प्रेरणास्रोत
साहित्य: एक मोठ्ठा पूर्णविराम, कंपूबाज, विचार, अॅटीट्युड, दोन कंस, त्यावर ठोकता येईल असे enter बटन, किस्सा परदेशगमनाचा , दुसऱ्यांच्या खरडवह्या उचकून सापडलेल्या कुरापती, मायदेशातील आठवणी.
कृती: Text box मध्ये विचार उकळण्यास ठेवावे. पूर्णविरामाचे सर्वमान्य वापर विसरून जावे अथवा न विसरता अधून मधून text box मध्ये भरावेत. किती झाले आहेत ते बघून घ्यावेत.
पूर्णविरामांच्या संख्येनुसार प्रतिसादाचे काठीण्य बदलते. पूर्णविरामाने भागत नसल्यास दोनास एक अथवा पावपट किंवा जास्ती enter key ठोकावी. विचार अर्धवट उकळल्यावर कंसात आपल्या आठवणी पसराव्या.
लक्षात ठेवून शुद्धलेखनात चूक करावी. एका पूर्णविरामासाठी ८ चुका कराव्यात. कमी चुका केल्यास प्रतिसाद सोपा होईल.
गडबडलेला प्रतिसाद तसाच ठेवून एक बिअर पेक्षा महाग कॉफी प्यावी.
आता दुसऱ्या कंसात परदेशगमनाचा किस्सा व मायदेशातील आठवणी टंकाव्यात. तीन चार आठवणी झाल्यावर मगाशी अर्धवट लिहिलेला प्रतिसाद त्यात घुसडावा. कम्पूबाजांच्या नावाने बोटे मोडत राहावे. आठवतील तशा कुरापती टंकाव्यात.
लिहून झालेला प्रतिसाद पुरेसा असंबद्ध वाटला की टंकणे बंद करावे. प्रकाशित केल्यावर प्रतिसाद अजून असंबद्ध दिसणार आहे हे लक्षात असू द्यावे. पूर्वादृश्याकडे दुर्लक्ष करून प्रतिसाद प्रकाशित करावा.
टीपा: १.पूर्णविराम देण्यासाठी जर्मन की बोर्ड वापरावा. माझ्याकडे तसा नसल्याने प्रतिसाद खूपच सोपा झाला.
२. प्रतिसाद खूपच सोपा वाटल्यास नवीन जोडशब्द शोधून दोन आठवणींच्या मध्ये टाकावा.
३. प्रतिसाद प्रकाशित करून झाल्यावर उपप्रतिसाद देण्या आधीच कंपूबाजांविरुद्धच्या विचारांनी भारून जावा. म्हणजे वर्षभर वाचक थकेल.
४. प्रतिसाद लिहिण्यासाठी गेंड्याचे कातडे पांघरावे म्हणजे अॅटीट्युड बदलून तुम्ही व्यवस्थित लिहायला जाणार नाही.

वाचने
14748
प्रतिक्रिया
71
मिसळपाव
प्रतिक्रिया
@प्रस्तुत गरीब लेखक सहमत नाही
In reply to शतकी प्रतिसादांसंबंधीच्या नालायकीची निलाजरी कबुली by चिंतातुर जंतू