Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by गणेशा on Wed, 03/23/2011 - 20:59
कोण येथे गुरुवर्य ? खितपत पडले शौर्य अहिंसेचे पुतळे मानतो मौनात दडले क्रौर्य झाकोळला स्पष्ट अंधार मुखवट्यात गळले धैर्य स्त्रीत्वाची ताकद जाणतो खुऱाड्यात लुटले कौमार्य घुंगूरपाण्यात डुबले नेत्र कळले कोणास सूरगांभिर्य दगडात ईश्वर जाणतो देवत्व शोधतो सूर्य भावनांचा गच्च बाजार मनात हरवले माधुर्य वैराग्यात निरपेक्षता मानतो अहंकारातून घडते कार्य ---- शब्दमेघ

Submitted by प्रकाश१११ on Wed, 03/23/2011 - 22:17

Permalink

गणेशा -निव्वळ अप्रतिम

गणेशा -निव्वळ अप्रतिम झाकोळला स्पष्ट अंधार मुखवट्यात गळले धैर्य स्त्रीत्वाची ताकद जाणतो खुऱाड्यात लुटले कौमार्य हे खूपच छान ,नि मस्त सूर लागले
  • Log in or register to post comments

Submitted by गणेशा on गुरुवार, 03/24/2011 - 13:13

In reply to गणेशा -निव्वळ अप्रतिम by प्रकाश१११

Permalink

काका धन्यवाद .. रिप्लाय या

काका धन्यवाद .. रिप्लाय या कारणासाठी की खरे तर हे कडवे सर्वात शेवटी या कवितेत आले ... तसे मला पहिले कडवे बरे वाटत होते .. नंतर आपोआप सुचलेल्या या कडव्यामुळे मात्र कविता छान जमली असेच वाटले होते ..
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानराम on गुरुवार, 03/24/2011 - 13:42

Permalink

अप्रतिम

अप्रतिम जमली आहे कवीता... भावनांचा गच्च बाजार मनात हरवले माधुर्य वैराग्यात निरपेक्षता मानतो अहंकारातून घडते कार्य आवडले
  • Log in or register to post comments

Submitted by कच्ची कैरी on गुरुवार, 03/24/2011 - 15:43

Permalink

अप्रतिम

गणेशा मी तुमच्या कवितेची फॅन झाले आहे प्रत्येक शब्दन शब्द कवितेच्या माळेत असा गुंफला आहे कि वाचतच र्रहावेसे वाटत आहे .मस्त :)
  • Log in or register to post comments

Submitted by हरिप्रिया_ on गुरुवार, 03/24/2011 - 17:08

Permalink

कविता आवडली...

कविता आवडली...
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on गुरुवार, 03/24/2011 - 17:13

Permalink

सुंदर आहे रे.

सुंदर आहे रे.
  • Log in or register to post comments
Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on Fri, 03/25/2011 - 04:02

Permalink

सॉलीड

.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Fri, 03/25/2011 - 07:16

Permalink

गणेशा अतिशय सुन्दर अन गेय !!

गणेशा अतिशय सुन्दर अन गेय !! मानल बुवा!!
  • Log in or register to post comments

Submitted by गणेशा on Fri, 03/25/2011 - 12:27

Permalink

मनपुर्वक आभार सर्व वाचकांचे

मनपुर्वक आभार सर्व वाचकांचे ...
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 2964 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com