Skip to main content

मोज्-माप किती...

लेखक निनाव यांनी मंगळवार, 05/04/2011 03:33 या दिवशी प्रकाशित केले.
बघत आभाळा कडे गेल्या निघून प्रहर किती आले किती गेले किती मनी माझ्या भाव किती मोजलेच कुणी श्वास मिळाले कुणास किती घेतले जितुके मिळाले, सोडले कुणास ठाउक किती स्वप्नांच्या प्रवासात काढले का डोळ्यांचे कुणी तिकिट कधी गेले किती, भिजले किती, परतले किती, विसरले किती वाटांनी मोजले का कधी अंतर पार केले किती थांबले किती, आले किती, गेले किती, न परतले किती कुणाची लागली चाहुल, लागली झोप कुणास किती जागले कोण, झोपले कोण, प्रश्न आहेत अनुत्तरित किती प्रेम झाले, राग आले, क्लेश झाले, द्वेश झाले किती झुकले मन किती, वाकले मन किती, तुटले किती, जुडले किती
लेखनविषय:

वाचने 1120
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

मस्त आवडली कविता ... स्वप्नांच्या प्रवासात काढले का डोळ्यांचे कुणी तिकिट कधी गेले किती, भिजले किती, परतले किती, विसरले किती मस्तच

वाटांनी मोजले का कधी अंतर पार केले किती थांबले किती, आले किती, गेले किती, न परतले किती व्वाह.....