✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

आमंत्रण - सरुटॉबाने १७ एप्रिल २०११

५
५० फक्त यांनी
Tue, 04/05/2011 - 22:54  ·  लेख
लेख
नमस्कार मिपाकरहो, १४ फेब्रुवारीचा भोजन कट्टा झाला तेंव्हा आम्ही सांदण दरीचं स्वप्न पाहिलं होतं, ते पूर्ण झालं तेंव्हाच एक स्वप्न पाहिलं होतं, एका नव्या कट्ट्याचं, ब-याच जणांच्या खवमध्ये हा शब्द गेल्या काही दिवसात वाचला असेल. आमचे इगुरु श्री. गणपा यांच्या धाग्यानं चिकन भुजिंगच्या धाग्यानं आणि त्यातल्या फुललेल्या निखा-यंनी आमच्या स्वप्नात अजुन निखारे फुलवले. म्हणुन आम्ही ह्या दुस-या खादाडी कट्ट्याचं आयोजन केलंय आणि आमंत्रण देतो आहे. सर्व येउ इच्छिणा-यांचं हार्दिक स्वागत आहे. सरुटॉबाने - म्हणजे सयाजी रुफ टॉप बार्बेक्यु नेशन. पुणे -मुंबई रस्त्यावर वाकडच्या थोडं पुढे डाव्या बाजुला सर्विस रोडवर असलेलं हॉटेल सयाजि, आणि त्याच्या रुफ टॉप वर म्हणजे गच्चीवर असलेले बार्बेक्यु नेशन हे रेस्टॉरंट. नेहमीच्या रेस्टॉरंट पेक्षा जरा वेगळे असलेले हे रेस्टॉरंट, मुद्दामच निवडलेलं आहे. नेहमीच्या ठिकाणि जाउन नेहमीचंच पिणं आणि खाणं टाळायचं म्हणुन. हे रेस्टॉरंट खास आहे, त्याच्या ऑन टेबल लाइव्ह ग्रिल साठी. इथं मेन्यु व्हेज आणि नॉनव्हेज दोन्हीही प्रकारात ५ ग्रिल बेस स्टार्टर, २-३ प्रकारचे सुप , २-३ सॅलड, मेन कोर्स आणि डेझर्ट असा असेल. तुम्हाला जास्त माहिती धाग्याच्या शेवटी दिलेल्या दुव्यावरुन पाहता येईल. दिवस - १७ एप्रिल २०११ वेळ - संध्याकाळी ७.३० ते ११.०० प्रकार - व्हेज आणि नॉनव्हेज खर्च - व्हेज साठी रु. ५७२/- प्रति व्यक्ति आणि नॉन व्हेज साठी रु. ६२४/- कोणि सदस्य इथं दारु पिउ इच्छित असतील तर आमची ना नाही, फक्त तो खर्च ज्याने त्याने करायचा असुन, दारु पिउन गोंधळ करु नये हि विनंती. आणि दारुच्या रेटबद्दल माझ्याकडे विचारणा करु नये. मी या बाबतीत पुर्ण ढ आहे. तसेच, रविवार असल्याने बुकिंग करणे गरजेचे आहे, म्हणुन जे येणार असतील त्यांनी १४ तारखेपर्यंत मला किंवा वल्लीला व्यनि करुन कळवावे. इथे धाग्यावर कळवले तरी चालेल परंतु न आल्यास बुकिंगचा किमान खर्च उपस्थित सदस्यांना शेअर करावा लागेल हे लक्षात ठेवावे. हा धागा १४ तारखेला लॉक करुन १५ ला संध्याकाळ पर्यंत येणा-या सर्व सदस्यांना डिटेल्स कळवले जातील. कोणी सदस्य सहकुटुंब येणार असेल तर आपल्या जोडिदारास मिपाचे काही शब्द / व्याख्या याची थोडी कल्पना द्यावी म्हणजे त्यांना अचानक विमानातुन पडुन मिपाग्रहावर आल्यासारखे वाटणार नाही. http://www.barbeque-nation.com/ http://sayajihotels.com/punehotel/index.php
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
15229 वाचन

💬 प्रतिसाद (60)

प्रतिक्रिया

धम्या य अपेक्षा आपला कात्रज

विजुभाऊ
Wed, 04/06/2011 - 22:25 नवीन
धम्या य अपेक्षा आपला कात्रज कट्टा लै भारी झाला होता. ही बघ त्याची लिंक http://misalpav.com/node/1232 शुद्ध सात्वीक अभिरुची कट्टा तर भन्नाट होता. बहुतेक सगळेच शाम्ग्रीला कट्टे रम्गले होते.
  • Log in or register to post comments

कट्टा होण्याच्या आधीच

मृत्युन्जय
गुरुवार, 04/07/2011 - 10:51 नवीन
कट्टा होण्याच्या आधीच याआधीचा कट्टा चांगला झाला होता म्हणताय? चान चान.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

;)

धमाल मुलगा
गुरुवार, 04/07/2011 - 11:09 नवीन
ओ भौ, शांग्रिला कट्ट्यांचं नाव नको. ;) दर वेळी आमचा कलमाडी झालाय. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

धम्या

चिंतामणी
Sat, 04/09/2011 - 00:45 नवीन
पुढच्या निवडणुकीला भाईना तिकीट नाही मिळाले तर तुलाच मिळणार. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

जे कोणी जाणार असेल त्यांकरिता !!

सुहास..
गुरुवार, 04/07/2011 - 19:44 नवीन
१ )जेवणाच्या क्वॉलिटी बाबत तक्रार करु नये . २) पिणार्‍यांने कृपया क्रेडीट कार्ड सोबत घेवुन जावी . ३ ) आम्ही येणार नाही .
  • Log in or register to post comments

(बहुतेक ) येतो आहे ...

छोटा डॉन
Fri, 04/08/2011 - 10:37 नवीन
जर (माझ्या) ठरलेल्या वेळापत्रकात काही फेरफार आणि गडबड झाली नाही तर मी ह्या कट्ट्याला हजरी लावेन. साधारणता ८.१५-८.३० पर्यंत पोहचेन ... बाकी किमान १ दिवस आधी कुणातरी संयोजकाला योग्य ते कन्फर्मेशन देईनच :) कट्ट्याला शुभेच्छा :) - ( टेन्टिटिव्ह उपस्थित ) छोटा डॉन
  • Log in or register to post comments

एय्य

आनंदयात्री
Fri, 04/08/2011 - 23:26 नवीन
एय्य ... कोण आहे रे तिकडे !! हारतुरे, फटाके बिटाके सगळे रेडी ठेवा रे भेंडी . साहेब येणारेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

हारतुरे, फटाके बिटाके सगळे

३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 04/09/2011 - 13:48 नवीन
हारतुरे, फटाके बिटाके सगळे रेडी ठेवा रे भेंडी . साहेब येणारेत.
असं म्हणताहेत ... ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

पुणे खादाडी कट्ट्याला हार्दिक शुभेच्छा!

प्रास
Fri, 04/08/2011 - 10:54 नवीन
मजा करा लेकोहो! :-)
  • Log in or register to post comments

शुभेच्छा!!

स्मिता.
Fri, 04/08/2011 - 18:03 नवीन
बार्बेक्यु नेशन हे माझे आवडते रेस्टॉरंट आहे. येऊ शकत नसल्याने आता फक्त जळजळ होत आहे :( तरी कट्टा झाल्यावर त्याचे सचित्र वर्णन येथे द्यायला विसरू नका. शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा