Skip to main content

या अंधश्रद्धेचे काय करू?

लेखक विकास यांनी शुक्रवार, 25/03/2011 00:41 या दिवशी प्रकाशित केले.
आज भारत-ऑस्ट्रेलीयाचा "एफ-५" कळ दाबत सतत ताजा होणारा धावफलक एकीकडे बघत असताना दुसरीकडे ज्यांना तो खेळ प्रत्यक्ष बघता येत होता त्यांचा विचार करत इनो घेणे चालू होते. भारतीय संघाचा खेळ बघताना सरासरी आता आटोक्यात आहे, तरी देखील काय होते या भितीने एकीकडे बोटे जुळवून बसलेलो (फिंगर्स क्रॉस्ड) तर दुसरीकडे मनातल्या मनात, "च्यायला यांना बरं बघायला मिळतं" असे म्हणत तीच बोटे मोडत होतो.... :( तर मग ठरवलचं! की यापुढे "एफ-५" नाही तर ३० मार्चला हातात रिमोटच असेल! असा, भारत-पाक मॅच मी प्रत्यक्ष बघायचा निर्धार करणार, तितक्यात एक किडा डोक्यात आला, जेंव्हा जेंव्हा मी (विशेष करून) भारत-पाक मॅच एकाजागी बसून (म्हणजे मधे मधे उठलो असेनही), बघितली, तेंव्हा तेंव्हा भारत हरला आहे. आता सारे भारतीय माझे बांधव असल्याने, आपले भारतीय खेळाडू पण बांधवच आहेत. त्यामुळे त्यांचे जिंकणे हे मीच जिंकण्यासारखे आहे... मग मी आता काय करू? मला माहीत आहे, उपलब्ध विदाचा विचार केल्यास, स्टॅटीस्टीकली जरी माझ्या अनुभवात तथ्य असले तरी वैज्ञानिक दृष्टीकोनातून याला काहीच अर्थ नाही, ही केवळ अंधश्रद्धा आहे! आणि मी तर स्वतःला अंधश्रद्धाळू समजतही नाही आणि तसे वागतही नाही. त्यामुळे वाटते, कशाला फुकटचे भ्यायचे? पण मग जर परत माझ्या स्टॅटीस्टिक्स मधे नको ती भर पडली तर? भारत हरला तर? छ्या! काही समजत नाहीसे झाले आहे... बघितले आणि आपण जिंकलो तर एकदाचे अंधश्रद्धा निर्मूलन होईल. पण जर जिंकलो नाही तर? या अंधश्रद्धेचे काय करू? डोक्यात न ठेवता सरळ भारत-पाक सामना बघू का नुसतीच "कळ एफ-५"? तुम्हाला देखील भारतीय क्रिकेट संघच जिंकावा असे वाटत असेल अशी आशा करतो. पण मग, इथले क्रिकेटप्रेमी आणि अंधश्रद्धा निर्मूलन करू इच्छीणार्‍या सन्माननीय सदस्य काही तोडगा सांगतील का? ;)

वाचने 31062
प्रतिक्रिया 158

प्रतिक्रिया

अंधश्रद्धा आणि क्रिकेट हातात हात आणि गळयात गळे घालुन चालतात. आजही सकाळ पासुन सोफ्यावर बसुन होतो. (आईच्या भाषेत अजुन थोडावेळ बसलो असतो तर मुळं रुतली असती सोफ्यात.) पण जाग्यावरुन हललो नाही. पंखा बंद होता तो चालु केला नाही. एसी ही बंदच होता. घामात निथळत मॅच पाहिली शेवट पर्यंत. सो विकासराव वाटल्यास एक झकास रेशीपी तुमच्या नावे करीन पण पुढाल्याली मॅच नेट वर पाहा पण रिमोटला हात लावु णका. (एक्स क्रिकेटर) गणा

In reply to by गणपा

अंधश्रद्धा आणि क्रिकेट हातात हात आणि गळयात गळे घालुन चालतात.
असंच म्हणतो! मीही आज एकदा उठून किचनमध्ये जाऊन एक ग्लास पाणी घेऊन आलो तोवर व्हाईट गेलेला होता. मग आपली ब्याटिंग चालू असताना इंचभरही हाललो नाही जागचा! म्हटलं उगाच उठायचो नि विकेट जायची आपली एखादी.. तेंव्हा, वाटल्यास नेट वर पाहा पण रिमोटपासून मैलभर दूरच थांबा. तुम्ही आणि ज्यांना तुमच्यासारखं वाटतं त्यांनी सगळ्यांनीच! :)

In reply to by मेघवेडा

अरे मेव्या, येड्या, अजून चार ग्लास पाणी त्यांच्या इनिंगमध्ये जास्त प्यायला असतात तर काय असा काय दुष्काळ पडणार होता तुझ्याकडे??? त्या म्याचपायी डोकं चालवणारच नाही तर काय बोलणार आता??? ;-) --असुर

In reply to by गणपा

घामात निथळत मॅच पाहिली शेवट पर्यंत. यावर डोळ्यात पाणी येऊस्तवर हसुन घेतलं, वा! याला म्हणतात क्रिकेटचे खरे भक्त!! मला हाफिसात असल्याने मॅच बघता नाही आली, फक्त स्कोअरबोर्डावर नजर ठेवुन होते. प्लिज कोणाकडे जर हायलाईट्सची लिंक असेल तर इथे कळवाल का?

सेम टु सेम अंधश्रद्धा मी बाळगुन आहे. आज शेवटचे २२ रन राहिले असतांना मी एफ-५ मारणे बंद केले आणि सरळ रामनाम जपत काहीतरी फतरुड मेलला रिप्लाय देत बसलो, अन जिंकलो ना तेजायला. भारत पाक बघु की नको असा आजपासुनच विचार करतोय.

In reply to by आनंदयात्री

=)) मॅचमुळे अनेकजण जपमार्गाला लागलेले पाहून धन्य झाले. आज जर गोंदवलेकर महाराज असते तर जपाऐवजी त्यांनी मॅचचा पुरस्कार केला असता.

In reply to by आनंदयात्री

गणपा, मेघवेडा, आनंदयात्री, मामला गंभीर दिसतोय... नक्कीच विचार करेन.

In reply to by विकास

काय लोकं आहेत ? आहो क्रिकइन्फो वर मॅच पाहिल्यास एफ-५ नाही दाबावा लागत . ऑटो रिफ्रेश आहे . मेंटॉस खाऑ .. दिमाग की बत्ती जलाऑ :) -( एफ-१ ऍट युवर सर्वीस ) सायकल सुमाकर

(१) कॉम्युटर टी व्ही ला जोडून , रिमोटद्वारा चालवून मॅच पहाणार का? (२) तसं असेल तर पहा ना मग. रिमोट जोडीदाराकडे द्या. तुम्ही अजीबात स्पर्श करू नका रिमोटला. (३) तुम्ही त्या दिवशी स्वयंपाक बनवा म्हणजे सारखं उठावं पण लागेल आणि (जर या श्रद्धेत काही तथ्य असेल तर) स्वस्थता न लाभल्याने भारत जिंकेल.

अरेरे.. इकासराव काय हे! (तरी बरं उपक्रमावर असता तुम्ही, यनावालासर थकले तुम्हाला समजावुन! ;-) ) येक उपाय सांगतो, पण तेव्हढं चित्राकाकुंना उपाय दिसणार नाही याची काळजी घ्या, नायतर आहेच दंडुका आमच्या पाठीत. ;-) तसंही मॅच रातच्याला सुरु होते बघा (रोजच्यासारखं एखादा पेग वाईन घेण्यापेक्षा) अंमळ थोडीशी जास्तच व्हिस्की घ्या.. फार जास्त नको.. आणि मग बघा मॅच.. नाय सगळ्या अंधश्रद्धा हाय (म्हणजे वर हो) झाल्या तर सांगा.

In reply to by Nile

चित्राकाकुंना म्हणतोस काय रे? येच आता इकडे, दंडुका घालते पाठीत. आता हे मधुशालेत 'बसणार'च असतील तर मीही बसेन म्हणते बाजूला. एकास दोन बरें, कांय?

In reply to by चित्रा

आता हे मधुशालेत 'बसणार'च असतील तर मीही बसेन म्हणते बाजूला
हो, भारत जिंकायला लागला तर एखादा पेग जास्तच जाउन, किंवा हरायला लागला तर दोन पेग जास्त घ्यायला लागुन, कदाचित 'डीडी' लागेल त्यांना. ;-)

In reply to by Nile

यनावालासर थकले तुम्हाला समजावुन! फक्त यनावालाच? ;) बाकी पाणी वाचवा म्हणत असताना अशाच्याने इतरांना "पालथ्या घड्यावर पाणी" असाच अनुभव येत असणार. :( बाकी नशा काय दारूनेच चढते? मॅच बघूनपण चढू शकते ना!

नाऊ आयम काँटींग ओन यूव फो शूअर, पूढील मॅचला (व मॅचपर्यंत) तेंडूलकरची सेंचूरी भारतीय संघाची बॅटींग चालू असताना तेंडूलकरचे ड्रेसींगरूमधे वीना पॅड्स/ग्लोव्ज बसणे तूमचे टीवी बघणे व श्रध्दा व अनूभवाला चक्क अंधश्रध्दा संबोधणे प्रूथ्वी गोल आहे असा अर्धसत्य वैज्ञानीक द्रुश्टीकोन बाळगणे तर्काने काल्पनिक गणितवादाचे व पर्यायाने वैज्ञानिक दृष्टीकोनाचे खण्डन करणे आणी इतर सर्व श्रध्दाळू लोकांच्या धृड श्रध्दा व अनूभव सीध्द गोष्टी यांच्या वीपरीत वर्तन व वीशेषतः लेखन करणे हे टाळलेच पाहीजे. तरीही सांगू जस्ट चीलं... सगळ काही फीक्स आहे... पण कोणीतरी नूकतच लीहल आहे की जो जींकेल अथवा हारेल हा फक्त एक अपघात असेल आणी आपल्या हातात फक्त दैवी उपायांच्या मागे न लागता आलेल्या प्रसंगाला तोंड देत योग्य तो मार्ग शोधला पाहिजे.... म्हणून जरा भीती वाटती आहे.... कारण जर तूम्ही टीवी बघून मॅच जींकली अथवा न बघता हारली तर मग तूमचे रीवर्सल ओफ फोरच्यून सूरू झाले म्हणावे लागेल आनी त्याचे परीणाम भारतीय टीम मधील बांधवांपेक्शा तूमच्यावरच जास्त वाइट होतील सावधान..

In reply to by आत्मशून्य

तेंडूलकरची सेंचूरी ?...
तेंडूलकर काल जेव्हा ५३ रनांवर औट झाला तेव्हाच म्हणालो आज म्याच जिंकणार ? लै मोटा फ्यान आहे राव.. पुन साला त्येचं ब्याड लक लय घान.. म्हुन मन्ल शेन्चुरी नाय तर नाय.. वल्ड कप फायजे...

मी जेव्हा जेव्हा प्रत्यक्ष मॅच बघितली आहे तेव्हा भारत हमखास पाकिस्तानविरुद्ध जिंकलेला आहे. त्यामुळे असं करा, येत्या मॅच बघण्यासाठी मला तुमच्या घरी बोलवा. आपण दोघांनी बघितली तर त्यावरून तुमची पनवती जास्त स्ट्रांग की माझा गुडलक चार्म जास्त पावरफुल हे ठरवता येईल. क्काय?

In reply to by राजेश घासकडवी

तुमच्या दोघांचे लक/चार्म एकमेकांवर आदळुन टाय झाली तर. ;) नक्को बॉ हार्ट लै कमजोर झालय हल्ली आमचं. :p

In reply to by राजेश घासकडवी

आपण दोघांनी बघितली तर त्यावरून तुमची पनवती जास्त स्ट्रांग की माझा गुडलक चार्म जास्त पावरफुल हे ठरवता येईल. कल्पनेची आयडीआ एकदम आवडली! पण अहो, लोक काय म्हणतील? दोघे आपापल्या अंधश्रद्धांची स्पर्धा करत आहेत! ;)

In reply to by विकास

त्या रामानंद सागरच्या रामायणात जसे रामाचे नि रावणाचे बाण जसे बरोब्बर टोकापाशी भिडून कसलेसे फटाके फोडून विरून जात ते डोळ्यासमोर आले. शेवटी काय, फटाके फुटल्याशी मतलब, कसं?

हॅ हॅ हॅ... हे असेच प्रश्न डोकं वर काढतात म्हणून मी कधी म्याच पहात नाही. कोणी अनोळखी बारा पंध्राजण मोठ्या मैदानावर खेळत असतात आणि आमच्या घरात "अरे मुर्खाऽऽ कॅच सोडलास (किंवा दिलास) की!" "आऽऽऽऊट" अजून असलेच शब्द ऐकायला मिळतात. मी आतापर्यंत कधीही म्याच संपूर्ण अशी पाहिली नाहिये. माझ्या कॉलेजला जाण्याच्या बसस्टॉपच्या मागे पोस्टरं विकणारा बुवा सगळ्या आकाशी निळ्या कपड्यातल्या माणसांची चित्रं लावून ठेवायचा. त्यातला अनिल कुंबळे हा माणूस 'त्या वयाप्रमाणे' आवडत असे. मला कोणावरही 'मरणे' जमलेले नाही हे ही लगेच सांगते. माझे लग्न झाल्यावर सासरी सगळेजण म्याच बघत होते म्हणून मीही बघत होते. आणि तो पोस्टरवरचा मनुष्य इथे मैदानावर काय करतोय हा प्रश्न मनात आल्याआल्या बावळटासारखा विचारला. नवरा हसून हसून दोन खुर्च्यांमध्ये पडला. तर सांगायचा मुद्दा असा कि आपण म्याच कशीही, कुठुनही, अक्षांश, रेखांश लक्षात ठेवून, पंचांग बघून ठरवली, पाहिली किंवा पाहिली नाही तरी (आपल्याला तरी) फरक पडत नाही. हा प्रतिसाद हलके घेणे.

In reply to by राजेश घासकडवी

त्यातला अनिल कुंबळे हा माणूस 'त्या वयाप्रमाणे' आवडत असे. मला कोणावरही 'मरणे' जमलेले नाही हे ही लगेच सांगते. हसून हसून लोळले. मी मात्र इंडियन क्रिकेट टीममधील अनेकांवर आळीपाळीने मरत असे हेही सांगून टाकते. :) त्यातही कुंबळे आवडत असे, श्रीकांत, दिलीप वेंगसरकर आवडत. हिंदू कॉलनीतले वेंगसरकरचे घर बसमधून जाताना मैत्रिणीने दाखवले होते, तिकडे हमखास लक्ष जायचे :) आणि तिकडे संदीप पाटीलच्या शिवाजी पार्कच्या इथल्या गल्लीजवळ एका सायकलवाल्याचे दुकान होते तेथे सायकल घेऊन फिरत असू. उगाच तो गॅलरीत दिसतो का हे पहाण्याची उत्सुकता असे. (अर्थात तेव्हा मी बरीच लहान होते!) सचिन लहान, आपल्यातला वाटायचा, त्यामुळे त्याच्यावर मरण्याचे फीलींग येत नसे. हाहाहा.

In reply to by विकास

इंडियन क्रिकेट टीममध्ये असता तर तुमच्यावर तेव्हाच मेले असते. हाहाहा.

In reply to by चित्रा

अरेरे, अंधश्रद्धेसारख्या महत्त्वाच्या विषयावरून हा असला जारण-मरण्याचा प्रकार पाहून खेद वाटला, शरम वाटली. उगाच, काहीही घेणं-देणं, गरज नसताना मिपाकरांची जाहीर माफी मागावी काय? बाकी पाशवी शक्तींनी मरण्यापेक्षा मारण्याच्या गोष्टी कराव्यात हा फुकाचा सल्ला देऊन मी माझे दोन शब्द संपवते.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

विकासचे धागे आम्ही तसे नेहमीच वाचतो.... पण क्वचितच ते इतके रोचक आणि वाचनीय असतात!!!!:) क्रिकेट फीवर जवरदस्त चढलेला दिसतोय!!! आम्ही फक्त "सौ"जन्यभयास्तव इतकंच म्हणतो, चालू द्या!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

कुणाच्या सौजन्यभयास्तव गप्प बसायची वेळ आली आहे?

In reply to by चित्रा

काकू लोकांना एक सूचना. आपण कालिजात असताना कुठल्या क्रिकेटपटूवर मरत होतो हे असे उघड सांगण्यापूर्वी विचार करा. वयं कळतात. ;-)

In reply to by पुष्करिणी

वय फक्त काकु लोकांना असतं असा जावई शोध लावणार्‍या पुष्करीणी काकुंचा विजय असो .. :) - पुष करुनी

In reply to by टारझन

अरे वय दोघांच असतं, पण बायका या बाबतीत* जरा चोरटयाच. (आता येतय पाशवी मंडळ मोर्चा घिऊन. ;) घ्या विकासराव आम्ही तुमच्यासाठी कुर्बान होतोय. शेंचुरीच्या अभिनंदनासाठी जिवंत असु नसु. तेव्हा आत्ताच आमच्या शुभेच्छा कबुल करा. ) लागोपाठ दुसर्‍या संपादकाच्या शतकी भागीदरीत खारीचा वाटा उचलतोय याची संमं ने दखल घ्यावी अस जाता जाता नमुद करतो. *अपवाद पाकी खेळाडु.

In reply to by गणपा

क्रिकेटसारख्या पवित्र विषयावरच्या धाग्यावरही महिलांचा अपमान !! शेवटी काय कंपू आणि कंपूबाज ...:) ह्.घ्या हो :)

In reply to by मेघवेडा

हे तर चार शब्द झाले मेवेराव!! हिशोबात चुकायला लागलात तुम्ही!!! क्रिकेटच्या साथीच्या ज्वराचा परिणाम, दुसरं काय!!! ३० तारखेला सूतशेखराची मात्रा ठेवा बरोबर, नाहीतर अगदीच वात आणाल दुसर्‍यांना!! =)) =)) --असुर

In reply to by मेघवेडा

अभ्यास कमी पडतोय का मेवे?? स्त्री कंपु (वि.) पुरुष कंपु नसतात असे तुम्हाला म्हणायचे आहे काय? मग युयुत्सु कुठल्या कंपुत आहेत? शिल्पा ब कुठल्या कंपुत आहेत असेही विचारणार होतो, पण जीवाच्या भीतीने नाही विचारत. :-?

In reply to by टारझन

वय दोघांनाही असतच पण त्याचं काय आहे वर फक्त काकू लोकांना सांगितलय ना वय कळतं म्हणून ... लगेच पळत पळत येउन स्टेफी काकू आवडतात म्हटला म्हणून विचारलं...

In reply to by पुष्करिणी

काकु, तुम्हाला चिखलात दगडफेक करायला सांगितले हो कोण? शिंतोडे उडणारंच... पुन्हा असं म्हणु नका 'सर्फ एक्सेल है तो दाग अच्छे है !'

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

अहो मेंहेंदळे काका, अनेक काका लोकांप्रमाणे काकूंना आपली माहिती दडवण्याची गरज वाटत नाही. मला एकेकाळी रिकी पाँटींग आवडायचा, पण माजोर्डेपणा दिसल्यावर आवडेनासा झाला. अलिकडे क्रिकेट पहाणं कमी झालेलं आहे, पण ब्रेट ली एकदम हँडसम आहे. ही आपली सहजच माहितीची देवाणघेवाण.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

काकु, जरा स्टुअर्ट ब्रॉड, कोहली, ल्युक राईट, KP, Michael Clarke.... अजुनही आहेत देखणी मुले.. गुगलुन बघा एकेकाला.. आणी हो काका लोकांसाठी... ही लिंक Ellyse Perry, Laura Marsh

In reply to by वपाडाव

नाय रे व.डा.बाळा, मला "छपरी" दिसणारे क्रिकेटपटू आवडत नाहीत. आमची आवड वेगळी आहे. ;-) आधीच्या प्रतिसादातल्या यादीत राहुल द्रविड, डॅनिएल व्हीटोरी, जाँटी र्‍होड्स आणि मार्क बाऊचर राहिलेच.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

नाय रे व.डा.बाळा, मला "छपरी" दिसणारे क्रिकेटपटू आवडत नाहीत. लसीत मलिंगा , मखाया एन्टीनी , हे सुपरहिट्ट देखणे लोक्स राहीले की तै.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

होना..! मला वॉ ब्रदर्स आवडयचे. त्यातल्या त्यात मार्क वॉ तर जास्तच. :) वासिम आक्रमही आवडायचा.. :)

In reply to by प्राजु

वसिम आक्रमचे गाल थोड्या प्रमाणात ओम पुरी च्या गालांसारखे होते म्हणे ? रांजणखळगे का काय ते :) बाकी प्राजु चे ही वय कळले असे मी म्हणनार नाही :) कोणत्या पोरींना स्टिव्ह टीकोलो , हेन्री ओलोंगा , मॉरिस ऑडुंबे , प्युमाई म्बांग्वा , मखाया एन्टिनी , अ‍ॅबी कुरुविला , व्यंकटेश प्रसाद , लक्ष्मीपथी बालाजी , आशिश नेहरा , इत्यादी हँडसम गाईज का नाही आवडत ? का आवडतात पण सांगण्यास संकोच वाटतो ? =)) -

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

Full name Ricky Thomas Ponting Born December 19, 1974, Launceston, Tasmania Current age 36 years 107 days (अवांतर- Education Mowbray Primary; Brooks Senior High School, Launceston) Full name Brett Lee Born November 8, 1976, Wollongong, New South Wales Current age 34 years 148 days त्रैराशीक मांडा. ;)

In reply to by चित्रा

मी मात्र इंडियन क्रिकेट टीममधील अनेकांवर आळीपाळीने मरत असे हेही सांगून टाकते.
आता कुठे खरं कारण कळलं, का विकासराव मॅच बघत नाहीत ते. मॅच सुरु असताना असं सारखं सांगून टाकल्यामुळे अंमळ इनो कमी पडत असेल विकासरावांना. ;-) पळा आता, काका आणि काकू दोघे एकदम दंडूका घालताहेत पाठीत...

In reply to by Nile

दहापंधरा वर्षांनी लहान पोरे म्हणजे आमच्या भावांसारखी, कधीकधी पुतण्यांसारखी. :) त्यांना बघून फार तर बंधुप्रेमाचे, पुत्रप्रेमाचे भरते येईल. अर्थात त्याने जळजळ होत असली तर माहिती नाही बॉ.

In reply to by Nile

Nile, मला त्या 'HATTRICK !' पिच्चर मधील गाण्यातील एक कडवं आठवलं... मेरे दिलविच वो रेंदिये, उसके दिलविच धोणी , टुक टुक देखे मैच लगाके कैच गया बेकार, रब्बा खैर करे... गाणं इथं पहायला मिळेल...

In reply to by रेवती

हा प्रतिसाद हलके घेणे. हलके वगैरे आम्ही काही घेत नाही.. इतरांकडून प्रतिसादाची अपेक्षा न करता, आम्हीच प्रत्येक प्रतिसादाला उत्तर देतो. ;) (आता हा प्रतिसाद मात्र हलकेच घ्या!)

In reply to by रामदास

काकांनी नेहमी प्रमाणे एकच मार्‍या पण काय शोल्लेट मार्‍या. =)) एका बॉलात(वाक्यात) शेंचुरी कशी मारावी ते काकांकडुन शिकावे. ;)

In reply to by रामदास

रामदास, तुम्ही का हो माझ्या नवर्‍याला जाड म्हणत असता? एवढ्यात त्याने पूर्ण एक किलो आणि २०० ग्रॅम वजन कमी केले आहे. आणि वेळ आलीच तर आम्ही खुर्च्यांमधले अंतर वाढवू म्हणजे सहजपणे पडता येइल.;)

आज नेमकी मिटींग मॅचच्या शेवटच्या १० ओव्हर्सच्या वेळी होती. मिटींग मध्ये फोनवर मॅच पहात बसलो होतो. बाजुचे दोघेही नजर तीरकी करुन पहात होते. रैनाचा फटका (षट् कार) बाउंडरीच्या बाहेर पडल्यावर तीघेही ओरडलो. सगळे आमच्याकडे पहात होते, पण निगरगट्टपणे सर्व मॅच पाहीली . आता भारत-पाक मॅचच्या दिवशी मॅच संपल्यावरच ऑफिसला जाणार.

In reply to by नेत्रेश

आता भारत-पाक मॅचच्या दिवशी मॅच संपल्यावरच ऑफिसला जाणार. तुमच्या हापिसाचे नाव शेअर मार्केटमध्ये असेल तर कळवा. त्या दिवशी शेअर घेतो. (दुसर्‍या दिवशी भाव नक्की वाढलेला असणार!) ;) असो गंमतीचा भाग सोडून द्या आणि ह.घ्या. पण फोनवर मॅच कशी पाहीली ते सांगावेत ही विनंती. फोनला रिमोट नसतो तेंव्हा मला कदाचीत चालेल... :-)

In reply to by विकास

इंटरनेटवर मॅचचे लाईव्ह स्ट्रीमिंग चालु असते. तेव्हा ३जी/४जी फोन किंवा वायफाय सपोर्ट असलेल्या फोनवर मॅच दिसते. ऑफिसचा फोन असल्यास उत्तम :)