✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

असा अनुभव फक्त पुण्यातच येऊ शकतो.

३
३_१४ विक्षिप्त अदिती यांनी
Mon, 03/14/2011 - 12:45  ·  लेख
लेख
शनिवार-रविवारी काय करायचं हा एक मोठ्ठा प्रश्न पुण्यातच चुटकीसरशी सुटतो. The King's Speech बघायचं ठरलं आणि आश्चर्य म्हणजे घराजवळच्या ई-स्क्वेअरमधे सोयीच्या वेळेत तो दाखवतही होते. पिक्चरच्या वेळेच्या वीस मिनीटं आधी जाऊन तिकीटही मिळाली. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून स्कूटर पार्किंगमधे नेण्याआधी त्यांनी पिलियन रायडरला उतरवला, मला हेल्मेट काढायला लावलं, अ‍ॅक्टीव्हाच्या सीटखालची डिकी उघडून पाहिली (हँडलमधली महत्त्वाची नसावी), आणि मगच पार्किंगमधे सोडलं. दीडचा शो वेळेतच, बरोब्बर एक वाजून सदतीस मिनीटांनी सुरू झाला. सगळं कसं, आलबेल! पिक्चर संपला आणि मी खुर्चीतून उठताना स्वतःच्याच खिशात हात घातला, किल्ली नाही. झोळीत टाकली असेल म्हणून झोळीत हात घातला, तिथेही नाही. अंधारात दिसणार नाही, चालता चालता चाचपडताना मी धडपडेन म्हणून खाली उतरल्यावर पाहिलं किल्ली नाही. "आता स्कूटर गेली असणार, इथून घरी जायचं तर रिक्षा कुठे मिळेल, बस मिळेल का, पुढचे दोन-तीन महिने सायकल चालवावी" वगैरे विचार आधीच करून झाला. तरी एकदा खात्री करण्यासाठी पार्किंगमधे आले. नक्की कुठे स्कूटर ठेवली होती हे आठवेना, तर तिथल्या माणसाने "हो, इथेच होती तुमची स्कूटर. नंबरप्लेट पहा," असा सूज्ञ सल्लाही न मागताच दिला. चालण्याचा थोडा व्यायाम केल्यावर स्कूटर दिसली आणि स्कूटरलाच ठेवलेली किल्लीही! जिथे जशी लावली होत्या तिथेच स्कूटर आणि किल्ल्या, दोन्ही तशाच होत्या! असं काही घडलं की आनंदाने मन अगदी भरून जातं. आणि निव्वळ, पुढचे दोन महिने सायकल चालवावी लागणार नाही, पोलिस चौक्यांचं पुन्हा पुन्हा दर्शन घ्यावं लागणार नाही, विसरभोळे म्हणून आपल्यावर व्यक्तीगत टीका होणार नाही इतका स्वार्थी विचारच त्यामागे नसतो. त्याही पलिकडे काहीतरी जाणवतं. हे जग सुंदर आहे असं वाटायला लागतं. माणसाच्या माणूसकीवर पुन्हा एकदा विश्वास ठेवावासा वाटतो. 'आज फिर जीने की तमन्ना है' सारखी गाणी खरोखर मनाला भिडतात. हे फक्त पुण्यातच घडू शकतं. तुम्हालाही पुण्यात मला आलेत तसे चांगले अनुभव आले असतील. o. तर कृपया ते चांगले अनुभवच लिहीणे. o. आपसातल्या भांडणांसाठी कृपया या धाग्याचा वापर करू नये, हा मुंबईच्या चाळीतला नळ नव्हे. o. पुण्याबद्दलचा धागा असला तरी पुणेरी रिक्षावाल्यांचा माजोरीपणा हा या धाग्याचा विषय आहे असं समजू नये. o. पुणेरी पाट्याही प्रेमळ असू शकतात याची कृपया जाणीव ठेवावी. o. 'आयपीएल'च्या पुणेरी पाट्या, आमचे रा.को. छोटा डॉन यांनीच लिहीलेल्या आहेत तेव्हा त्यांचा संदर्भ वापरताना निदान डान्रावांचा ॠणनिर्देश असावा.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव

प्रतिक्रिया द्या
24075 वाचन

💬 प्रतिसाद (148)

प्रतिक्रिया

हो गं, नक्की पुण्यातच होते.

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 03/14/2011 - 22:43 नवीन
हो गं, नक्की पुण्यातच होते. हवंतर त्या पार्किंगची पावती दाखवते. तू असा संशय नको गं व्यक्त करूस, मग कोणा gamjya-tamjya ना वाटतं आपलं भांडण आहे असं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

अरेच्च्या खरच कि काय? हे

रेवती
Wed, 03/16/2011 - 03:12 नवीन
अरेच्च्या खरच कि काय? हे राम(ज्या), मी माझं म्हणणं मागं घेते.;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

दुर्बिण

आनंदयात्री
Mon, 03/14/2011 - 19:04 नवीन
दुर्बिण आणि शिनेमा !!! अन तो पण थेटरात ... शिव शिव शिव. जमणा बदळ रहा है.
  • Log in or register to post comments

आंद्या असं नाही हां बोलायचं!

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 03/14/2011 - 22:42 नवीन
आंद्या असं नाही हां बोलायचं! आपण जुन्या मिपावरचे जुने मित्र ना ... मग, एवढं टाकून, घालून-पाडून नाही बोलायचं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

अपवाद...

पैसा
Mon, 03/14/2011 - 19:59 नवीन
मी आजी/माजी/भावी पुणेकर नाही, त्यामुळे पुणेकरांबद्दल अधिकारवाणीने बोलू शकत नाही पण अपवादाने नियम सिद्ध होतो असं म्हणतात.
  • Log in or register to post comments

माझाही अनुभव..

सूर्यपुत्र
Mon, 03/14/2011 - 20:01 नवीन
एकदा मी पुण्यात गेलो होतो. पण मला टिपीकल पुणेरी म्हणावा असा काहीच नुभव आला नाही. बब, असा नुभव फक्त पुण्यातच येऊ शकतो, असे म्हणायला हीही रकत नाही. ( :) / ;) ) -सूर्यपुत्र.
  • Log in or register to post comments

केवळ पुण्यातच असं घडु शकत असे

कानडाऊ योगेशु
Mon, 03/14/2011 - 20:09 नवीन
केवळ पुण्यातच असं घडु शकत असे ज्यांना वाटते त्यांनी हा ही अनुभव वाचुन पहावा.
असं काही घडलं की आनंदाने मन अगदी भरून जातं. आणि निव्वळ, पुढचे दोन महिने सायकल चालवावी लागणार नाही, पोलिस चौक्यांचं पुन्हा पुन्हा दर्शन घ्यावं लागणार नाही, विसरभोळे म्हणून आपल्यावर व्यक्तीगत टीका होणार नाही इतका स्वार्थी विचारच त्यामागे नसतो. त्याही पलिकडे काहीतरी जाणवतं. हे जग सुंदर आहे असं वाटायला लागतं. माणसाच्या माणूसकीवर पुन्हा एकदा विश्वास ठेवावासा वाटतो. 'आज फिर जीने की तमन्ना है' सारखी गाणी खरोखर मनाला भिडतात.
अगदी सहमत.(शेवटची ओळ मुद्दामच काढली आहे.)
  • Log in or register to post comments

प्र. का. टा आ.

मनीषा
Mon, 03/14/2011 - 21:15 नवीन
प्र. का. टा आ.
  • Log in or register to post comments

गॉग

अप्पा जोगळेकर
Mon, 03/14/2011 - 23:00 नवीन
अकारण तोंडाला बांधलेली फडकी, गॉगल आणि फालतू गोष्टींचा अभिमान याव्यतिरिक्त उल्लेख करावा अस काहीच पुण्यामध्ये सापडत नाही.
  • Log in or register to post comments

+100000000

नन्दादीप
Tue, 03/15/2011 - 19:00 नवीन
+100000000
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

अकारण तोंडाला बांधलेली फडकी,

नि३
Tue, 03/15/2011 - 19:17 नवीन
अकारण तोंडाला बांधलेली फडकी, गॉगल म्हणजे त्यामागील कारण कळालेच नाही म्हणता तुम्हाला?? अधीक माहीतीसाठी ओव्हर टु टारझन..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

चोरी करायला आलेला इसम मिपा चा वाचक

एक
Tue, 03/15/2011 - 21:34 नवीन
आणि अस्सल पुणेरी असणार.. त्याने विचार केला कि समजा मी गाडी चोरली तर या बाई घरात पाऊल ठेवल्या ठेवल्या मिपा वर "पुण्यातल्या ताज्या अनुभवावर" लेख लिहिणार. मग मिपावर सगळे नामांकित येउन आपल्या पुण्याला शिव्या घालणार (आयतं कोलीत, दुसरं काय?). नकोच ते. हि गाडी सोडून देउ. दुसर्या बर्याच चांगल्या मिळतील. शिवाय चोरांच थोडं वाघा-सिंहा सारखं असेल. आयती शिकार (चावी लावून ठेवलेली) का खावी? कशावरून ही स्कुटर म्हणजे "हाकेचं बकरं " नसेल. मचाणावर लेखिकेने लेख लिहूनपण ठेवला असेल. आपण हात मारायचा अवकाश त्या तिकडे "सबमिट" चं बटण लगेच दाबतील. प्रतिसादाचं वजन हलकं आहे. तो तेव्ढ्याच मापात घेणे.. -एक पुणेकर.
  • Log in or register to post comments

आपल्या नावाईतुके नंबर या

वपाडाव
Wed, 03/16/2011 - 14:22 नवीन
आपल्या नावाईतुके नंबर या प्रतिसादाला..... जब्रा....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक

आमचा अनुभव.

अडगळ
Wed, 03/16/2011 - 02:21 नवीन
त्या पोरगीनं गाडी लावली आणि किल्ली न घेता गेली .म्हटलं की आता पंधरा दिवस रोज दारु - चिकन .दारु - चिकन.दारु - चिकन. कोण न्हाई ते बघुन गेलो , किल्ली फिरवाय गेलो तर शीटवर बोका. गाडीला हात बी लावू दिला नाही . वस्सकन अंगावर यायचा. गाडी हालवून , वाकडी करुन बघितली , कुत्र्यागत भुकून बी बघितलं . हालना बी झाल्तं. लै बाराचं बेनं. जाऊ दे च्यायला. सायकल तर सायकल .पलिकडं आणि एक यडं सायकल गेल्तं सोडून .किल्लीसकट.
  • Log in or register to post comments

मी तर त्याही पुढं जाऊन

रेवती
Wed, 03/16/2011 - 03:23 नवीन
मी तर त्याही पुढं जाऊन बोक्याच्या पाठीत काठी घातली, तरी हालेना. मग त्याला घेऊनच निघाले.......ट्रॅफिकमधून वाट काढता येइना.....मग पोलिसमामा दिसले.....माझी चूक कबूल करून गाडी पुन्हा शिनेमा संपायच्या आत जाग्यावर नेवून लावली. मामानं पोलिस ठेसनात नेऊ नै म्हणून त्याना एक शिनेमाचं तिकिट काढून दिलं नी पुन्हा म्हणून चोरी करायची नै असं ठरवलं. बरेच पैशे अक्कलखाती टाकून घरी परत्....तेही रिक्षानं.;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अडगळ

हाय कंबख्त!

पंगा
Wed, 03/16/2011 - 17:27 नवीन
पलिकडं आणि एक यडं सायकल गेल्तं सोडून .किल्लीसकट.
??????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अडगळ

काय कंबख्त ????

अडगळ
गुरुवार, 03/17/2011 - 02:08 नवीन
?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

हम्म्म्म्...

पंगा
गुरुवार, 03/17/2011 - 08:18 नवीन
...काही नाही. जाऊ द्या. (पुण्यात सायकल चालवून बरीच वर्षे झाली. त्यामुळे, सायकलचे कुलूप उघडल्यावर त्यात किल्ली तशीच अडकून बसते की बाहेर निघते हे या क्षणी नक्की आठवत नाही. बाहेर निघत असावी या धारणेखाली प्रतिसाद लिहिला, त्यामुळे '(एकदा कुलूप उघडल्यावर) सायकलला किल्ली कोण लावून ठेवतो, रादर कशाला लावून ठेवावी लागते' असे विचारणार होतो. पण आता विचार केला तर कदाचित माझेच चुकलेले असू शकेल असे वाटते. चूभूद्याघ्या.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अडगळ

काही कुलपं तशी असतात. कुलुप

Nile
गुरुवार, 03/17/2011 - 11:00 नवीन
काही कुलपं तशी असतात. कुलुप लॉक होताना एक खटका होउ कीली आपोआप (ऑलमोस्ट) फिरुन निघत असे. पण साधी खटका नसलेली कुलुपंही मिळतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

तुम्हाला बरीच माहिती

शिल्पा ब
गुरुवार, 03/17/2011 - 11:03 नवीन
तुम्हाला बरीच माहिती कुलुपान्बद्दल...आधी काय कुलूपतोडे होता का? ;) नाही पांढर्‍या शाईत लिहिलंय म्हणुन विचारलं!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

तुम्हाला ब्वॉ भलत्याच चौकशा..

Nile
गुरुवार, 03/17/2011 - 11:21 नवीन
आमच्या कडं लै कुलपाच्या किल्ल्या असायच्या म्हणुन माहिती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

सायकल चोरीवरुन आठवलं

इंटरनेटस्नेही
गुरुवार, 03/17/2011 - 12:17 नवीन
हल्लीच माझी सायकल चोरीला गेली. आणि नंतर एकदा रात्री पाणवठ्यावरुन परतत असताना सोसायटीत आलो (तेव्हा साधारण २.३० ए एम वाजले होते) बघतो तर काय, एक माणुस अगदी निर्धास्तपणे आमच्या इमारतीच्या लॉबीमध्ये झोपला होता.. सरळ १०० ला फोन केला.. आणी त्याची अशी काही तक्रार केली केली पोलिस साधारण १० मिनिटांत आले त्यांच्या क्वालिस मधुन आणि त्याची बॅग उघडुन बघितली त्यांनी.. बघतात तर काय, त्यात त्यांना एक स्क्रुड्रायव्हर मिळाला.. (माझ्या महिती प्रमाणे एनी इम्प्लीमेंट ऑफ हाउसब्रेकिंग, विदाऊट ए लॉफुल एक्सयुझ सोबत बाळगल्यास, आणि पोलिस अधिकार्‍यांना संशयास्पद वाटल्यास ते सदर व्यक्तीस वॉरंट शिवाय अटक करु शकतात पहा: क्रि.प्रो.कोड) पोलिसांणी लै दणादण तुडवला त्याला, काठी आणि हातांनी, लै विव्हळत होता (लोकांच्या सायकली चोरताना काही वाटत नाही!) १ सहायक आयुक्त, १ पोलिस निरीक्षक, २ उपनिरीक्षक आणि ३ पोलिस हवालदार एवढी मोठी ७ जणांची पोलिस टीम आली होती.. या सर्वांनी मिळुन त्याला ५० तरी फटके लगवाले असतील.. नंतर त्याला ते घेऊन गेले. बहुतेक अजुन चोप देण्यासाठी! लै मज्जा आली.. साला, माझी सायकल यानेच चोरली असणार.. चांगली अद्दल घडली!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

इंट्या, अरे नीट पाह्यलंस ना.

वपाडाव
गुरुवार, 03/17/2011 - 17:21 नवीन
इंट्या, अरे नीट पाह्यलंस ना. कदाचित ते Nile निघायचे. असं का मार देतं कुणी आपल्या जालमित्राला. ह. घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही

=)) =)) =)) =)) =)) =)) =))

इंटरनेटस्नेही
Fri, 03/18/2011 - 01:05 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

आभार

पंगा
गुरुवार, 03/17/2011 - 11:04 नवीन
माहितीसाठी धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

चौथे शतक

सहज
Wed, 03/16/2011 - 06:51 नवीन
पुनश्च अभिनंदन! पा.श.शु.
  • Log in or register to post comments

पाचव्या शतकास शुभेच्छाच्या

Nile
Wed, 03/16/2011 - 07:11 नवीन
पाचव्या शतकास शुभेच्छाच्या आडुन पाशवी शक्त्यांना शुभेच्छा देण्याच्या मनसुबा लपलेला नाही इतकी नोंद करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

अभीनंदन अभीनंदन

चिंतामणी
Wed, 03/16/2011 - 10:12 नवीन
शतकाबद्दल (मिपास्टाईलने) हबीणंदन यावरुन तुमची गाडी किती भंगार आहे ते समजलं. चोरांनी सुद्धा हात लावला नाही. बाकी , आम्ही मल्टीप्लेक्सात जावुन ईंग्रजी चित्रपट वगैरै पहातो हे दाखविण्याचा क्षीण प्रयत्न मला वाटत तुमची काहीतरी चूक होत असावी. पेट्रोल चेक केल होत का??? किल्ली विसरणारी व्यक्ती नंबर मात्र लक्षात ठेवेल याबद्दल माझ्या मनात शंका आहे. चोरांचेही काही उसूल असणारच. आपण आत्ता आत्तापर्यंत हिरव्या देशात होता आणि एकदम मातृभुमीला पोहोचलात हे सांगण्यासाठी लेखन केल्याचे बघून ड्वले पाणावले. या सारख्या वैयक्तीक शेरेबाजी बरोबरच पुणे आणि पुणेकरद्वेष्ट्यांना धैर्याने तोंड देत केलेल्या शतकाबद्दल अभीनंदन.
  • Log in or register to post comments

हाहा!

चित्रा
Wed, 03/16/2011 - 18:58 नवीन
या सारख्या वैयक्तीक शेरेबाजी बरोबरच पुणे आणि पुणेकरद्वेष्ट्यांना धैर्याने तोंड देत केलेल्या शतकाबद्दल अभीनंदन. असेच म्हणते. :) पुण्यातले अनुभव चांगले असे सांगायचे तर आठवावे लागते बुवा. पुण्याची नशा थोडी हळू हळू चढते असे वाटते. मागे एक चांगला रिक्षावालाही भेटला होता, नवसह्याद्रीच्या भागात जाताना, रिक्षा लकडीपुलावरून घेऊ का मधून कुठूनतरी (मला वाटते पत्रकार भवन (का जे काही आहे ते?). असा प्रश्न विचारला की अनेकदा आपण फसले जाण्याच्या मार्गाला लागणार असे नक्की होऊ लागते (आपण शहरात नवीन आहोत असे दिसले की कुठच्याही रस्त्यांमधून गरागरा मीटर वाढवत फिरवणे सोपे जाते), असा प्रश्न न विचारता त्याने रिक्षा व्यवस्थित चालवली. एवढीच अपेक्षा असते ती त्याने पूर्ण केली, तेव्हा हा अनुभव चांगलाच म्हणायला पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

काय जमल नाय बा,कायतरी नवीन

pramanik
Wed, 03/16/2011 - 21:22 नवीन
काय जमल नाय बा,कायतरी नवीन शोधा पुन्याच्या बढाया मारायला, मी दोन वर्षे राहीलो पुन्यात,नंतर गुजरातमधे व आता मुंबईत्,त्यात सुरत बेस्ट हाय.
  • Log in or register to post comments

असाही अनुभव

विकास
Wed, 03/16/2011 - 23:32 नवीन
बहुतेक वेळेस पुण्यातल्या ५-६ रिक्षेवाल्यांना थांबवायचा प्रयत्न केला तर सातवा थांबून विचारतो आणि नववा येयला तयार होतो. पण तो दिवस वेगळाच होता... मी आमच्या घराच्या जवळील चौकात गेलो काय आणि एक रिक्षेवाला आपणहून थांबला आणि म्हणाला ,"साहेब कुठे जायच्यं?". म्हणलं "रिक्षा खाली आहे का?" तो हसत म्हणाला, "अहो म्हणूनच तर विचारतोय ना!" मी गोंधळलो, म्हणलं "जाऊंदेत कदाचीत ते तुझ्या एरीयाच्या बाहेरचे असेल". तो उत्तरला, "अहो आम्हाला परवाना मिळतो, तेंव्हा आम्ही हे मान्यच केलेले असते की कुठेही जावे लागेल. आम्ही प्रवाशांसाठी आहोत, प्रवासी आमच्यासाठी नाही!" माझ्या (कृतज्ञतेने) ओलावलेल्या डोळ्यांच्या कडा लपवत मी म्हणले, "मला औंधला जायचे आहे" तो: "मग चला की" आणि मिटर पाडला.., "साहेब कुठच्या बाजूने नेऊ? 'इकडून' का 'तिकडून' " माझ्यातला अनुभवी जागा झाला, मनात म्हणलं आता कुठूनही म्हणले तर समजेल की आपल्याला माहीत नाही. म्हणल, "इथून ने". "अहो साहेब, तो रस्ता लांबचा हाय. मी तिथून नेतो, तिथे सिग्नल्स पण कमी असतात आणि रस्ता पण शॉर्ट हाय. फक्त जरा दोनचार खड्डे लागतील तेव्हढे सांभाळून घ्या" मला वास्तवीक अर्धातास लागेल असे सांगण्यात आले होते पण या पठ्ठ्याने २० मिनीटात पोचवले! मिटर बघितला, तेव्हढ्यात त्याने कार्ड काढून सांगितले, "८८.५० झाले" मी शंभराची नोट हातात ठेवत म्हणालो की काय पाच-दहा परत केलेस तरी चालतील... "नाही साहेब, तसे नाही, हे घ्या साडे अकरा रुपये". "अरे दोन-चार रुपये ठेव तुझ्याकडे" असे माझ्या तोंडातून आपसूक पडले... "नाही साहेब, ते माझ्या तत्वात बसत नाही!" मनात म्हणलं, चला! किमान अशा तत्वामुळे का होईना हा पुणेकर आहे याची खात्री पटली! तेव्हढ्यात "धन्यवाद" म्हणत, त्याने रिक्षा परत चालू केली होती आणि डोळ्यासमोर निघूनही गेला. त्या रिक्षेच्या मागून येणार्‍या धुराकडे बघत माझे विचारही हवेत तरंगत होते आणि कधी एकदा हे घरच्यांना सांगतो की सगळेच काही "तसे" नसतात, असे झाले होते. तितक्यात, "विकास, ए विकास" ऐकायला आले. म्हणून उत्साहाने बायकोस सांगायला गेलो, पण तितक्यात तिच्याकडूनच ऐकावे लागले, "उठ, आपल्याला नऊ पर्यंत औंधला पोचायचे आहे. रिक्षा मिळायला किमान अर्धा तास तरी लागतो हे लक्षात असुंदेत!" :( असाही अनुभव पुण्यात येऊ शकतो!
  • Log in or register to post comments

हॅ हॅ हॅ...हा प्रतिसाद लै

शिल्पा ब
Wed, 03/16/2011 - 23:42 नवीन
हॅ हॅ हॅ...हा प्रतिसाद लै भारी!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

मला असलं स्वप्न पडलं असतं तर

रेवती
Wed, 03/16/2011 - 23:52 नवीन
मला असलं स्वप्न पडलं असतं तर दचकून जाग आली असती.;) एखादा खरच चांगला रिक्षावाला भेटला तरी अविश्वासानं त्याला चार शिव्या घालून "कसले नाटकी असतात मेले!" म्हणून आम्ही घरी येतो. तुम्हाला इतकी सकारात्मक स्वप्नं पडतात म्हणजे तुम्ही मुळचे पुणेकर नसणार असे वाटते. आपल्या पत्नी तरी पुणेकर आहेत काय? असतील तर त्यांना विचारा सग्गळं सांगतील.;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

अरे बापरे

चित्रा
गुरुवार, 03/17/2011 - 06:50 नवीन
पुणेकर एवढे आत्मपरिक्षण करणारे असतात हे माहिती नव्हते. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

कळ्ळं हो कळ्ळ!

रेवती
गुरुवार, 03/17/2011 - 18:22 नवीन
कळ्ळं हो कळ्ळ!;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

विकासभौंना असं स्वप्न पडलं

Nile
गुरुवार, 03/17/2011 - 02:54 नवीन
विकासभौंना असं स्वप्न पडलं म्हणजे ते नक्कीच पुण्याच्या बाहेरचे असले पाहिजेत! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

मागे एकदा पुण्यात आलो होतो

निनाद मुक्काम …
गुरुवार, 03/17/2011 - 01:14 नवीन
मागे एकदा पुण्यात आलो होतो तेव्हा स्टेशन वरून चिंतामणी ह्यांना फोन केला व'' रिक्षावाल्याला किती पैसे .. अनु का द्यायचे'' हे रिक्षावाल्या समोर विचारले . आता अस्सल पुणेकराकडून मी हा सल्ला घेतला . आणी त्यांच्याच घरी चाललो आहे .असे समजून रिक्षावाल्याने माझ्या कडून मी देईन तेवढेच म्हणजे आधी ठरले तेवढे पैसे पेठेत जाण्यासाठी घेतले . व त्याचं संध्याकाळी घरी जातांना पुणेकरांनी आपल्या गाडीतून मला मुंबईची बस पकडण्या साठी इच्छित स्थळी सोडले . .इतके नव्हे तर बस सुटली पाहून तिचा आम्ही पाठलाग गेला व तिला थांबवून मला बस मध्ये चढवले . थोडक्यात पुणेकरांचा इतक्याच आलेला हा चांगला अनुभव येथे नमूद करत आहे . ((भविष्यात युरो च्या जीवावर पुण्यनगरीत घरकुल एक गुंतवणूक म्हणून घेण्याच्या विचारात असलेला भविष्यातील नव अनिवासी पुणेकर मुक्काम पोस्ट........ )
  • Log in or register to post comments

युरो च्या जीवावर पुण्यनगरीत ...

कुंदन
गुरुवार, 03/17/2011 - 01:59 नवीन
असं म्हणताय... ठाणे मार्गे जाउ नका फक्त....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

पुणेकरांना चांगलं

रेवती
गुरुवार, 03/17/2011 - 02:50 नवीन
पुणेकरांना चांगलं म्हणताय. किती चांगले आहात हो निनाद मु. पो. ज. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

आदितीतै, यापुढे गाडीवर पत्ता

अभिज्ञ
गुरुवार, 03/17/2011 - 11:33 नवीन
आदितीतै, यापुढे गाडीवर पत्ता लिहून ठेवत चला,म्हणजे गाडि थेट घरच्या पत्त्यावरच पोहोचवलि जाईल. :) (पुणेकर) अभिज्ञ.
  • Log in or register to post comments

आम्हाला ल्हानपनी खालील

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 03/17/2011 - 16:40 नवीन
आम्हाला ल्हानपनी खालील गोष्टींसाठी पुने आवडायचे १) चहात पाव बुडवुन खायला भेटतो २) केक क्रिमरोल खायला भेटतो; आईस्क्रिम खायला भेटते. ३) पुन्यात डांबरी रस्ते आहेत ४) पुन्यात शिमिंट ची घरे आहेत ५) वेगवेगळ्या रंगाच्या ट्युबलाईटीच्या पाट्या आहेत ६) पुन्यात नळाला लई जोरात पानी येते ७) पुन्यात भरजारी पोषाखाचे ब्यांडवाले आहेत ८) पुन्यात रहरदारी हाकायला पोलिस असतो. ९) पुन्यात रिक्षा आहेत . . . ( आता पुनेरी)
  • Log in or register to post comments

पुने तिथे काय उने

इरसाल
गुरुवार, 03/17/2011 - 21:27 नवीन
पुने तिथे काय उने
  • Log in or register to post comments

पुन्याला पन लै उन ए... -(काही

वपाडाव
Fri, 03/18/2011 - 11:36 नवीन
पुन्याला पन लै उन ए... -(काही दिसात हुनाळ्यामुळे त्रस्त होणारा) वपाडाव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

अरे

रमताराम
गुरुवार, 03/17/2011 - 22:31 नवीन
काय गडबड आहे रे पोरांनो. मला जरा सुखाने जगू द्याल की नाही.
  • Log in or register to post comments

अजुन चालुच ए का?

शिल्पा ब
गुरुवार, 03/17/2011 - 22:34 नवीन
अजुन चालुच ए का?
  • Log in or register to post comments

चांगला

भवानी तीर्थंकर
गुरुवार, 03/17/2011 - 23:26 नवीन
चांगला लिहिला आहे हा अनुभव. मला तरी आवडला बाई. इतरांना काय म्हणायचं असेल ते म्हणोत.
  • Log in or register to post comments

तुम्ही?

पैसा
गुरुवार, 03/17/2011 - 23:35 नवीन
आलात का तुम्ही? तुमच्या डायरीतली पानं नोव्हेंबरपासून वाचतोय आम्ही!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भवानी तीर्थंकर

हो ना...

भवानी तीर्थंकर
Fri, 03/18/2011 - 00:16 नवीन
हो ना. अहो, झालं काय की, मागे एकदा काही कामानिमित्त युनिकोडमधून गुगल सर्च कसं होतं हे पाहण्यासाठी माझंच नाव देवनागरीत टाकलं आणि सर्च केला. तर तिथं बऱ्याच पानांमागं हे लेखन दिसलं. मग मी मिसळपाववर आले. 'माझ्या'च डायरीतलं पान पाहून हरखूनच गेले अगदी. मग ठरवलं आपणही इथं सदस्य व्हायचं. त्यानुसार सदस्य झाले. पण नंतर पुन्हा इथं येण्यास वेळच मिळत नव्हता. आज वेळ मिळाला आणि 'माझ्या' डायरीतलं पान लिहिणाऱ्या अदिती यांचाच लेख समोर दिसला. त्यात तो पुण्यावरचा. म्हणून तो वाचून काढला. तसंच नंदन यांची एक कविताही वाचली. खूप आवडली. मीही असंच काही लिहीन म्हणते. पाहू, कसा वेळ मिळतो ते. बरं, त्या स्मायली कशा टाकतात? आणि ती हायपरलिंकही कशी देतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा