेली कामं जास्त रहायची नाहीत असा माझा अंदाज,. हाच नियम नगरसेवकांपासून ते सर्व राजकारण्यांनाही लागू करता येऊ शकेल. अर्थात ह्याच्या व्यापकतेची उमज समज मला नाही. तेव्हा ते कसे करावे ह्याबद्दल मी बोलू शकत नाही. असं झालं, तर पगार नीट हवा, तर झक मारुन काम करायलच हवं ही भानगड एकदा डोक्यावर बसली की कामं अडायची कमी होतील आणी मग लाच देत बसायचं लोकांनाही कारणच उरणार नाही (निदान बर्‍याचशा बाबतीत तरी.) असा माझा आशावाद.
  • Log in or register to post comments

कॉर्पोरेट पध्दतीनं अगदी

गणपा
Fri, 04/08/2011 - 20:14 नवीन
कॉर्पोरेट पध्दतीनं अगदी क्लार्कपासून ते सचिवापर्यंत आणि नगरसेवकापासून ते पंतप्रधानापर्यंत सगळ्यांनाच 'व्हेरिएबल पे बेस्ड अपॉन परफॉर्मन्स' असे पैसे दिले तर?
मालक छान स्वप्नरंजन आहे. स्वप्नातल्या भारतात मी असच काहीस पहात असतो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

:)

धमाल मुलगा
Fri, 04/08/2011 - 20:55 नवीन
म्हणुनच 'आशावाद' असा शब्द वापरला ना. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

भ्रष्टाचाराला आळा बसेल अशी

मराठे
Fri, 04/08/2011 - 18:57 नवीन
भ्रष्टाचाराला आळा बसेल अशी एकच एक पद्धत असेल असं मला वाटत नाही. त्यामुळे भ्रष्टाचार जिथे जिथे होतो (कुठे होत नाही म्हणा) किंवा होऊ शकतो अशा प्रत्येक कामाचं विश्लेषण करून त्यात भ्रष्टाचार रोखण्यासाठी उपाय योजावे लागतील. कुठे वर गविंनी म्हटल्या प्रमाणे कंसंल्टंसी पद्धत उपयोगी पडेल, कुठे तात्काळ सारखी योजना यशस्वी होई,, जिथे शक्य आहे तिथे ऑनलाईन कामे व्हावीत. अर्थात जिथे जिथे "माणूस" हा फॅक्टर येतो तिथे तिथे भ्रष्टाचार होण्याची शक्यता आहे. आमचे अर्थशात्राचे प्राध्यापक नेहमी म्हणायचे "भारतात सगळ्या पॉलिसीज फार छान आहेत.. पण अंमलबजावणी मात्र अत्यंत बेक्कार आहे.".
  • Log in or register to post comments

प्रथमतः एका सनातन विषयाला तोंड फोडल्याबद्दल अभिनंदन ऋषिकेश

चतुरंग
Fri, 04/08/2011 - 19:14 नवीन
वरती बर्‍याचशा मुद्यांचा उहापोह झालाय. मला असे वाटते की लाच ह्या कल्पनेचा उगम केवळ पैशात नसून इतरही अनेक छोट्या छोट्या बाबतीत सुरु होत असतो. आणि अगदी लहानपणापासून मुलांवर अतिशय दूरगामी परिणाम करत असतो. लहानशा कामांमधे शॉर्टकट्स घेणे हे लाचेचे अगदी पहिले स्वरुप. झटपट काम उरकताना गोष्टी अ‍ॅडजस्ट करुन घेतल्या तरी चालतात हे मुले लगेच टिपतात, शिकतात आणि तेच त्यांना योग्य वाटायला लागतं. "तू अमूक एक केलंस तर तुला तमूक एक गोष्ट देईन!" हे बक्षीस ह्या स्वरुपात न राहता लालूच म्हणून कधी बदलतं हे पालकांच्याही लक्षात येत नाही! हीच मानसिकता पुढे जाऊन घट्ट मूळ धरते आणि काहीतरी करायचं किंवा करुन घ्यायचं असलं तर काहीतरी द्यावं/घ्यावं लागतं एवढंच मुलांच्या लक्षात राहतं. सनदशीर मार्गाने गोष्टी योग्य प्रकारे पूर्ण करुन घ्याव्यात आणि त्यासाठी वेळेवर हालचाली करुन तुमच्याकडून तुम्ही काटेकोर राहावे हे शिकवले जातेच असे नाही. शिस्त, वेळेचा योग्य आणि नेटका उपयोग, वेळेवर किंवा किंचित आधीच पूर्ण माहिती करुन घेऊन तयारी करणे ह्या गोष्टींसाठी जे शारीरिक आणि मानसिक कष्ट पडणार असतात ते घ्यायची तुमची तयारी नसेल तर मागाहून पळवाटा काढत बसावे लागते. सद्यस्थितीत जो भ्रष्टाचार सुरु आहे त्यावर हा उपाय काम करेल का? तर ताबडतोब करणार नाहीच. अगतिक झाल्यामुळे, कालापव्यय टाळण्यासाठी, सगळे कायदेशीररीत्या पूर्ण असूनही केवळ सही शिक्क्यासाठी पैसे मागून कागद अडवून धरले जातात तेव्हा तुमचा नाईलाज असतो. वेळ ही सगळ्यात महत्त्वाची ठरते! परंतु जिथेजिथे शक्य असेल तिथे तिथे आपण लाचेला विरोध तर करु शकतोच. मुलांसमोर योग्य उदाहरण घालून देऊ शकतो. त्यांची मानसिकता तयार करु शकतो. जिथे संघटित होऊन लाचखोरीवर तुटून पडता येत असेल तिथे ते करु शकतो.चांगलं काम करणार्‍या लोकांचं जाहीर आणि भरपूर कौतुक करु शकतो. दोनेक पिढ्यांनंतर फरक नक्की दिसेल. वरती नगरीनिरंजनने मुद्दा मांडलाय की काही देशात कसं सगळं व्यवस्थित असतं? तर तसं नसतं. तिथेही भ्रष्टाचार असतो परंतु तो तुमच्या आमच्या पर्यंत पोचण्याइतका सर्वदूर पसरलेला नसतो. आपली रोजची कामं जर विना कटकटीची झाली तर उच्चपदस्थ भ्रष्टाचार करतात की नाही ह्याच्याशी आपल्याला घेणेदेणे नसते आणि ते बरोबरही आहे अन्यथा रोजचे जगणे अशक्य होऊन बसेल! परंतु जेव्हा लाचखोरी नसते तेव्हा लोक संघटित होऊन कायद्यावर बोट ठेवून मोठ्या भ्रष्टाचाराला तोंड फोडायला उत्सुक असतात कारण त्यांचा कायद्यावर आणि अंमलबजावणीवर विश्वास असतो. जिथे तोच डळमळीत होतो (जसे आपल्याकडे झाले आहे) तिथे तुम्हाला लोकांपासून आणी उमलत्या पिढीपासूनच सुरुवात करावी लागते. ते अटळ आहे. -रंगा
  • Log in or register to post comments

अत्यंत सहमत. एक समाज म्हणून

नगरीनिरंजन
Fri, 04/08/2011 - 19:37 नवीन
अत्यंत सहमत. एक समाज म्हणून आपण संस्कारांमध्ये कमी पडतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

विचार करायला लावणारा

ऋषिकेश
Sun, 04/10/2011 - 09:45 नवीन
विचार करायला लावणारा प्रतिसाद.. लाचखोरी वगैरेच्या समुळ उच्चाटनासाठी एखाद-दोन पिढ्या लागतील हा कयासही पटतो. मात्र हे प्रमाण (नजीकच्या भविष्यात) कमी होण्यासाठी काहि तात्कालिक उपाय/कायदे असावेत-करावेत हे ही प्रकर्षाने वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

जिथं शक्य आहे तिथं

विकास
Fri, 04/08/2011 - 19:24 नवीन
या चर्चेची आठवण झाली. "जातं तिथं देतं" अशी वृत्ती ठेवण्यापेक्षा जिथं शक्य आहे तिथे लाच न देता काम करता येईल का ते पहावे. बर्‍याचदा माझ्या एकट्याने काय होणार, हा प्रश्नच मोठा आहे लहान-सहान गोष्टींनी सुटणार नाही असे म्हणत, आपण कळत-नकळत त्याचा एक भाग होत असतो. किमान प्रयत्न करून तरी बघा. नाहीतर मॅरेथॉन धावण्याची महत्वाकांक्षा आहे, पण सरावाच्या पहील्याच दिवशी तेव्हढे अंतर धावता येत नाही म्हणून शक्यच नाही असे म्हणण्यातला प्रकार झाला. मी भारतात बहुतांशी कामे ही कुठलीही पैसे न देता केली आहे. कधी कधी पर्यायच नाही अशा ठिकाणी अक्षरशः चिरीमिरी दिलेली आहे. असे अनुभव विशेष करून कामानिमित्त जेंव्हा कधिही अनस्केज्यूल्ड प्रवास करावा लागे तेंव्हा रेल्वेत डब्यात घेण्यासाठी आले आहेत. अजून एक वाटते. जसे तात्काळ पासपोर्ट अथवा स्पिडपोस्टला जास्तीचे पैसे देयला लावून अग्रक्रमाने काम केले जाते तसेच अजून काही ठिकाणी अधिकृत पणे जास्त पैसे देऊन काम करायला लावावे. त्यासाठी वेगळी खिडकी/व्यक्ती बसवावी. थोडक्यात अधिकृत झाल्यामुळे लाच देण्याऐवजी सरकारी तिजोरीत पैसे जातील...
  • Log in or register to post comments

हे करून पहा

नितिन थत्ते
Fri, 04/08/2011 - 22:51 नवीन
जन्मतारखेच्या दाखल्यासाठी गेले असता मूळ कागदपत्रे गहाळ झाली आहेत असे सांगण्यात आले आणि तेव्हा आधी त्यांनीच दिलेले प्रमाणपत्र दाखवले असता त्याचा काही उपयोग नाही असे सांगितले असा अनुभव वर लिहिलेला आहे. वरील केस मध्ये मी त्या अधिकार्‍याला सांगतो की "आधी आम्हीच दिलेले प्रमाणपत्र ग्राह्य नाही" असे लिहून द्या. अशा वेळी ते बहुधा नमते घेतात. आणि आपले काम होते.
  • Log in or register to post comments

असेच

स्मिता.
Fri, 04/08/2011 - 23:02 नवीन
वरील केस मध्ये मी त्या अधिकार्‍याला सांगतो की "आधी आम्हीच दिलेले प्रमाणपत्र ग्राह्य नाही" असे लिहून द्या. अशा वेळी ते बहुधा नमते घेतात. आणि आपले काम होते. मलादेखील असेच वाटले होते. तेथे मी प्रत्यक्ष नसून माझ्या कामासाठी माझे बाबा गेले होते. परंतु मी त्या कचेरीतल्या मह- डॅम्बिस आणि निगरगट्ट लोकांना पाहिले असल्याने या उपाय तेथे कितपत चालला असता याबाबत शंकाच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

चर्चा मस्तच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 04/08/2011 - 23:29 नवीन
ऋषी, चर्चा, प्रतिसाद मस्तच रे........! कामास होणारा विलंब, आवश्यक कागदपत्रांबरोबर विनाकारण काही अतिरिक्त कागदपत्रांची मागणी ज्यात अशी कागदपत्रे मिळवणे कठीण असते. किंवा ती कागदपत्रे मिळण्यासाठी खूप कालावधी लागणार असतो अशा वेळी अधिकार्‍यांच्या अडवणूकीपेक्षा पैसे दिलेले बरे...या विचारामुळे लाच देण्याची प्रक्रिया सुरु होते आणि अशावेळी चिरीमिरी दिली आहे. :( -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

वाढति लोकसंख्या ..अपु~या

अविनाशकुलकर्णी
Sun, 04/10/2011 - 19:15 नवीन
वाढति लोकसंख्या ..अपु~या संधि...या मुळे हे घडते आहे..... भु भाग आहे तेव्हढाच आहे..पण लोकसंख्या कमालिची वाढत आहे.. लोकसंख्या घटवा लाच खोरी ला बराच आळा बसेल
  • Log in or register to post comments

लाच = unofficial commission

गोंधळी
Tue, 03/13/2012 - 11:20 नवीन
लाच = unofficial commission =black money मला वाटते जो पर्यंत यांच्यावर कड़क कार वाई होत नाही तो पर्यंत हे असेच चालु राहणार. पण जिथे कुंपण शेत खाते तिथे कोण काय करणार.
  • Log in or register to post comments

लूक हुज टॉकींग!

दादा कोंडके
गुरुवार, 03/15/2012 - 11:29 नवीन
तो पर्यंत हे असेच चालु राहणार.
पापं वाढलियेत, दुसरं काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोंधळी
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा