Skip to main content

थोडेसे शब्दवणे

थोडेसे शब्दवणे

Published on सोमवार, 04/04/2011 प्रकाशित मुखपृष्ठ
तंद्रीमधून अचानक भान यावे तसे आमच्या दारातल्या झाडाला पालवी फुटली. नाजूकश्या पानाने फांदीच्या सालीला फाडून बाहेर येणे हे आश्चर्य. पातळ नाजूक पाने ! वार्यावर डुलून नवजीवनाची द्वाही देणारी. रंग तरी कसा तर शब्द बापुडे. निसर्गाशी असलेली आपली नाळ तुटली असे वाटून आत पोटात कुरतडते. अभिव्यक्तीची मर्यादा अधोरेखित करण्यासाठीच शब्दाने जन्म घ्यावा. आपले शब्द जसे तसेच झाडाला आलेली नवी पालवी. जीवन सातत्या बद्दल आश्चर्य व्यक्त करण्यासाठीचे सर्व प्रयत्न. पण जीवन या सर्वांहून फार मोठे व्यापक. मी नव्या उत्साहाने गुढीसाठी पालवी तोडणार तोच दहा-बारा वर्षांचा कोवळा मुलगा मला म्हणाला, गुढी उभारायची ती त्या नव्या पालवीच्या कौतूकासाठीच ना! मग ती पालवी तोडायची कशाला. हे क्रूर नाही का? आपण त्या फांदीलाच वस्त्र लाऊया. नव्या पालवीचे कौतूक करुया ! माझ्या डोळ्यात कौतूकपाणी तरारले. आज नवे वस्त्र थेट झाडाच्याच फांदीला लावले. एका नव्या उमलणार्‍या कळीने नव्या पालवीला दिलेली ती निसर्गनिष्ठ दाद होती. -- लिखाळ शब्दवणे

याद्या 5236
प्रतिक्रिया 33

इतक्या कालावधीनंतर अचानक लिखाळाने लिहिले जणू उंबरफूलच! नववर्षाच्या स्वागताला अंतरात्म्यातून उमललेल्या ह्या सुगंधी शब्ददवण्याला सलाम! बाकी कौतुकपाणी ह्या शब्दाने डोळे अंमळ पाणावले! ;) -चतुरंगवणे

=)) =)) =)) =)) =)) =)) अरेऽऽ.... भल्या माणसा.. _/\_ पाय कुठायत तुझे? कापून देव्हार्‍यात ठेवतो. :D -( आवर रे) ध.

छानच हो............ आणी आज टी.व्ही. वर पाहिले का इको फ्रेंडली गुढ्या विक्रीस आलेल्या दाखवत होते.. कल्पना छान आहे!!!!!!!!!!

मी नव्या उत्साहाने गुढीसाठी पालवी तोडणार तोच दहा-बारा वर्षांचा कोवळा मुलगा मला म्हणाला, गुढी उभारायची ती त्या नव्या पालवीच्या कौतूकासाठीच ना! मग ती पालवी तोडायची कशाला. हे क्रूर नाही का? आपण त्या फांदीलाच वस्त्र लाऊया. नव्या पालवीचे कौतूक करुया ! वरील वाक्यांना एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. :) -दिलीप बिरुटे

लिखाळांचे अत्यंत कमी शब्दात महत् लिखाण! आवडले. ते कौतुकपाणी आणि नव्या पालवीचे कौतुक, लई म्हणता लईच भारीये...... :-)

येस्स! लिखाळ इज ब्यॅक!! केवळ केवळ केवळ शब्दातीत!! काय लिहू..! वरती चतुरंग म्हणतात त्याप्रमाणे खरंच उंबराचे फूल आहे.. जियो!!

लिखाळभौ अनेक हजार वर्ष कुठे गायप होते कुणास ठौक! पण आज पाडव्याचा मुहुर्त साधून जोरदार वेन्ट्री घेतलेली आहे. टाळ्यांचा कडकडाट झालेला आहे!! गुढी उभारायची नवीन पद्धत आवडलीच! पुढल्या वर्षी घरी करुन पाहीन म्हणतो!! --असुर

In reply to by असुर

लिखाळभौ अनेक हजार वर्ष कुठे गायप होते कुणास ठौक!
गेली हजार वर्षे शब्दसमाधीस्थ होतो. इकडे वसंत सुरु झाला आणि शब्दपालवी फुटू लागली. समाधी भंगली. आता अशीच शब्दफुलांची परडी घेऊन पुन्हा येईन. ;)

लिखाणाची खूप वाट पहायला लावून प्रतीक्षेचं चीज केलंत! आता ही शब्द-पालवी अशीच तरारू द्या नव्या वर्षात!

आज पाडवा आहे म्हणून लिखाळाला श्या घालत नाहीये. एरवी कधी भेटच रे तू. निषेध म्हणून लेखनावर प्रतिक्रिया देत नाहीये. ;)

पालवीसारखेच नवथर लुसलुशीत लेखन. लिखाळांनी डोळ्यांत कौतूकपाणी आणले अगदी. - - - (रिव्हर्स-इंजिनियरिंग करून याचे सुडंबन करायला हात शिवशिवत आहेत. पण नको... मला पेलायचे नाही.)

In reply to by नंदन

अगदी हेच लिहायला आलो होतो =)) __/\__

मासूम (शेखर कपूर दिग्दर्शीत सिनेमा) मधील झाड/वेलींना इजा झाल्यावर हळवा होणारा तो लहान मुलगा (जुगल हंसराज) आठवला. फोटो - passionforcinema.com येथुन लिखाळसाहेबांचे स्वागत!!

.

लेख आवडला. आम्हाला दवण्यांचे लेखनही आवडत असल्याने तुमचाही लेख आवडला. असो. असेच (म्हणजे दवणीय किंवा अदवणीय पण) लिहीत रहा.

सुंदर लिहल आहे!मस्त!! :)

शाब्दिक प्रतिसादांसाठी सर्वांचे आभार. अशाब्दिक प्रतिसादासाठी श्रामोंना '!'

>>>अभिव्यक्तीची मर्यादा अधोरेखित करण्यासाठीच शब्दाने जन्म घ्यावा. व्वा !!! फारच छान लिखाण आहे .आवडले.

'तंद्रीमधून अचानक भान यावे तसे आमच्या दारातल्या झाडाला पालवी फुटली. ' या पालवीने माझी तंद्री मात्र मोडली. एव्हाना वसंत आला... या धकाधकीत हे ध्यानातच आलं नाही रे.. या रोजच्या रहाट-गाड्यात ह्या पालवीची तुला जाणिव होते हेच तुझं भाग्यं.. इथे फुललेली पालवीच जिथे grasp होत नाहीये तिथे प्रतिभेची पालवी कसली फुलणारं... असो..