Skip to main content

नववर्षाचा सण हा पहिला आनंदाने साजरा करू

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 04/04/2011 03:59 या दिवशी प्रकाशित केले.
नववर्षाचा सण हा पहिला आनंदाने साजरा करू
चला लवकर यारे सारे मराठीची गुढी उंच उभारू नववर्षाचा सण हा पहिला आनंदाने साजरा करू ||धृ|| चला एक मोठी काठी आणू शालू बांधून तिला आपण सजवू हारकडे अन फुलमाळा हारकडे अन फुलमाळा बांधून वर एखादा लोटा घट्ट बसवू नववर्षाचा सण हा पहिला आनंदाने साजरा करू ||१|| पाडव्याच्या शुभमुहुर्ती मंगल कार्य सुरू हो करती दारी तोरण अंब्याचे दारी तोरण अंब्याचे लावून अंगणी मंगल सडा चला शिंपडू नववर्षाचा सण हा पहिला आनंदाने साजरा करू ||२|| उत्साहाचा वारा आता वाहू लागला फाल्गून गेला चैत्र महिना सुरू झाला पानाफुलांनी पानाफुलांनी सजली धरती निसर्गाला वंदन चला करू नववर्षाचा सण हा पहिला आनंदाने साजरा करू ||३|| - पाषाणभेद (दगडफोड्या) ०४/०४/२०११ (गुढीपाडवा)
लेखनविषय:

वाचने 1065
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

गुढीपाडवा तसेच मराठी नुतन वर्षाच्या अनेक शुभेच्छा अमोल केळकर