Skip to main content

हा ध्वजाचा अपमान नाही का?

लेखक युयुत्सु यांनी रविवार, 03/04/2011 17:29 या दिवशी प्रकाशित केले.
काल वल्डकप जिकल्यानंतर स्टेशियम वर जो उन्माद बघायला मिळाला त्यात एक घॄणास्पद गोष्ट बघायला मिळाली. हरभजनसिंग आणि युवराजने राष्ट्रीय ध्वज चेहेर्‍यावरचा घाम पुसायला तसेच नाक पुसायला वापरला. सचिनने तर स्वत:ला राष्ट्रध्वजामध्ये शाली सारखे लपेटून घेतले होते. ही गोष्ट कितीजणांच्या लक्षात आली कुणास ठाऊक?.

वाचने 59530
प्रतिक्रिया 130

प्रतिक्रिया

सचिनने तर स्वत:ला राष्ट्रध्वजामध्ये शाली सारखे लपेटून घेतले होते. मग यामधे प्रॉब्लेम वाटण्यासारख काय आहे ? सायना नेहवाल, अभिनव बिंद्रा, विजेंदर सिंग यांनीसुद्धा असंच स्वतःला ध्वजामधे लपेटून घेतलेलं पाहिलं आहे. कारण तेंव्हा ते भारत देशाचं प्रतिनिधित्व करत असतात. हरभजनसिंग आणि युवराजने राष्ट्रीय ध्वज चेहेर्‍यावरचा घाम पुसायला तसेच नाक पुसायला वापरला. चेहर्‍यावरचा घाम पुसताना पाहिले. पण नाक पुसायला याचा अर्थ काय? म्हणजे नाक शिंकरायला असं म्हणायचं आहे का ? नाक शिंकरताना मी तरी पाहिले नाही. चेहर्‍यावरचा घाम पुसणं हे खटकलं इतपत ठीक आहे. पण ते जाणीवपूर्वक केले आहे असे वाटले नाही. सगळा भारत विश्वविजयाचा आनंद घेत होता तेंव्हा तुम्हाला खेळाडूंची किळस वाटत होती हे वाचून गंमत वाटली.

In reply to by अप्पा जोगळेकर

मग यामधे प्रॉब्लेम वाटण्यासारख काय आहे ? सायना नेहवाल, अभिनव बिंद्रा, विजेंदर सिंग यांनीसुद्धा असंच स्वतःला ध्वजामधे लपेटून घेतलेलं पाहिलं आहे. कारण तेंव्हा ते भारत देशाचं प्रतिनिधित्व करत असतात. ते करतात म्हणजे चांगलेच आहे असे कोण म्हणते?????? ते असे करत असतील तर तीसुध्दा चूकच आहे त्यांची. सायना नेहवाल, अभिनव बिंद्रा, विजेंदर सिंग हे भारताचे प्रतिनीधित्व करतात. BCCI म्हणते का की ही टिम भारताची आहे?????? तशी असती तर आशीयाई स्पर्धेत भारताचा संघ का नव्हता? (अप्पा BCCI याचे उत्तर देणार नाही. आपण देउ शकता आणि द्यावेत) हरभजनसिंग आणि युवराजने राष्ट्रीय ध्वज चेहेर्‍यावरचा घाम पुसायला तसेच नाक पुसायला वापरला. चेहर्‍यावरचा घाम पुसताना पाहिले. पण नाक पुसायला याचा अर्थ काय? म्हणजे नाक शिंकरायला असं म्हणायचं आहे का ? नाक शिंकरताना मी तरी पाहिले नाही. चेहर्‍यावरचा घाम पुसणं हे खटकलं इतपत ठीक आहे. पण ते जाणीवपूर्वक केले आहे असे वाटले नाही. सगळा भारत विश्वविजयाचा आनंद घेत होता तेंव्हा तुम्हाला खेळाडूंची किळस वाटत होती हे वाचून गंमत वाटली. पण ते जाणीवपूर्वक केले आहे असे वाटले नाही. म्हणजे काय?????? जाणिवपुर्वक कृत्य केले असेल तरच गुन्हा असतो?????? कायद्याचे दृष्टीने "कायदा माहीत नसणे अथवा चूकून होणे" ही माफिची कारणे असू शकत नाहीत.

In reply to by चिंतामणी

चिंतामणींशी सहमत आहे. राष्ट्रध्वज खांद्यावर घेण्यात झालंच तर लपेटून घेण्यातही काही तितकेसे चूक वाटले नाही. पण घाम पुसणे वगैरे म्हणजे अतीच होते. जो ध्वज खांद्यावर घेतला आहे त्याच मान राखला नाही तर काय उपयोग आहे. देशासाठी खेळलात (असे म्हणूया) म्हणून काय वाट्टेल तसे वागायचे का? प्रथमच युयुत्सुंशी सहमत आहे.

In reply to by चिंतामणी

कायद्याचे दृष्टीने "कायदा माहीत नसणे अथवा चूकून होणे" ही माफिची कारणे असू शकत नाहीत. सहमत आहे. घाम पुसणे हा गुन्हा नाही असे मी लिहिलेले नाही. ते मुद्दामून केलेले नाही असे वाटले असे लिहिले आहे. 'चेहर्‍यावरचा घाम पुसणं हे खटकलं इतपत ठीक आहे.' असे स्पष्टपणे लिहिलेले आहे. या कारणासाठी खेळाडूंची किळस वाटली हे विधान हास्यास्पद आहे हे पुन्हा एकदा नमूद करतो. ते करतात म्हणजे चांगलेच आहे असे कोण म्हणते?????? ते असे करत असतील तर तीसुध्दा चूकच आहे त्यांची. ते करतात म्हणून नाही. ते एक उदाहरण आहे. मुळामधे या खेळाडूंनी ध्वज अंगाला लपेटून घेणे यातच काही गैर आहे असे वाटत नाही. BCCI म्हणते का की ही टिम भारताची आहे?????? BCCI चं माहिती नाही. भारतातली आम जनता तरी असंच मानते हे त्रिवार सत्य आहे. आय्पीएल च्यामॅचेस आणि विश्वचषकातले सामने यामध्ये फरक आहे हेही लोकांना ठाउक आहे. समजा आयपील्चा सामना हैद्राबादने जिंकला तर तिथे रात्री दिवाळी साजरी होत नाही. पण भारताने विश्वचषक जिंकला तेंव्हा हैद्राबादच काय भारतभर दिवाळी साजरी होते यावरुनच काय ते समजा. परवाच्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत फिकट निळ्या कपड्यात खेळाणारी टीम जिंकली तेंव्हा मी आणि माझ्यासारखे असंख्य भारतीय लोक तरी हा सामना भारताने जिंकला आहे असं म्हणत होते. तुम्ही त्यां टीमला काय म्हणत होतात हे माहीती नाही.

In reply to by अप्पा जोगळेकर

कायद्याच्या कोनातुन सुध्दा ही भारताचीच टीम आहे. आणि हे न्यायालयाने मान्य केलेले तत्व आहे ज्यामध्ये बी सी सी आय ही संस्था 'घटनेच्या कलम १२ मध्ये समावेश असलेल्या 'स्टेट' या व्याख्येत बसते...!' यामुळे हा भारताचा "official" संघ आहे... यामुळे हा विजय देशाचा विजय मानायला हरकत घेणे योग्य वाटत नाही.

In reply to by अप्पा जोगळेकर

या क्लिपमधे युवराज ध्वजाने तोंड (घाम) पुसताना दिसेल. (फक्त २.२६ मीनीटाची क्लिप आहे.) तरीही मला वाटते काही वेळा फार वाईट पद्धतीने ध्वज हाताळला आहे. भज्जी आणि विराट कोहलीचा १.३७ मीनीटाला येणारा फोटो बघा. भज्जीच्या हातातील चोळामोळा केलेला ध्वज बघा (आणी तो कुठे धरला आहे हेसुद्धा बघा.) लॅपमारताना पुढील ओळीतील पियूष चावला आणि कोहली ध्वज कसा घेउन चालले आहेत हे बघा. .

राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ नये. युवराज चेहर्‍यावरचा घाम राष्ट्रध्वजाने पुसत होता, तर सचिनच्या अंगावरील ध्वजाला चक्क शाल किंवा स्वेटरसारखी गाठ मारली होती.

In reply to by पैसा

राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ नये. युवराज चेहर्‍यावरचा घाम राष्ट्रध्वजाने पुसत होता, तर सचिनच्या अंगावरील ध्वजाला चक्क शाल किंवा स्वेटरसारखी गाठ मारली होती.
असे जर असेल तर ते नक्कीच चुकीचे आहे.. परंतु निदान सचिनबद्दल तरी मी असे म्हणेन की ते त्याच्याकडून आनंदच्या भरात आणि खरोखरच अनवधानने झाले असावे...आणि तसे झाले असलेच तरी गेल्या २२ वर्षाच्या त्याच्या उत्तुंग कालावधीत प्रथमच झाले असावे..! सचिन जेवढा मोठा खेळाडू आहे त्याहूनही अधिक तो एक सच्चा देशप्रेमी आहे, आणि एक अत्यंत विनम्र, मर्यादाशील व्यक्ती आहे याबद्दल वाद नाही.. तात्या.

काल जेव्हा मैदानावर खेळाडू ध्वज घेऊन वावरत होते, धावत होते तेव्हा मला उगाच शंकेची पाल चुकचुकलीच होती. आनंदाच्या आणि भावनेच्या भरात भारतीय खेळाडूंकडून ध्वजाचा अवमान तर होणार नाही ना ? होऊ नये असेच सारखे वाटत होते. आणि झाले नाही असे मला वाटते. कारण, तसे झाले तर विजयाचा आनंद सोडून दिवसभर विविध वाहिन्या आणि प्रसारमाध्यमं नसलेल्या विषयाचा चोथा करुन आनंदाला गालबोट लावतील. बाकी, ध्वजाचा वापर नाक पुसायला केला हे मात्र दिसले नाही. बाकी, खेळाडूंची किळस वगैरे कै च्या कैच वाटले राव. -दिलीप बिरुटे

हा ध्वजाचा अपमान नाही का? युयुत्सु- चांगल्या विषयाला तोंड फोडले आहेत. कालच्या प्रकारात राष्ट्रध्वजाचा अपमान नक्कीच झाला आहे. पण राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वज यांच्या पावित्र्याबद्दल कितीजण जागरूक असतात? अनेकांनी आंधळ्या क्रिकेट प्रेमापाई आणि क्रिकेटीयर देवांपाई सर्वांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले आहे. लिहीण्यासारखे खूप आहे. तुर्त एव्हढेच लिहून थांबतो. वेळ मिळाल्यावर परत लिहीनच.

बाकी, खेळाडूंची किळस वगैरे कै च्या कैच वाटले राव. भरपूर लोकांना सांगून पाहिले असेल पण सगळ्यांनी खिल्ली उडवली म्हणून मग यांनी धागा काढला बहुतेक.

प्र का टा आ खाली दिलेल्या पकाकाकांच्या प्रतिक्रियेशी सहमत .

राष्ट्रध्वजाचा अवमान ही तांत्रिक बाब आहे. अनेक राष्ट्रशोषक बगळे मोठ्या भक्तीभावाने राष्ट्रध्वजाला मानवंदना देताना आपण पहातोच.

In reply to by प्रकाश घाटपांडे

'राष्ट्रशोषक बगळे' ह्या शब्दांबद्दल एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत! ;) -रंगा

In reply to by प्राजु

सहमत! प्रकाशरावांकडे सिक्सर कशी मारावी याचे शिक्षण घेण्याचा सध्या विचार आहे. ;)

In reply to by प्रकाश घाटपांडे

राष्ट्रशोषक बगळे मोठ्या भक्तीभावाने राष्ट्रध्वजाला मानवंदना देताना आपण पहातोच. राष्ट्रशोषक बगळे मोठ्या भक्तीभावाने राष्ट्रध्वजाला मानवंदना देतात. (खोटी का होईना). जाहीररीत्या नाक/ घाम पुसायला नाही वापरत राष्ट्रध्वज.

In reply to by चिंतामणी

>>राष्ट्रशोषक बगळे मोठ्या भक्तीभावाने राष्ट्रध्वजाला मानवंदना देतात. (खोटी का होईना). जाहीररीत्या नाक/ घाम पुसायला नाही वापरत राष्ट्रध्वज बास , मग आता त्यांचाच आदर्श आपण यापुढे ठेवुयात , काय ?

असामान्य यशाच्या उन्मादात अजाणतेपणाने असे होऊ शकते. ध्वज खांद्यावर टाकून किंवा लपेटून घेणे ह्यात मला गैर वाटले नाही परंतु घाम जर पुसला असेल तर तसे व्हायला नको होते असे नक्कीच वाटते. परंतु खेळाडूंची किळस वगैरे यावी असे काही मला वाटत नाही. तो सगळा विजयोत्सव साजरा करताना घडलेला प्रकार असावा. त्याचा इतका बाऊ केला जाऊ नये. -तिरंगा

In reply to by चतुरंग

असेच म्हणतो. सचिनचे तत्वतः चुकले असावे पण यात अपमान वाटला नाही. तेच युवराजबद्दल वाटते की अनावधानाने झाले. सांगितले पाहीजे हे नक्की... तरी देखील हरभजनची पद्मश्री संदर्भातील बातमी वाचून थोडे शिक्षण देण्याची गरज आहे असे वाटले... Learn from Sachin, Gill tells Dhoni, Harbhajan

In reply to by विकास

बाकी ठीक पण गिल म्हणजे तेच ना ज्यांनी एका महीला हॉकी खेळाडुशी असभ्य वर्तन केले म्हणुन केस झाली होती आणि दाबली गेली? धागा नेहमीप्रमाणेच रोचक. प्राजुशी सहमत.

In reply to by शिल्पा ब

"ते" के.पि.स गिल. हॉकी असोसिएशनचे प्रेसीडेंट होते ( व I.P.S. अधीकारी होते. त्यांनी एका I.A.S. महीलेचा विनयभंग केला होता) हे डॉ. एम.एस.गिल. हे केंद्रीय मंत्रीमंडळात मंत्री आहेत. वरील उदगार काढले त्यावेळी ते क्रिडा खात्याचे मंत्री होते. (अवांतर- टेनीस खेळाडु रूचिका गेहरोत्राचा विनयभंग करून तीला आत्महत्या करण्यास भाग पाडलेला I.P.S. अधीकारी हरयाणा लॉन टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष एसपीएस राठोड होत. त्यांनी रूचीकाच्या कुटुंबियांनासुद्धा खूप त्रास दिला. परंतु या घटनेची साक्षीदार असलेली तिची मैत्रीण आराधना गुप्ताने या राठोड विरूध्द कायदेशीर लढा देउन त्याला तुरुंगवास घडवला. या बद्दलची सवीस्तर माहिती येथे वाचा.) (के.पि.स गिल आणि एसपीएस राठोड या दोघांबद्दल एक लेख येथे वाचा)

In reply to by चतुरंग

कायद्याचे दृष्टीने "कायदा माहीत नसणे अथवा चूकून होणे" ही माफिची कारणे असू शकत नाहीत. वरती एकदा लिहीले आहे. पुन्हा लिहीतो. कायद्याचे दृष्टीने "कायदा माहीत नसणे अथवा चूकून होणे" ही माफिची कारणे असू शकत नाहीत. रंगाभाउ- एक सांगा. एखाद्या सामान्यमाणसाला काही लाखांची लॉटरी लागली. आणि त्या "यशाच्या उन्मादात अजाणतेपणाने" त्याने वाहन चालवताना तुम्हाला धडक मारली. तर माफी देणार काय?

कै च्या कै!! मान -अपमानाच्या कक्षा आपण ठरवायच्या असतात. अंगावर लपेटणे यात गैर काहीच वाटले नाही. घाम वगैरे पुसला असेल.. "चला... आता राष्ट्रध्वजाने घाम पुसूया.." असं म्हणून जाणूनबुजून कोणीच केलं नसेल/नसणारच. विजयाच्या उन्मेदामध्ये होऊ शकतं, पण याचा अर्थ राष्ट्रध्वजाच्या अपमान झाला असा होत नाही. असल्या फाल्तू गोष्टींनी अपमान होण्यासारखा इतका खालच्या पातळीचा आणि स्वस्त आपला राष्ट्रध्वज नक्कीच नाहीये. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला रस्त्यांवर काडीला लावलेले कागदाचे राष्ट्रध्वज ५ - १० रूपयांना मिळतात आणि १६ ऑगस्ट आणि २७ जानेवारीला रस्ते लोटणार्‍या बायका हे राष्ट्रध्वज उचलून कचर्‍यात टाकतात.. तो अपमान नसतो का? नक्की मान कशाने वाढतो आणी अपमान कशाने होतो.. याची सीमारेखा आखली पाहीजे. आपल्या अपमानाची कक्षा इतकी अरूंद ठेवली तर दर २-४ पावलांवर अपमान होतो. मला राष्ट्राबद्दल, राष्ट्रध्वजाबद्दल अभिमान वगैरे नाही असा समज कोणी करून घेऊ नये.. पण somewhere you have draw the line..! उद्या हे असले धागे वाचून पुन्हा कोणी माथेफिरू राष्ट्रध्वजाचा अपमान झाला म्हणून दंगा घडवू शकतो आणि चांगल्या गोष्टिकडे व्यवस्थित दुर्लक्ष होऊ शकतं. नक्की कशाला किती महत्व द्यायचं हे समजायलाच हवं. माझ्या दृष्टीने या धाग्याला काहीही अर्थ नाहीये. हा धागा काढायची गरज नव्हती. तुम्हाला वाटलं अपमान झाला.. तुमच्यापर्यंतच ठेवायला हवं होतं.. इथे लिहून ज्यांच्या लक्षात ते आलं नव्हतं त्यांना लक्षात आणून देण्याइतकी मोठी गोष्ट ही नक्कीच नाहीये. असो.. बाकी चालूद्या.. शहाण्यास सांगणे न लागे.

In reply to by प्राजु

प्राजुशी सहमत. मी तर पाहीले तेव्हा हरभजनने आधी डोळे पुसले होते, नंतर घाम. सचिनने किंवा आणि कोणी त्याच्या भोवती शालीसारखा ध्वज गुंडाळला तर ते काय लगेच तो काढुन घडी करुन टिव्हीवाल्यांशी बोलणार का? समजा तुमची जी भावना आहे तीच भावना मनात ठेवुन तशी कृती केली असती तर ब-याच लोकांना तोही राष्ट्रध्वजाचा अपमान वाटला असताच की. ही घटनाच अगदी माझ्यासारख्या सामान्य भारतीयालासुद्धा ह्रदयात सामावाणारी (Overwhelmed ला अजुन चांगला मराठी शब्द?) नाही तर जिथे त्यांचा कस लागला त्यांची काय कथा. आधीचा सगळा तणाव, लोकांचे, मिडीयाचे प्रेशर, राजकीय व्यक्तींची उपस्थिती, एखादा कोणी किंवा स्वत: तो खेळाडु चांगला नाही खेळला तर ती होणारी चिडचिड आणि नंतर २८ वर्षांनी मिळवलेला तो विजयी कप! हे सगळे फार मोठे आहे हो, त्याचा अर्थ असा नाही की या गदारोळात राष्ट्रध्वजाचा अपमान व्हावा, झाला तर चालतो, कोणीही हे मुद्दाम केलेले नाही. आणि प्राजु म्हटली तसं अशा वेळी गळा काढणारे किती लोक १६ ऑगस्ट आणि २७ जानेवारीला रस्त्यांवर पडलेल्या हजारो ध्वजाची काळजी घेतात?

In reply to by सखी

सहमत.. जाज्वल्य राष्ट्राभिमानासाठी प्रसिद्ध असलेले इंग्लिश पाठीराखे राष्ट्रध्वजाच्या चड्ड्या करुन घालतात आणि मॅच पहायला येतात. तिथे कुठे राष्ट्रध्वजाचा अपमान झाल्याच्या बातम्या ऐकल्या नाहीत. किंबहुना आपण राष्ट्रध्वज परिधान करतो या बद्दल अभिमानच वाटतो त्याना.. आपण इतके दिवस आपला राष्ट्रध्वज सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरच ठेवला होता. नविन जिंदालच्या प्रयत्नाने तो आता आपल्याला अभिमानाने फडकावता तरी येतो. ऑलिंपिक सारख्या स्पर्धात बहुतेक देशांचे विजेते राष्ट्रध्वज शालीसारखा अंगावर पांघरतात. राष्ट्रगीत चालू असताना ढसाढसा रडतात. ते काही अपमान करण्यासठी नव्हे.. तर देशाबद्दलचे अपार प्रेम व्यक्त करण्यासाठी.. अशा अविस्मरणीय क्षणी खेळाडुंच्या मनात असलेल्या भावनांचा विचार न करता दोष देणे हे छिद्रान्वेषीपणाचे लक्षण वाटते.. या संदर्भातला एक किस्सा आठवतो.. एकदा एका ब्रिटीश खलाशाने एका अमेरिकन खलाशाला राष्ट्रध्वज उलटा फडकविल्याबद्दल हटकले. अमेरिकन खलाशी ताडकन उत्तर देता झाला, " आमचा झेंडा उलटा लावला तर कळते तरी.. तुमचे तसेही नाही.."

In reply to by प्राजु

राष्ट्रध्वज अंगाला गुंडाळल्याचे मी सुद्धा पाहिले आणि विजयोन्मादाच्या जल्लोषात कोणीही त्या गोष्टीकडे लक्ष दिले नाही हे खरे. हे काही जाणूनबुजून केले नसावे. त्यामुळे प्राजुतायशी सहमत..

In reply to by प्राजु

मान -अपमानाच्या कक्षा आपण ठरवायच्या असतात. अंगावर लपेटणे यात गैर काहीच वाटले नाही. घाम वगैरे पुसला असेल.. "चला... आता राष्ट्रध्वजाने घाम पुसूया.." असं म्हणून जाणूनबुजून कोणीच केलं नसेल/नसणारच. विजयाच्या उन्मेदामध्ये होऊ शकतं, वरची प्रतिक्रीया वाचा. रंगाभाउंना प्रश्ण विचारलेला आहे. तो तुम्हालासुद्धा लागू आहे. आपण त्याचे उत्तर द्यावे. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला रस्त्यांवर काडीला लावलेले कागदाचे राष्ट्रध्वज ५ - १० रूपयांना मिळतात आणि १६ ऑगस्ट आणि २७ जानेवारीला रस्ते लोटणार्‍या बायका हे राष्ट्रध्वज उचलून कचर्‍यात टाकतात.. तो अपमान नसतो का? तो सुद्धा अपमान आहेच. याची जाणीव असलेल्या जागरूक नागरीकांनी संघटना स्थापून लोकजागृती करायला सुरवात केली आहे. त्याच बरोबर याची जाणीव असलेले स्वयंसेवक हे पडलेले ध्वज गोळा करतात आणि राष्ट्रध्वजासंभंदी असलेल्या नियमांप्रमाणे पुढील कारवाई करतात. राष्ट्रध्वजासंबंधी नियम/कायदे आहेत. त्यामधे खराब झालेले राष्ट्रधज कसे निकाली काढावेत (निकाली काढणे या मराठी शब्दावरून वाद होउ शकतील म्हणून इंग्लीश शब्द सांगतो dispose off) या संबंधी मार्गदर्शन आहे. नक्की मान कशाने वाढतो आणी अपमान कशाने होतो.. याची सीमारेखा आखली पाहीजे. आपल्या अपमानाची कक्षा इतकी अरूंद ठेवली तर दर २-४ पावलांवर अपमान होतो. या संबंधी नियम/कायदे आहेतच. त्याची माहिती करून घ्या. (वैयक्तीक आयुष्यात "मान कशाने वाढतो आणी अपमान कशाने होतो" हे सांगता येते का?) ह.घ्या. माझ्या दृष्टीने या धाग्याला काहीही अर्थ नाहीये. हा धागा काढायची गरज नव्हती. तुम्हाला वाटलं अपमान झाला.. तुमच्यापर्यंतच ठेवायला हवं होतं.. अपमान धागाकर्त्याचा नाही झाला. तो राष्ट्रध्वजाचा झाला. म्हणजेच देशाचा झाला. ही चूक नजरेसमोर आणणे गैर नाही. देशाच्या ध्वजाचा आणि राष्ट्रगिताचा मान राखणे हे प्रत्येक नागरीकाचे कर्तव्य आहे. (आजकाल फक्त हक्कच माहीत असतात. कर्तव्यांची ऐशी तैशी)

In reply to by चिंतामणी

>>(आजकाल फक्त हक्कच माहीत असतात. कर्तव्यांची ऐशी तैशी) ३३% कर भरल्यावर काही हक्क माफक प्रमाणात तरी का मिळु नयेत ?

In reply to by कुंदन

दुबई मध्ये केंव्हा पासुन कर घ्यायला सुरवात झाली? ;)

राष्ट्रध्वजाचा आकार प्रमाणात नसेल तर तो राष्ट्रध्वज ठरु शकत नाही.. तशी काळजी घेऊनच अशा गोष्टी बनवल्या जात असाव्यात बहुतेक

मला तरी ध्वज लपेटून घेण्यात काहीच वाटले नाही. घाम पुसल्याचं जाऊ दे हो युयुत्सु! त्यांनी राष्ट्राला अभिमान वाटावा असे काम केले मग त्यात काय एवढे. राष्ट्रध्वजाला साष्टांग नमस्कार घालत वाईट खेळून हरले असते तर वेगळी टीका झाली असती. यावेळी कधी नव्हेतो तुमचा धागा पाहून आनंद झाला हे काय कमी आहे.;) चक्क पुरुषांवर कसला का होइना आरोप केला आहे म्हणून म्हटले.

In reply to by रेवती

चक्क पुरुषांवर कसला का होइना आरोप केला आहे म्हणून म्हटले. कदाचीत, हरभजन -युवराजला, पांडेबाईंच्या भितीने घाम आला असावा आणि भयग्रस्त अवस्थेत आपण तो कशाला पुसतोय याचे भान राहीले नसावे. ;)

In reply to by विकास

शक्यता आहे. हे ध्वज त्यांनी बराचवेळ जवळ बाळगले असतील्.........ही मुलगी कुठेही नैसर्गीक अवस्थेत दिसली तर तिच्या अंगावर लपेटता येतील म्हणून. तरीच काल पुढच्या सेलिब्रेशनबद्दल कोणी काहीही बोलत नव्हते. नक्की काय (किंवा काय काय) होणार ते त्यांनाही माहीत नसावे.;)

In reply to by रेवती

त्यांनी राष्ट्राला अभिमान वाटावा असे काम केले मग त्यात काय एवढे.
सहमत. प्रत्यक्ष कामगिरीकडे दुर्लक्ष करून चुकून झालेल्या प्रतीकात्मक चुकीकडे लक्ष देऊ नये. या खेळाडूंमुळे एकुणात राष्ट्रध्वजाची शान वाढली असंच मी म्हणेन.
ही मुलगी कुठेही नैसर्गीक अवस्थेत दिसली तर तिच्या अंगावर लपेटता येतील म्हणून.
तसं झालं तर राष्ट्रध्वजाची शान वाढेल की कमी होईल?

In reply to by राजेश घासकडवी

काही काही लोकं तर गालावर राष्ट्रध्वजाचे रंग लावून फिरत होते. आता हा ध्वजाचा अपमान, ध्वजाचं विडंबन का आणखी काही?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

काही काही लोकं तर गालावर राष्ट्रध्वजाचे रंग लावून फिरत होते. ध्वजा संदर्भात काही प्रथा आवर्जून पाळल्या जातात. सूर्यास्तानन्तर ध्वज उतरवले जातात. गालावरचे ध्वज उतरवणार कसे.... ;)

In reply to by राजेश घासकडवी

एखाद्याला अमका पुरस्कार मिळाला म्हणून त्या पुरस्काराची शान वाढली असे मानक काही ठिकाणी चालेल. सगळीकडेच नका लावत जाऊ राव. आणि तसे म्हटले तरी असे काही करणे पटत नाही. प्रत्यक्ष कामगिरीकडे दुर्लक्ष करून चुकून झालेल्या प्रतीकात्मक चुकीकडे लक्ष देऊ नये. मध्ये एकदा रिकी पोंटिंगने शरद पवारांना मंचावरून खाली उतरायला लावले तेव्हा मग ती प्रतीकात्मक चूक वाटत नाही, चूकच वाटते. असे का? कारण ती बाहेरच्याने केली आहे ?

युयुत्सुंनी असला धागा काढुन राष्ट्रध्वजाचा अपमान केल्या आहे . आणि त्यांचे हे कृत्य पाहुन मला माईंदळ किळस आल्याने उंम्दळायला होतं आहे . ही किळस एवढी तीव्र आहे की आमच्या आजुबाजुच्यांना पण युयुत्सुंच्या कृत्याची किळस आल्या गेली आहे . काय समजायचे ते समजा. -किळुत्सु

या बहूतांश प्रतिसादातून ध्वनित होणारा संदेश म्हणजे या उन्मादात कुणी सिग्नल तोडला आणि एखाद्याचा जीव घेतला तरी त्याकडे दूर्लक्ष करायला पाहिजे. कारण सम आर मोअर इक्वल दॅन अदर्स!

In reply to by युयुत्सु

या उन्मादात कुणी सिग्नल तोडला आणि एखाद्याचा जीव घेतला तरी त्याकडे दूर्लक्ष करायला पाहिजे. आपल्या समजशक्तीचे कायम कौतुकच वाटत आले आहे.

In reply to by रेवती

राष्ट्रध्वजाचा आणि राष्ट्रगिताचा अपमान हा संपुर्ण देशाचा अपमान आहे आपणास वाटत नसल्याने आपणास काहिही सांगणे चुकीचेच आहे.

In reply to by चिंतामणी

हे राष्ट्रध्वज काल मैदानात खेळाडूना उपलब्ध कोणी करुन दिले त्याना पण पकडा ना. अवांतर : चेहरा पुसला - नाक पुसले असे वेगवेगळे का सांगतायत , नाक हा चेहर्‍याचाच एक भाग आहे नै का?

जाऊ द्या की राव, असा कुठे काय राष्ट्रध्वजाचा अपमान होतो काय ? भावना समजुन घ्या की राव ... बाकी लोकांच्या राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रध्वजाच्या सन्मान ह्याबाबतच्या भावना आणि त्यांचे प्रदर्शन दिवसेंदिवस दिखावु होत चालले आहे ह्याचा देख वाटतो. अवांतर : बाकी युयुस्तुराव काल सामना पहात असतील तर भारताच्या राष्ट्रगीताच्यावेळी जिथे असतील तिथे सन्मान देण्यासाठी 'सावधान' पोझमध्ये उभे राहिले असतील असे गृहीत धरतो. ;) - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

श्रीलंकेचे राष्ट्रगीत संपून आपले राष्ट्रगीत सुरु झाले तेव्हा मी सावधान उभा राहिलो होतो. अशावेळी माझा ऊर नेहेमीच भरुन येतो. -(राष्ट्रप्रेमी)रंगा

In reply to by चतुरंग

हेच म्हणतो. >>श्रीलंकेचे राष्ट्रगीत संपून आपले राष्ट्रगीत सुरु झाले तेव्हा मी सावधान उभा राहिलो होतो. +१, मी पण. बाकी मैदानावर ११ प्लेयर्स आणि त्यांचे हजारो पाठीराखे ह्यांनी एकसाथ गायलेले कुठल्याही देशाचे राष्ट्रगीत ही बाब मला नेहमीच सुखावणारी वाटली आहे. भले ते भारताच्या क्रिकेट सामन्यातले असो वा स्पेन / जर्मनी / इटली ह्यांचे फुटबॉल सामन्यातले असो, त्यातुन मिळणारा आनंद आणि सुख हे सारखेच असते. - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

बाकी मैदानावर ११ प्लेयर्स आणि त्यांचे हजारो पाठीराखे ह्यांनी एकसाथ गायलेले कुठल्याही देशाचे राष्ट्रगीत ही बाब मला नेहमीच सुखावणारी वाटली आहे. सहमत आहे. आम्हालाही पाकीस्तानचे राष्ट्रगीत आणि भारताचे राष्ट्रगीत झाल्यावर असेच वाटले होते. त्यातल्या त्यात पाकीस्तानचे राष्ट्रगीत जास्त आक्रमक वाटले.

In reply to by चतुरंग

श्रीलंकेचे राष्ट्रगीत संपून आपले राष्ट्रगीत सुरु झाले तेव्हा मी सावधान उभा राहिलो होतो. ?? .....पण आपले राष्ट्रगीत श्रीलंकेच्या आधी झाले ना? कारण मी जेव्हा TV सुरू केला आपले राष्ट्रगीत चालू झाले होते आणि त्यानंतर श्रीलंकेचे राष्ट्र्गीत सुरू झाले.

In reply to by योगी९००

आपण श्रीलंकेत राहता का? -असाल तर ठीक आहे, नसाल तरिही अवांतर : सकाळी ७:३० च्या सुमारास रोज (रव्वार वगळुन) माझ्या टेरेसवर राष्ट्रगीत ऐकु येते, मी तोंडात ब्रश कोंबुन १ मिनिट स्तब्ध उभा राह्तो. असे करताना काटा येत नसेल तर ते भारतीय नव्हेत.. मले तर ब्वॉ थेटरात पन मज्जा येते...

In reply to by चतुरंग

श्रीलंकेचे राष्ट्रगीत संपून आपले राष्ट्रगीत सुरु झाले तेव्हा मी सावधान उभा राहिलो होतो. मीदेखील अशावेळी नेहमी उभा राहतो. पण उर भरुन येण्याचा अनुभवच आलेला नाही मला कधी. राष्ट्रगीत वाजत असताना उर भरुन आला नाही तर तो राष्ट्रगीताचा अपमान समजावा का असा माझा युयूत्सूंना साधासुधा प्रश्न आहे.

In reply to by अप्पा जोगळेकर

राष्ट्रगीत वाजत असताना उर भरुन आला नाही तर तो राष्ट्रगीताचा अपमान समजावा का असा माझा युयूत्सूंना साधासुधा प्रश्न आहे. ऊर भरून येताना अनाठायी हालचाल (जशी परवा मॅच संपल्यावर रस्त्यावर चालली होती) झाली तर तो अपमान होत असावा असे युयुत्सुंचे उत्तर असेल असे वाटते.

In reply to by छोटा डॉन

बाकी युयुस्तुराव काल सामना पहात असतील तर भारताच्या राष्ट्रगीताच्यावेळी जिथे असतील तिथे सन्मान देण्यासाठी 'सावधान' पोझमध्ये उभे राहिले असतील असे गृहीत धरतो.
राहिले असतील तर त्यांच्याबद्दल आदरच वाटेल! तेच काय इथं पब मध्ये सुद्धा उपस्थित समस्त भारतीय जनता 'सावधान' पोझमध्ये उभी राहते राव. आणि राहायलाच हवं. तुमच्या अंगावर काटा येत नाही का हो डान्राव राष्ट्रगीत ऐकताना? माझ्या तर येतो ब्वॉ! आणि अभिमानानं ऊरही भरून येतो! जेव्हाकेव्हा राष्ट्रगीत सुरू होतं तेव्हा आपण असू तिथं सावधान पोझमध्ये येतो राव! बाकी युवराजने राष्ट्रध्वजको नाक पुस्या तर उसका चुक्याच बाबा!

additional: सोनिया गांधी रात्री दिल्लीत विजयजल्लोष करण्यासाठी गाडीवर उभ्या राहून रस्त्याने फिरत होत्या.त्यांनीही राष्टध्वज अंगावर लपेटल होता. अवमान झाला का हा तांत्रिक भाग,पण हे फक्त खेळाडूंनीच केले असे नव्हे.