सरकार राज .. वैताग सिनेमा !
लेखनप्रकार
नमस्कार !
काल 'सरकार राज' हा चित्रपट पाहिला. का पाहिला याचे उत्तर .. नवा चित्रपट आहे म्हणून पाहिला. अहो, तो चित्रपट पाहून इतका वैताग आला आहे, की जरा मित्रमंडळींसमोर बडबड करुन मन हालके करावे या हेतूने इथे लिहित आहे. ही चित्रपटाची समिक्षा, परिक्षण वगैरे नसून.. निव्वळ बडबड आहे.
सत्या, कंपनी, सरकार अश्या चित्रपटांत लहान तुटक वाक्यांचे संवाद, सर्वांचे मख्ख चेहरे, काळसर पिवळसर रंगातले चित्रीकरण (माझ्याकडची प्रिंट खराब असल्याने मला रंग असे दिसले असतील बहुधा !), नजरेतून जास्तीतजास्त बोलणे..कोणी नुसते डोळ्यात डोळे घालून पाहिले की 'कोणाला तरी मारावे' असा संदेश- आदेश त्यातून देणे..इत्यादी सर्व गोष्टींचा अतिवापर या चित्रपटात केला आहे असे मला वाटले. अमिताभचा आवाज एकेकाळे लैभारी होता..कबूल आहे..पण या चित्रपटात तो काय बोलतो ते ऐकायला मला प्रत्येकवेळी एक्-एक वाक्य दोनवेळा एकायला लागले.. अमिताभच्या संवादांच्या वेळी खाली सबटायटल्स टाकावित असे वाटू लागले.
कॅमेरा एका दोरीला टांगून तो सोडून दिला.. आणि त्याच्या आंदोलनांमध्ये जे दृष्य टिपले गेले आणि बरे वाटले ते सर्व जोडले आणि एक एक प्रसंग तयार झाला असे अनेकदा मला वाटले. कॅमेरा, त्याचे झूम आणि इतर रचना इतक्या बदलत वापरल्यासारख्या दिसत होत्या की डोळ्यांची वाट लागेल असेच वाटत होते. खुर्चीखालून, टिपॉयच्या काचेखालून.. कुठून कुठून शूटिंग... आणि त्यात अनेक दृष्यांत प्रकाशाचा मोठा तीव्र स्रोत अभिनेत्याच्या चेहर्याच्या मागे ठेवून मधून मधून आपले डोळे दिपवणे. इतका खर्च करुन सिनेमा बनवला.. चार दोन प्रखर दिवे त्या सरकारच्या घरात बसवले असते तर किती बरे झाले असते.
'सरकार' चित्रपटात एक मुख्यमंत्री मोठा कट करुन सरकारच्या गोटातील अनेक माणसे फोडतो. 'सरकार'ला गोळ्या घालतो, त्याला तुरुंगात बसवतो, त्याच्यावर तेथे हल्ला करवतो, त्याच्या मुलाला, आणि आतल्या गोटातल्या लोकांना ठार मारण्यापर्यंत वेळ येते..पण मुलगा (अभिषेक)वाचतो.., एका मुला फितवतो आणि घरात हल्ल्याचा डाव होतो..त्यात तो मुलगा मात्र मारला जातो... बापरे.. येवढा मोठा पावरबाज 'सरकार' आणि पहिल्या चित्रपटात इतकी धुळधाण. आता या नव्या 'सरकार राज' या चित्रपटात तर एक गावातला समाजसुधारक नेता मोठा कट करतो..त्यात सरकारची सून (गर्भवती असताना) घरच्या गाडीत बाँबफुटून मरते.. वीस वर्षे जवळ असलेला इमानी सेवक फुटतो, मुलगा मरतो... बापरे.. या सिनेमात तर पूर्णच धुळधाण... असे असताना मला तर तो अमिताभ दयनीय दिसू लागला.. तो पावरबाज आहे अशी पाटी लावावी..तरच आम्हाला तसे वाटेल. आणि सगळ्यात भारी म्हणजे अभिषेकची गादी आता ऐश्वर्या चालवणार सरकारिण बनून.. धन्य आहे !!!
तुम्ही हा सिनेमा पाहिलात का.. कसा वाटला ???
-- (वैतागलेला) लिखाळ.
वाचने
10175
वाचनखूण
प्रतिक्रिया
30
अगदीच बेकार नाही वाटला.
येडा समझके रखा है क्या ;-)
हम्म..
सरकार-राज
In reply to सरकार-राज by कोलबेर
खि खि
In reply to सरकार-राज by कोलबेर
हा हा हा
पसंद अपनी अपनी...
In reply to पसंद अपनी अपनी... by संदीप चित्रे
सहमती
In reply to सहमती by मुक्तसुनीत
मलासुद्धा
In reply to मलासुद्धा by भडकमकर मास्तर
सहमत. पण
In reply to सहमत. पण by II राजे II (verified= न पडताळणी केलेला)
पण सत्या
In reply to मलासुद्धा by भडकमकर मास्तर
हाहा
छान
राज ?
हा सिनेमा
मला ठीक वाटला
सरकार
सिनेमा तसा छान!!
धन्य
स्पॉइलर अलर्ट ?
बघावा सुद्धा वाटले नाही
In reply to बघावा सुद्धा वाटले नाही by अन्या दातार
असहमत...
"एखादी
सरकार राज चे समर्थन करणारयानी तो पाहिला आहे का नक्की?
In reply to सरकार राज चे समर्थन करणारयानी तो पाहिला आहे का नक्की? by वेताळ
त्यावेळी खरे कळते
आभार आणि क्षमा
बरं झाल!
In reply to बरं झाल! by विसोबा खेचर
तात्या टुकार बच्चन सोड रे!
In reply to तात्या टुकार बच्चन सोड रे! by llपुण्याचे पेशवेll
आणि सयाजी शिंदे विसरलात...
In reply to आणि सयाजी शिंदे विसरलात... by विसुनाना
मराठी