कधी सरणार ही सांज कधी निजणार मन आज
मंद सुलगते आहे ओल्या धुराखालची आग
वाहते आहे भरुन इतुके
मनी झरेच झाले आज
पाउल पुढे पडतांना
दिशा गुंतत आहेत आज
धुकेच धुके आहे समोर
न दिसते आहे काही आज
अशी हरविले आहे मी
न ओळखे आज मज कुठली वाट
न मावे पदरात माझ्या आज
एकटीच वाढे हि अंधारी रात्र
सरकते आठवणींचे थेंब अलगद
काजळ पुसते मी पसरते आज
कधी सरणार ही सांज कधी निजणार मन आज
मंद सुलगते आहे ओल्या धुराखालची आग
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1078
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान लय .आवडली !! कधी सरणार ही
>कधी सरणार ही सांज कधी निजणार
मस्त कविता .. आवडली