Skip to main content

शब्दहो, याना जरा...!

लेखक केशवसुमार यांनी शुक्रवार, 20/06/2008 20:24 या दिवशी प्रकाशित केले.

आमची प्रेरणा प्रदिप कुलकर्णी यांची अप्रतिम कविता शब्दहो, थांबा जरा...!

.................................
शब्दहो,  याना जरा...!
.................................

शब्दहो, याना जरा! मी गुंफतो वृतात गाणे!
आजच्यापुरते तरी पाडू नका मजला उताणे!!

मुक्त लिहतो नेहमी... वृतातही थोडे लिहू द्या!
गूढ मात्रांची करामत एकदा मजला जमू द्या!
एवढे ऐका जरा! मी विनवतो रे दीनवाणे

सारखे माझ्यापुढे का कोडगे होऊन येता?
आणि मज निःशब्दतेने का असा हा त्रास देता?
वैर माझ्याशीच  तुमचे काय आहे कोण जाणे!

एरवी तुमची अशी आराधना करतो कुठे मी?
`व्यक्त होताना तुम्ही या, ` हट्ट हा धरतो कुठे मी?
आज मज अडवू नका पण रोजच्या सवयीप्रमाणे!

द्या तुम्ही हा "केशवा"ला एक मौका आज या द्या...!
हा निराळा-वेगळा आनंद त्याला ही मिळू द्या...!
रोज मग आहेच त्याचे खरडणे लाचारवाणे !!

- केशवसुमार

..............................
 गुंफणकाल ः २० जून २००८
..............................

लेखनविषय:

वाचने 4158
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

शब्दांची विनवणी आवडली. मूळ कवितेचे विडंबन एवढेच न राहता एक स्वतंत्र कविता म्हणूनही वाचायला आवडली. स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

मूळ कवितेचे विडंबन एवढेच न राहता एक स्वतंत्र कविता म्हणूनही वाचायला आवडली. स्वातिशी सहमत आहे. अतिशय सुंदर काव्य आहे हे. अभिनंदन. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

छान विडंबन..

शब्द तर तुमच्या पुढे मान झुकवून उभेच आहेत. पण शिवाय कवीता रंगली देखील आहे.

द्या तुम्ही हा "केशवा"ला एक मौका आज या द्या...! हा निराळा-वेगळा आनंद त्याला ही मिळू द्या...! रोज मग आहेच त्याचे खरडणे लाचारवाणे !! हे मस्त! वा केशवशेठ! :) तात्या.

मुक्त लिहतो नेहमी... वृतातही थोडे लिहू द्या! गूढ मात्रांची करामत एकदा मजला जमू द्या! हे विशेष जमलंय!!

द्या तुम्ही हा "केशवा"ला एक मौका आज या द्या...! हा निराळा-वेगळा आनंद त्याला ही मिळू द्या...! रोज मग आहेच त्याचे खरडणे लाचारवाणे !! वा वा !! विडंबन सम्राट वा... !! छान जमला आहे रंग ! राज जैन माणसाने जगावे कसे .... स्कॉच सारखे .. एकदम आहिस्ता!!! ....एकदम देशी प्रमाणे चढून उतरण्यात काय मजा :?

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी)केशवसुमार