त्या प्रसंगानंतर तर बायकोने अंथरूणच धरले. आधीच सावळा असलेला तिचा चेहरा निस्तेज होऊन बघवेनासा झाला. केस पांढरे झाल्याने ती माझ्यापेक्षा दहा वर्षांनी म्हातारी दिसू लागली. शेवटी डॉक्टरी सल्ल्याने मी तिला हवापालटासाठी बाहेरगावी महिनाभर तरी घेऊन जायचे ठरवले. आम्ही हनीमूनसाठी मसूरीला गेलो होतो म्हणून पुन्हा मी तिथेच जायचे ठरवले म्हणजे तिला जुन्या आठवणींनी बरं तरी वाटावं. मसूरीगावापासून ३-४ किलोमीटरवरचे एक रिसॉर्ट हॉटेल मी बुक केले आणि झटपट आवराआवरी करून आठवड्याभरातच आम्ही तिकडे गेलो. सुरुवातीला एक आठवडा रिसॉर्ट सोडून बाहेर पडायचंच नाही असं मी ठरवलं होतं. उगाच कोणी लाल दाढीवाला दिसायचा आणि तिला परत अॅटॅक यायचा. आठवडाभर रिसॉर्टवरच्या निसर्गरम्य वातावरणात आणि निरव शांततेत काढल्यावर मात्र बायकोला जरा बरं वाटलं. चेहर्यावर जरा तुकतुकी आली आणि ती त्या लालदाढीवाल्याला विसरतेय असं मला जाणवू लागलं. मग मात्र तिला बाहेर फिरायला घेऊन जायची मला घाई झाली. मग एक दिवस आम्ही सकाळीच गनहिलवर फिरायला गेलो. दहा-साडेदहाची वेळ होती आणि मस्त कोवळी उन्हं पडली होती. बरेच पर्यटक तिथे जमा झाले होते. बायकोला एका हाताने माझ्या कवेत घेऊन आम्ही तिथे बरंच फिरलो. उंचावरून दरीतली शोभा पाहिली. दूरवर दिसणार्या ब्रिटीशकालीन सुंदर इमारती पाहिल्या. बायको खूश दिसत होती. मला खूप आनंद झाला. एकदा तिचा चेहरा ओंजळीत घेऊन मी तिचे हलकेसे चुंबन घेतले. ती लाजली. मग मी विषय बदलत म्हणालो,"तू इथे बस मी आपल्यासाठी लिचीची फळं आणतो." तिने आनंदाने मान डोलावली आणि रस्त्याच्या कडेला एक दगडावर बसून खाली दरीकडे पाहू लागली. मी साधारण दोनशे मीटर जाऊन फळवाल्याकडून लिची घेतल्या. एक लिची तोंडात टाकून मी वळालो आणि बायको बसली होती तिकडे पाहिले. समोरचं दृष्य पाहून माझ्या हातापायातून जणू वीज सळसळली. बायको थरथर कापत उभी होती. तिची मान लटलट कापत "नाही, नाही" म्हणावं तशी हालत होती, सगळं अंग थरथरत होतं आणि ती एकेक पाऊल मागे टाकत होती. तिच्या समोर पंधरा-वीस फुटावर तो उभा होता. मोहम्मद? की त्याच्यासारखा दिसणारा कोणी? तो तिच्याकडे का जातोय? मी हातातली पिशवी टाकून धावत सुटलो. "एऽऽऽऽऽऽऽय," मी खच्चून ओरडलो. आजूबाजूचे लोक थबकून माझ्याकडे पाहू लागले पण मी मात्र फक्त बायकोकडेच बघत होतो. ती एकेक पाऊल मागे टाकत दरीकडे जातच होती. निम्मं अंतर धावून गेल्यावर मी थबकलो आणि पुन्हा खच्चून ओरडलो, थांऽऽऽऽब". त्या ओरडण्याने माझा घसा खरवडला गेला आणि पुढे दिसणार्या दृष्याने माझ्या डोळ्यात खळ्कन पाणी आलं. मी पुन्हा पळायला पाऊल उचललं पण त्याच क्षणी बायको खाली खोल दरीत पडताना मला दिसली. माझ्या हातापायातलं त्राण गेलं आणि मी कोसळलो.
शुद्धीवर आलो तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होतो. जाग आल्या आल्या मी ताडकन उठून बसलो. नर्सने ते पाहताच लगबगीने माझ्या जवळ आली आणि माझ्या खांद्यावर हात ठेवला. मी प्रश्नार्थक मुद्रेने तिच्याकडे पाहिले. तिने नकारार्थी मान हलवली आणि मग खाली घातली. मी दोन्ही हातांनी डोळे झाकून रडू लागलो आणि ती फक्त माझ्या खांद्यावर हात ठेवून उभी राहिली.
बायकोचा अंत्यसंस्कार वगैरे सगळं तिकडेच उरकून मी पुन्हा घरी आलो. आल्यावर आधी रतनशेटला भेटलो. त्याने छातीवर हात ठेवून मोहम्मद कुठेही गेला नसल्याचे सांगितले. मला काहीच कळेनासे झाले होते. तो माणूस मी खरंच पाहिला की तो भास होता हे माझे मलाच कळेना. मसूरीच्य पोलिसांनी अपघाती मृत्यु अशीच नोंद केली होती ती मी काही बदलायला लावली नाही. एनीवे तो माणूस कोण होता हे कळल्याने बायको परत थोडीच येणार होती? बायकोच्या दु:खात सहा महिने असेच गेले. या सहा महिन्यात मी ऑफिसात किंवा बाहेरही कोणाशीही बोललो नाही की हसलो नाही. कामापुरतं काम. लोक हळहळायचे. सहानुभूति दाखवायचे. पण मी बधलो नाही. सहा महिन्यांनी एकच जरा चांगली गोष्ट झाली. सहावर्षांपुर्वी काढलेल्या बायकोच्या विम्याचे कोटी-दीडकोटी रुपये हातात आले. मग मात्र मी या गावात तिच्या आठवणींचा छळवाद सहन करत राहायचं नाही असं ठरवलं. महिनाभर नोकरीसाठी खटपट करून सिंगापूरला नोकरी मिळवली. जाण्याआधी मोहम्मदला जो पोलिसांचा वगैरे त्रास झाला त्याबदल्यात त्याच्या मुलाच्या किडनीच्या ऑपरेशनसाठी पाच लाख रुपये दिले.
विमानात बसल्यावर मनावरून एक ओझं उतरल्यासारखं झालं. घर, जमीन वगैरे होतं नव्हतं ते सगळं विकून मी ते गाव, तो देश सोडून चाललो होतो. बायकोच्या आठवणी माझा पाठलाग करणार नाहीत अशा ठिकाणी. विमानात छानपैकी शँपेन पिऊन स्वप्नविरहीत झोप काढली आणि फ्रेश होऊन सिंगापूरच्या चकाचक विमानतळावर उतरलो. आता खूपच हलकं हलकं वाटत होतं. इमिग्रेशन चेक वगैरे झाल्यावर बॅगा घेऊन बाहेर आलो आणि जागीच स्तब्ध झालो. समोर ती हसत उभी होती......माझी सविता. (समाप्त)
मिसळपाव
प्रतिक्रिया
आग्ग्गाआगा? विश्वास घात? सरळ
धन्यवाद!
In reply to आग्ग्गाआगा? विश्वास घात? सरळ by स्पंदना
+१ असंच म्हणते , मजा आली
In reply to आग्ग्गाआगा? विश्वास घात? सरळ by स्पंदना
:)
हो. अशा कथा वाचणार्यांना हे
In reply to :) by गोगोल
अफलातून!
होय ननि, जोर का धक्का धीरेसे
वा रे पठ्ठे!
कथा जमली!
वाटलं होत बायकोच नवर्याची पध्दशीर गेम करते आहे...
आँ????
In reply to वाटलं होत बायकोच नवर्याची पध्दशीर गेम करते आहे... by आत्मशून्य
अहो असं वाटत होत की हे सर्व बायकोच नाटक आहे... नवर्याला फसवायला
In reply to आँ???? by रेवती
शेवट कैच्याकै वाटला.
वाट पहायला न लावल्यामुळे
>>शेवटी बायको दरीत पडण्याआधी
In reply to वाट पहायला न लावल्यामुळे by रेवती
चांगली जमलीये कथा. अवडली!
चांगली लिहिलीए कथा. आवडली.
छान जमली आहे.
कथेची कल्पना छान आहे पण जर जी
दगल्बाज.............
छान जमली आहे कथा.
पटकन संपवलेली छोटीशी छानशी
मस्त
डिसअपाँईंटमेंट!
-१
का हो?
In reply to -१ by सहज
मस्त............. शेवट अंदाज
आवडली. दोघांपैकी कोणीतरी कट
हा हा! खरंय! या अँगलने
In reply to आवडली. दोघांपैकी कोणीतरी कट by सविता
कायदा काहीही बोलो
In reply to हा हा! खरंय! या अँगलने by नगरीनिरंजन
कथा आवडली
छान लेखन
+१
In reply to छान लेखन by प्रास