Skip to main content

या अंधश्रद्धेचे काय करू?

लेखक विकास यांनी शुक्रवार, 25/03/2011 00:41 या दिवशी प्रकाशित केले.
आज भारत-ऑस्ट्रेलीयाचा "एफ-५" कळ दाबत सतत ताजा होणारा धावफलक एकीकडे बघत असताना दुसरीकडे ज्यांना तो खेळ प्रत्यक्ष बघता येत होता त्यांचा विचार करत इनो घेणे चालू होते. भारतीय संघाचा खेळ बघताना सरासरी आता आटोक्यात आहे, तरी देखील काय होते या भितीने एकीकडे बोटे जुळवून बसलेलो (फिंगर्स क्रॉस्ड) तर दुसरीकडे मनातल्या मनात, "च्यायला यांना बरं बघायला मिळतं" असे म्हणत तीच बोटे मोडत होतो.... :( तर मग ठरवलचं! की यापुढे "एफ-५" नाही तर ३० मार्चला हातात रिमोटच असेल! असा, भारत-पाक मॅच मी प्रत्यक्ष बघायचा निर्धार करणार, तितक्यात एक किडा डोक्यात आला, जेंव्हा जेंव्हा मी (विशेष करून) भारत-पाक मॅच एकाजागी बसून (म्हणजे मधे मधे उठलो असेनही), बघितली, तेंव्हा तेंव्हा भारत हरला आहे. आता सारे भारतीय माझे बांधव असल्याने, आपले भारतीय खेळाडू पण बांधवच आहेत. त्यामुळे त्यांचे जिंकणे हे मीच जिंकण्यासारखे आहे... मग मी आता काय करू? मला माहीत आहे, उपलब्ध विदाचा विचार केल्यास, स्टॅटीस्टीकली जरी माझ्या अनुभवात तथ्य असले तरी वैज्ञानिक दृष्टीकोनातून याला काहीच अर्थ नाही, ही केवळ अंधश्रद्धा आहे! आणि मी तर स्वतःला अंधश्रद्धाळू समजतही नाही आणि तसे वागतही नाही. त्यामुळे वाटते, कशाला फुकटचे भ्यायचे? पण मग जर परत माझ्या स्टॅटीस्टिक्स मधे नको ती भर पडली तर? भारत हरला तर? छ्या! काही समजत नाहीसे झाले आहे... बघितले आणि आपण जिंकलो तर एकदाचे अंधश्रद्धा निर्मूलन होईल. पण जर जिंकलो नाही तर? या अंधश्रद्धेचे काय करू? डोक्यात न ठेवता सरळ भारत-पाक सामना बघू का नुसतीच "कळ एफ-५"? तुम्हाला देखील भारतीय क्रिकेट संघच जिंकावा असे वाटत असेल अशी आशा करतो. पण मग, इथले क्रिकेटप्रेमी आणि अंधश्रद्धा निर्मूलन करू इच्छीणार्‍या सन्माननीय सदस्य काही तोडगा सांगतील का? ;)

वाचने 31062
प्रतिक्रिया 158

प्रतिक्रिया

मी वरील एकही प्रतिसाद न वाचता सांगते, गप एफ ५ वरच बघा!! भरीत भर म्हणुन एफ ५ ला लिंबु मिरच्या बांधा पण भारत v/s पाकचा वांदा झाला ना तर बघा! सुप्पारी काढीन मी तुमच्या नावाची. सो ऽ बोट मोडुन हातात आली तरी चालतील पण बोट मोडतच बघा! मी स्वतः भारत v/s पाक कधीही बघु शकत नाही, प्रचंड धडधडत मला, एक एक बॉल म्हण्जे बाँब वाटतो मला. एव्हढ हायपर व्हायला होत की सहन नाही होत्.पहिल्या दहा ओव्हर मध्ये भारताच्या ३०० व्हाव्यात अस माझ प्रामाणिक मत असत. उगिच बोलायला लावलत विकास दा . माझा नवरा जाम वैतागतो या मॅचच्या वेळी माझ्यावर. 'अग जरा थंड घे! थंड घे!'म्हणुन म्हणुन वैतागतो.

In reply to by स्पंदना

भारत v/s पाकचा वांदा झाला ना तर बघा! सुप्पारी काढीन मी तुमच्या नावाची. सचीन-युवराजला सांगून ठेवले आहे की त्यांनी गडबड केली तर सुपारी काढेन म्हणून! सचीनने शब्द दिला आहे की तो सेंच्युरी काढणार नाही म्हणून.

In reply to by विकास

कॉलिंग डॉन्राव (व्यावसायिक कॉल बर्का, नायतर याल 'हॅ कसला भिक्कारडा खेळ' असे म्हणत), कॉ़ळिंग टार्‍या, सुपारी घ्यायला या. ये रे मेव्या, ये रे प्रभो, विकासरावांची सुपारी देतोय देवावर शतक करू नये म्हणून दबाव टाकल्याबद्दल, जरा मदत करा. ओ विकासराव, तुम्हीही गोर्‍या लोकांच्या प्रॉपगंडाचे बळी वाटतं. अभ्यास करा अभ्यास. नि गोर्‍या लोकांचे शब्द प्रमाण मानणे पुरे आता. त्या एका सुधारकाला फटका देताना आम्ही हिशोब दिला होता तो तुम्हालाही देतो, ४८ शतके ३३ विजय, आवाज नाय पायजे.

In reply to by रमताराम

आत्ताच डॉन्रावांना फोन केला तर "डान्राव गुलुगुलु बोलने मे बिजि है, क्रियपा थोडी देर बाद ट्राय कीजीए" असा मेसेज येतो आहे. दोन तीन तास तरी फोन एंगेज्ड राहील असे कळते. :-(

In reply to by Nile

ती शक्यता गृहित धरूनच टार्‍याला पण बोलावणे धाडले होते. तोही गुलूगुलू बोलत बसला असण्याची शक्यता आहेच. पण आम्ही संख्याशास्त्री असल्याने 'विमानात एकाच वेळी दोन बॉम्ब असण्याची शक्यता शून्य असते' यावर आमचा भरवसा आहे.

आपल्या अंधश्रद्धा काय घेउन बसलात, काल युवराज-रैनाची भागीदारी १५ च्या वर गेली, त्यानंतर आपल्या संघापैकी कोणिही बसल्या ठिकाणावरुन हलला नाही. गावसकर सांगत होते, ही श्रद्धा / अंधश्रद्धा / परंपरा आपल्याकडे गेली २० वर्षे चालु आहे. अझरुद्दीनच्या काळात चालु झाली. अर्थात त्यामागे मानसिक कारणं ही असतील. बाकी, जेंव्हा जेंव्हा मी मॅचकडं दुर्लक्ष करतो तेंव्हा तेंव्हा अगदी प्रत्येक वेळी मला हायलाईट बघावे लागतात, आणि ही अंधश्रद्धा नाही अनुभव आहे.

In reply to by ५० फक्त

गावसकर सांगत होते, ही श्रद्धा / अंधश्रद्धा / परंपरा आपल्याकडे गेली २० वर्षे चालु आहे. अझरुद्दीनच्या काळात चालु झाली. ही माहीती खरेच रोचक आहे. बाकी आता सुरवात नाही हो, वर्ल्डकपचा शेवट जवळ आला आहे. :-)

In reply to by ५० फक्त

>>>>>> जेंव्हा जेंव्हा मी मॅचकडं दुर्लक्ष करतो तेंव्हा तेंव्हा अगदी प्रत्येक वेळी मला हायलाईट बघावे लागतात मग ३१ ला थोडा वेळ काढुन ठेवा हायलाईट पाहण्यासाठी... :)

हा हा हा! फिक्सींग नसल्यास, त्या दिवशी जी टीम चांगली/कमी वाईट खेळेल ती जिंकणार. बाकी असे वाटते की भारताने हा वर्ल्ड कप जिंकावा, सचिनला चांगला सेंड ऑफ द्यावा. मग भले पुढची दोन वर्ष जी खेळाल ती मॅच हरा लेको, पर्वा नाय. :-) (अंधश्रद्धाविरोधक) सहज

In reply to by सहज

पण सचिनला चांगला सेंड ऑफ कशापाय ? आपला मास्टर ब्लास्टर अजून एक वर्ल्ड कप खेळणार आहे.... सच्चू नसेल तर नंतर ऊरलंच काय आहे क्रीकेटमंदी.

भारताचा संघ जिंकावा वाटत असेल अशा सगळ्यांनी पाकिस्तानी संघाच्या विजयावर असतील नसतील तेवढे पैसे लावा. मग अंधश्रद्धा पाळा किंवा पाळू नका, भारत जिंकणार.

मी जनरली ज्या टिमवर लिहतो ती टिम पटकन मॅच हारुन बसते अशी आकडेवारी आहे, अर्थात त्यालाही उगाच आप्ले शास्त्रापुरते अपवाद आहेत, बाकी आम्ही लिहणार आणि मॅच हारणार हे फिक्स असते ( अर्थात ह्या फिक्सिंगचा मॅच फिक्सिंगशी संबंध नाही ). मग हाच मुहुर्त गाठुन आमच्या 'धोबीघाट' चा पुढचा भाग 'पाकीस्तान' वर लिहावा का असा विचार चालु आहे. - छोटा डॉन

ह्यात काय आहे. असं होतय कारण तुमच्या दृष्टीवर शनीची दृष्टी वक्री आहे! एखाद्या सज्जन, गरिब व सदाचरणी ब्राह्मणास सलग दोनेक महिने रोज अभिषेक करुन भोजन दिल्यास तुमच्या दृष्टीवरची शनीची दृष्टी नक्कीच जाइल. काय म्हणता? असा कोण मिळणारे? अहो मी आहे की. आता अशा अडीअडाचणीच्या वेळेस आम्ही नाय तर कोण कामाला येणार हो. कधीही हाक द्या, मस्त भरपॅत भोजन करुन तुम्हाला उपकृत करु! ;-) --मनोबा.

विश्वास ठेवा अगर ठेवू नका. पण माझा असा ठाम समज आहे की सचिन जर खूप खेळला, म्हणजे शतकी खेळी वगैरे केली तर आपण हारणार हे नक्की. त्याला कारण सचिन मुळीच नाही पण होतं काय की त्याची अशी जबरदस्त खेळी झाली, की त्याच्यानंतर येणारे का कुणास ठाऊक, पण भराभर आऊट होत जातात. त्यामुळे काल सचिन अर्धशतकानंतर आऊट झाल्यावर मी मनोमन खूष झालो की आता आपण जिंकण्याची शक्यता वाढली. आणि खरोखरच आपण जिंकलो आणि माझ्या समजूतीवर परत एकदा शिकामोर्तब झालं :) :) अवांतरः ऑस्ट्रेलियाची चांगलीच जिरली ह्याचा आनंद अवर्णनीय होता, ते स्वतःला फार म्हणजे फारच महान समजत होते. गर्वाचे घर असे कधी ना कधीतरी खाली झालेले पाहायचेच होते. :)

In reply to by sagarparadkar

(कंटाळा आला पुन्हा पुन्हा टंकून, इतके अडाणी आहेत आजूबाजूला) अरे बाळांनो देवाची ४८ शतके नि त्यातले ३३ विजय रे राजांनो. जरा कष्ट घेऊन क्रिक-इन्फोच्या स्थळावर आकडेवारी नि फॅक्ट्स पहा की, किती दिवस बाबा वाक्यम् प्रमाणम् चालणार, आं? (अर्थात अज्ञान कवटाळून बसणारे पुरावा शोधायला जात नाहीतच. हातचे गेले तर कवटाळायला नवे पूर्वग्रह निवडायला चार आणे का होईना कष्ट पडतात ना.) विश्वासावरच भरवसा ठेवायचा तर पृथ्वी त्रिकोणी आहे यावरही विश्वास ठेवता येतो (हा शोध आम्हाला नुकताच जालावर लागला) नि पुरावे नि खंडनमंडन वर्ज्य म्हटल्यावर ते स्वयंसिद्ध असतेच.

In reply to by रमताराम

रमताराम , तुम्ही म्हणता तसंच असेल. पण मी नेमके त्या ४८ पैकी ३३ सोडून उर्वरीत १५ सामनेच नेमके बघितले असतील. तर मग मी माझ्या अंधश्रद्धेचे पॉस्चुलेट्स असे मांडतो: १. मी सामना बघत आहे , आणि २. सचिनने जबरदस्त शतकी/द्विशतकी खेळी केली तर आपण सामना हारण्याची शक्यता वाढते. आता खूष ? :) :) :)

In reply to by sagarparadkar

असं आहे काय? आता सचिन जेव्हा शतकी खेळतो तेव्हा जिंकायची शक्यता जास्त असल्याने, तुमचे पॉस्ट्युलेट चुकु नये म्हणुन, तुम्ही अजिबातच बघत जाउ नका. म्हणजे कसं.. मी एकदाही पाहिलेला सामना भारताने जिंकलेला नाही म्हणायला तुम्ही मोकळे. कशी वाटली आयडिया? :|

In reply to by Nile

मी सामना पाहाणं, सचिनने दणकून शतक ठोकणं आणि आपण सामना हारणं हे आजतागायत जेव्हा कधी घडलं ते त्या त्या वेळेला 'यनावालां'च्या यदृच्छेने घडलं ... आता पुढे काय काय आणि कसं कसं घडणार असेल ते केवळ ती यदृच्छाच (किंवा ते 'यनावाला'च) जाणे ... मी पामर काय सांगणार .... :)

In reply to by sagarparadkar

आकडे खरे सांगत नाही हे नेहमी येणारे उत्तर न दिल्याबद्दल आभार. आता तुमचे उत्तर पटले. तुम्ही स्वत:लाच स्टेक्-होल्डर बनवल्याने कार्यकारणभाव बदलला आहे. आणि हो त्यामुळे वपुंची स्टॅटिस्टिक्स मराठे म्हणून एक कथा आहे ती आठवली. ;) मिळाल्यास वाचून पहा. कृपया ह.घ्या हे वे. सां. न. ल.

In reply to by रमताराम

कारण शेवटी आम्ही पेशवे नसलो तरी 'पेठेतले पुणेकर'च .... :) आणि हो, नेमका इलेक्ट्रॉनिक्सच्या पहिल्या वर्षाला असताना व. पुं. ची 'प्रिंटेड सर्किट बोर्ड' ही कथा वाचली आणि जाम भडकलो होतो. परत कधीही त्यांचे पुस्तक खरेदी करून वाचणार नाही असा पणच करून टाकला होता ... :)

In reply to by sagarparadkar

>>परत कधीही त्यांचे पुस्तक खरेदी करून वाचणार नाही असा पणच करून टाकला होता तो मोडू नका हो. पुस्तक मित्राकडून उधार घेऊन वाचा. किंवा वाचनालयातून आणा. म्हणजे पुस्तकही वाचून होईल आणि प्रतिज्ञा पण अबाधित.

In reply to by रमताराम

देवाची ४८ शतके नि त्यातले ३३ विजय रे राजांनो. जरा कष्ट घेऊन क्रिक-इन्फोच्या स्थळावर आकडेवारी नि फॅक्ट्स पहा की आम्ही बाबा वाक्य प्रमाण मानत नाही त्यामुळे कोणत्याची क्रिकिन्फो वगैरे बाबाच्या भेटीला जाणार नाही. आम्ही देवाची जी जी शतके अनुभवली त्या त्या वेळेस भारताने हार अनुभवली. त्यामुळे अशा स्वानुभवाने सिद्ध झालेल्या गोष्टीवर विश्वास न ठेवण्यासाठी आम्हाला कोणत्याही क्रिकिन्फोबाबाची गरज नाही. असो. (पळा नायतर हा रमता धुवेल उगाच)

In reply to by llपुण्याचे पेशवेll

(पळा नायतर हा रमता धुवेल उगाच) च्यायला मला काय येड लागलंय काय? तुमचे तुम्हीच नीट निस्तरा म्हणजे झालं. पाणी आहे ना पुरेसे? अवांतरः पुप्याला देवावर टीका करताना पाहून ड्वाले पानावले.

In reply to by रमताराम

रराशी बाडिस. अनंत वेळा सांगुनही आणि पुर्‍याव्याने शाबित करुनही जे सचिनच्या सेंचुरीच्या नावाने बोटे मोडतात आणि/तसेच त्या गांधीच्या राहुलला 'युवराज' (?) म्हणुन संबोणारे म्हणजे मिडियामागे धावणारी मेंढर. एक बोलला की लावलीच माळ बाकिच्यांनी.

In reply to by sagarparadkar

सचिन जर खूप खेळला, म्हणजे शतकी खेळी वगैरे केली तर ते रिकीच्या बाबतीत काल खरे ठरले. शेवटी तो रडवेला झाल्यावर नाही म्हटले तरी दया आलीच.

In reply to by रेवती

ते रिकीच्या बाबतीत काल खरे ठरले. शेवटी तो रडवेला झाल्यावर नाही म्हटले तरी दया आलीच. तुम्हाला काकू म्हटले ते योग्यच म्हणायचे, नाही म्हंजे 'मरणान्तानि वैराणी' वगैरे म्हणायला लागलात म्हणजे काकू असणारच तुम्ही. आमचे बघा स्सालं तो यम एक्स्टेंशन देऊन देऊन कंटाळला, पण अजून खुन्नस ठेवणे काही सोडत नाही आम्ही. आणि माजोरडया रिकीला दया...? अशी वेळ आमच्यावर कधीही येऊ नये, आमच्या 'आम्ही' असण्याबद्दलच शंका घेऊ खुद्द आम्हीच.

या भितीपोटी काल रात्री एका दुकानासमोर उभा राहून शेवटच्या ओव्हर बघीतल्या. वयाकडे बघून दुकानवाल्यानी आत बसायची विनंती केली पण मी नाही आत गेलो. मग सायबर कॅफेत जाऊन स्कोर बघत होतो पण घरी नाही गेलो. शेवटच्या पाच ओव्हर तर चुळबुळत बघीतल्या. (आधी दोन बीर झाल्या होत्या) मग आपण जिंकलो .. आणि हा ... हा .. व्हॉट अ रिलीफ....

खरे आहे खरे. आहे. माझाही अनुभव आहे की मी ज्यावेळेस मॅच पुर्ण बघतो तेव्हा भारत हारते. त्यामुळे मी किमान १०-२० ओव्हर्स तरी बघायचे टाळतो (तसे करुनही भारत कैकदा हारतो ही गोष्ट वेगळी).

In reply to by मृत्युन्जय

माझ्या बाबांच्या बाबतीत पण हेच होतं आता त्यांनी यावर उपाय शोधलाय. ते मॅच म्युट करुन पहातात ;)

विकास यांना सल्ला... पुढची मॅच जरूर पहा. टेन्शन आले की मिपा मंत्राचा (बा*** भा**) तीन वेळा उच्चार करावा. आणि एक चमचाभर 'तीर्थ' घ्यावे. तीर्थ घेण्यासाठी इतरांना बोलावले तर पुण्यसंचय होऊन सर्व संकटे दूर होतील असे भाकीत करतो.

In reply to by नितिन थत्ते

उगाच नाय आम्ही म्हणत ... गली गली मे शोर है ... थत्ते चाचा पॉल है .. अवांतर : कोणाला आकडा लावायचा असल्यास थत्ते चाचांचा सल्ला जरुर घेणे ;)

In reply to by टारझन

थत्तेचाचा कल्जी घेने. फुटबॉल वर्ल्डकप नंतर लवकरच पॉलसाहेब वैकुंठवासी झाले होते. (यात काही चेल्सीप्रेमींचा हात होता असे नंदन मेव्याला सांगत असताना प्रभोने ऐकले असे पराने पुप्याला केलेल्या खरडीत वाचल्याचे अदितीबैंनी डान्रावांना व्य. नि. तून लिहिले अशी वदंता आहे असे प्रीमोने प्रभोला सांगितल्याचे मेव्याने नंदनला कळवले असे आमच्या कानावर आले आहे.)

In reply to by रमताराम

माझ्या जिवावर एवढे लोक उठलेले पाहून डॉळे पाणावले. ररा यांच्याकडून डलु समजावून घेतला की डोळे मिटेन. :) -लुईस डकवर्थवी

In reply to by रमताराम

एय्य्य्य्य हम कु छ नहीं किया .. ; कंपु त माझास मावेश्क -रुन काय सिद्ध करायचे आहे ? - विनाकारण आम्हाला ह्यात गुंतवल्याची कारणे द्या आज्जोबा!!!

In reply to by प्रीत-मोहर

ज्याचं करायला जाव भलं... लोक कंपूत जायला धडपडतात, नाना क्लृप्त्या करतात नि इथे आम्ही तुम्हाला आयतेच 'लिफ्ट करा दिया' तरी तुमची तक्रार आहेच. (रमनान रामी)

तीर्थ घेण्यासाठी इतरांना बोलावले तर पुण्यसंचय होऊन सर्व संकटे दूर होतील असे भाकीत करतो नितीन थत्ते चाचा तुम्ही गुजरात मध्ये असल्याने कोणी तुमच्या तीर्थ घेण्यासाठी येईल याची सूतराम शक्यता नाही. चला मी देतो तुम्हाला आवातण. ओये आज्जावो साड्ढी दिल्ली वीच टश्शण मनाणे वासते इथ्थे

In reply to by विजुभाऊ

माझं तीर्थ नाय वो.... मला कोण तीर्थ (प्रसाद मी घेत नाही म्हणून) घ्यायला बोलावतोय का पहात होतो.

In reply to by नितिन थत्ते

अहो या ना कधीही! गुजराथ मधील प्रत्येक व्यक्तीस व्हिसा मिळत नाही असे थोडेच आहे आणि दिला नाही तरी गोरे (आडनाव नाही) बोलत नाहीत असे थोडेच आहे? ;) फक्त मॅच राहील दूर आणि आपण दोघे एकमेकांशी कॅच-कॅच खेळत बसू अशी शंका येते :-)

In reply to by आत्मशून्य

यनावाला मिपावर यदृच्छेने (randomness चे तत्व) प्रकट होतात, त्यामुळे ते हा धागा बघतील याची गारंटी नाही.

In reply to by रमताराम

'वन पिक्चर इज बेटर दॅन थाउजंड वर्डस्' हे पुरेपूर पटले. अगदी १०००% पटले!

@ इरसाल-इतला मजाना फोटो कस काय दिशी नई र्‍हायना तुले ?गैरच गांडु नशीब शे भो मंग तुन :) बाकी एकदा माझ्या दिराला मी मॅचच बघु दिली नव्हती या अंधश्रद्धेपायी ,काय करणार आखिर दिल है हिंदुस्थानी :)

>> इतला मजाना फोटो कस काय दिशी नई र्‍हायना तुले ?गैरच गांडु नशीब शे भो मंग तुन अहिराणी, मराठी, कोंकणी आणि हिंदी ह्या सर्वच बोलींमधे ह्या शिव्यांचं समरूप असण्यामुळे आमचे डोळे मात्र विस्फारले .... ह्या बाबतीत मात्र स्त्रीमुक्ती बरीच पुढे गेलेली दिसतेय .... :)

In reply to by प्रीत-मोहर

हेच म्हणतो. अभिनंदन. काका आणि काकु दोघांनी जोडीने हे कार्य सिद्धीस नेलेलं आहे त्याबद्दल दोघांचे अभिनंदन! =)) =))

In reply to by Nile

कसचं? क्रिकेट फीवर असाच राहू दे, आणि भारत जिंकू दे म्हणजे सत्यनारायण घालीन, थत्ते येतील तेव्हा तीर्थाबरोबर त्यांना प्रसादही मिळेल. ;).

In reply to by प्रीत-मोहर

'आम्ही' कोण या खुलासा करण्यात येईल काय? ('आम्ही कोण म्हणुनी काय पुसता दाताड वेंगाडुनी' हे आत्रेय उत्तर आगाऊच फाट्यावर मारण्यात आलेले आहे)

सध्याच्या मॅच बघुन त्या आलरेडी सेट वाटतात. तेव्हा अंधश्रद्धांना खत-पानी घालु नका.

मी पाहीलेल्या याआधीच्या दोन्ही म्याचेस भारताने जिंकल्या आहेत, पाकड्यांच्या नाकावर टिच्चून!!! आयच्यान, यावेळेला पण पाहणार, सुट्टी काढून पाहणार, नाय तर हापिसात क्रिकटाईम चालू करुन पाहणार नायतर डायरेक डोक्यात च्यानल लावून घेईन, पण जाईन तिथं म्याच पाहीन!!!! १९९६ आणि २००३ च्या दोन वेळच्या वर्ल्डकपवारीच्या भारत-पाकडे म्याचचं पुण्य लागलंय नावामागे, आता उगाच नस्तं पाप नको व्हायला हातून! वाचव रे देवा महाराजा!!!! -- असुर

प्रतिसाद वाचून हहपुवा झाली. :) बाकी, सुशिक्षित लोक अधिक अं. श्रद्धाळू असतात त्याचा विदा उपलब्ध करुन दिल्याबद्दल विकासराव यांचे आभार. अशा क्रिकेटच्या निमित्ताने अजूनही खूप अंधश्रद्धा बाळगल्या जातात हे वाचून आज सुशिक्षित आणि विज्ञानवादी म्हणून माझी मान खूप खाली गेली. ;) आता कालच्या म्याचचा किस्सा. मोठ्या हॉलमधे मारे सर्व म्याचची मजा मोठ्या टीव्हीवर घेत होते. मलाही सर्वांबरोबर भारताची फलंदाजी बघायची होती. पण जरा नेटावर भटकंती करत बसलो. सोबत टीव्हीट्युनरच्या माध्यमातून सामनाही पाहात होतो. सर्वांबरोबर सामना पाहावा म्हणून मी हॉलमधे जायला आणि सेहवागने झेल द्यायला एकच वेळ झाली. सर्व मला म्हणायला लागले तुम्ही तिकडेच म्याच पाहा. नाविलाजाने संगणकावर येऊन बसलो. मी समजावले असे काही नसते वगैरे पण कोणी ऐकले नाही. गंभीर धावबाद होता होता वाचला. आणि ते सांगायला गेलो आणि दुस-या चेंडुवर गंभीर धावबाद झाला. असा अजून एक प्रसंग झाला पण तो आता काही सांगत नाही. काल मी सर्वांसोबत सामना पाहिला नाही म्हणून भारत सामना जिंकला. ही गोष्ट यानिमित्ताने काल सिद्ध झाली. :) -दिलीप बिरुटे

भारताने पाकिस्तानला विश्वकपात नेहेमीच धोबिपछाड दिला आहे, पण मोहालीच्या आकडेवारीनुसार, एकुण वन डे सामने - ९ (भारत - ५ विजयी, ४ - पराभुत) अलिकडील ३ सामने भारत सलग पराभुत (ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया) पाकिस्तानशी खेळलेले दोन्ही सामने पराभुत (२००७, १९९९). लेकिन इस बार स्टॅटिस्टीक्स को फिक्स कर देंगे...

सोपा उपाय आहे. तुम्ही रिमोटला हात लावू नका म्हणजे झालं. चित्राला टीव्ही ऑन करायला सांगा आणि चॅनेल बदलू नका! मग काही झालं तरी म्हणता येईल, "टीव्ही काय मी नाही ब्वॉ लावला!"