लावणी - प्रणयरातीला कुठे चालला
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
रात चांदण टिपूर सांडल
वार्याचा बी साज नवा
प्रणयरातीला कुठ चालला
शृंगाराला सोडून या
नथनी पैंजण दूर ठेवल
कशास त्यांची भीड उगा
प्रणयाच्या या साजापुढती
सोन्याचाही साज फिका
हाती माझ्या हात सख्याचा
अन् फुललेली रात हवी
नभांगणातील लाख चांदणी
प्रीत बघुनी जळल मनी
प्रेमामध्ये हवी सहजता
शृंगारातही लाज हवी
अस सामोर जाव रातीला
रोजच व्हावी रात नवी
वाचने
4356
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
फक्कड!
In reply to फक्कड! by मिसळपाव
कविता
In reply to फक्कड! by मिसळपाव
कविता
In reply to फक्कड! by मिसळपाव
एक नविन
कविता आवडली.
मास्टर स्ट्रोक
अतिशय सुंदर ...
वा..
छान
सुंदर लावणी
याला मस्त