Skip to main content

सहवास

लेखक निनाव यांनी रविवार, 27/03/2011 03:23 या दिवशी प्रकाशित केले.
क्षितिजा वर मावळतांना तु मज वर प्रेम करशील का? श्वासांमधल्या अंतरामधुनी शोध माझा घेशील का? समोर दिसून लांब किती तु जवळ मज येशील का? अंतर मिटता मिटता मज तु उमजशील का? प्रत्येक प्रहर अशी अनोळखी तु ही मज विसरशील का? न संपणार्या वाटा कधी ह्या पलीकडे मज नेशील का? तुझ्या स्पर्शानं विणलेला शालू नेसतात लाटा उठणार्या मनी तारका लाजवतात मज बघुनी कुशीत मज तु लपवशील का ? तीच वाट अन तेच प्रवास न तु इथे, न तुझे सहवास शोधत तुला फिरते नजर पुन्हा मज तु दिसशील ना? क्षितिजा वर मावळतांना तु मज वर प्रेम करशील का? श्वासांमधल्या अंतरामधुनी शोध माझा घेशील का?
लेखनविषय:

वाचने 1441
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

समोर दिसून लांब किती तु जवळ मज येशील का? अंतर मिटता मिटता मज तु उमजशील का? हे छानच लिहिले आहे .आवडले ..!!