|
एक वाटी ज्वारीचे किंवा थालिपिठ भाजणी पिठ, एक मध्यम कांदा बारिक चिरुन, कोथिंबीर भरपुर बारीक चिरुन, तिखट, मिठ चवीनुसार, ओवा थोडासाच, हळद चिमुटभर हे सर्व एकत्र करुन मळून घ्या,
आता तव्याला तेल लावून हा मळलेला गोळा तव्यावर एकसारखा पातळ थापा...कडेने पुन्हा तेल सोडा,
आता हे थालीपिठ तवा गॅसवर ठेवुन त्यावर झाकण ठेवा व साधारण पाच मिनिटे भाजा..
खमंग भाजले आहे का ते पहा..हे एकाच बाजुने भाजा...
तयार झालेले थालीपिठ साजुक तुपाबरोबर गरम गरम खा... |
प्रतिक्रिया
मस्त.
मिळालं बॉ आम्हालाही
हा हाहा
In reply to मिळालं बॉ आम्हालाही by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छान.
मस्त! मॅच चालू असतांना नाही पाहिली पाककृती..
एकाच साईडने भाजायचे का
>>आणी एक्सारखे तव्यावर
In reply to एकाच साईडने भाजायचे का by किशोरअहिरे
आणी ५ मिनीट ठेवले तर ते काळपट
हा आमचा कांद्याचा पराठा..