Skip to main content

जैतापूर हवे का?

लेखक युयुत्सु यांनी शनिवार, 12/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
जपान सारखा देश निसर्गाच्या प्रकोपापुढे हतबल झाला. अणु - ऊर्जा निर्मितिकेंद्राच्या सुरक्षेच्या बाबतीत हरला. आम्ही भारतीय मानव निर्मित स्कॅमपुढे हरलो. स्कॅम्सची अद्वितीय परंपरा असलेल्या देशात जैतापूर सारखा प्रकल्प निर्धोक होइल काय? जपानला जे जमले नाही ते भारताला जमेल काय?

वाचने 10842
प्रतिक्रिया 58

प्रतिक्रिया

नाव वाचून गल्ली (प्रकार) चुकला का असे वाटले. आधी वाटले होते "कौल" असावा. पण टॉपीक एव्हढ्या कमी ओळीत मांडला आहे ते पाहून निराश झालो.

भविष्यात त्याचा फायदाच होइल

जपानला जे जमले नाही ते भारताला जमेल काय? जपानला जे जमले नाही ते भारताला करुन दाखवण्याची सोन्यासारखी संधि का घालवता? पुढची पिढी छाति फुगवुन सांगेल.. होय आमच्या पुर्वजांनी हे केले...

In reply to by अविनाशकुलकर्णी

दुर्दम्य आशावाद.... पण हे होण्यासाठी आधी कोणीतरी बाहेरच्याने 'भारतीय हे करू शकतात' हे म्हणणे गरजेचे आहे. क्लिंटनने सांगितल्यावर आपल्याला कळलं की आपण एक आर्थिक महासत्ता होऊ शकतो, सारकोजीने सांगितले तेव्हा आपण नागरी उपयोगांसाठी अणूऊर्जा वापरू लागलो (अलिकडच्या काळात).... दुरदृष्टी असलेले होमी भाभांसारखे लोक फारच कमी आहेत राव देशात आपल्या. भारताने कशात गुंतवणूक करावी? चांद की सतेह का अध्ययन करणार्‍या यानात की कमीत कमी इंधनात जास्तीत जास्त अंतर धावणार्‍या गाड्यांच्या संशोधनात? ध्रुवीय प्रदेशांमधील संशोधनात की तिन्ही सैन्यदलांत देशाला स्वयंपूर्णतेकडे नेणार्‍या संसाधनांच्या आविष्कारात? दुरदृष्टी असलेल्या लोकांचा खरंच अभाव आहे आपल्याकडे.... भारी समर्थ

In reply to by भारी समर्थ

दुरदृष्टी असलेले होमी भाभांसारखे लोक फारच कमी आहेत राव देशात आपल्या. तसे वाटत नाही. पण अशा दूरदृष्टी असलेल्यांना सत्तेच्या आणि पैशाच्या राजकारणात कोणी जवळ करत नाही. म्हणून ते जिथे शक्य असेल तेथे स्वतःचे काम करत, यातून पुढेकाही चांगले निष्पन्न होऊ शकेल असा आशावाद ठेवत कर्म करत रहातात... भारताने कशात गुंतवणूक करावी? चांद की सतेह का अध्ययन करणार्‍या यानात की कमीत कमी इंधनात जास्तीत जास्त अंतर धावणार्‍या गाड्यांच्या संशोधनात? ध्रुवीय प्रदेशांमधील संशोधनात की तिन्ही सैन्यदलांत देशाला स्वयंपूर्णतेकडे नेणार्‍या संसाधनांच्या आविष्कारात? सगळ्यात. अर्थात समान म्हणत नाही आहे. प्राधान्य बदलू शकते. बाकी चालूंदेत.

जपान हा देश भूकंप अतिप्रवण क्षेत्रात येतो. तिथे भयानक भूकंप झाले , होत आणि होणार आहेत हे तिथल्या जनतेला,सरकारला आणि योजनाकारांना चांगलेच माहीत आहे. तरीही तिथे महाकाय अणु ऊर्जाप्रकल्प तसेच इतरही अवजड उद्योग उभारले गेले आहेत. जैतापूर्-माडबनला भूकंपाची शक्यता खूपच कमी आहे. योग्य ती भूकंपनिरोधक व्यवस्था आणि इतरही सुरक्षाव्यवस्था राबवून योग्य नियोजनाने प्रकल्प उभारला जावा. अर्थात नियोजनकारांनी त्यांच्या आराखड्यात ह्या सर्व बाबींचा समावेश केलाच असेल. नक्की माहिती नाही.

In reply to by राही

जैतापूर्-माडबनला भूकंपाची शक्यता खूपच कमी आहे.
वरील नकाशा हा विकीवरून घेतलेला आहे. त्यात बघितल्यास लक्षात येईल की हा भाग किमान "मॉडरेट" आणि कमाल "हाय" अशा भूकंपप्रवण क्षेत्रात येतो.

In reply to by विकास

जैतापूर प्रकल्पविरोधका॑नी मिळ्वलेल्या माहीतीच्या अधीकारात मागील २० वर्षात जैतापूर आणि परीसरात ९१ भूक॑पाचे धक्के बसले आहेत.सन १९९३ मध्ये सर्वात मोठा म्ह्णजेच ६.३ रिस्टर स्केल एवढा धक्का बसला आहे.तसेच जिऑलॉजीकल सर्वे ऑफ इ॑डिया च्यानुसार जैतापूर क्षेत्र हे भूक॑पप्रवण क्षेत्र ४ मध्ये येते. त्यामुळे भविष्यात प्रकल्पावर भूक॑पाचे सावट असणारच.

In reply to by विकास

कोयनानगर, जो नेहमी एपिसेंटर असतो, त्याच्यापासून १००-१२५ किमी च्या त्रिज्जेत कोकणाचा बराचसा भाग येतो.

In reply to by विकास

जर्मनीनेही त्यांच्या अणूभट्ट्यांविषयी पुनःविचार सुरू केला आहे, अशी बातमी आहे. अँजेला मर्कल म्हणते की जपानमधील [ह्या संदर्भातील] घटना ह्या विशेष (watershed) स्वरूपाच्या आहेत, तेव्हा आम्ही 'काहीच जणू झालेले नाही' अशा तर्‍हेने [आमच्या निर्धारीत मार्गावर] पुढे जाऊ शकत नाही. गेल्या हिवाळ्यातच मर्कलच्या सरकारने तेथील अणूभट्ट्यांचे कार्य अगोदर ठरवलेल्या काळापे़क्षा (२०२२ पर्यंत) सुमारे १२ वर्षांनी वाढवायची घोषणा केली होती,

In reply to by प्रदीप

आज संध्याकाळी आम्ही व आमचे कुटुंब ह्या विरोधात आमच्या शहरात विराट मोर्चा निघणार आहे .त्यामध्ये सहभागी व्हायला चाललो आहोत . आमच्या विभागातील काही मान्यवरांनी सोशल नेटवर्क मधून आम्हास संपर्क केला . अर्थात सहमती बनल्याने आम्ही मोर्च्यात येऊ म्हटले . अर्थात मोर्चा अहिंसक मार्गाने जाणार असेल तरच सहभागी होऊ कारण ''मी गांधींच्या देशातला आहे'' . ह्याचा विशेष परिणाम होऊन बहुदा स्वतःहून फोन आला . '' मूळ उद्देश जपानमधील आण्विक पीडित व इतर मृत व्यक्तीस आदरांजली वाहणे. व ह्याच मुद्यावर पुढे सरकारच्या निर्णयाचा विरोध करणे'' .. त्यांचा अणू उर्जेस विरोध आहे .तर आपल्या येथे विरोध प्रकल्पाच्या जागेवर, पर्यावरण व इतर मुद्दे आहेत .
त्यांच्यात व आपल्या एकंदर परिस्थितीत फरक म्हणजे ''आपल्याकडे विजेच्या बाबतीत म्हटले तर कुपोषण तर ह्यांच्याकडे अती लठ्ठता'' त्यामुळे अपारंपरिक उर्जेचा पर्याय आम्हास येथे योग्य वाटतो. भारतात मात्र असलेल्या विजेच्या प्रचंड विषमतेमुळे अणू उर्जेस पर्याय नाही .( ह्यावर भारतात कुणाचेच दुमत नाही .)

अणुस्फोटापेक्षा त्सुनामीची अधिक भिती आहे. त्यामुळे जैतापुर प्रथम समुद्र किनार्‍यावरुन हलवुन भारताच्या अंतर्गत भागात घेता येते का ते प्रथम पाहिले पाहिजे.

In reply to by वेताळ

>> जैतापुर प्रथम समुद्र किनार्‍यावरुन हलवुन भारताच्या अंतर्गत भागात घेता येते का ते प्रथम पाहिले पाहिजे अख्खे जैतापूरच हलवायचे म्हणता ? बाकीची शहरे आणि गावे पण अशाच प्रकारे हलवता येतील का हो ?? मुंबई थोड्या थंड ठिकाणी नेता येईल का ???

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

सहमत.. आणि पुणे समुद्रात कुठेतरी हलवा. म्हणजे पुणेकरांचा त्रास इतरांना नको. ;)

In reply to by बिपिन कार्यकर्ते

हे आले दुबैचे शेख लगेच विकत घ्यायला. तुम्हाला नाय देणार हो, एकवेळ बंद करुन तिथे युयुत्सुंचे भविष्यकेंद्र सुरु करु पण तुम्हाला जैतापुर देणार नाही!!!

.आता तर प्रकल्प झालाच पायजेल........

शिवसेनेचे जैतापूर प्रकल्पाला ‘चले जाव’! जपानसारखा विनाश कोकणात होऊ देणार नाही मुंबई, दि. 12 (विशेष प्रतिनिधी) - अणुऊर्जा प्रकल्पामुळे जपानमध्ये झालेला संहार अख्ख्या जगाने पाहिला. असा विध्वंस कोकणात होऊ देणार नाही असे बजावतानाच जैतापुरात विनाशकारी अणुऊर्जा प्रकल्पाची वीटही रचू देणार नाही असा जबरदस्त इशारा शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. मी स्वत: लवकरच जैतापुरात जाणार आहे. कोकणवासीयांसह शिवसैनिकांची सुनामी जैतापुरात धडकेल आणि या अणुऊर्जा प्रकल्पाला कायमचेच ‘चले जाव’ करण्यात येईल, असेही उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला ग्रामस्थांचा प्रचंड विरोध असूनही हा प्रकल्प उभारण्यासाठी सरकारची दडपशाही सुरू आहे. जैतापूर ग्रामस्थांच्या भावना जाणून घेण्यासाठी व लढ्याची पुढील दिशा ठरविण्यासाठी आज शिवसेना भवन येथे बैठक झाली. या बैठकीत विविध संघटनांसह कोकणातील शिवसेनेचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते. जैतापुरातून मोठ्या संख्येने मच्छीमार, शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी त्यांची आस्थेने विचारपूस केली. तुमच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना अखेरपणे लढेल आणि अणुऊर्जा प्रकल्पाला कायमची मूठमाती दिली जाईल असे वचनच उद्धव ठाकरे यांनी त्यांना दिले. दोन अणुऊर्जा प्रकल्पांमुळे जपानमध्ये विध्वंस झाला आहे. हे भीषण वास्तव पाहत असतानाही अणुऊर्जा प्रकल्प आणणारच असा अट्टहास का केला जात आहे? सरकार सुखासमाधानाने राहणार्‍या कोकणवासीयांच्या जीवावर का उठले आहे, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. जैतापूरवासीयांना हा प्रकल्प नकोय तर तो शिवसेनेलाही मान्य नाही. माझ्यासह शिवसेनेचे खासदार, आमदार, नगरसेवक व कोकणवासीय मुंबईकर जैतापुरात धडक देऊन जनतेची ताकद दाखवून देतील आणि आम्ही एकजुटीने सरकारला पळता भुई थोडी करू असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. जसे डाऊ, नॅनो, सेझ हे प्रकल्प जनतेच्या विरोधामुळे रद्द करावे लागले तसा जैतापूर प्रकल्पही रद्द होणारच असा विश्‍वास शिवसेना विधिमंडळ पक्षनेते सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. यावेळी शिवसेना नेते दत्ताजी नलावडे, आमदार विनोद घोसाळकर, राजन साळवी, परशुराम उपरकर, दीपक सावंत, शिवसेना सचिव विनायक राऊत उपस्थित होते. ग्रामस्थांच्या वतीने राजन साळवी, जैतापूर जनहित समितीचे अध्यक्ष प्रवीण गवाणकर व जैतापूर संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रकाश वाघधरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. * जैतापूरमधील दडपशाही थांबविण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटले होते. या भावनांचा गंभीरपणे विचार करू असे सांगणारे मुख्यमंत्री आता अमरावतीत शिवसेनेचा जैतापूर विरोध मावळला आहे असे सांगत आहेत. स्वच्छ आणि पारदर्शी कारभाराचा दिवसरात्र गळा काढणारे मुख्यमंत्री खोटारडे आहेत हे दिसून आले. * कोकणवासीयांवर दडपशाही करण्यापेक्षा हिंमत असेल तर सरकारने अणुऊर्जा प्रकल्प नक्षलवादी भागात नेऊन दाखवावा. * सुपारी घेऊन हा प्रकल्प राबविण्यासाठी आटापिटा करणार्‍या नारायण राणेंची सुपारी कशी कातरायची आम्हाला माहीत आहे. * विकासाच्या आड आम्ही नाही पण जनतेचे मुडदे पाडून होणारा विकास आम्हाला मुळीच मान्य नाही.

In reply to by अविनाशकुलकर्णी

* सुपारी घेऊन हा प्रकल्प राबविण्यासाठी आटापिटा करणार्‍या नारायण राणेंची सुपारी कशी कातरायची आम्हाला माहीत आहे. काल श्रीकांत सरमळकरानी काही टीप दिली असेल का ?

In reply to by अविनाशकुलकर्णी

अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर जे म्हणले(मटा दुवा) ते मला पटंतं बा. बाकी चालूं द्या. बाबुराव :)

In reply to by अविनाशकुलकर्णी

अविनाशकुळकर्णींचा इतका प्रदीर्घ प्रतिसाद तितकाच प्रदीर्घ श्वास घेऊन वाचावयास सुरूवात केली, तोच लक्षात आले की इथे कुठल्यातरी वर्तमानपत्रातील बातमी डकवण्यात आलेली आहे. अविनाशकुळकर्णी किमानपक्षी ह्या बातमीचे स्त्रोत सांगून आम्हा येथील वाचकांना, व त्या वर्तमानपत्राला उपकारीत करतील काय?

त्याच्या व सेनेच्या अथक परिश्रमामुळे कोकणात गॅस वरुन वीज निर्मीतीचा एन्रॉन सारखा यशस्वी प्रकल्प साकारला गेला आहे.त्यामुळे त्याचे विचार सर्व सामान्य लोकाना महत्वाचे वाटतात.उध्दव ठाकरेना महाराष्ट्रातील प्रश्नांबद्दल चौफेर माहिती आहे. सत्ता मिळाल्यावर ते त्याचा योग्य उपयोग करुन महाराष्ट्र सुजलामसुफलाम बनवु शकतील.त्याच्या कार्यकिर्दीमध्ये शिवसेनेने जी चौफेर मुसंडी मारली आहे त्यावरुन आगामी निवडनुकीत शिवसेनेच्या जागा दोन्ही हाताच्या बोटावर नक्कीच मोजता येतील.

In reply to by कुंदन

>> बाकी रिबेका मार्क ने काय जादु केल्ती काय माहित एन्रॉनच्या वेळी. +100

In reply to by वेताळ

युवराजांनी घोषित केले होते की, विरोध हा अणुऊर्जेस नसून जोपर्यंत तेथील लोकांचा विरोध आहे, तिथपर्यंतच आहे. पण जपाननंतर त्यांचा नूर पालटलासा वाटतो. त्यांचा विरोध आता या विनाशकारी, अतिभयंकर ऊर्जा स्त्रोतासच आहे. अर्थात ते स्वतः असे म्हणाले नसले तरी दिवाकर रावतेंनी साधारण अशीच प्रतिक्रिया काकोडकरांच्या भाषणानंतर दिली होती. आणि ज्या दिवशी शिवसेनेतील नेत्यांमधे स्वतःच विचार करण्याची व मांडण्याची वेळ येईल त्या दिवशी मातोश्रीचे प्रस्थच संपेल हे काय शेंबडं पोर देखील सांगेल. हलके अवांतरः मातोश्रीवर तर म्हणे आता चुलीवर स्वयंपाक होतो, कारण एलपीजीचाही स्फोट वगैरे होतो. फुकणीने फुंकून फुंकून तर मोठ्या साहेबांचे गाल बाहेर आले नसावेत??? भारी समर्थ

मला अबू हत्ती वाले ह्यांचे जैत पूर विषयी मत जाणून घ्यायचे आहे . कुणास अधिक माहिती असल्यास कृपया द्यावी . हा प्रकल्प व फक्त महाराष्ट्राचा आहे .उर्वरित देशाची त्याचा संबंध नाही अश्या थाटात उर्वरित भारतातील विविध पक्ष व नेते मंडळी वागत आहेत .नाही म्हणायला जयराम ह्यांनी आपले मत नोंदवले पण इतर राष्ट्रीय पक्ष कमालीची उदासिनता दाखवत आहेत . अवांतर कोकणात आता जमिनी विकत घेणे घेणे शक्य नाही पण एखादे घरकुल घेतले तर फ्रेंच मंडळीना भाड्याने देता येईन ,असा व्यापारी विचार करीत आहोत ( कॉलेजात फ्रेंच जुजबी शिकलो आहे व .बायकोला समजते ). तूर्त हा प्रकल्प यशस्वी होणार का अरबी समुद्रात रामदास बोटी प्रमाणे डुबणार ह्यावर आमची गृह खरेदी अवलंबून राहीन .

प्रदीर्घ प्रतिसाद शिवसेनेचे जैतापूर प्रकल्पाला ‘चले जाव’! जपानसारखा विनाश कोकणात होऊ देणार नाही मुंबई, दि. 12 (विशेष प्रतिनिधी) - उध्द्वव ठाकरे म्हटले कि शिवसेना म्हटले कि सामना हे कुठल्याहि नेट साक्षरास कळु शकते.. असो हे वृत्त" सामना" चे क्व्यापि पेस्त आहे

अनिल काकोडकर जे म्हणले(मटा दुवा) ते मला पटंतं बा. बघु यात सुनामी आली तर आपली किति तयारी आहे या वर काकोदकर काय म्हनतात

In reply to by पिंगू

मी काही जैतापूर प्रकल्प होयला हवा या बाजूने लिहीलेले नाही आणि आत्ता देखील तो उद्देश नाही. मात्र ही कोण जी संघटना आहे ती केवळ राजकारण समजतच राजकारण म्हणून या प्रकल्पाला विरोध करत आहे असे पहील्याच पानावरील दिलेले "३ हेतू" वाचल्यावर वाटते. त्यांनी अनेक मुद्दे नंतरच्या पानावर जरी मांडले असले तरी, "फ्रेंच कंपनीकडे" ज्यात फ्रेंच सरकार देखील भागीदार आहे, कंत्राट दिलेले असताना, "अमेरिकेच्या भांडवलशाहीस काही करून" कसे पैसे करता येतील हे समजले नाही. (हे दुवा दिलेले तसे आहे का नाही ते माहीत नाही, पण) अशा मुद्यांमुळे आंदोलन जरी प्रामाणिक असले, तरी त्याची विश्वासार्हता देखील कमी होऊ शकते (की हा राजकारण्यांनीच वरकरणी तयार केलेला विरोध आहे का). तसेच मूळ उद्देशाला त्यामुळे मूठमाती मिळू शकते असे वाटते.

अणुप्रकल्प हा समुद्रापासून लांब न्यावा असे म्हणणार्‍यांनी हे समजून घ्यावे की अणूप्रकल्पासाठी जवळ पाण्याचा प्रचंड साठा असावा लागतो. अणूउर्जेतून निर्माण होणारी प्रचंड उष्णता थंड करण्यासाठी. भारतात ती शक्यता समुद्राजवळ हीच आहे. आता असा प्रकल्प हा जैतापूरला करावा की नाही हा वादाचा विषय आहे. पण तिथे केला नाही तरी कुठेतरी करावाच लागणार. त्सुनामी, भूकंप हे रोजरोज होत नाहीत. एकदा तो जैतापूरला नाही, असे झाले की भारतातले कुठलेच राज्य तो स्वीकारणार नाही, बहुतांशी अपप्रचारामुळे. मग दुसरा पर्याय हा वाढत्या विजेच्या तुटवड्याचा सामना करा. मग लोड शेडिंग बद्दल बोललात तर सरकार जैतापूर प्रकल्पाच्या विरोधकांकडे बोट दाखवेल. चॉईस इज युवर्स!

In reply to by तिमा

अणूउर्जेतून निर्माण होणारी प्रचंड उष्णता थंड करण्यासाठी.
बरोबर. अणुइंधनाच्या एका रॉडला(~ १२०० डि. से. तापमान कायम ठेवायला) ताशी २८ टन पाणी लागते. एका रिअ‍ॅक्टरमधे साधारणतः १५००+ रॉडस असतात. सहसा अणु प्रकल्प उभारायला येणार्‍या खर्चाचा विचार करता, एका प्रकल्पात एका पेक्षा जास्त (२ किंवा अधिक) रिअ‍ॅक्टर असतात. अशा परिस्थितीत पाणी पुरवठा चटकन आणि हमखास करू शकणारा समुद्र हा एकच स्त्रोत असतो. शिवाय तयार झालेल्या वीजेच्या वितरणात कमीत कमी खर्च यावा म्हणून अणुप्रकल्प नागरी वस्तीच्या जवळ असतो(५० किमी). दोन्ही बाबींचा विचार करता, जर देशाच्या अंतर्गत भागांत अणुप्रकल्प उभारयचा म्हटला तर त्या प्रकल्पाची पाण्याची गरज नागरी वस्तीच्या पाणी पुरवठ्यावर प्रचंड ताण आणेल.

जैतापूर प्रकल्प चळवळीबद्दल काही अधिक माहिती: कोकण अणुऊर्जा प्रकल्पविरोधी समितीची वेबसाइट: http://www.nonukekokan.org/ आजची बातमी: मटा. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7697319.cms http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7697270.cms http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7693739.cms गोषवारा: या अणुभट्ट्या प्रकल्पात समुद्राचं पाणी वापरतात. तसं सतत वापरल्यामुळे अणुस्फोटाचा धोका वाढू शकतो. 'प्रकल्पासाठी समुद्राचे पाणी या भट्ट्या वापरत असून तसे सातत्याने होत राहिल्यास चेर्नोबिलसारखी दुर्घटना होऊ शकते.-अमेरिकन संस्थेतील प्राध्यापक (वरच्या बातमीनुसार)' ....(चेर्नोबिल अपघात समुद्रपाणीवापरामुळे झाला होता?) एका अणुभट्टीचा स्फोट/गळती झाली आहे. दुसर्‍या अणुभट्टीचं वातावरण नियंत्रण बंद पडलं आहे, त्यामुळे तिलाही धोका आहे. त्या एका मोठ्या स्फोटानंतरही छोटे धक्के बसणं चालू आहे, त्यामुळे धोका आणखी वाढला आहे. या परिस्थितील प्रकल्पांशी आपण जैतापूरची तुलना करू शकतो. शिवाय, टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सेस चा रिपोर्ट जैतापूर प्रकल्पाच्या बाजूने दिलेला नाहीये. गंभीर गोष्ट म्हणजे, सरकारने त्याच्याकडे लक्षच दिलं नाहीये. NPCIL Director ने हा रिपोर्ट अवैज्ञानिक असल्याचं म्हटलं आहे. (सरकारची भूमिका संशयास्पद दिसते.) संदर्भः http://www.nonukekokan.org/ सर्वसाधारण चर्चा, आंदोलनांमध्ये सरकारची भूमिका लोक, तज्ञ, शास्त्रज्ञ, आंदोलक यांचं शंकासमाधान करण्याची दिसत नाही (शंका तर्कशुध्द असूनही). 'तुम्ही तुमच्या जमिनीची भरपाई घ्या, प्रकल्पाला काही होत नाही.' अशा प्रकारची भूमिका दिसते. ही वेळ मारून नेण्याची नोकरशाही भूमिका नाही काय? वेळ कशासाठी मारून नेली जात आहे, त्याची कारणं अनेक, गुंतागुंतीची असू शकतील. सरकारने प्रकल्पाबद्दलच्या योग्य शंकांचं निरसन केलंच पाहिजे. त्याच्या कल्याणकारक / अकल्याणकारक बाजू शास्त्रीय विश्लेषणाने/शास्त्रीय चर्चेने समजून घेतल्या पाहिजेत, इतरांना समजून दिल्या पाहिजेत. जर त्यातून प्रकल्पनिर्माण देशासाठी सगळ्या बाजूंनी (आर्थिक, सामाजिक, निसर्गचक्राच्या दृष्टीने, भविष्यकालीने ऊर्जेच्या गरजेसाठी, आंतरराष्ट्रीय राजकारणातील वर्तमान व भविष्यकालीन सामर्थ्यवाढीच्या दृष्टीने (प्रकल्प १००००मेवॉ.चा आहे, त्याच्याशी अमेरिकन अणुकरार व फ्रेंच कंपनीच्या कराराचा संबंध आहे)) गरजेचा आहे असं दिसलं तर तो प्रसंगी गावं हटवूनसुध्दा करायला हवा. आणि जर तो तसा कल्याणकारक नाही असं लक्षात आलं तर काही झालं तरी तो करता नये. ही शहर, खेडी, देश, स्थानिक लोक, उद्योग यांचं कल्याण करण्याच्या दृष्टीने गरजेची/योग्य भुमिका नाही काय? पण सरकार अशी भूमिका घेताना दिसत नाहीये. त्यामुळे जैतापूर प्रकल्प चांगला असूही शकेल, पण तो अशा हेकट पध्दतीने राबवला जाणार असेल, तर (हेकटपणामुळे दुसरी बाजू लक्षात घेतली न गेल्यामुळे) तो खरंच भयंकर (उदा. जपानची सद्यस्थिती) ठरू शकतो.

आत्ताचे प्रतिसाद बघून माहिती टाकाविशी वाटली. प्रकल्प गरजेचा'च' आहे, असं गृहीत धरण्यासाठी; हे गृहीत धरणार्‍यांकडे काही विशेष माहिती आहे काय? तशी असेल तरच, तो इथे झाला नाही तर इतर ठिकाणी व्ह्यायला तसाच विरोध होईल की नाही या मुद्द्यावर चर्चा युक्त आहे. तो समुद्राजवळ असण्याची गरज याबद्दलही हीच गोष्ट लागू आहे. सध्या सरकार व आंदोलक यांतील वादाचं स्वरूप बाहेरून जमीन सरकारजमा होणं एवढंच दिसत असलं तरी त्याचं मूळ (तात्विक/शास्त्रीय) हे आहे की, १०,००० मेवॉ. एवढ्या मोठ्या अणुउर्जा इन्स्टॉलेशन एकाच ठिकाणी करायची गरज आहे काय? मग आंदोलक म्हणतात, करणार तर करा पण आमच्या इथे नको वगैरे.

जेतापुर प्रकलप होणे जरुरिचेच आहे परन्तु नुकतेच जपानचे जे वाटोळे झाले ते पाहता योग्य जागा निवडावि व लोकान्चे पुनरव्रसन समाधान कारक करुन मगच समुद्रापासुन दुर प्रकलप करावा. विनित

http://www.misalpav.com/node/16592 म. टा. वरचा आणखी एक लेख http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7689515.cms हा सारांश : धडा फुकुशिमाचा... डॉ. बाळ फोंडके, ज्येष्ठ वैज्ञानिक अणुभट्टीचा गाभारा थंड करण्यासाठी तीन-चार आपत्कालीन सुरक्षा यंत्रणा प्रस्थापित केलेल्या असतात. पहिली यंत्रणा बंद पडली तर दुसरी लगेच कार्यान्वित होते. तीही काही कारणानं आपदग्रस्त झाल्यास तिसरी, तिच्याही पाठी चौथी अशी व्यवस्था केलेली असते. जैतापूरमध्ये अशा चार संपूर्णपणे स्वतंत्र चौपदरी यंत्रणांचा अंतर्भाव करण्याची योजना आहे.

मी म्हणतो, देशाच्या (की राष्ट्राच्या?) आणि महाराष्ट्राच्या हितासाठी जैतापूरकरांनी एवढा त्याग करावाच !!

In reply to by नितिन थत्ते

मी म्हणतो, देशाच्या (की राष्ट्राच्या?) आणि महाराष्ट्राच्या हितासाठी जैतापूरकरांनी एवढा त्याग करावाच !! नक्की कसला त्याग करावा?

In reply to by विकास

१. आपल्या जमिनी (जी काय नुकसानभरप्पई मिळेल, न मिळेल ती घेऊन) द्याव्या. २. किरणोत्साराचा धोका सहन करावा. ३. अपघात झाला तर जे काय होईल त्याची तयारी ठेवावी.

In reply to by नितिन थत्ते

अजून एक... तयार होणार्‍या उर्जेचा स्वतःच वापर न करता, ती इतरांसाठी आहे, हे ध्यानात ठेवावे. :-)

माय बाप सर्कार समोर एक योजना आहे, ज्यांना जैतापुर प्रकल्प हवा आहे त्यांना जैतापुर ला वसवा, आणि ज्यांना जैतापुर प्रकल्प नको आहे त्यांना त्यांच्या जागी वसवा, (पुनर्वस्ना साठी सर्व तो परी मदत मिळेल,)

In reply to by VINODBANKHELE

पुनर्वस्ना साठी सर्व तो परी मदत मिळेल मी याला असे वाचले. पुनर्वस्त्रासाठी सर्वांना 'परी' मिळेल.

भारताने अरेवा शी फक्त अणुभट्टी बांधण्यापुरता करार केला नसून सर्वात महत्वाचे म्हणजे संशोधनासाठी अनेक करार झाले आहे . आपल्या देशात थोरियम विपुल प्रमाणात सापडते .त्यापासून उर्जा निर्मितीचे प्रयत्न भारत अनेक दशकांपासून करत आहे . पण त्याला यश आले नाही .जगातील सरावत प्रगत टेक्नोलोजी असलेल्या फ्रेंच कंपनीच्या मदतीने जर ह्यात आपल्याला यश मिळाले तर आपल्या उर्जेची कमतरता संपून जाईन ( अमेरिकेची आण्विक करार करतांना आपल्यावरची आण्विक अस्पृश्यता त्यांनीच पुढाकार घेऊन काढून टाकली .ह्याचा फायदा घेण्याची हीच संधी आहे . आपली चांद्रमोहीम ही जगातील सर्वात स्वस्त मोहीम होती . जपान मध्ये घोळ झाला म्हणून भारताने अणुभट्टी उभारताना विचार करावा हे मला पटत नाही . मुळात चेबार्लीन दुर्घटने नंतर आपण काही दशक पूर्वी रशियाकडून अणुभट्टी उभारली .तेव्हा वाद का झाला नाही ? आता त्या अणु भट्टीतून नियमित अणु उर्जा मिळत असताना जपानच्या निम्मिताने त्या अणुभट्ट्या अजून चालू आहेत त्या विरुद्ध का बरे कोणीच बोलत नाही .? आणी जगातील सर्वात प्रगत तंत्रन्यान असलेल्या फ्रेंच कंपनीच्या निम्मिताने का होत आहे .? भारताने आज पर्यत रशिया बरोबर संयुक्त प्रकल्प यशस्वी केले .मग फ्रेंच लोकांबरोबर का करू शकत नाही . परदेशी नोकरी /पैसा नाकारून अगदी धर्माध पाकड्या कादीर खानच्या विरुद्ध व्यक्तिमत्व असलेले अनिल काकोडकर जेव्हा कळकळीने एखादी गोष्ट सांगतात तेव्हा ते आपल्याला का पटत नाही . का अचानक आपल्याला त्यांच्या पेक्षा जास्त ह्या विषयात समजायला लागले आहे .

In reply to by निनाद मुक्काम …

भारताने अरेवा शी फक्त अणुभट्टी बांधण्यापुरता करार केला नसून सर्वात महत्वाचे म्हणजे संशोधनासाठी अनेक करार झाले आहे . ती कंपनीपण बर्‍यापैकी बुडीत खात्यात आहे आणि फ्रान्स सरकारच्या भागिदारीमुळे तग धरून आहे असे ऐकले होते. त्यामुळे हे दुसरे एन्रॉन होऊ शकेल का असे जर वाटले तर त्यात काही गैर नाही. मात्र तसे प्रश्न विचारल्यावर त्याची स्पष्टीकरणे न देता विरोधाला नुसता विरोध करणे हे गैर आहे. अमेरिकेची आण्विक करार करतांना आपल्यावरची आण्विक अस्पृश्यता त्यांनीच पुढाकार घेऊन काढून टाकली . आज विकीलीक्स संदर्भाने आलेल्या बातमीप्रमाणे युपिएसरकारने तो करार घडवून आणण्यासाठी (आणि सरकार वाचवण्यासाठी) लाच दिल्याचे सिद्ध झाले आहे... जपान मध्ये घोळ झाला म्हणून भारताने अणुभट्टी उभारताना विचार करावा हे मला पटत नाही . जपान मध्ये दुर्घटना झाली नसती तरी देखील भारताने अणुभट्टी उभारताना विचार करावा असे म्हणावेसे वाटते. "विचार करावा" म्हणले आहे, "विरोध करावा" असे नाही.... मुळात चेबार्लीन दुर्घटने नंतर आपण काही दशक पूर्वी रशियाकडून अणुभट्टी उभारली .तेव्हा वाद का झाला नाही ? चेर्नोबिल दुर्घटना १९८६ साली झाली. त्यावेळेस मिळणारी माहीती आणि सरकारी पकड खूप जास्त होती. नव्वदच्या दशकानंतर जनतेला अधिक माहीती अधिक स्त्रोतातून समजू लागली आहे. त्यात निर्वासितांचे आत्ता पर्यंत झालेले हाल आणि अनुभव महत्वाचेच. कोकणात इतरही अनेक पद्धतीने पर्यावरणीय र्‍हास हा राजकीय आशिर्वादाने होत आहे. त्यात खाणी आणि औष्णीक प्रकल्प आहेत... तसेच भ्रष्टाचार हा कितीपटीने वाढला आहे हा भाग वेगळाच. आधी भ्रष्टाचार वाईट पण ज्या पातळीवर होत आहे त्यातून कुठलेही काम हे क्वालीटी ठेवून होऊ शकेल का या बद्दल संशय निर्माण होऊ शकतात.... परदेशी नोकरी /पैसा नाकारून अगदी धर्माध पाकड्या कादीर खानच्या विरुद्ध व्यक्तिमत्व असलेले अनिल काकोडकर जेव्हा कळकळीने एखादी गोष्ट सांगतात तेव्हा ते आपल्याला का पटत नाही . प्रश्न काकोडकर आहेत का भाभा का नारायण राणे आहेत हा नाही. प्रश्न या सर्व प्रकल्पात किती पारदर्शकता आहे याचा आहे, जनतेला विश्वासात घेतले जात आहे का, हा आहे.

In reply to by विकास

सहमत आहे. अणुभट्ट्यांमध्ये अमुक अमुक प्रकारची काळजी घेतलेली असते या माहितीचे मूल्य किती हे ठरवता येत नाही. अमेरिकेत आणि इतर पाश्चात्य देशांत जी काळजी घेतली जाते ती भारतात घेतली जातेच असे नाही हे भोपाळ घटनेवरून दिसून आलेलेच आहे. विचार करणे गरजेचेच आहे.

अमेरिकेची आण्विक करार करतांना आपल्यावरची आण्विक अस्पृश्यता त्यांनीच पुढाकार घेऊन काढून टाकली . तुम्हाला ह्या चा अर्थ लागला नाही असे दिसत आहे . भारताने सी ती बी ती करारावर सही न केल्याने त्यांच्यावर जगभरातील अण्वस्त्र देश व युरेनियम पुरवठा करणारे देश ह्यांचा एक संघ आहे त्यांची मान्यता नव्हती त्यामुळे आपल्यावर अनेक मर्यादा होत्या . पण बुश साहेबांनी त्यांच्या देशातील कंपन्यांचे चे उखळ पांढरे करण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेऊन .स्वतःहून वजन खर्च करून भारताला ह्या संघातून मान्यता मिळवून दिली . भारत नेमक्या ह्याच संधीचे वाट पाहत होता .( माझ्या मते जेव्हा ही मान्यता मिळाली तेव्हा जगभरातील देशांची व्यापार करण्याचा मुक्त परवाना मिळाला ) आता खरे म्हणजे अमेरिकेची
आपल्याला गरज संपली . पण धूर्त पणाने आपण त्यांना करार झाल्यावर प्रत्यक्ष व्यापार करतांना त्यांच्या कंपन्यांच्या मर्मावर बोट ठेवले .( नुकसान भरपाईची मुद्दा ) हा मुद्दा त्या कंपन्या कधीच पूर्ण करू शकणार नव्हत्या कारण ह्यांना आपल्या देशात भोपाल सारखे पळ काढण्याची सवय होती .व नुकसान भरपाई करतांना त्यांचे दिवाळे निघाले असते .( बिपी ला अमेरिकेत नुकसान भरपाई देतांना तोंडाला फेस आला ) अरेवा हे फ्रेंच कंपन्यामध्ये बडे नाव . ह्या कंपन्यावर आर्थिक तंगी आली कारण मंदीमुळे अनेक अविसित राष्ट्रांनी ह्यांच्या सोबतचे करार मोडले .व कंपनीचे प्रशासन पण तेवढेच जबाबदार होते . ह्याच मंदीत भारतने बाहेरून शस्त्र खरेदी करण्यात जगात पहिला नंबर पटकावला .ह्या कंपनीचा हात दरडी खाली आहे हे पाहून भारतने ह्यांना अशक्य अश्या अटी घातल्या . व ह्यांनी त्या मान्य केल्या ( ह्यांचे प्रगत तंत्रन्यान हे त्यांचे बलस्थान ) अर्थात भारतच्या ह्या कराराने ह्या कंपनीचे भले होणार असल्याने त्यानी जास्त कटकट न करता आपल्या अटी मान्य केल्या . अहो विकास जी आणि भारताने येथे तुम्हाला दिसून येईन नुकतेच २०१० मध्ये भारताने रशियासोबत करार केला तेव्हा रशिया भारताला १६ भट्या बांधून देणार आहेत . त्यावेळी तर सगळी माहिती होती ना आपल्याला . ह्या करारात काकोडकर ह्यांचा सल्ला गोड मानल्या गेला . जनतेने काय राजकारणी लोकांनी सुद्धा प्रश्न विचारले नाही. अमेरिकेने स्वताचे वजन खर्ची करून भारताला ही मान्यता मिळवून देऊ नये म्हणून त्यावेळच्या त्यांच्या विरोधी पक्षाने खूप प्रयत्न केला . मी देत असलेल्या लिंक क्रमाने पहा .1 मध्ये पहिले दोघा कराराच्या बाजूने बोलतात .पण ३ रा मात्र कळीचा मुद्दा उपस्थित करतो .त्याचा मुद्दा ही लिंक स्पष्ट होईन . सी ती बी ती वर सही न केल्याने भारत लष्करी अणु उर्जा चा कार्यक्रम करू शकतो .कोणीही आपल्याला थांबवू शकत नाही . मात्र व्यापाराच्या लोभापायी भारताला अमेरिकेने हे मिळवून दिले आपल्या परराष्ट्र धोरणास व काकोडकर ह्यांना सलाम

आम्हाला जैतापूरला अणूउर्जा प्रकल्प व्हावा असे वाटते...तसेच आम्हाला अणूउर्जेतले ** काही कळत नसल्याने आमचे मत विचारात घेऊ नये असेही सुचवावेसे वाटते.

आज सकाळी ९ वाजता, पुण्यात लोकायत ह्या संस्थेने जैतापूर अणुप्रकल्प रद्द व्हावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. त्यांनी त्यांच्या ब्लॉगवर ह्या विषयी सविस्तर लेख लिहिला आहे. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प रद्द करा!!

In reply to by मनिष

लोकायतच्या आंदोलनाचा संबंध कळला नाही... :( जैतापूर रत्नागिरी जिल्ह्यात जर येत असेल तर यांनी पुणे जिल्हाधिकार्‍याच्या कार्यालयासमोर धरणे का धरले?

In reply to by विकास

बहुधा पुप्याला आपले शक्तीप्रदर्शन करायचे असेल म्हणुन.