मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

साखरांबा

रेवती · · पाककृती
साहित्य: एक मोठी कडक कैरी, साखर, केशर, वेलचीपूड, दोन पातेली, त्यावर बसेल असे झाकण, मोठा चमचा, किसणी, चाळणी. कृती: पातेल्यात अर्धा तांब्या पाणी उकळण्यास ठेवावे. कैरीची साले काढून किसून घ्यावी अथवा साले न काढता मोठ्या फोडी करून किसणीवर पालथ्या ठेवून किसाव्यात.कीस वाटीने मोजून घ्यावा. कैरीच्या आंबटपणानुसार साखरेचे प्रमाण बदलते. कैरी आंबट नसल्यास एकास एक प्रमाण अथवा सव्वापट, दुप्पट किंवा जास्त साखर घ्यावी. पाण्याला आधण आल्यानंतर पातेल्यावर चाळणी ठेवून कैरीचा कीस पसरावा. झाकण ठेवून वाफ द्यावी. एका कैरीच्या किसासाठी ८ मिनिटे वाफ द्यावी लागली. खूप वाफवल्यास चोथा होइल. वाफवलेला कीस ताटात पसरून गार होवू द्यावा. आता दुसर्‍या पातेल्यात मोजलेली साखर व साखरेच्या निम्मे पाणी पाकासाठी ठेवावे. तीन तारी पाक झाल्यानंतर गार झालेला कीस त्यात घालावा. मध्यम आचेवर चमच्याने ढवळत रहावे. केशरपूड व वेलची पूड घालावी. पातळ झालेला पाक पुन्हा तीनतारीच्या जवळ गेला की आच बंद करावी. गार झाल्यानंतर साखरांबा अजून घट्ट होणार आहे हे लक्षात असू द्यावे. पूर्ण गार झाल्यानंतर साखरांबा बरणीत भरून ठेवावा. sakharamba 003 टीपा: १.कैरी किसण्यासाठी जाड किसणी वापरावी. माझ्याकडे तशी नसल्याने कीस बराच बारीक झाला. २. कैरी अतिशय आंबट असल्यास कीस पिळून घेऊन मग चाळणीवर पसरावा. ३. साखरांबा गार झाल्यानंतर भरून ठेवायची बरणी आधीच अगदी स्वच्छ धुवून, उन्हात वाळवून ठेवावी म्हणजे वर्षभर साखरांबा टिकेल. ४. साखरांबा करण्यासाठी जड बुडाचे पातेले घ्यावे म्हणजे तळाला जळून त्याचा वास साखरांब्याला लागणार नाही.

वाचने 26400 वाचनखूण प्रतिक्रिया 144

In reply to by निवेदिता-ताई

रेवती 24/03/2011 - 22:45
हे हे... बघुयात कोण किती वाद उकरून काढतय? त्यावर खरा रंग अवलंबून आहे.;) माझ्या धाग्याच्या पायगुणानं आपण म्याच जिंकलो.;)

In reply to by रेवती

निनाद मुक्काम … 24/03/2011 - 23:10
पाककृती प्रमाणे सामन्याचा शेवट गोड झाला . आता मोहालीच्या सामन्यात मोठा राडा होणार ( तेथील मैदानावर ) तेव्हा एक राडेबाज पाककृती हवी .

In reply to by गणपा

मेघवेडा 24/03/2011 - 23:34
असंच म्हणतो! वरील बहुतेक प्रतिसादकांप्रमाणेच मधल्या सुटीत साखरांचा/मुरांबा इ. सोबत खाल्लेले खाल्लेले पोळीचे रोल्स आठवले.. आज आधीच मॅचमुळे घरची खूप आठवण येत होती त्यात हे.. कुफेहेपा? ;)

कवितानागेश 25/03/2011 - 00:20
या पाककृतीमध्ये साखरेचे प्रमाण थोडे कमी करुन मीठ घातले आणि केशराऐवजी लाल तिखट घातले तर जे काही तयार होईल, त्याला छुंदा म्हटलेलें चालेल का? - नसलेले ज्ञान पाजळणारी माउ

लंबूटांग 25/03/2011 - 00:21
धाग्याने अशीच शंभरी गाठल्याने मी आपला साधा सोज्वळ प्रतिसाद देत आहे.. साखरांब्यामुळे बर्‍याच जुन्या आठवणी जाग्या झाल्या.. मी लहानपणी पक्का गोडघाशा होतो त्यामुळे साखरांबे (कैरीचा आणि करवंदाचा) म्हणजे जीव की प्राण... ते वर कोणीतरी लिहील्याप्रमाणे पोळीला तूप लावून साखरांबा खाणे सततच चालायचे.. सद्ध्या फारसे गोड खात नाही त्यामुळे ३.५. वर्षांपूर्वी पहिल्यांदा भारतातून आलो तेव्हा आणलेला साखरांबा अजूनही पडून आहे..

In reply to by लंबूटांग

या धाग्यावर कीतीही अवांतर प्रतिसाद दिला तर डिलीट होणार नाही अशी टीप मिळाल्याने प्रतिसाद देत आहे. ;-) बाकी साखरांबा मिळणार असेल तर अजुन दहा प्रतिसाद देउ, हाकानाका. ;-)

In reply to by विकास

लंबूटांग 25/03/2011 - 04:50
हाहा, त्याला साखरकरवंदा म्हणायला पाहिजे खरं तर. बाकी कसा करतात वगैरे काय माहिती नाही ब्वॉ. कसा खातात ते माहित आहे फक्त.
मी आपला साधा सोज्वळ प्रतिसाद देत आहे.. असे आधीच जाहीर केल्याने अनेकांनी (पक्षी- सं.मं., विविध परदेशस्थ वगैरे) हुश्यश्यश्यश्यश्यश्यश्य केले असणार. ;)

राजेश घासकडवी 25/03/2011 - 04:33
९८ प्रतिसाद झाल्यामुळे हा धागा वाचनमात्र करण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी मिसळपावची संपादकीय धोरणे पहावीत. -जेवती

रेवती 25/03/2011 - 04:51
धन्यवाद! धन्यवाद!! धन्यवाद!! सर्व प्रतिसादकांचे आभार! त्यांनी बारीऽऽक लक्ष ठेवून शेवटी माझ्या धाग्याला शतकापार नेले.:) धाग्याआधी दोन दिवस येताजाता दिसेल त्याला 'माझा धागा येतोय' असे अप्रत्यक्षपणे सांगून ठेवले होते. त्यातूनही जर कुठे गणित फसले तर भारतात आणि घरात काही छुपे प्रतिसादक तयार ठेवले होते. जाहिरातबाजी करताना आपण मागे पडता कामा नये. आपला सर्वसाधारण दिसणारा मालही खपवता आला पाहिजे. माझा प्लॅन चिंतामणरावांनी अनवधानाने का होइना पण ओळखला. आपल्या प्रोत्साहनामुळे लवकरच माझा लाळेर्‍यांचा बिझनेस भरभराटीला येइल अशी आशा वाटते.;)

In reply to by रेवती

स्पंदना 25/03/2011 - 06:57
रौप्य! सुवर्ण ! हिरक! माहिताहेत. १००री ला काय म्हणतात? आता तु तुला कोणी आज्जी म्हंटल म्हणुन तक्रार नाही ना करणार? ( असा १००रे गाठायचा अस्तो होय? मला वाटल आच्रत बच्रत लिहुन गाठता येतो)

In reply to by स्पंदना

नगरीनिरंजन 25/03/2011 - 08:56
२५ :- रजत महोत्सव ५० :- सुवर्ण महोत्सव ७५ :- हीरक महोत्सव १०० :- अमृत महोत्सव. अजूनही येणारे प्रतिसाद पाहून रेवतीआज्जी चांदीच्या वाटीतून अमृतांबा खाणार असं दिसतंय. सर्वात लोकप्रिय (आणि वेल मार्केटेड) पाककृतीचा पुरस्कार या धाग्याला देण्यात येत आहे. - अमृती

In reply to by नगरीनिरंजन

रमताराम 25/03/2011 - 14:15
ओ दादा, गणित चुकलं की हो. ६० ला 'हीरक' नि ७५ ला 'अमृत' महोत्सव असतो. १०० ला शतकच म्हणतात. मधे ८०-८१ च्या आसपास कुठेतरी 'सहस्रचंद्रदर्शन' असते.

In reply to by रमताराम

नगरीनिरंजन 25/03/2011 - 17:53
तुमचं बराबर हाय दादा, पण आपण रेवतीआज्जीच्या वयाबद्दल नाय ना बोलत? मग हे पाहा. A Diamond Jubilee is a celebration held to mark a 60th anniversary in the case of a person (e.g. wedding anniversary, length of time a monarch has reigned as King or Queen, etc.) or a 75th anniversary in the case of an event.[1]

नगरीनिरंजन 25/03/2011 - 07:03
व्वा! मस्त दिसतोय साखरांबा! (प्रतिसाद दिलेला आहे याची नोंद घ्यावी.(स्साला पब्लिक इथं दणादण शतकं ठोकतंय आणि आमचं घोडं मात्र हाफ सेंच्युरीच्या आधीच बसतं. सोचनाऽऽ पडेंगाऽऽऽ ) )

In reply to by रेवती

मदनबाण 25/03/2011 - 07:16
आपला कंपू नसला तरी कंपूतलेच असल्याप्रमाणे वावरता आले म्हणजे झाले! ख्या ख्या ख्या खी खी खी... यशस्वी धाग्याचे सुत्र सांगितलेस गं मुली... ;) बाकी +१ आणि तू सहमत आणि मी सहमतचे राजकारण पण करता आले पाहिजे बरं... कसे ? ;)

In reply to by बिपिन कार्यकर्ते

टारझन 25/03/2011 - 15:12
णिळ्या लायनीत विसर्ग द्यायचा राहिल्या गेला आहे का ? - शाहिन सिटीकर्ते

In reply to by टारझन

बिपिन कार्यकर्ते 25/03/2011 - 15:34
=)) _/\_ टारझन : विरजण

रेवती 25/03/2011 - 16:39
अरे बाबांनो/ बायांनो, बास, बास!! कशीबशी शंभरी गाठायची होती........माझ्याकडून जाहिरात जरा जास्तच झाली वाट्टं!;) इंट्या, टार्‍या, पैसाताई बास! हवीतर खरड करून नवी पाकृ सुचवा.:) दिपाली, अगं तुझा मॅणेजर मला शिव्या घालेल ना! आता यावर उपप्रतिसाद नकोयत.;)

In reply to by नगरीनिरंजन

लंबूटांग 25/03/2011 - 17:58
पाकृ मुरवायसाठीच्या काही टिप्स? आमची पाकृ थंड व्ह्यायच्या आधीच संमं ने खाल्लेली दिसते :(.

सूर्यपुत्र 25/03/2011 - 18:10
आणि धाग्याने शतक झळकवले की. इतरजणांच्या धाग्यांना प्रतिसाद देऊन-देऊन जमा केलेले पुण्य कामी आले की.. ;) -सूर्यपुत्र.

स्पंदना 27/03/2011 - 20:22
एव्हढा उहापोह झाला पण कुणाला हा साखरांबा ब्रेड बरोबर कसा लागेल हा प्रश्न कसा काय नाही प्डला? ब्रेड बरोबर टॉर्टीला, नान, एट्सेट्रा एट्सेत्रा ची पण उद्बोधक चर्चा व्हावी,

दीप्स 05/05/2011 - 13:08
शमव तुझी भूक रेवती. हा घे अजून एक प्रतिसादअजून एक प्रतिसाद, गुळांबा/साखरांबा/मुरांबा/छुंदा हे सगळे अतिशय आवडीचे

स्वाती दिनेश 08/06/2011 - 11:18
रेवती, साखरांबा माझ्या नजरेतून कसा काय सुटला? माहित नाही, पण भारी आवडीचा ! फोडींच्या पेक्षा असा किसलेलाच जास्त आवडतो, माझा भाऊ किसाच्या साखरांब्याला दोर्‍याचा साखरांबा म्हणायचा (कैरीचा कीस दोर्‍यांसारखा दिसतो पाकात घातल्यावर त्याच्या मते,:) ) स्वाती हा प्रतिसाद म्हणजे शतकोत्तर अर्धशतकाकडे होणार्‍या वाटचालीतला खारीचा वाटा,;)