Skip to main content

भारत विरूध्द पाकीस्तान उपांत्य सामन्यात या पैकी कोणाला संधी मिळेल.

लेखक चिंतामणी यांनी शनिवार, 26/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 1483
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

मुनाफ पटेल कधीच सातत्याने खेळलेला नाहीं. खूपदा अनफिट असतो. एकाद्या डावात कांहीं बळी मिळतात व तो खेळत रहातो. (कदाचित झोनल किंवा तत्सम 'अक्रिकेटीय' कारणामुळेही घेतला जात असेल!) क्षेत्ररक्षणातही आनंदी-आनंदच आहे. नेहरा एक चांगला गोलंदाज आहे. पण परवाच्या पिटाईमुळे त्याचा आत्मविश्वास खलास झाला असणार. याउलट श्रीसंत (कीं श्रीशांत?) हा पाकिस्तानला अनोखा गोलंदाज आहे. म्हणून त्याला संधी द्यायला हरकत नाहीं. पण ते योग्य वाटत नसेल तर मुनाफपेक्षा नेहरा बरा! मी मत श्रीसंतला दिले आहे.

In reply to by सुधीर काळे

खरोखरच आहे म्हणा .. जो गोलंदाज सातत्याने आखूड टप्प्याचे (स्वतःच्या खांद्यात दम नसतांना) चेंडू टाकून फलंदाजांना व स्वतःच्या कप्तानाला (शिवाय झहीरला) आश्चर्यचकचकीत करून टाकून धावावर धावा देतो .. तो अनोखाच म्हटला पाहिजे - उदा. बांगलादेशविरुद्ध सामना. त्यानंतर धोनीने त्याला १४व्या खेळाडूवर कधी येऊ दिले नाही. अगदीच घालवून देऊ शकत नाही म्हणून तो १४ मधे तरी आहे. माझ्या मते ९०% धोनी मुनाफ पटेलला संघात घेईल. १०% .. पटेल जखमी असल्यास नेहराला घेईल. तसेही नेहरा जखमी असण्याची टक्केवारी ९०% आहे. - शेखर काळे.

In reply to by सुधीर काळे

मलाही वाटतं की, (आपल्याला वाटून काही उपयोग नाही ) मुनाफच्या ऐवजी युसुफ पठाणला घ्यावं. पण धोणीच्या मनात त्याच्या बोलण्यावरुन रैनाला बसवून यूसुफ पठाणला कदाचित घेईल. बाकी, मुनाफचं ओझं आपल्याला वाहावं लागेल असेच चित्र दिसतंय. :( -दिलीप बिरुटे

यातल्या कोणालाही घेतलं म्हणून काही फरक पडत नाही हो! शेवट तेंडुलकरला बॉलिंग टाकावी लागते!

In reply to by पैसा

कस्सं बोललात. आणि त्याने चेंडू हातभर वळवूनही शेवटी 'सरळ'मार्गी हरभजनलाच प्राधान्य दिले जाते नि बापडा दोन टप्प्यात प्रत्येकी एक अशा दोन ओवर मिळाल्या यातच समाधान मानतो. दुर्दैव.... धोनीचे दुसरे काय.

आशिष नेहरा हा पर्याय क्रिकेट मधुनच काढुन टाका

In reply to by प्रशांत

>>>आशिष नेहरा हा पर्याय क्रिकेट मधुनच काढुन टाका सहमत आहे. अवांतर : मिपा उघडण्याची बाबतीत काही तरी तांत्रिक गडबड आहे काय ? -दिलीप बिरुटे

अय्या गडे!!! आताच हा कौल पहिला...थोड्यावेळापूर्वी पहिला असता तर बरं झालं असतं...लोकांची मतं कळली असती...कारण कालच भारतीय क्रिकेट बोर्डाचा अन धोनीचा फोन आला होता कोणाला घेऊ विचारायला....मी म्हंटल उगाच मला फोन नको करू बायकोचा गैरसमज होईल, मी बोर्डशीच बोलते आणि त्यांना तुला फोन करायला सांगते.

In reply to by शिल्पा ब

वरील निळे व ब ह्यांचे प्रतिसाद हे चिंतामणी ह्यांनी कंपूबाजी ह्या विषयावर मत व्यक्त केले म्हणून आले आहेत असे माझे मत आहे . ह्यापुढे मिपाकरांनी कंपूबाजी विरुद्ध काही लिहिले की त्यांच्या लेखात त्यांना इंगा दाखवू .असा इशारा ह्या प्रतिसादातून स्पष्ट होतो . .

In reply to by शिल्पा ब

मी म्हंटल उगाच मला फोन नको करू बायकोचा गैरसमज होईल,
ऑं हे काय हो शील्पा तै तूम्हाला बायको कूठाय ?