आमची प्रेरणा प्रदिप कुलकर्णी यांची अप्रतिम कविता शब्दहो, थांबा जरा...!
.................................
शब्दहो, याना जरा...!
.................................शब्दहो, याना जरा! मी गुंफतो वृतात गाणे!
आजच्यापुरते तरी पाडू नका मजला उताणे!!मुक्त लिहतो नेहमी... वृतातही थोडे लिहू द्या!
गूढ मात्रांची करामत एकदा मजला जमू द्या!
एवढे ऐका जरा! मी विनवतो रे दीनवाणेसारखे माझ्यापुढे का कोडगे होऊन येता?
आणि मज निःशब्दतेने का असा हा त्रास देता?
वैर माझ्याशीच तुमचे काय आहे कोण जाणे!एरवी तुमची अशी आराधना करतो कुठे मी?
`व्यक्त होताना तुम्ही या, ` हट्ट हा धरतो कुठे मी?
आज मज अडवू नका पण रोजच्या सवयीप्रमाणे!
द्या तुम्ही हा "केशवा"ला एक मौका आज या द्या...!
हा निराळा-वेगळा आनंद त्याला ही मिळू द्या...!
रोज मग आहेच त्याचे खरडणे लाचारवाणे !!- केशवसुमार
..............................
गुंफणकाल ः २० जून २००८
..............................
| लेखनविषय: |
|---|
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुटला गं बाई सुटला!
केशाचा वारु सुटला!! ;)
मस्त रे केसुशेठ, झकास पलटी!
चतुरंग
शब्द..
शब्दांची विनवणी आवडली.
मूळ कवितेचे विडंबन एवढेच न राहता एक स्वतंत्र कविता म्हणूनही वाचायला आवडली.
स्वाती
सहमत आहे..
In reply to शब्द.. by स्वाती दिनेश
मूळ कवितेचे विडंबन एवढेच न राहता एक स्वतंत्र कविता म्हणूनही वाचायला आवडली.
स्वातिशी सहमत आहे. अतिशय सुंदर काव्य आहे हे. अभिनंदन.
- (सर्वव्यापी)प्राजु
https://praaju.blogspot.com/
छान
छान विडंबन..
शब्द तर
शब्द तर तुमच्या पुढे मान झुकवून उभेच आहेत. पण शिवाय कवीता रंगली देखील आहे.
वा!
द्या तुम्ही हा "केशवा"ला एक मौका आज या द्या...!
हा निराळा-वेगळा आनंद त्याला ही मिळू द्या...!
रोज मग आहेच त्याचे खरडणे लाचारवाणे !!
हे मस्त!
वा केशवशेठ! :)
तात्या.
छान!
मुक्त लिहतो नेहमी... वृतातही थोडे लिहू द्या!
गूढ मात्रांची करामत एकदा मजला जमू द्या!
हे विशेष जमलंय!!
द्या
द्या तुम्ही हा "केशवा"ला एक मौका आज या द्या...!
हा निराळा-वेगळा आनंद त्याला ही मिळू द्या...!
रोज मग आहेच त्याचे खरडणे लाचारवाणे !!
वा वा !!
विडंबन सम्राट वा... !! छान जमला आहे रंग !
राज जैन
माणसाने जगावे कसे .... स्कॉच सारखे .. एकदम आहिस्ता!!! ....एकदम देशी प्रमाणे चढून उतरण्यात काय मजा :?
व्वा !!
खुप छान
धन्यवाद!
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!!
(आभारी)केशवसुमार