Skip to main content

स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo.

लेखक गंगाधर मुटे यांनी रविवार, 27/03/2011 01:45 या दिवशी प्रकाशित केले.
ब्लॉग माझा-३ चे आज स्टार माझा TV वर प्रक्षेपण. स्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या (कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम) बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे ऑन एअर प्रक्षेपण करण्याची सज्जता झाली असून आज रविवारी (२७ मार्च) सकाळी ९ ते १० या वेळेत स्टार माझावर हा कार्यक्रम आपल्याला पाहता येईल. चॅनेल : स्टार माझा TV मराठी दिनांक : २७-०३-२०११ वेळ : सकाळी ९ वाजता …………………………………………………….. ========******================*+++++============= दि. ३०.०३.२०११ स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo ब्लॉग माझा-३ स्पर्धेच्या कौतुक सोहळ्याचा समरंभाचे आणि बक्षिस वितरण कार्यक्रमाचे स्टार माझा TV वर दिनांक २७-०३-२०११ रोजी सकाळी ९ ते १० आणि दुपारी २ ते ३ वाजता प्रक्षेपण करण्यात आले. या कार्यक्रमाचा रेकॉर्डेड वृतांत सादर करताना खरोखरच खूप आनंद होत आहे. सदर कार्यक्रमाचे अपलोड करण्याच्या सोयीने ५ भागात विभाजन करण्यात आले आहे. TV वरील कार्यक्रम रेकॉर्ड करून त्याच्या व्हिडियो क्लिप्स बनवून अपलोड करणे ही माझ्यासाठी नविन बाब होती. तरीही मी माझ्यापरीने शक्य तेवढा प्रयत्न केला आहे. व्हिडीओ आणि ऑडियो यामध्ये दर २५-३० सेकंदात टाईम डिफरन्स येत होता. एडिट करून आणि भरपूर मेहनत घेऊनही ध्वनी आणि चित्र यात शतप्रतिशत अ‍ॅक्यूरसी राखणे शक्य झाले नाही, त्याबद्दल दर्शक या बाबीकडे दुर्लक्ष करून मला माफ़ करतील अशी अपेक्षा बाळगतो. १) आज Blog Majha 3 कार्यक्रमाच्या Vdo चे सर्वच पाचही भाग अपलोड केले आहेत. ते खालील लिंकवर पाहता येईल. http://gangadharmute.wordpress.com/vdo/starmazavdo/ २) मोबाईल फ़ॉर्म्याट मध्ये सदर भाग उपलब्ध आहे. कोणास हवे असल्यास ranmewa@gmail.com या मेलवर मागणी नोंदवावी. विनामुल्य पाठविण्यात येईल. धन्यवाद. -----------------------------------------------------------------
लेखनविषय:

वाचने 3967
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

सर्व ब्लॉग विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.....! स्टार माझा आयोजित स्पर्धेतील सर्व ब्लॉगर विजेत्यांचा कौतुक सोहळा आम्हीही पाहिला. कार्यक्रम आवडला. मुटे सरकार, अगदी थोड्या वेळात सर्वांनी आपापल्या ब्लॉगविषयी मतं मांडलीत परंतु आपण मात्र इतरांपेक्षा कुछ खास अंदाजमे आपली मतं मांडलीत. आपलं पेश्शल अभिनंदन......! :) च्यायला, अजून एक सांगायचं राहिलं. प्रमोद देव मात्र भाव मारुन गेले राव. सौ.अंबासकर यांच्या वतीने बक्षीस घ्यायला गेल्यावर ते स्टार वाल्यांनी यांना ओळख दाखवून म्हटलं की हे आपल्या मागील ब्लॉग माझाचे विजेते आहेत. देवसाहेबांची बोलतांना जाणवलेली जेष्ठताही दिसून येत होती त्याचबरोबर दिसायलाही इतरांपेक्षा ते तरुण आणि देखणे वाटत होते. :) [असो, देवांचा कौतुक सोहळा थांबवतो] बाकी, परीक्षक असलेल्या त्या बाई कोण होत्या हो ? -दिलीप बिरुटे

In reply to by गंगाधर मुटे

प्राशासकिय अधिकारी लीना मेहेंदळे आहेत. शिवाय त्या ब्लॉगिंगही करतात माहितीबद्दल धन्यु. ब्लॉगचा दुवा द्या बरं....! -दिलीप बिरुटे

सर्व ब्लॉग विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन! मुटेसाहेब अभिनंदन!! :)

अभिनंदनाबद्दल सर्व प्रतिसादकांचे सर्व विजेत्यांतर्फे आभार. :) १) आज Blog Majha 3 कार्यक्रमाचा Vdo चा १ ला भाग अपलोड केला आहे. तो खालील लिंकवर पाहता येईल. http://gangadharmute.wordpress.com/vdo/starmazavdo/ उर्वरीत भाग लवकरच अपलोड करतो. २) मोबाईल फ़ॉर्म्याट मध्ये सदर भाग उपलब्ध आहे. कोणास हवे असल्यास ranmewa@gmail.com या मेलवर मागणी नोंदवावी. विनामुल्य पाठविण्यात येईल. धन्यवाद.