व्यापार
लेखनविषय:
केला सुखाचा व्यापार
दु:ख झाले, तोटा झाला
झोळीभर पश्चाताप,
खरा दाम खोटा झाला !
देवा, जगणं रुचंना
काय करावं सुचंना
भल्या सुपीक डोक्याचा
नर्मदेचा गोटा झाला !
तोंडावर लाडीगोडी
पाठ फिरताच खोडी
असे ग्राहक भेटले,
ठकसेन छोटा झाला !
जमा अक्कलखात्यात,
तुझी सावकारी त्यात
हात बुद्धीचे गहाण,
उभा जन्म थोटा झाला !
कधी केली ना लाचारी,
आज देणेकरी दारी
ऐकती ना विनवण्या
गोंधळ वांझोटा झाला !
खुळ्या मनाचं ऐकून
दिलं आयुष्य झोकून
झाले भणंग, भिकारी
मुद्दलात तोटा झाला !
वाचने
2599
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
वा! मस्त कविता!
छान
आवडली!
फारच सुरेख...
कविता छान झालीय, पण फार
चांगली
झकास ग तै आणि हो भेलकम बॅक.
>भल्या सुपीक
खुळ्या मनाचं ऐकून दिलं आयुष्य
कविता आवडली
आवडली