मुनाफ पटेल कधीच सातत्याने खेळलेला नाहीं. खूपदा अनफिट असतो. एकाद्या डावात कांहीं बळी मिळतात व तो खेळत रहातो. (कदाचित झोनल किंवा तत्सम 'अक्रिकेटीय' कारणामुळेही घेतला जात असेल!) क्षेत्ररक्षणातही आनंदी-आनंदच आहे.
नेहरा एक चांगला गोलंदाज आहे. पण परवाच्या पिटाईमुळे त्याचा आत्मविश्वास खलास झाला असणार. याउलट श्रीसंत (कीं श्रीशांत?) हा पाकिस्तानला अनोखा गोलंदाज आहे. म्हणून त्याला संधी द्यायला हरकत नाहीं. पण ते योग्य वाटत नसेल तर मुनाफपेक्षा नेहरा बरा!
मी मत श्रीसंतला दिले आहे.
खरोखरच आहे म्हणा .. जो गोलंदाज सातत्याने आखूड टप्प्याचे (स्वतःच्या खांद्यात दम नसतांना) चेंडू टाकून फलंदाजांना व स्वतःच्या कप्तानाला (शिवाय झहीरला) आश्चर्यचकचकीत करून टाकून धावावर धावा देतो .. तो अनोखाच म्हटला पाहिजे - उदा. बांगलादेशविरुद्ध सामना. त्यानंतर धोनीने त्याला १४व्या खेळाडूवर कधी येऊ दिले नाही. अगदीच घालवून देऊ शकत नाही म्हणून तो १४ मधे तरी आहे.
माझ्या मते ९०% धोनी मुनाफ पटेलला संघात घेईल. १०% .. पटेल जखमी असल्यास नेहराला घेईल.
तसेही नेहरा जखमी असण्याची टक्केवारी ९०% आहे.
- शेखर काळे.
मलाही वाटतं की, (आपल्याला वाटून काही उपयोग नाही ) मुनाफच्या ऐवजी युसुफ पठाणला घ्यावं. पण धोणीच्या मनात त्याच्या बोलण्यावरुन रैनाला बसवून यूसुफ पठाणला कदाचित घेईल. बाकी, मुनाफचं ओझं आपल्याला वाहावं लागेल असेच चित्र दिसतंय. :(
-दिलीप बिरुटे
कस्सं बोललात. आणि त्याने चेंडू हातभर वळवूनही शेवटी 'सरळ'मार्गी हरभजनलाच प्राधान्य दिले जाते नि बापडा दोन टप्प्यात प्रत्येकी एक अशा दोन ओवर मिळाल्या यातच समाधान मानतो. दुर्दैव.... धोनीचे दुसरे काय.
अय्या गडे!!! आताच हा कौल पहिला...थोड्यावेळापूर्वी पहिला असता तर बरं झालं असतं...लोकांची मतं कळली असती...कारण कालच भारतीय क्रिकेट बोर्डाचा अन धोनीचा फोन आला होता कोणाला घेऊ विचारायला....मी म्हंटल उगाच मला फोन नको करू बायकोचा गैरसमज होईल, मी बोर्डशीच बोलते आणि त्यांना तुला फोन करायला सांगते.
वरील निळे व ब ह्यांचे प्रतिसाद हे चिंतामणी ह्यांनी कंपूबाजी ह्या विषयावर मत व्यक्त केले म्हणून आले आहेत असे माझे मत आहे .
ह्यापुढे मिपाकरांनी कंपूबाजी विरुद्ध काही लिहिले की त्यांच्या लेखात त्यांना इंगा दाखवू .असा इशारा ह्या प्रतिसादातून स्पष्ट होतो .
.
प्रतिक्रिया
झोनल किंवा तत्सम 'अक्रिकेटीय' कारणामुळेही घेतला जात असेल!
मुनाफ पटेल
In reply to झोनल किंवा तत्सम 'अक्रिकेटीय' कारणामुळेही घेतला जात असेल! by सुधीर काळे
अनोखा गोलंदाज ?
In reply to झोनल किंवा तत्सम 'अक्रिकेटीय' कारणामुळेही घेतला जात असेल! by सुधीर काळे
मलाही वाटतं की, (आपल्याला
In reply to झोनल किंवा तत्सम 'अक्रिकेटीय' कारणामुळेही घेतला जात असेल! by सुधीर काळे
अर्थातच आपला श्रीशांत
नक्की चिंतामणीच का ?
काही फरक पडत नाही हो!
+१००
In reply to काही फरक पडत नाही हो! by पैसा
आशिष नेहरा
हा हा हा
In reply to आशिष नेहरा by प्रशांत
अय्या गडे!!! आताच हा कौल
अय्या गडे!! या दोन शब्दांवरुन
In reply to अय्या गडे!!! आताच हा कौल by शिल्पा ब
काय सांगता?
In reply to अय्या गडे!! या दोन शब्दांवरुन by Nile
कंपुबाज कुणीकडचे!!सहमत
In reply to काय सांगता? by शिल्पा ब
कंपुबाज कुणीकडचे!! सहमत
In reply to काय सांगता? by शिल्पा ब
मी म्हंटल उगाच मला फोन नको
In reply to अय्या गडे!!! आताच हा कौल by शिल्पा ब
मला नसली तरी त्याला आहे
In reply to मी म्हंटल उगाच मला फोन नको by आत्मशून्य