✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

नवे धडे

व
विजुभाऊ यांनी
Wed, 03/16/2011 - 14:02  ·  लेख
लेख
शासनाने शिक्षणाला स्कीलबेस्ड करायचा विचार चालू केला आहे. त्या नुसार अभ्यासक्रम येतील धडे येतील नव्या धोरणानुसार इयत्ता पहीलीच्या भाषा शिक्षणाच्या पुस्तकातील काही धडे. धडा पहीला. उद्देश : विद्यार्थ्याना "अ " कार आणि "आ"कार याची समज यावी. रमण भरभर चल अकबर लवकर चल अकबर ,रमण , कमल लवकर ,भरभर चला मायकल हात धर. बबन चखणा आण रमण ताट आण राजर पाव गरम कर पाव एकदम कडक कर अकमल फडका मार फडका एकदम साफ मार. कमल चखणा ताटात टाक. करतार चखणा ताटातच खा. अकबर गलास आण शबनम गलास भर रमण नवटाक मार . रमण वमन कर. शिक्षकांसाठी सूचना : शिक्षण हे जास्तीत जास्त लोकांपर्यन्त पोहोचावे तसेच शिक्षणाचा उपयोग विद्यार्थ्याला रोजच्या आयूष्यात व्हावा यासाठी स्कीलबेस्ड शिक्षण या धोरणांतर्गत शक्य तेथे शिक्षकानी प्रात्यक्षीकांवर भर द्यावा. कार्यानुभव : या पाठावर आधारीत नाट्यछटा करा डीस्क्लेमरः हे लिखाण एक स्वैर कल्पना आहे.
  • नवे धडे २

Book traversal links for नवे धडे

  • नवे धडे २ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वावर
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
5817 वाचन

💬 प्रतिसाद (26)

प्रतिक्रिया

विजु काजु खा.

पर्नल नेने मराठे
Wed, 03/16/2011 - 14:21 नवीन
विजु काजु खा. कुंदन चुचुला वंदन कर. =))
  • Log in or register to post comments

एय

रमताराम
Wed, 03/16/2011 - 14:23 नवीन
हुशार विद्यार्थ्यांनी अशी घाई करायची नाय हां. आजून 'उ'काराचा धडा शिकवला नाहीये गुर्जींनी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे

रमता हल्ली गमजा मारतो

पर्नल नेने मराठे
Wed, 03/16/2011 - 14:25 नवीन
रमता हल्ली गमजा मारतो ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

ईकार सुद्धा शिकवला नाही...

अवलिया
Wed, 03/16/2011 - 15:00 नवीन
ईकार सुद्धा शिकवला नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे

डायरेक्ट जोडक्षर चुच्स

पुष्करिणी
गुरुवार, 03/17/2011 - 21:01 नवीन
डायरेक्ट जोडक्षर चुच्स ? पुढचा पोर्शन येतो म्हणून असं चालणार नाही ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे

पुढचा पोर्शन ना....

कुंदन
Sat, 03/19/2011 - 23:45 नवीन
हो ना , नाही तर जोडक्षर येतात अन बेसिकमध्ये लोच्या आहे असं व्हायच.... थोडक्यात काय पुढचे पाठ , मागचे सपाट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी

रमण यमन गा

अवलिया
Wed, 03/16/2011 - 15:01 नवीन
रमण यमन गा
  • Log in or register to post comments

मला सगळ समजल.टारझन व परा या,

वपाडाव
Fri, 03/18/2011 - 11:46 नवीन
मला सगळ समजल. टारझन व परा या, जागा भरा. कागद वाट पाहतय. -वपाडावला याच बलावण हय का ? (चखणा बनवणारा)
  • Log in or register to post comments

इजु भौ....

कुंदन
Wed, 03/16/2011 - 18:36 नवीन
प्रौढ शिक्शणाचे क्लासला जाता का?
  • Log in or register to post comments

जात होते

रमताराम
Fri, 03/18/2011 - 13:46 नवीन
पण पुरेसे शिक्षण झाल्याबरोबर पहिले छूट 'त्या शिक्षकाविरुद्ध अर्जी देऊन त्याला ढिसमिस करून टाकला'* विजुभाऊंनी, आणि आता स्वतःच क्लासेस चालू केले आहेत. *वार्‍यावरची वरात मधल्या रामाकडून साभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

पण पुरेसे शिक्षण झाल्याबरोबर

परिकथेतील राजकुमार
Fri, 03/18/2011 - 14:02 नवीन
पण पुरेसे शिक्षण झाल्याबरोबर पहिले छूट 'त्या शिक्षकाविरुद्ध अर्जी देऊन त्याला ढिसमिस करून टाकला'* विजुभाऊंनी, आणि आता स्वतःच क्लासेस चालू केले आहेत.
ओह्ह ! असे आहे होय. मला वाटले तिकडच्या माजोरड्या शिक्षकांशी आणि मुख्याध्यपकाशी पटले नाही म्हणुन विजुभौंनी स्वतःची वेगळी शाळा उघडली का काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

प्रकाटाआ

रमताराम
Fri, 03/18/2011 - 13:48 नवीन
दोआप्रकाटाआ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

धडा छानच..

पद्मश्री चित्रे
Wed, 03/16/2011 - 18:58 नवीन
कमल नमन कर च्या चालीवरिल धडा सही.. आणि इंग्लिश मधील गोपाल्,सीता,यास्मीन पण आठ्वले... पण असले धडे शिकवायला गुरुजी पण तुमच्यासारकेच हवे ना.. अनुभवी, मनापासून (असे )धडे शिकवणारे..
  • Log in or register to post comments

विजु भौ!!!... होळीची तयारी

मृगनयनी
Fri, 03/18/2011 - 10:26 नवीन
विजु भौ!!!... होळीची तयारी सुरु केलेली दिस्तेय! अकबर... शबनम... सगळ्यान्नाच यावेळी रन्गवायचं ठरवलेलं दिस्तय! ;) ;) ___________________ रमण यमन गा! =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) क ह र !!! _/\_ टार्या... कुठे आहेस रे!!!!! ;) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मश्री चित्रे

:)

टारझन
Fri, 03/18/2011 - 18:43 नवीन
भुर्जी खातोय भुर्जी .. डबल भुर्जी ... तुला खायची का ? ए भिकारचोट इलियास , एक डबल भुर्जी ला रे .. नयनी मॅडम के लिये ? ये नयनी मॅडम बहोत बडी मॅडम :) व्हाईट कलर है ;) - टमटम बार मनिजर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

गंमतीदार शाळा

पैसा
Wed, 03/16/2011 - 18:59 नवीन
पुढचे धडे पटापट द्या. पहिला धडा बर्‍याचजणांना आधीच पाठ आहे!
  • Log in or register to post comments

शाळा काय ड्यान्सबारमध्ये

धमाल मुलगा
गुरुवार, 03/17/2011 - 21:28 नवीन
शाळा काय ड्यान्सबारमध्ये भरलीय काय? :D
  • Log in or register to post comments

शाळा काय ड्यान्सबारमध्ये

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 03/17/2011 - 23:06 नवीन
शाळा काय ड्यान्सबारमध्ये भरलीय काय? धमुशी सहमत. :) शबनम,कमल, चखणा,गलास,नवटाक, आणि शेवटी वमन. काय चाल्लंय राव विजुभौ. हे कोणत्या शाळेतले धडे आहेत ? :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

ढ्यांसबारमधे जाण्यासाठीचे धडे

शिल्पा ब
Fri, 03/18/2011 - 06:11 नवीन
ढ्यांसबारमधे जाण्यासाठीचे धडे असावेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बाळा यमन गा.

सुबक ठेंगणी
गुरुवार, 03/17/2011 - 21:42 नवीन
नायतर चपला घाल.
  • Log in or register to post comments

वॉव ! ह्यो धडा शिकायला बालपन

नरेशकुमार
Fri, 03/18/2011 - 05:16 नवीन
वॉव ! ह्यो धडा शिकायला बालपन देगा देवा.
  • Log in or register to post comments

काय चाल्लंय राव विजुभौ. हे

विजुभाऊ
Fri, 03/18/2011 - 10:57 नवीन
काय चाल्लंय राव विजुभौ. हे कोणत्या शाळेतले धडे आहेत ? जीवनात शिक्षण उपयोगी पडावे म्हणून स्कीलबेस्ड शिक्षण द्यायचे ठरवलय. शिवाय रमण करतार अकबर राजर हे सगळे यालाच हवेत ना शबनम, कमल या महीला वर्गाचे प्रतिनीधीत्व करतात. पुढच्या धड्यांमध्ये आकार उकार ईकार या अनुसार इकबाल ,झुबेदा . पासकल, रसीकलाल , महादू वगैरे येतील पुढेमागे नन्हालाल अचोतानी , मायकेल व्हर्गीस ,दुर्वास शेकरू वगैरे ना आणेन. सर्वाना बरोबर घेउन जाणारे शिक्षण महत्वाचे
  • Log in or register to post comments

व्वा!

धमाल मुलगा
Fri, 03/18/2011 - 16:12 नवीन
सरकारी वटहुकुम अगदी तंतोतंत पाळताय म्हणा की. ;)
  • सर्व धर्मांना प्रवेश,
  • अल्पसंख्यांकांच्या आरक्षित जागा,
  • महिलांच्या ३३% आरक्षणाचा विचार,
  • नवटाक सारख्या गोष्टीतून कुटीरोद्योगाला चालना,
  • चखणा तिथूनच आणण्यातून गावच्या महिला बचत गटाच्या प्रकल्पाला मदत.
लै भारी! आम आदमी के साथ, विजुभाऊ (आय) का हाथ| - डी. मुलगाम्बरम्.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

विजु

कुंदन
Sat, 03/19/2011 - 15:38 नवीन
विजु भांग पाड. डॉन्या केस कापुन ये.
  • Log in or register to post comments

नशिब कोणी अजुन "कुंदन

Nile
Sat, 03/19/2011 - 23:57 नवीन
नशिब कोणी अजुन "कुंदन स्लिपींग पार्टनर हो" असं वाक्य नाही लिहलं ते! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

मुलानो गृहपाठ झालाय ना

विजुभाऊ
Tue, 03/29/2011 - 16:48 नवीन
मुलानो गृहपाठ झालाय ना व्यवस्थीत परवा परीक्षा आहे. पेपरला सर्वानी नीटच यायचे ( कोण रे तो नीट च्या ऐवजी नीप म्हणाला. अकबर्‍या....घेरे त्याला कोपच्यात...आणि त्याच्या जवळचे मटेरीयल जप्त कर)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा