आमच्या खालापूरचा "किरकिंडे" यांचा वडापाव.
आता पर्यंत खुप ठीकाणी वडा-पाव खाल्ला पण "किरकिंडे" ची चव कुठ्ठेच नाही.
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
एकदा अलका टॉकिज मधे ईरंटर्वल मधे वडापाव खाण्याचा योग आला....
...... "तो प्रचंड वडा" पाहून माझी दातखिळीच बसली.
.........लिंबाएवढा मोठा वडा पाहून मी त्याला म्हणालो हे काय "बकासूरांसठी" बनवलेले वडे देतोस कायं?
..............आणि त्याला पाव ही मस्त काँप्लिमेंट करत होता....किंमत रुपये ६ ....
चार वडापाव चेपलेला ) कुबड्या खविस
फोरम मॉलमध्ये वरती 'ट्रान्झिट' म्हणून फूडकोर्ट आहे. तिथे शिवसागर स्टॉलवर २० रु. ना १ वडापाव प्लेट. त्यात २ वडापाव असतात.
मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
यशोताई,
बंगलोरात वडापाव खायचा आहे.??????????
हि घ्या लिहून काहि ठिकाणे.
१.फोरम मोल-ट्रान्सिट
त्यात राजधानी मध्ये वडापाव रु.४५ फक्त (२ वडापाव)
२.राजवर्धन फूडस-जे.पी. नगर ,बिगबझार जवळ्,(वुडिज होटेल जवळ)
एक वडापाव -रु.१४ फक्त
३. ब्रिगेड रोड- (मोलचे नाव आठवत नाहि.परंतु एम जी रोडला जाताना डावीकडे हा मोल आहे.बाहेर कॉफीचे स्टोल्स आहेत.)
एक वडापाव -रु.१४ फक्त.
४.जयनगर मार्केट ,आयसीआयसीआय बँकेजवळ एक बिहारी माणसाचे दुकान आहे.
एक वडापाव -रु.५ फक्त.(हा चवीला सगळ्यात जबरी आहे.)
अभिज्ञ.
पुण्यात बर्याच हातगाड्यांवर चांगला वडापाव मिळतो.
त्यातली एक गाडी : सुजाता कोल्ड्रिंककडून बाजीराव रोडला जो चौक मिळतो, त्या चौकातील हातगाडी. एकदम टेष्टी!
मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
सीओईपी होस्टेलच्या शेजारी..(कलानिकेतनसमोर) दुर्वांकुर वडापाव....
फक्त संध्याकाळी २-३ तास गाडी सुरु असते.....
ओर्डर दिली की ५ मिनटात तुमच्यासमोर बनवून देतात...
निगडी बष्टाप वर....
मागची बिल्डिंग आहे ना तिच्या तळमजल्यावर एक मारवाड्याचं /राजस्थान्याचं स्वीट्सचं दुकान आहे. त्या दुकानाबाहेर स्टॉल लाऊन वडापाव, कचोरी, सामोसे विकतो.
तिथला वडापाव लै भारी असतो...एकदम "नो वन कॅन इट जस्ट वन" :)
सासवडला बसस्टॅडबाहेर 'अस्मिता वडेवाले'. पुर्वी मस्त असायचे. हल्लीचं ठाऊक नाही.
बारामतीला कुलकर्णी वडेवाले.
दिल्लीत 'दिल्ली हट' ला एम.टी.डी.सी.च्या स्टॉलवर...इतका काही खास नसतो वडा, पण परमुलुखात आपल्या वडापावची अतीव इच्छा पुर्ण करण्याइतपत ठीक असतो. किंमत रु. ३५/- नग २.
निगडी बष्टाप वर....
मागची बिल्डिंग आहे ना तिच्या तळमजल्यावर एक मारवाड्याचं /राजस्थान्याचं स्वीट्सचं दुकान आहे. त्या दुकानाबाहेर स्टॉल लाऊन वडापाव, कचोरी, सामोसे विकतो.
तिथला वडापाव लै भारी असतो...एकदम "नो वन कॅन इट जस्ट वन" Smile
काय रे निगडीत राहतो काय रे !!!
मिसळीबाबतही लागू
कुंजविहार ठाणे एस टी स्टँड्जवळ. याने जंबो वडापावचा शोध लावला असे माझे मत आहे.
मुंबईत जंबो किंग ची साखळी आहे. तेथे ही बरा मिळतो. आणि हो... भेळ/ वडापाव / मिसळ वगैरे खायला गेल्यावर जे स्वच्छता पाहण्याची वायफळ अपेक्षा करतात त्यांच्यासाठीही हा चांगला.
नितिन थत्ते
चांगला विषय :)
श्रीकृष्ण बेकरी, सहकारनगर पुणे (अप्रतिम वडा आणि भला मोठा पाव) - लई लई भारी असतो..
अजून एक म्हणजे खत्री वडापाव - बालगंधर्व पूल जोशी वडेवाल्याच्या समोर :)
--
ध्रुव
मला तसे सगळेच वडापाव आवडतात.. पण अहमदाबाद मधे एकदा खाल्ला होता, अगदी भरपुर बटर लावून, पावाला एका साईडला हिरवी न दुसर्या साईडला लाल चटणी लावून मधे तो मस्त बटाटेवडा खाल्ला होता...(आय नो, वडापाव असा नसतो.. वर्तमान्पत्राच्या कागदात बांधून लाल कोरडी चटणी, आणि तळलेल्या मिरच्यांबरोबरचा वडापाव तोच खरा!!) पण तो अमेझिंग लागत होता! नाव काय माहीत नाही..
पण वडा म्हटलं की मला माझ्या आईच्या हातचाच ब.वडा आवडतो.. भरपूर सारण असलेला, आई आलं-लसूण, हिरव्या मिरच्या मस्त ठेचून असला सही करते ना! आईग्ग... आठवण झाली!! तशी मी पण आता आईसारखी करायला लागलीय.. त्यामुळे सद्ध्य होम-मेड वडापाव!
http://bhagyashreee.blogspot.com/
साडेतीन पाऊंडात (२८० रुपायात) दोन वडापाव! (म्हणजे २ डिस्को ब.वडे, ब्रेडच्या २ स्लाईस् आणि एकदम रद्द्ड टेस्ट) :(
पण चलता है! दरवेळी शिव्या देत खातो ;)
(सातासमुद्रापार वडापाव खाल्लेला) टिंग्या :)
कोल्हापुरात राजाराम कॉलेजजवळ शामचा वडा एकदम झकास मिळतो.(कालच मित्रांबरोबर २ खाल्ले)
मिसळीसाठी फेमस असे हॉटेल मोहनमध्येही चांगला वडा-सांबार मिळते.
अनेक गाड्यांवर मुंबई वडा म्हणून व्हर्जिनल वड्याची रिडक्शन आवृत्ती मिळते. पण अजून कधी खाल्ला नाहिए इतका चिरकुट वडा ;)
खादाडीचा विषय; ते ही पावसाळ्यात; ते ही वडापाव =P~
धमाला तु उल्लेख केलेल्या दुकानाच नाव आहे "नॅशनल स्वीट्स" :)
निगडी प्राधीकरणात भेळ चौकाच्या जवळच असलेला वासु वडापाव चवीत लयी भारी आहे.
फेमस देखील आहे आणि चवीत भारी देखील हे दुर्मिळ कॉम्बिनेशन आहे तिथे. :)
मध्ये एकदा "गोली वडापाव" खाल्ला चिंचवड स्टेशनच्या जवळ बिगबजारच्या जवळच. तो ही चांगला आहे.
(गोली वडापाव ही मुंबईमधील चेन आहे ना???)
दिवाडकरांचा वडा अजुन खाल्ला नाहिये पण लोणावळ्याला एकदा पावसाळ्यात दिवसभर भटकंती करुन संध्याकाळी ६ च्या लोकलला बसायच्या आधी स्टेशनवर खाल्लेला वडापाव जबरा होता. :)
अन्या दातार दहावीनंतर मी कालेजातली पाच वर्ष मी शामचा धंदा वाढवण्याच पुण्यकर्म केलय :)
शामचा वडा चांगला होताच पण मला तो संध्याकाळी ४-४:३० वाजता करत असलेली कांदाभजी जास्त आवडत होती.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
कोल्हापुरात केशवराव भोसले नाट्य गृहा जवळ अश्विनी वडा से॑टर नावाच्या गाङया वर मस्त वडा मिळतो.
कोल्हापुरातील वडे मोठे, आणि ब्रेडच्या स्लाईस असतात, येथे पुण्यात छोटे वडे आणि गोल ब्रेड.
कोल्हापुरातील दीपक वडा फारच फेमस आहे. अयोध्या टॉकिज जवळ असणारी वड्याची गाडी आता त्याच रोडवर पण सीपीआर हॉस्पिटलजवळ असते.
कधी योगच नाही आला खायचा पण एकदा खायचाच आहे.
अजुन एक आठवल. आम्ही कालेजात असताना प्रोजेक्ट निमित्ताने इचलकरंजीत जात होतो.
तेव्हा इचलकरंजीमध्ये गाडीने एन्ट्री केली की एक चौक आहे तिथे कोणाचा तरी पुतळा आहे. त्या चौकाच्या जवळ वडा पाव चटणी हाणायला जात होतो.
शेंगदाण्याची पातळ बनवलेली चटणी अप्रतिम होती. आणि खाल तितकी. त्याची चव देखील मस्त होती. आता नाव आठवत नाहिये त्या दुकानाच.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
दसरा चौकात शाहु महाराजांचा पुतळा आहे तिथुन एक रस्ता अयोध्या टॉकिज कडे जातो त्या रस्त्यावर उजवीकडे बघत जायचे.
सापडेल ती टपरी तुला. :)
आणो हो.
मी दोन वर्ष राजाराम आणि (बारावीत मार्क कमी पडल्याने) तीन वर्ष पॉलिटेक्निक
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
त्रिमुर्ती (कानिटकर) वडापाव, डो॑बिवली (इथे वड्याबरोबर पावास शिळ्या ब्रेडची लाल चटणी व मिरची, आले, लसूण लावलेली फक्कड हिरवी चटणी लावतात ती लाजवाब..)
आमचे आडनावंधू इतके फेमस आहेत मला माहित नव्हतं आता तिथे आले की खाऊन पाहीन हा वडा...
कुंजविहार चा वडा असाच पाऊस पडत असताना सगळ्या कॉलेजच्या ग्रुप बरोबर उभं राहून खायला काय मज्जा यायची...तिथे ये दिल मांगे मोअर चा चान्सच नसायचा एक खाल्ला की संपलं....
कुंजविहार चा वडापाव तर जबरदस्तच आहे...१०वी ला असताना बर्याच वेळेला ताव मारला आहे.....
राजमाता चा वडापाव पण जबरदस्त लागतो..
(गरम गरम वडा चापणारा)
मदनबाण.....
श्रीकृष्ण वडा (सहकारनगर), जोशी वडेवाले (बालगंधर्वसमोर), दिवाडकर (कर्जत) इथल्या बटाटावड्यांच्या आठणीत रमून मग पावलं अधून्-मधून वळतात 'डिंपल'कडे !
न्यू जर्सीत 'ओक ट्री रोड' ह्या ठिकाणी (भारतातील एखाद्या गजबजलेल्या रस्त्याची परदेशी आवृत्ती) डिंपल रेस्टॉरंट आहे.
अमेरिकन ब्रेडमधे बटाटावडा आणि लाल चटणी लावून मिळतो. पाहिजे असल्यास झणझणीतही मिळतो.
तुका म्हणे त्यातल्या त्यात ... अजून काय !!!
वेताळ -- मिरची बाबत पूर्ण अनुमोदन !
(पुढच्या पुणे दौर्याची वाट बघत असलेला) संदीप !
हॉट ब्रेड मधला वडापाव मला जरा बरा वाटला डिंपल पेक्षा..पण कितीही झणझणीत सांगितला तरी आपल्या घरची चव येतच नाही....
तुका म्हणे त्यातल्या त्यात अगदी पटलं....
रमाकांतचा वडा प्रसिद्ध होता.. आता फारसा चांगला नाही...
पण त्रिमुर्ती चा वडा झकास होता... खाऊन दोन वर्ष झाली पण ती चव आठवते... आणि भला थोरला वडा ...झणझणीत चटणी आणि तळलेल्या मोठ्या मोठ्या हिरव्या मिरच्या ...
पुण्यात नारायण पेठेत प्रभा विश्रांती गृह, एस पी च्या मागे एस एस आणि
टिळक रोड चिमण बागेत तिलक...
खत्रीचा वडापाव (बालगंधर्व पुलावर)....त्यातही त्याच्या म्हातारीने तळलेला असेल तर अजून बेश्ट (ती फार वेळा हे काम करत नाही, आता आहे की नाही बिचारी हे पण ठाऊक नाही, शेवटचं पाहिलं तेव्हाच लै वाकली होती)...
--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
रितु आयी सावन की,
रिमक झिमक झिम झिम बून्दनियां बरसे ॥
पुण्यात बटाटे वडा खावा तर प्रभाचा ....
"प्रभा विश्रांती ग्रुह"
नारायण पेठ, रमणबाग शाळेच्या शेजारी.
वडापाव नाही, फक्त वडा & उपवासाची कचोरी.... एकदा चाखून बघा नक्की ..
मुकेश
प्रतिक्रिया
माझ्या गावी.
हा बटाटा वडा की बटाटा भजी?
दादर
बंगलुरुत
बंगळुरात वडापाव
अरेरे
अररररर.. लै
पुण्यात
शिवाजीनगरमध्ये...
निगडी...
निगडी
फरासखान्यासमोरच्या कळकट गाडीवरचा.
जितकी गाडी
सहमत
इन्डीयन
वा वा वा...
एकदम मस्त!
मनस्वी,
डोंबिवली-
पुण्याच्य
मला तसे
हो,गुजरात
ट्रॅफलगर स्क्वेअर्......लंडन!
साडेतीन
कोल्हापूर
व्हर्जिनल वड्याची रिडक्शन आवृत्ती
अरे वा!
आयल्ल्ला.....
दिवाडकर वडा.....
आयला
पनवेल, गुरुदत्त वडा
मस्त बटाटा वडा.
अरे हो!
मी कसा काय खाल्ला नाही बरे?
अन्या
वडा चारुदत्तचा ..
वडा कसाही असो
अरे वा
कुंजविहार
वडा!
डिंपल -- न्यू जर्सी
संदीप
हॉट ब्रेड
रियल आईसक्रिम
हॉट ब्रेड
खोपोली
खत्रीचा
वाईकरचा वडा
पुण्यातली
पुण्यात