Skip to main content

मराठी आमची रोजी रोटी

प्रकाशित मुखपृष्ठ
मराठी आमची रोजी-रोटी , बेचाळिस पिढ्यांसाठी कारखाने वरपले , सीटं बदलली, नोटवाल्या बाबाचा जयजयकार केलात, झोपडपट्टीत स्लिपांबरोबर १००० च्या नोटा-वाटप, तरीही मराठी आमची रोजी-रोटी विकास म्हणजे पन्नास लाखाची टोयाटो, विकास म्हणजे , लवासा, मुळशी आणि मावळ, विकास म्हणजे सिंचन विभागाचे कुरण , विकास म्हणजे ब्रिगेड स्थापना, तरीही मराठी आमची रोजी-रोटी पुतळे हलवा रात्रीचे उद्घाटन करा पहाटेचे , क्रेडीट घ्यायचे कुणी, अटी-तटी ची युती, दाढ्या कुरवाळा,जाती-पातीत पेटवा संघर्ष तरीही मराठी आमची रोजी-रोटी फायलींचा गठ्ठा , पि.ए. कडे सोन्याच पेन, एका शहरात गळे घालायचे, दुसर्‍यात गळे काढायचे, देव पाण्यात बुडवुन बसतात, कधीतरी 'पंत' प्रधान होतील म्हणुन, दात पडले, डोके सडले , काकांना म्हातार-चळ , पुतण्याकड माज, तरीही मराठी आमची रोजी-रोटी दर पावसाळ्यात गटारे तुडंब, दर उन्हाळ्यात लोड-शेडींग, नागपुरातल ऑफिस आयटी सेक्टर च जणु , विदर्भातला शेतकरी सावकारी पाशात, तरीही मराठी आमची रोजी-रोटी धान्य सडवा , दारु बनवा , गावोगावी बियर शॉपी, जमीनीच भुत मानगुटी, आरटीआय वाले जिवानिशी जातात, तुरडाळ , कांद्यात सामान्य गुंततात, अडते मात्र दुपारी, छानश्या बार मध्ये बसुन नोटा मोजतात तरीही मराठी आमची रोजी-रोटी तरीही मराठी आमची रोजी-रोटी तरीही मराठी आमची रोजी-रोटी

याद्या 2235
प्रतिक्रिया 12

लेखनविषय:
काव्यरस

कविता आवडली सुहास, पण आम्ही मराठी लोक अशा गोष्टींबद्दल काही वाटण्याच्या पलीकडे गेलो आहोत...