Skip to main content

युवीच्या अर्धशतकापुढे रिकीचे शतक हरले....

लेखक प्रशांत यांनी गुरुवार, 24/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
युवीच्या अर्धशतकापुढे रिकीचे शतक हरले.... आणि गतस्पर्धेतल्या पराभवाचा पुरेपुरे 'बदला' घेवुन भारतीय संघ सेमिफायनल मधे पोहचला... दे घुमाके...

वाचने 4676
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

भारत जिंकला, बदला घेतला आनंद आहेच! रिकी कितीही हरामखोर, माजखोर वगैरे असो मला तो आवडत नाहीच पण त्याची आजची खेळी एक मास्टरक्लास अ‍ॅक्ट होता. नवशिक्या बॅट्समनसाठी प्रेशरखाली खेळताना संघाला कसं सावरायचं याचं एक आदर्श उदाहरण होतं. 'रायझिंग टू द ओकेजन' वगैरे म्हणतात त्यातलं.. :)

In reply to by मेघवेडा

रिकी कितीही हरामखोर, माजखोर वगैरे असो मला तो आवडत नाहीच पण त्याची आजची खेळी एक मास्टरक्लास अ‍ॅक्ट होता.
सहमत

In reply to by गणपा

पण ९१ वर आउट होता. दिल्या गेला नाही . डिट्टो समोर समोर होता स्टंप च्या .. त्यामुळे आमच्या भज्जी ला विकेट मिळाली नाही ;(

In reply to by टारझन

चालायच रे टार्‍या. आबा सांगुन र्‍हायलेत ना की बडे बडे मॅचों में ऐसी छोटी छोटी घटनाए होतीच हय. ;) हा प्रतिसाद आज जिंकलो म्हनुन, अन्यथा वेगळा दिसला असता.

In reply to by गणपा

चालायच रे टार्‍या.
आज रिव्ह्यू सिस्टीम, हॉकआय टेकनॉलॉजी इ. मुळे तो बॉल स्टंपवर जात होता हे आपल्याला कळतं पण ऑन फील्ड अंपायर्सना त्याक्षणी डिसिजन्स घ्यायची असतात. त्यात भज्जी अराऊंड द विकेट टाकत असल्याने थोडा बेनिफिट ऑफ डाऊट बॅट्समनला मिळणारच होता. एवढं तेवढं चालायचंच. :) हाही प्रतिसाद आज जिंकलो म्हणूनच, अन्यथा लिहिलाच नसता. ;)

कांगारूंचा माज उतरला. आता टारगेट पाकडे !! Tomorrow, SA will meet NZ at Mirpur, and.... Australia will meet West Indies at the AIRPORT !! ;)

नरेंद्र मोदी प्रेक्षकांत बसलेले असतांना आपण हरण्याचा चान्सच नाही. आपल्याला तर युवराजची खेळी आवडली बुवा. युवराज म्हणे पुणे वॉरियरचा (IPL) कर्णधार होणार आहे. मोहालीत तर राडा होणारच....

In reply to by वेदनयन

फूल्टू राडाच होणार.... काहीही झाले तरी.......

In reply to by वेदनयन

नरेंद्र मोदी यांना आपल्या फटकेबाजीवर याऽहू करता येणार नव्हते. त्यांचे अंगरक्षक शेजारी बसले होते. शेवटच्या चार बॉलांना ते अंगरक्षकच इन्व्हॉल्व्ह होवून म्याच बघत होते आणि मोदी स्वसंरक्षण करत होते.;) मला एवढेच दिसले कारण शेवटचे चार बॉलच म्याच पाहिली.;) अंबानी कुटुंबीय आनंद व्यक्त करताना दिसले. मोहालीमध्ये संरक्षण किती लागेल आणि काय होइल असे वाटते आहे. अर्थात ती म्याचही पाहणार नाहिये.

कॅप्टन्स इनिंग्ज होती! त्याने जिंकायचेच ह्या निर्धाराने स्वतःच्या शतकाने पाया रचून दिला. निश्चितच कौतुकास्पद खेळला. शेवटी आपल्याला जिंकायला चार धावा राहिलेल्या असताना त्याच्या चेहर्‍यावर क्लोजप घेतला तेव्हा बिचारा अगदी रडवेला झाला होता! आजच्या सामन्यात आपले क्षेत्ररक्षण कमालीचे चांगले झाले. फिरकी गोलंदाजांनी कामगिरी चांगली केली आणि शेवटी फलंदाजीने कळस चढवला. टीम एफर्ट्स!


द्येवा म्हसूबाराया, कोंबडं असूदे, बकरं असूदे, मेंढरं असूदे, काय म्हन्चीला त्ये कापतु, पर त्येवढं त्या पाकड्यांना हरवू दे रं, काय माती खायाची असल ती फायनल मदी खावा, त्ये चालंल वो ,पर ह्यो येक डाव जिंकाच राव, माजा जीव लैच्च टांगनीला लागून रहायलाय जनू ;)

आता पाकड्यांना धूळ चाराच उपांत्यपूर्व व त्याआधिचे सामने पाकिस्ताने सहजगत्या आणि मोठ्या फरकाने जिंकलेत. भारताची मात्र सामने जिंकता जिंकता दमछाक झालेली आहे. जाहिराती व मॉडेलींगमध्ये आपले खेळाडू इतके लटकलेले आहेत किं मैदानावर खेळतांना आपण मॉडेलिंगच करतोय असं त्यांना वाटतं त्याला आवर कसा घालणार? धर्मयुद्धचे स्पिरिट अंगात आणल्याशिवाय पाकला हरवणे मुश्कील. पण वर्ल्ड कप पाकिस्ताने जिंकला काय वा श्रीलंकेने तो भारतीय उपखंडात राहिला याचा आनंद साजरा करायला आता आपण शिकुया.

पण वर्ल्ड कप पाकिस्ताने जिंकला काय वा श्रीलंकेने तो भारतीय उपखंडात राहिला याचा आनंद साजरा करायला आता आपण शिकुया. हे म्हणजे अगदी 50 देश क्रिकेट खेळत असल्यासारखं बोललात्.

In reply to by श्रीरंग

आयसीसी ने क्रिकेटचा बिजनेस वाढवायचं ठरवलंय त्यामुळे नविन नविन देशात क्रिकेटचं प्रमोशन जोरात सुरू आहे. आताच पंधरा/सोळा देश झालेत लवकरच हाफ सेंच्युरी लागेल.