कटाची आमटी ---
चार वाट्या पुरणावरील कट--आपण आज जे पुरण केले त्यावरील जेवढा कट आधीच बाजूला काढून ठेवला असेल तो घ्या.व थोडेसे तयार पुरण पण घ्या,
गुळ पाव वाटी, एक लींबाएवढी चिंच भिजत घालून ठेवा व त्याचा कोळ काढा, सुक्या खोबर्याचा एक छोटा तुकडा गॆसवर भाजून घ्या म्हणजे तो तुकडा गॆसवर धरा तो पेट घेइल तो खाली काढून ठेवा व तो पुर्ण काळा झाला की फ़ुंकर घाला...करपु देउ नका, आता त्याचे बारीक तुकडे करुन ते वे जिरे चमचाभर घेउन मिक्सरवर
वाटून घ्या, गोडा मसाला एक चमचा (टे. स्पुन.),
आता तेल गरम करुन घ्या , त्यात मोहरी टाका, तडतडली की हिंग घाला, हळद घाला, कढीपत्ता टाका,
आता आपण जे खोबर्याचे वाटण करुन ठेवले ते टाका, चांगले परतुन घ्या, त्यातच गोडा मसाला टाका, पुन्हा परतुन घ्या, आता त्यात पुरण कट घाला, चिंच कोळ घाला, थोडे गरम पाणी घाला, गुळ घाला, मीठ चविनुसार घाला,पुरण पण त्यातच घाला, मस्त भरपुर वेळ उकळू द्या,वरुन कोथींबीर पण घाला.ही थोडी काळपट दिसते पण चव मात्र मस्तच्..!!!!!!!!!!!!!!!!!!!!
जास्त वेळ उकळल्यामुळे कटाची आमटी जास्त चविष्ट होते,आणी गरम गरम घ्या आता पुरणपोळी बरोबर खायला.
अस्सा भुरका मारा की आहा आहा......:) :p
वाचने
6103
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
वॉव
मारला भुरका!
In reply to मारला भुरका! by पैसा
+१
आज केली होती मी .
मीही केलिये. मला वाटतं
In reply to मीही केलिये. मला वाटतं by रेवती
अग फोटो काढेपर्यंत आमटी
जबरा पाकृ दिल्याबध्द्ल धन्स !
मस्त !!
(No subject)
मी पण केली होती होळीच्या
मस्तच
परवाच चव चाखायला मिळाली...
म्स्त झाली होती ताई कटाची