असा अनुभव फक्त पुण्यातच येऊ शकतो.
शनिवार-रविवारी काय करायचं हा एक मोठ्ठा प्रश्न पुण्यातच चुटकीसरशी सुटतो. The King's Speech बघायचं ठरलं आणि आश्चर्य म्हणजे घराजवळच्या ई-स्क्वेअरमधे सोयीच्या वेळेत तो दाखवतही होते. पिक्चरच्या वेळेच्या वीस मिनीटं आधी जाऊन तिकीटही मिळाली. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून स्कूटर पार्किंगमधे नेण्याआधी त्यांनी पिलियन रायडरला उतरवला, मला हेल्मेट काढायला लावलं, अॅक्टीव्हाच्या सीटखालची डिकी उघडून पाहिली (हँडलमधली महत्त्वाची नसावी), आणि मगच पार्किंगमधे सोडलं. दीडचा शो वेळेतच, बरोब्बर एक वाजून सदतीस मिनीटांनी सुरू झाला. सगळं कसं, आलबेल! पिक्चर संपला आणि मी खुर्चीतून उठताना स्वतःच्याच खिशात हात घातला, किल्ली नाही. झोळीत टाकली असेल म्हणून झोळीत हात घातला, तिथेही नाही. अंधारात दिसणार नाही, चालता चालता चाचपडताना मी धडपडेन म्हणून खाली उतरल्यावर पाहिलं किल्ली नाही. "आता स्कूटर गेली असणार, इथून घरी जायचं तर रिक्षा कुठे मिळेल, बस मिळेल का, पुढचे दोन-तीन महिने सायकल चालवावी" वगैरे विचार आधीच करून झाला. तरी एकदा खात्री करण्यासाठी पार्किंगमधे आले. नक्की कुठे स्कूटर ठेवली होती हे आठवेना, तर तिथल्या माणसाने "हो, इथेच होती तुमची स्कूटर. नंबरप्लेट पहा," असा सूज्ञ सल्लाही न मागताच दिला. चालण्याचा थोडा व्यायाम केल्यावर स्कूटर दिसली आणि स्कूटरलाच ठेवलेली किल्लीही! जिथे जशी लावली होत्या तिथेच स्कूटर आणि किल्ल्या, दोन्ही तशाच होत्या!
असं काही घडलं की आनंदाने मन अगदी भरून जातं. आणि निव्वळ, पुढचे दोन महिने सायकल चालवावी लागणार नाही, पोलिस चौक्यांचं पुन्हा पुन्हा दर्शन घ्यावं लागणार नाही, विसरभोळे म्हणून आपल्यावर व्यक्तीगत टीका होणार नाही इतका स्वार्थी विचारच त्यामागे नसतो. त्याही पलिकडे काहीतरी जाणवतं. हे जग सुंदर आहे असं वाटायला लागतं. माणसाच्या माणूसकीवर पुन्हा एकदा विश्वास ठेवावासा वाटतो. 'आज फिर जीने की तमन्ना है' सारखी गाणी खरोखर मनाला भिडतात. हे फक्त पुण्यातच घडू शकतं.
तुम्हालाही पुण्यात मला आलेत तसे चांगले अनुभव आले असतील.
o. तर कृपया ते चांगले अनुभवच लिहीणे.
o. आपसातल्या भांडणांसाठी कृपया या धाग्याचा वापर करू नये, हा मुंबईच्या चाळीतला नळ नव्हे.
o. पुण्याबद्दलचा धागा असला तरी पुणेरी रिक्षावाल्यांचा माजोरीपणा हा या धाग्याचा विषय आहे असं समजू नये.
o. पुणेरी पाट्याही प्रेमळ असू शकतात याची कृपया जाणीव ठेवावी.
o. 'आयपीएल'च्या पुणेरी पाट्या, आमचे रा.को. छोटा डॉन यांनीच लिहीलेल्या आहेत तेव्हा त्यांचा संदर्भ वापरताना निदान डान्रावांचा ॠणनिर्देश असावा.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हो गं, नक्की पुण्यातच होते.
अरेच्च्या खरच कि काय? हे
दुर्बिण
आंद्या असं नाही हां बोलायचं!
अपवाद...
माझाही अनुभव..
केवळ पुण्यातच असं घडु शकत असे
प्र. का. टा आ.
गॉग
+100000000
अकारण तोंडाला बांधलेली फडकी,
चोरी करायला आलेला इसम मिपा चा वाचक
आपल्या नावाईतुके नंबर या
आमचा अनुभव.
मी तर त्याही पुढं जाऊन
हाय कंबख्त!
काय कंबख्त ????
हम्म्म्म्...
काही कुलपं तशी असतात. कुलुप
तुम्हाला बरीच माहिती
तुम्हाला ब्वॉ भलत्याच चौकशा..
सायकल चोरीवरुन आठवलं
इंट्या, अरे नीट पाह्यलंस ना.
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
आभार
चौथे शतक
पाचव्या शतकास शुभेच्छाच्या
अभीनंदन अभीनंदन
हाहा!
काय जमल नाय बा,कायतरी नवीन
असाही अनुभव
हॅ हॅ हॅ...हा प्रतिसाद लै
मला असलं स्वप्न पडलं असतं तर
अरे बापरे
कळ्ळं हो कळ्ळ!
विकासभौंना असं स्वप्न पडलं
मागे एकदा पुण्यात आलो होतो
युरो च्या जीवावर पुण्यनगरीत ...
पुणेकरांना चांगलं
आदितीतै, यापुढे गाडीवर पत्ता
आम्हाला ल्हानपनी खालील
पुने तिथे काय उने
पुन्याला पन लै उन ए... -(काही
अरे
अजुन चालुच ए का?
चांगला
तुम्ही?
हो ना...