Once Upon A Time In Yerwada !! - १
डिसक्लेमर : १) सत्यकथेवर आधारित, काही पात्रांची नावे बदलली आहेत. २) कुठल्याही व्यक्तीच्या मृत्युचा तमाशा करण्याचा हेतु नाही.
पुण्यात, कोणे एके काळी, ज्या भागाला संध्याकाळ च्या वेळेला , सामान्य माणसे टाळत असायचे, तो भाग म्हणजे येरवडा, याच येरवड्याचा शेवटचा कोपरा म्हणजे येरवडा जेलच्या भिंतीला लागुन असलेली पत्र्यांची पाच-एकशे घरे असलेली वसाहत. आधी आनंदनगर आणि नंतर त्याचे नामकरण नागपुरचाळ असे झाले.
नागपुरचाळीत, किमान सतरा-अठरा तरी ' बाळ्या ' असतील, त्यामुळे प्रत्येक बाळ्या च्या नावाला आपोआपच आडनाव जोडलं जायच. तसचं या आख्ख्या झोपडपट्टीत, अल्पावधीत, एक प्रसिध्दी पावलेले कॅरक्टर म्हणजे लातुर-बाळ्या. अर्थात लातुर हे काही त्याच आडनाव नव्हत. लातुरच्या भुकंपानंतर अशीच काही वाचलेली मंडळी (जी तिथे असतानाच गरीब होती.) तिथुन निघुन आली त्यातलाच बाळ्या एक. कमी वयात भुकंपामुळे बसलेला मानसिक धक्का, अंगावर कुटंबातील सात माणसांच्या मृत्युच दुख: , भुकंपातून वाचलेल्या धाकट्या बहिणीची जबाबदारी, आणि परक्या प्रदेशात आल्यावर येणार्या अडचणी या मुळे बाळ्या जरा विक्षिप्ता सारखाच वागत असे. पण त्याला सगळ्या परिस्थितीतही मोठा आधार वाटत असे तो रोशनकाकांचा.
रोशन ! कोणे एके-काळचा दादर स्टेशनचा सर्वात स्किल्ड पाकिटमार ! पण चोर पोलीसाच्या दोन पावले पुढे असला तरी एखाद्या दिवशी पकडला जातो असे म्हणतात. त्याच प्रकारे हा ही पकडल्या गेला आणि बदली येरवड्याच्या जेलमध्ये झाली. चार वर्षाची शिक्षा भोगुन , मोकळ आकाश आणि तंबाखुची तल्लफ घालवायला नागपुरचाळीत (तेव्हाचे आनंदनगर) आला आणि इथलाच झाला . जेलमधल्या कमाईवर चहाच दुकान टाकल आणि कर्मधर्म संयोगाने कोणी ही नातेवाईक नसलेल्या रोशनचा आख्ख्या नागपुरचाळीने 'रोशनकाका' केला. त्या चहाच्या दुकानाच नंतर किराणा मार्केट झाल.
याच किराणा-मार्केट च्या बाहेर ते दोन लहान जीव, जवळ-जवळ भीक मागायच्या परिस्थितीत रोशनकाकांना दिसले तेव्हा त्यांना त्यांच्यांत उतारवयाचा आधार दिसला आणि बाळ्याचा ' लातुर-बाळ्या' झाला. बाळ्यानेही नंतर बहिणीला शिकवायचा वसा घेतला. आमच्या इथल्या पेपरवाल्याला आलेल्या अकाली अधुत्वामुळे, पेपरवाल्याची पेपरची आणि जोडीला दुधाची लाईन बाळ्याच्या हातात पडली. मेहनत करुन त्याने त्या धंद्याला अजुन बळकट केले आणि वर्ष दोन वर्षातच बाळ्या कमवायला लागला. रहायला रोशनकाकांच घर, बहिणी करिता नेताजी शाळा आणि धंद्या करिता दुधाची - पेपरची लाईन, इतक्या जिवावर एकुणच, बाळ्या वयाच्या १५ व्या वर्षीच सेटल झाला.
सौ. सुलक्षणा बाळाराम धिवार हे कुरूप व्यक्तीमत्व दोन कारणांनी संपुर्ण नागपुरचाळीला ठावुक होते, एक म्हणजे ती अंगणवाडीची शिक्षीका 'सुलाताई' होती ,दुसर कारण म्हणजे ताईची आणि तिच्या सासुची दररोज ची खडाजंगी !! पहिल्या गल्लीतील्या डाव्या कोपर्यातुन, संध्याकाळी सातच्या सुमारास, बायकांचा भांडणाचा आवाज वाढायला लागला की लहान पोर-सोर देखील समजुन जायची की आजही रात्री नवाच्या सुमारापर्यंत कान पवित्र होणार. भांडणाच मुळ कारण होतं की सुलाताईचा नवरा , एक वर्षाच पोरं तिच्या पदरात टाकुन, दुसरीबरोबर पळुन गेला होता. त्यानंतर सासुचा संभाळ करुन ही सासु समाधानी नव्हती आणि एक दिवस सुलाताईंच्या सहनशक्ती चा बांध फुटला...
बाळ्या नेहमी प्रमाणे संध्याकाळी ' बिल वसुली ' करुन परतला. तसा हा दररोजचा प्रोग्राम ! एकदा घरी आला की घराच्या मागच्या बाजुला असलेल्या लोखंडी ड्र्म मधुन पाणी घेवुन हात पाय धुवायचे, चहा घ्यायचा आणी रोशनकाकांच्या राशन दुकानात पडेल ती मदत करायची. पण त्या दिवशी जेव्हा तो ड्र्म पर्यंत जायला निघाला तेव्हा त्याला एक जोरदार किंकाळी ऐकु आली. धावत जाऊन पाहिल तर एक पाच फुटाचा जळता देह त्याचा अंगावर धावुन आल्यासारखा आला. त्याच्या पर्यंत पोहोचायचा आधीच तो देह कोसळला . बाळ्या चा हात ड्र्म पर्यंत जाईपर्यंत पर्यंत त्या देहाचा कोळसा झाला होता.
भेदरलेला बाळ्या पळत जाउन सुलाताईच्या घरात बघतो तो तिथे दिड वर्षाच पोर केव्हाच जळुन खाक झाल होतं. सासु थरथरत एका कोपर्यात उभी होती. बाळ्या तेथेच बेहोश होवुन पडला. दोन तासाने जेव्हा त्याला जाग आली तेव्हा तो इस्पितळात होता.पण डोके मात्र प्रचंड जड झाले होते. समोर उभे असलेले रोशनकाका धुसर दिसले आणि पुन्हा बाळ्या निद्रिस्त झाला.त्याचे दोन दिवस त्याच अवस्थेत गेले. दोन दिवसांनी जेव्हा त्याला नीटपणे जाग आली तेव्हा तो बाळ्यासारखाच नव्हता च मुळी .
त्याने रोशनकाकांना, बहिणीला, इतर सर्वांना ओळखले. पण सगळी गफलत !! रोशन काकांना डॉक्टर, बहिणीला रोशन काका, डॉक्टर ला नर्स आणि असे सर्वच घोटाळे !! त्यात बोलता-बोलता अचानक " हे sssss !! जळाली !! जळाली !! जsssssळाली !! " असे म्हणायचा. डोळे विचीत्रपणे फिरवायचा. डॉक्टरांनी चार-पाच दिवस वाट पाहिली आणि शेवटी त्याची मनोरुग्णालयात रवानगी झाली.
क्रमश......
- Once Upon A Time In Yerwada !! - २
- Once Upon A Time In Yerwada - 3
- Once Upon A Time In Yerwada - अंतिम
Book traversal links for Once Upon A Time In Yerwada !! - १
वर्गीकरण
प्रतिक्रिया
सुन्न्न्न्न्न्न्न
......
.
काटा आला रे शेवटी.
बापरे........
जाळ
खरच सुन्न :-(
याच एरियात पूर्वी
सुन्न
आयला मस्त कादंबरी हातात पडली
घरगुती भांडणाचा शेवट इतका
.....
शहारा आणणारे लिखान .. क्रमशः
वाचतोय...
...
सुहास धन्यवाद.
:(
<>><><><><<>
बाप रे...
अवघड आहे...
असेच म्हणेन
सुरवात चांगली आहे . कांदबरी
त्याची काय अवस्था होणार काय
पूर्ण
हे कदाचित असच चालायचं. असाच
नि:शब्द .............
...
बापरे..! पुढे काय झालं??
ह्म्म
अरे बापरे , भीती वाटतेय
पूर्ण कर रे लवकर.
बापरे. भंयकर घटना आहे. पुढे
लिखाण चा॑गले वाटले
सुहास लिहिते झाल्या बद्दल
वाचतोय ...
काटा...
जबरदस्त
.
बापरे,पुढचा भाग लवकर टाक
गुड!
भयानक. पुढे काय झालं हे
(No subject)
खतरनाक....मी अजुन त्या
लवकर पुर्ण कर
पुढच्या भागाची वाट पाहात
पु भा प्र. सुन्न -प्यारे.