Skip to main content
लेखक निवेदिता-ताई यांनी शनिवार, 19/03/2011 20:06 या दिवशी प्रकाशित केले.
चार वाट्या पुरणावरील कट--आपण आज जे पुरण केले त्यावरील जेवढा कट आधीच बाजूला काढून ठेवला असेल तो घ्या.व थोडेसे तयार पुरण पण घ्या, गुळ पाव वाटी, एक लींबाएवढी चिंच भिजत घालून ठेवा व त्याचा कोळ काढा, सुक्या खोबर्याचा एक छोटा तुकडा गॆसवर भाजून घ्या म्हणजे तो तुकडा गॆसवर धरा तो पेट घेइल तो खाली काढून ठेवा व तो पुर्ण काळा झाला की फ़ुंकर घाला...करपु देउ नका, आता त्याचे बारीक तुकडे करुन ते वे जिरे चमचाभर घेउन मिक्सरवर वाटून घ्या, गोडा मसाला एक चमचा (टे. स्पुन.), आता तेल गरम करुन घ्या , त्यात मोहरी टाका, तडतडली की हिंग घाला, हळद घाला, कढीपत्ता टाका, आता आपण जे खोबर्याचे वाटण करुन ठेवले ते टाका, चांगले परतुन घ्या, त्यातच गोडा मसाला टाका, पुन्हा परतुन घ्या, आता त्यात पुरण कट घाला, चिंच कोळ घाला, थोडे गरम पाणी घाला, गुळ घाला, मीठ चविनुसार घाला,पुरण पण त्यातच घाला, मस्त भरपुर वेळ उकळू द्या,वरुन कोथींबीर पण घाला.ही थोडी काळपट दिसते पण चव मात्र मस्तच्..!!!!!!!!!!!!!!!!!!!! जास्त वेळ उकळल्यामुळे कटाची आमटी जास्त चविष्ट होते,आणी गरम गरम घ्या आता पुरणपोळी बरोबर खायला. अस्सा भुरका मारा की आहा आहा......:) :p

वाचने 6143
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

मीही केलिये. मला वाटतं रामदासांनी 'करी ऑफ कॉन्सिरसी' ची पाकृ दिली होती. फॉटू नसलेल्या पाकृंना आम्ही प्रतिसाद देत नाही पण आज दिला.;)

In reply to by रेवती

अग फोटो काढेपर्यंत आमटी शिल्लकच राहिली नाही...भुरके मारले सगळ्यांनी...:p

मी पण केली होती पण फोटो काढला नाही :( मी फोडणीत सुक्या खोब्र्याचे काप तळून टाकले होते छान लागतात. :)

मी पण केली होती होळीच्या दिवशी. मी खोबर्‍याबरोबरच लवंग, दालचिनी वाटून टाकते आणि शेवगेच्या शेंगाही टाकल्या होत्या.